निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 05/01/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 12/01/2012
तक्रार निकाल दिनांकः- 26/11/2012 कालावधी 10 महिने, 14 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
प्रभारी अध्यक्षा – सौ.रेखा कापडिया.
सदस्या -- - सौ.माधुरी विश्वरुपे.
---------------------------------------------------------------------------------------
उत्कर्ष पिता बालासाहेब आरळकर. अर्जदार
वय -25 वर्षे,धंदा – व्यापार. अड.नितीन.श्री.खळीकर.
रा.सारस्वत नगर, हिंगोली.ता.जि.हिंगोली.
विरुध्द
मा.मॅनेजर, अड.जी.एच.दोडीया.
युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी लि.
दयावान कॉम्प्लेक्स,दुसरा मजला,
स्टेशन रोड, परभणी ता.जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) सौ.रेखा कापडिया. प्र.अध्यक्षा.
2) सौ. माधुरी विश्वरुपे. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.माधुरी विश्वरुपे.सदस्या.)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदारांच्या मालकीची MH-38/ E-939 (अपे पॅजो) गाडीची विमा पॉलीसी गैरअर्जदार यांचेकडे घेतली असून ता. 27/04/2011 रोजी सदर गाडी हनुमान बळीराम काळे माल वाहतुकीच्या कामासाठी वाशीम येथून सिमेंटच्या विटा घेवुन जात असताना अटोचे मागील डाव्याबाजूचे चाक ( टायर ) अचानक फुटल्यामुळे ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यामुळे अटो रोडवर पल्टी झाला. त्यामुळे अटोचे नुकसान झाले.सदर अपघाताची माहीती हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा केला, F.I.R. दाखल करुन गुन्ह्याची नोंद केली.
तक्रारदारांनी सदर घटनेची माहीती गैरअर्जदार विमा कंपनीला दिली.तसेच गैरअर्जदार यांचेकडे सदर गाडीची नुकसान भरपाई मिळण्याकरीता विमा प्रस्ताव दाखल केला. गैरअर्जदार यांनी मागणी केल्याप्रमाणे नुकसानीचे दुरुस्तीसाठीचे इस्टीमेट दिले. गैरअर्जदार कंपनीच्या सर्व्हेअर यांनी घटनेची चौकशी केली. त्याप्रमाणे गाडीची दुरुस्ती केली, सदर दुरुस्तीसाठी रक्कम रु 70,000/- एवढा खर्च आला.तक्रारदारांनी गैरअर्जदार यांना गाडीचा सर्व्हे करण्याबाबत वारंवार कळवले, परंतु कोणीही आले नाही. गैरअर्जदार कंपनीने ता. 15/10/2011 रोजी तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केला. तक्रारदारांनी शेवटचा सर्व्हेअर अहवाल व पॉलीसीची 4 क्रमांकाची अट मोडली असे कळवले.
गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणणनुसार तक्रारदारांच्या गाडीचा ता. 27/04/2011 रोजी अपघात झाला असून त्याबाबतची माहीती गैरअर्जदार यांचेकडे न दिल्यामुळे घटनास्थळाचा तसेच गाडीचा अंतीम सर्व्हे करणे शक्य झाले नाही.तक्रारदारांनी ता. 18/06/2011 रोजी विमा प्रस्ताव गैरअर्जदार यांचेकडे दाखल केल्यानंतर सर्व्हेअर श्री.सुनील पी.परळीकर यांची नियुक्ती केली.सर्व्हेअर यांनी शांती अटो हिंगोली यांचेकडे गाडीची तपासणी करण्याकरीता गेले असता सर्व्हे होण्याचे आधी गाडीची दुरुस्ती झाल्याचे आढळले सर्व्हेअर यांना गाडीच्या नुकसानी बाबतचा सर्व्हे करता आला नाही,त्यामुळे त्यांनी “ Nil ” असा रिपोर्ट दिला.
तक्रारदारांची तक्रार आणि गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांच्या गाडीचा ता.27/04/2011 रोजी अपघात होवुन गाडीचे नुकसान झाले ड्रायव्हर श्री.हनुमान काळे यांच्या पोलीसांनी घेतलेल्या जबाबानुसार अंदाजे एकलाख ते एकलाख पंचविस हजार एवढे गाडीचे नुकसान झाले. घटनास्थळ पंचनाम्या नुसार रु.1,00,000/- एवढे नुकसान झाले.तक्रारदारांनी गाडीची दुरुस्ती शांती अटो एजन्सीकडे त्याप्रमाणे शांती अटो एजन्सीने दिलेल्या दुरुस्तीचे अंदाजपत्रकानुसार रु.66,413/- एवढा गाडी दुरुस्तीचा खर्च अपेक्षित असल्याचे दिसून येते.गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार सर्व्हेअर यांनी गाडीची तपासणी करुन अहवाल देण्याचे आधी गाडीची दुरुस्ती झाल्यामुळे सर्व्हेअर यांनी “ Nil ” अहवाल दिला, परंतु तक्रारदारांच्या गाडीचा ता.27/04/2011 रोजी अपघात होवुन गाडीची नुकसानी झाल्याची बाब स्पष्ट होते.तक्रारदारांनी गाडीची दुरुस्ती शांती अटो एजन्सी येथे 29/04/2011 पासून 27/06/2011 पर्यंत नादुरुस्त परिस्थितीत त्यांचेकडे आला ही बाब अटो एजन्सीत काम करणा-या कर्मचा-यांनी शपथपत्राव्दारे नमुद केले असून सदर गाडी त्यांचेकडे ता.29/04/2011 पासून 27/06/2011 नादुरुस्त होती.असे नमुद केले आहे,परंतु गाडी दुरुस्तीच्या खर्चाची रक्कम नमुद केलेली नाही.गाडी दुरुस्तीच्या खर्चाची रक्कम पोलीस पंचनामा, ड्रायव्हरचा जबाब वगैरे ठिकाणी वेगवेगळी रक्कम नमुद केल्याचे दिसून येते.
तक्रारदारांनी गाडीची दुरुस्ती शांती अटो एजन्सी यांचेकडे केल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्यानुसार स्पष्ट होते,त्यामुळे तक्रारदारांनी शांती अटो एजन्सीने दिलेल्या गाडी दुरुस्तीच्या अंदाजपत्रकानुसार गैरअर्जदार यांनी रक्कम रु. 66,413/- देणे उचित होईल.असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
1 गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना गाडी दुरुस्तीची रक्कम
रु.66,413/- फक्त ( अक्षरी रु.सहासष्टहजार चारशे तेरा फक्त ) आदेश
मिळाल्या पासून 30 दिवसात द्यावी.
2 वरील रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास 9 टक्के व्याजदरासहीत द्यावी.
सौ.माधुरी विश्वरुपे. सौ.रेखा कापडिया.
सदस्या. प्रभारी अध्यक्षा.