Maharashtra

Sangli

CC/13/150

SHRI SHIVANAND MALKARYAPPA HUGAR ETC. 2 - Complainant(s)

Versus

HON'BLE EXECUTIVE DIRECTOR, MAHARASHTRA STATE ELECTRICITY DISTRIBUTION COMPANY LTD. MUMBAI SHRI AJAY - Opp.Party(s)

ADV. M.N. SHETE

12 Aug 2015

ORDER

                                              नि.19

मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर

मा.अध्‍यक्ष श्री ए.व्‍ही.देशपांडे

मा.सदस्‍या – सौ वर्षा नं.शिंदे

मा.सदस्‍या – सौ मनिषा कुलकर्णी

ग्राहक तक्रार अर्ज क्र. 150/2013

तक्रार नोंद तारीख   : 23/10/2013

तक्रार दाखल तारीख  :   29/10/2013

निकाल तारीख         :    12/08/2015

 

1.  श्री शिवानंद मलका-याप्‍पा हुगार

2.  सौ विजयालक्ष्‍मी शिवानंद हुगार

    रा.कुडगी, ता.बसवन-बागेवाडी, जि. विजापूर                        ....... तक्रारदार

 

विरुध्‍द

 

1.  व्‍यवस्‍थापकीय संचालक,

    महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी लि.मुंबई

    श्री अजय मेहता,

    रा.हॉगकॉंग बँक बिल्‍डींग, महात्‍मा गांधी मार्ग,

    फोर्ट, मुंबई 400 001

2.  महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी लि.मुंबई

    शाखा – सं. व सु. विभाग, कवठेमहांकाळ,

    अंबिका चित्र मंदीराजवळ,

    ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली

    तर्फे कार्यकारी अभियंता

    श्री विश्‍वास रामु कांबळे                                ........ जाबदार     

 

 

                                 तक्रारदार  तर्फे : अॅड श्री एम.एन.शेटे

                                  जाबदार तर्फे   :  अॅड श्री यू.जे.चिप्रे

 

- नि का ल प त्र -

 

द्वारा : मा. अध्‍यक्ष: श्री. ए.व्‍ही.देशपांडे  

 

1.    प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदाराने, ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या कलम 12 खाली, दाखल केलेली असून, जाबदारांनी त्‍यास दिलेल्‍या कथित दूषित सेवेमुळे त्‍यांची मुलगी कु.पृथ्‍वी शिवानंद  हुगार ही दि.7/6/10 रोजी संध्‍याकाळी 7.00 चे सुमारास मौजे मालगांव ता.जत जि. सांगली येथे विजेचा धक्‍का बसून मरण पावल्‍याने नुकसान भरपाई दाखल जाबदारकडून रक्‍कम रु.15,00,000/- व तक्रारअर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.5,000/- ची मागणी केली आहे.

 

2.    थोडक्‍यात हकीकत अशी की, मयत पुथ्‍वी ही मौजे मालगाव ता.जत येथे शिक्षण घेणेकरिता तिच्‍या मामाच्‍या घरी आलेली होती.  तिचे आजोबा मल्‍लाप्‍पा भिमाप्‍पा स्‍वामी यांचे नावे घरगुती वीज जोडणी असून ग्राहक क्र. 2720220537535 असा आहे.  दि. 7/6/10 रोजी सायंकाळी 7.00 च्‍या सुमारास सदरची कु.पृथ्‍वी ही प्रातःविधीकरता गेली असता इलेक्‍ट्रीक पोलच्‍या ताणाला वीजेचा धक्‍का बसून ती जागीच मयत झाली.  तिच्‍या कथनाप्रमाणे खांबावरील विजेच्‍या तारांवर कोणीतरी दुसरी तार टाकल्‍याने त्‍या तारेतून विजेचा प्रवाह ताणाच्‍या वायरमध्‍ये (Stay wire) मध्‍ये उतरला व त्‍या तारेमध्‍ये विजेचा धक्‍का बसून पृथ्‍वी मरण पावली.  तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे जाबदारांनी त्‍याचे विद्युत सामुग्रीचे योग्‍य ते व्‍यवस्‍थापन व देखभाल न करुन व कर्तव्‍यचुती करुन तक्रारदारांना गंभीर स्‍वरुपाची सदोष सेवा दिली आहे.  त्‍यामुळे पृथ्‍वीचे निधन झालेले आहे.  तक्रारदारांनी जून 2010 मध्‍ये नुकसान भरपाईकरिता जाबदारकडे अर्ज दिला असता कंपनीच्‍या नियमाप्रमाणे लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्‍यात येईल असे तक्रारदारांना सांगण्‍यात आले.  परंतु अद्यापही कसल्‍याही स्‍वरुपाची नुकसान भरपाई तक्रारदारांना मिळलेली नाही किंवा जाबदारांनी नुकसान भरपाई देण्‍याचे नाकारलेले देखील नाही.  तक्रारदार यांच्‍या मुलीची काहीही चूक नसताना जाबदारांच्‍या गलथानपणामुळे व विद्युत जागेची योग्‍य ती देखभाल न केल्‍याने पृथ्‍वीचे अपघाती निधन झाले आहे.  तिच्‍या निधनामुळे तक्रारदारांना मानसिक धक्‍का बसलेला आहे व ते मुलींच्‍या प्रेमाला सहवासाला मुकलेले आहेत.  अशा कथनांवरुन तक्रारदारांनी कु.पृथ्‍वी हीच्‍या निधनामुळे भविष्‍यातील नुकसानीच्‍या रकमेखातर रु.12 लाख, मातृपितृ सुखापासून वंचित राहिल्‍याने रु.2 लाख व त्‍यांना दिलेल्‍या छळवणूक व मानसिक त्रासाबद्दल रक्‍कम रु.1 लाख तसेच तक्रारअर्जाचा खर्च रु.5,000/- ची मागणी तक्रारदारांनी केली आहे.

 

3.    तक्रारदाराने आपल्‍या तक्रार अर्जातील कथनांचे पुष्‍ठयर्थ नि.2 ला तक्रारदार क्र.2 श्रीमती विजयालक्ष्‍मी शिवानंद हुगार यांचे शपथपत्र दाखल केले असून नि.4 च्‍या फेरिस्‍तसोबत एकूण 13 कागदपत्रे दाखल केली आहेत.  त्‍यामध्‍ये सदर अपघाताबाबत जत पोलीस स्‍टेशनमध्‍ये संतोष विठ्ठल गुरव याने दि.7/6/10 रोजी दाखल केलेल्‍या वर्दी जबाबाची नक्‍कल, घटनास्‍थळाचा पोलीसांनी केलेल्‍या पंचनाम्‍याची नक्‍कल, पृथ्‍वीच्‍या प्रेताच्‍या इंक्‍वेस्‍ट पंचनाम्‍याची नक्‍कल, तक्ररदार क्र.2 विजयालक्ष्मी व इतर साक्षीदारांचे पोलीसांनी तपासकामी नोंदवून घेतलेल्‍या जबाबाच्‍या नकला, दि.7/6/10 च्‍या पोस्‍ट मॉर्टेम नोटसची नक्‍कल, उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग मिरज यांनी मयत पृथ्‍वी हुगार हिचा विजेचा धक्‍का बसून झालेल्‍या मृत्‍यूबाबत प्रसिध्‍द केलेल्‍या राजपत्राची प्रत, सदर अपघाताबाबत जाबदारतर्फे करण्‍यात आलेल्‍या चौकशीच्‍या अहवालाची प्रत, मयत पृथ्‍वी हुगार हीची जन्‍मतारीख दर्शविणारा ग्रामपंचायत बाडगाव यांनी दिलेल्‍या जन्‍मप्रमाणपत्राचा दाखला यांचा समावेश आहे.

 

4.    जाबदारांनी हजर होवून नि.12 ला आपली लेखी कैफियत सादर केलेली असून त्‍यात त्‍यांनी तक्रारदाराची संपूर्ण कथने व मागण्‍या अमान्‍य केल्‍या आहेत.  प्रस्‍तुतची तक्रार ही मुदतीत नाही.  विलंब माफीचे कोणतेही कारण न देता दाखल केल्‍याने ती कायद्याने चालू शकत नाही.  जुलै 2010 मध्‍ये तक्रारदारांनी कोणताही नुकसान भरपाई मिळण्‍याबाबतचा अर्ज तक्रारदारांनी जाबदारकडे दाखल केलेला नाही.  तक्रारदार किंवा मयत हे जाबदार कंपनीचे ग्राहक नाहीत.  त्‍यांना कधीही कधीही, केव्‍हाही आणि कोणत्‍याही प्रकारचा विद्युत पुरवठा देण्‍यात आलेला नाही.  तक्रारदार कर्नाटक राज्‍यात रहात असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसते.  त्‍यांच्‍या नावे कोणतीही स्‍थावर मिळकत महाराष्‍ट्र राज्‍यात नाही.  त्‍यांना कोणत्‍याही प्रकारची सेवा पुरविणेची जबाबदारी जाबदार कंपनीने स्‍वीकारलेली नाही अथवा त्‍यांच्‍याकडून कोणतेही सेवाशुल्‍क आकारलेले नाही किंवा वसूल करण्‍यात आलेले नाही.  सबब, तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत.  प्रस्‍तुतची तक्रार कायद्याने चालू शकत नाही.  तक्रारदार कथन करतात, त्‍याप्रमाणे पृथ्‍वी हीचा मृत्‍यू इलेक्‍ट्रीक पोलच्‍या ताणातून विजेचा धक्‍का बसून जागीच मृत्‍यू झाला आहे हे म्‍हणणे खरे नाही.  अपघाताबाबत अज्ञात व्‍यक्‍तीकडून फोन आल्‍याने जाबदार कंपनीच्‍या अधिका-यांनी जागेवर जावून तपासणी केली असता तसेच सदर विजेच्‍या खांबाच्‍या ताणाची तपासणी केली असता त्‍यातून विजेचा धक्‍का बसण्‍याचे काही एक कारण दिसून आले नाही. सदर ताणाची मांडणी योग्‍य असल्‍याचे दिसून आले आहे.  घटनची माहिती वरिष्‍ठ अधिका-यांना संबंधीत अधिका-याने त्‍वरित दिली आहे.  त्‍याबाबतची संपूर्ण कागदपत्रे तक्रारदारांनी याकामी सादर केली नाहीत.  विद्युत निरिक्षकांनी सदरचा मृत्‍यू संशयास्‍पद असल्‍याचे मत व्‍यक्‍त केलेले आहे.  ज्‍याठिकाणी अपघात घडला, त्‍या ठिकाणचा विचार केला तर तक्रारदार हे ग्राहक होवू शकत नाहीत.  तक्रारदार हे संभाव्‍य उपभोक्‍ता देखील होवू शकत नाहीत.  सदरचा वाद ग्राहक न्‍यायालयापुढे चालू शकत नाही.  जाबदारांनी कोणतीही दूषित सेवा दिलेली नाही किंवा त्‍यांच्‍या विद्युत उपकरणांची व्‍य‍वस्थित देखभाल केलेली नाही हे शाबीत झालेले नाही.  विद्युत संच मांडणीमध्‍ये काही दोष किंवा त्रुटी आढळून आलेल्‍या नाहीत.  तक्रारदारांनी नुकसान भरपाई मागण्‍याचा कोणताही अर्ज दाखल केलेला नाही.  त्‍यामुळे नुकसान भरपाई लवकरात लवकर देवू असे आश्‍वासन देण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही किंवा तसे आश्‍वासन कोणत्‍याही अधिका-याने दिलेले नाही.  तक्रारदारांना कोणतीही नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी जाबदारांची नाही.  तक्रारदारअर्जातील कथने खोटी आहेत.  या व अशा कथनांवरुन जाबदारांनी आपल्‍या विरुध्‍दच्‍या मागण्‍या नाकारलेल्‍या असून प्रस्‍तुतची तक्रार खर्चासह फेटाळून लावावी अशी मागणी केली आहे.

 

5.    आपले लेखी कैफियतीचे खाली जाबदारांनी श्री एस.बी.कोळेकर, सहायक अभियंता यांचे शपथपत्र जोडलेले आहे.  जाबदारतर्फे कोणतीही कागदपत्रे या प्रकरणात दाखल करण्‍यात आलेली नाहीत.

 

6.    तक्रारदारांनी तक्रारदार क्र.2 विजयालक्ष्‍मी हुगार व लालसाब कासीम मुल्‍ला यांचे पुराव्‍याचे शपथपत्र नि.14 व 15 ला दाखल करुन दि.30/7/14 चे पुरसीस अन्‍वये आपला पुरावा थांबविलेला आहे.  सदर पुरसीस नि.13 ला देण्‍यात आलेली आहे तर जाबदारतर्फे कोणताही पुरावा देण्‍यात आलेला नसून नि.18 ला पुरसीस सादर करुन आपली लेखी कैफियत हाच आपला युक्तिवाद समजावा असे नमूद करणेत आलेले आहे.  तथापि पुरावा संपल्‍यानंतर तक्रारदारांच्‍या वकीलांनी हजर होवून आपला युक्तिवाद सादर केलेला नाही. 

 

7.    सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्‍या निष्‍कर्षाकरिता उपस्थित होतात.

 

          मुद्दे                                                                                               उत्‍तरे

 

1. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2(1)(ड) अन्‍वये

   ग्राहक होतात काय ?                                                                             नाही.

    

2. कु.पृथ्‍वी हीचा मृत्‍यू जाबदारांनी दिलेल्‍या कथित दूषित सेवेमुळे

   झाला ही बाब तक्रारदारांनी शाबीत केली आहे काय ?                           उद्भवत नाही. 

     

3. तक्रारदाराने मागणी केल्‍याप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्‍यास

   तक्रारदार पात्र आहेत काय ?                                                             उद्भवत नाही.

 

4. अंतिम आदेश                                                                               खालीलप्रमाणे.

 

 

8.    आमच्‍या वरील निष्‍कर्षाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

  •                         < > - आदेश

    1.    तक्रारदाराची तक्रार ही  नामंजूर करणेत येत आहे.

    2.    तक्रारीचा खर्च उभय पक्षांनी आपला आपण सोसणेचा आहे.

    3.    या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्‍क देण्‍यात याव्‍यात.

     

    सांगली

    दि. 12/08/2015                       

       

    ( सौ मनिषा कुलकर्णी )          ( सौ वर्षा नं. शिंदे )                ( ए.व्‍ही.देशपांडे )

            सदस्‍या                        सदस्‍या                                  अध्‍यक्ष

     

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.