View 4072 Cases Against Vidyut
SMT. HIRABAI BHIMANNA HARAGE (LONAR) ETC. 1 filed a consumer case on 12 Aug 2015 against HON'BLE CHAIRMAN, MAHARASHTRA RAJYA VIDYUT VITARAN CO. LTD. ETC. 1 in the Sangli Consumer Court. The case no is CC/13/3 and the judgment uploaded on 30 Sep 2015.
नि.26
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या – सौ वर्षा नं.शिंदे
मा.सदस्या – सौ मनिषा कुलकर्णी
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 03/2013
तक्रार नोंद तारीख : 04/01/2013
तक्रार दाखल तारीख : 27/02/2013
निकाल तारीख : 12/08/2015
1. श्रीमती.हिराबाई भिमण्णा हरगे (लोणार)
2. श्रीमती.नागव्वा भिमण्णा हरगे (लोणार)
दोघे रा.मु.पो. बलोंडगी, ता.जत, जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. चेअरमन,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.मुंबई
2. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.मुंबई
शाखा – सं. व सु. विभाग, कवठेमहांकाळ,
अंबिका चित्र मंदीराजवळ,
ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
तर्फे कार्यकारी अभियंता
श्री विश्वास रामु कांबळे ........ जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एम.एन.शेटे
जाबदार तर्फे : अॅड श्री यू.जे.चिप्रे
- नि का ल प त्र -
द्वारा : मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने, ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 12 खाली, दाखल केलेली असून, जाबदारांनी त्यास दिलेल्या कथित दूषित सेवेमुळे त्यांचे पती भिमण्णा सदाशिव हरगे हे दि.5/9/08 रोजी मौजे बलोंडगी ता.जत जि. सांगली या ठिकाणी संध्याकाळी 7.00 चे सुमारास सायकल वरून घराकडे परत येत असताना घरासमोर गावातील रोडलाईटची खांबावरील तार तुटुन त्यांच्या अंगावर पडल्याने, त्यांस विजेचा धक्का बसून जागीच मरण पावले असल्याने, जाबदारांकडून भाविष्यातील नुकसानी भरपाईखातर रू.10,800,00/- व तक्रार क्र. 1 व 2 हया पती सुखापासून वंचित राहिल्यामुळे नुकसान भरपाई दाखल तसेच मानसिक त्रास दिले बद्दल प्रत्येकी रक्कम रू.2,00,000/- तसेच त्यांचे पतीचे अंत्यविधी करिता खर्च म्हणून रक्कम रू. 25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणुन रक्कम रु.5,000/- ची मागणी केलेली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, मयत भिमण्णा सदाशिव हरगे हे तक्रारदार क्र 1 व 2 यांचे पती होते. ते तक्रारदारसह गणपती गुरूलिंगप्पा बिराजदार यांचे घरी भाडयाने राहत होते व मोल-मजुरी करून जगत होते. मयत भिमण्णा सदाशिव हरगे हे जाबदार क्र.1 व 2 यांचे संभाव्य उपयोगकर्ता होते. मयत भिमण्णा यांचे उत्पन्न दरमहा रू. 6,000/- इतके होते. त्यांचे मृत्यू समयी वय 55 वर्षै होते. ते किमान पुढील 15 वर्षे पर्यंन्त सदरचे उत्पन्न मिळवू शकले असते.
3. तक्रारदाराचे कथनानुसार दि.5/9/08 रोजी मयत भिमण्णा सदाशिव हरगे हे अंदाजे 7 वाजता वस्तीवर शेळया बांधून सायकलने घराकडे जात असता घरासमोरील गावातील रोडलाईटची खांबावरील तार तुटून त्यांचे अंगावर पडली व ते जागीच मयत झाले. सदरची घटना जाबदार क्र.1 व 2 यांनी आपल्या सामुग्रीचे व्यवस्थित व्यवस्थापन न केल्याने व दुर्लक्ष केले असल्याने घडलेली असून त्यात तक्रारदाराच्या पतीचा नाहक बळी गेलेला आहे. तक्रारदारांना वैधव्य आलेले आहे. तक्रारदार क्र.1 व 2 या ज्येष्ठ नागरिक आहेत व त्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. त्या केवळ त्यांच्या पतीच्या उत्पन्नावर अवलंबून असणा-या व्यक्ती आहेत. पतीच्या निधनामुळे त्यांना अर्धपोटी जीवन जगावे लागत आहे व त्या पतीच्या प्रेमाला, सहवासाला, उत्कर्षाला, भाग्याला मुकलेल्या आहेत व त्यांना जबर मानसिक धक्का बसलेला आहे. तक्रारदारांनी नुकसान भरपाई मिळण्याकरिता सप्टेंबर 2008 मध्ये जाबदारकडे अर्ज दाखल केला होता व त्यांचा वारंवार पाठपुरावा केलेला होता. तथापि, जाबदारांनी कसलीही नुकसान भरपाई दिलेली नाही. आपल्या सामुग्रीचे व्यवस्थित व्यवस्थापन न करुन व त्यांची देखभाल व्यवस्थित न करुन जाबदारांनी दूषित सेवा दिलेली आहे. या व अशा कथनांवरुन तक्रारदारांनी वर नमूद केल्याप्रमाणे रकमांच्या मागण्या या प्रकरणात केल्या आहेत.
4. तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जातील कथनांचे पुष्ठयर्थ तक्रारदार क्र.1 हिराबाई भिमण्णा हरगे हीचे शपथपत्र नि.2 ला दाखल करुन नि.5 या फेरिस्तसोबत एकूण 17 कागदपत्रे दाखल केली आहेत. जाबदारांनी प्रस्तुत प्रकरणी हजर होवून नि.14 ला अर्ज देवून प्रस्तुतची तक्रार कायद्याने चालू शकत नाही आणि तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) खाली ग्राहक होवू शकत नाही आणि तक्रारदार हा कोणताही संभाव्य उपभोगकर्ता होवू शकत नाही. कारण अशा प्रकारची कोणतीही संकल्पना ग्राहक संरक्षण कायद्यास अभिप्रेत नाही. सबब, प्रस्तुत प्रकरण प्राथमिक मुद्दा काढून त्याचा निकाल करावा व प्रस्तुत प्रकरण खारीज करावे अशी मागणी केली. तथापि या मंचाने दि.26/8/13 रोजी सदरचा मुद्दा हा अंतिम निर्णयाच्या वेळेला विचारात घ्यावा असा आदेश पारीत करुन सदर अर्ज निर्गमित केला. त्यानंतर जाबदारांनी नि.18 ला आपली लेखी कैफियत दाखल करुन तक्रारदाराची संपूर्ण कथने व मागणी अमान्य केली. जाबदारांनी प्रस्तुत तक्रार ही मुदतबाहय असून कायद्याने चालू शकत नाही असा आक्षेप घेतला कारण तथाकथित अपघात हा दि.5/9/08 ला घडला असून त्यानंतर तब्बल 4 वर्षे 6 महिन्यांनी म्हणजे दि.4/1/13 रोजी तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली असल्याने ती कायद्याने चालणेस पात्र नाही. सबब, ती फेटाळण्यास पात्र आहे असे कथन केले. तद्वतच, उभय तक्रारदार व मयत भिमण्णा सदाशिव हरगे हे जाबदार कंपनीचे ग्राहक नव्हते व नाहीत. त्यांना जाबदार कंपनीने कोणत्याही प्रकारे वीज पुरवठा केलेला नाही किंवा त्यांचेकडून कोणत्याही प्रकारे सेवाशुल्क आकारलेले नाही. ज्या जागेवर सदरचा अपघात घडला, त्या जागेचा विचार केल्यास तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व सेवा देणार असे नाते निर्माण होत नाही. मा.राज्य आयोगाने वेळोवेळी अशा अपघातासंबंधी तक्रारदारसारख्या व्यक्ती ग्राहक होत नाहीत, जरुर तर त्यांना दिवाणी कोर्टात जाता येईल असे स्पष्टपणे नमूद केले आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार कायद्याने चालणेस पात्र नाही. उभय तक्रारदार या मयताच्या पत्नी आहेत ही बाब जाबदारांना ज्ञात नाही. तक्रारदार क्र.2 ही मयताची द्वितीय पत्नी असल्यास तिला कोणताही अधिकार प्राप्त होत नाही. मयत भिमण्णा सदाशिव हरगे हे तिची प्रथम पत्नी हिचेसोबत रहात नसल्याचे दिसून येते. सबब, तक्रारदाराचा प्रस्तुतचा तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे. जाबदारांनी तक्रारदारास कोणतेही दूषित सेवा पुरविलेली नाही. सदरची घटना Act of God या सदराखाली मोडते. त्यामुळे तक्रारदारास कोणतीही नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी जाबदारांवर नाही. जाबदारांनी आपल्या सामुग्रीचे व्यवस्थित व्यवस्थापन केलले आह. त्यांची वेळोवेळी पाहणीही केली जाते. मात्र पावसाळी दिवसांत अचानक आलेला पाऊस व वादळामुळे नमूद घटना घडत असतात. त्यामुळे सदरचा तथाकथित अपघात जाबदारच्या दुर्लक्षामुळे झाला असे म्हणणे अयोग्य व चुकीचे आहे.
5. मयत भिमण्णा सदाशिव हरगे हे दरमहा रु.6,000/- इतके उत्पन्न मिळवित होते हे म्हणणे खरे नाही हे चुकीचे आहे. ते कोणतेही काम करीत नव्हते. मृत्यू समयी त्यांचे वय 50 वर्षे असल्याचे खरे नाही. त्यांचे वय 60 वर्षे असल्याचे दिसून येते. त्यांनी किमान 15 वर्षे कथित उत्पन्न मिळविले असते हे चुकीचे आहे. मागणी रकमेवर कोर्ट फी स्टॅंप भरावा लागत नाही. या मंचाच्या अधिकारक्षेत्राचा विचार करुन तक्रारदारांनी रु.10,80,000/- ची काल्पनिक स्वरुपाची मागणी केलेली आहे. सदरची मागणी अवास्तव व बिनबुडाची आहे व तक्रारदाराची कोणतीही मागणी जाबदारांना मान्य नाही. या व अशा कथनांनुसार जाबदारांनी प्रस्तुत तक्रार खर्चासह फेटाळून लावावी अशी मागणी केलेली आहे.
6. जाबदारांनी आपले लेखी कैफियतीचे खाली सहायक अभियंता श्री सुभाष कोळेकर यांचे शपथपत्र दिलेले आहे.
7. तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणात नि.19 ला पुरसीस दाखल करुन तक्रारअर्जासोबत वेगळे शपथपत्र (नि.2) ला दिलेले असल्याने वेगळे पुराव्याचे शपथपत्र द्यावयाचे नाही असे स्पष्ट करुन आपला पुरावा थांबविलेला आहे. तथापि, नि.21 या फेरिस्त सोबत विद्युत निरिक्षक, विद्युत निरिक्षण, विभाग मिरज यांचा सदर अपघाताबाबतच्या दि.26/3/13 रोजीच्या अहवालाची प्रत सादर केलेली आहे. हया अहवालानुसार विद्युत निरिक्षक यांनी सदरचा अपघात वीज कंपनीच्या संचा मांडणीमुळे घडलेला असून चौकशीच्या निष्कर्षानुसार नुकसान भरपाईस जाबदार क्र.1 विद्युत वितरण कंपनी जबाबदार आहे असे नमूद कले आहे. त्यांच्या अहवालानुसार जाबदार वीज कंपनीची उपरी तार मार्गाची फेज वाहक गार्ड लुप पासून स्पार्कींग होवून तुटून झुडपांवर पडली व विद्युत भारीत राहिली आणि मयत रस्त्याच्या लगत असलेल्या पायवाटेवरुन सायकलने घराकडे जाताना त्या विद्युत भारीत तारेचा शॉक लागून ते तारेबरोबर गुंडाळून खाली पडले व त्यांचा मृत्यू झाला.
8. जाबदारांनी नि.22 ला पुरसीस देवून आपण सादर केलेली लेखी कैफियत हेच पुराव्याचे शपथपत्र म्हणून वाचण्यात यावे व समजण्यात यावे असे प्रतिपादन केले आहे. प्रस्तुत प्रकरणात उभय पक्षकारांतर्फे कोणताही तोंडी पुरावा सादर करणेत आलेला नाही. जाबदारांनी नि.25 ला पुरसीस सादर करुन आपली लेखी कैफियत हाच आपला लेखी युक्तिवाद समजावा अशी मागणी केली आहे.
9. सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)(ड) अन्वये
ग्राहक होतात काय ? नाही.
2. मयत भिमण्णा सदाशिव हरगे यांचा मृत्यू जाबदारांनी दिलेल्या
कथित दूषित सेवेमुळे झाला ही बाब तक्रारदारांनी शाबीत
केली आहे काय ? उद्भवत नाही.
3. तक्रारदाराने मागणी केल्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास
तक्रारदार पात्र आहेत काय ? उद्भवत नाही.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
10. आमच्या वरील निष्कर्षाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
1. तक्रारदाराची तक्रार ही नामंजूर करणेत येत आहे.
2. तक्रारीचा खर्च उभय पक्षांनी आपला आपण सोसणेचा आहे.
3. प्रकरण दफ्तर दाखल करावे.
4. या आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क देण्यात याव्यात.
सांगली
दि. 12/08/2015
( सौ मनिषा कुलकर्णी ) ( सौ वर्षा नं. शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या सदस्या अध्यक्ष
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.