Maharashtra

Nagpur

CC/376/2020

MRS. ANUSHKA APOORV SHARANGPANI, THROUGH THEIR REG. POWER OF ATTORNEY HOLDER, MR. SHRIKANT VISHWESHWAR BADKAS - Complainant(s)

Versus

HITESHREE INFRASTRUCTURE PVT. LTD., THROUGH DIRECTOR, MR. RAVINDRA LAKUDKAR - Opp.Party(s)

ADV. KETAN V. BHOSKAR

30 Sep 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/376/2020
( Date of Filing : 29 Sep 2020 )
 
1. MRS. ANUSHKA APOORV SHARANGPANI, THROUGH THEIR REG. POWER OF ATTORNEY HOLDER, MR. SHRIKANT VISHWESHWAR BADKAS
R/O. 64, SBI COLONY, GOPAL NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. MR. APOORV SANJEEV SHARANGPANI, THROUGH THEIR REG. POWER OF ATTORNEY HOLDER, MR. SHRIKANT VISHWESHWAR BADKAS
R/O. 64, SBI COLONY, GOPAL NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. HITESHREE INFRASTRUCTURE PVT. LTD., THROUGH DIRECTOR, MR. RAVINDRA LAKUDKAR
OFF. PLOT NO.1, PRUTHVIRAJ NAGAR, BELTARODI, BESA ROAD, NAGPUR-441108
NAGPUR
MAHARASHTRA
2. MR. RAVINDRA LAKUDKAR, DIRECTOR, HETESHREE INFRASTRUCTURE PVT. LTD.
OFF. PLOT NO.1, PRUTHVIRAJ NAGAR, BELTARODI, BESA ROAD, NAGPUR-441108
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. KETAN V. BHOSKAR, Advocate for the Complainant 1
 
Dated : 30 Sep 2021
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये -

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्ता क्रं. 1 व 2 यांनी विरुध्‍द पक्षाने विकसन केलेल्‍या आणि मौजा- अंबाझरी, अभ्‍यंकरनगर, नागपूर येथे बांधलेल्‍या हितेश्री प्‍लाझा,  या इमारतीमधील दुस-या मजल्‍यावरील सदनिका क्रं. 202 एकूण क्षेत्रफळ 51.937 चौ.मी. ही एकूण रक्‍कम रुपये 50,00,000/- खरेदी करण्‍याचे ठरविले व त्‍याकरिता विरुध्‍द पक्षाला अग्रिम राशी म्‍हणून रक्‍कम रुपये 5,00,000/- दिनांक 09.01.2014 ला धनादेश क्रं. 03058 अन्‍वये देऊन बुक केली होती व दि. 01.03.2016 ला विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे 1171/2016 अन्‍वये नोंदणीकृत करारनामा करुन दिला होता. तसेच विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने बांधकाम केलेल्‍या हितेश्री प्‍लाझामधील इन्‍टेरियर कामाकरिता अजय वानखेडे या कंत्राटदाराची नेमणूक केली होती व तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या सांगण्‍यावरुन  कंत्राटदार अजय वानखेडे याला दि. 13.11.2017 ला हितेश्री प्‍लाझा या इमारतीमधील सदनिका क्रं. 202 मधील अतिरिक्‍त व नविन बदलाकरिता एकूण रक्‍कम रुपये 20,00,000/- एवढया रक्‍कमेकरिता नोंदणीकृत नसलेला करारनामा केला.  अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने हितेश्री प्‍लाझा या इमारतीमधील सदनिका क्रं. 202 च्‍या खरेदीपोटी विरुध्‍द पक्षाला एकूण रक्‍कम रुपये 70,50,000/- अदा केलेली आहे.  

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने सदरची रक्‍कम वि.प. 1 व 2 व वि.प. 2 ची पत्‍नी मनिषा लाकुडकर यांच्‍या बॅंक खात्‍यात धनादेश तसेच आर.टी.जी.एस.द्वारे दि. 09.01.2014 ते 25.06.2019 पर्यंत रुपये 62,50,000/- व वि.प. 1 व 2 यांनी नेमलेले कंत्राटदार अजय वानखेडे याच्‍या बॅंक खात्‍यात दि. 23.02.2017 ते दि. 12.09.2017 पर्यंत एन.एफ.टी द्वारे रुपये 8,00,000/- अदा केलेले आहे, अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिका खरेदी पोटी व सदनिकेच्‍या इन्‍टेरियर कामापोटी मिळून एकूण रक्‍कम रुपये 70,50,000/- अदा केलेले आहे. तरी देखील विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी शासनाच्‍या संबंधित विभागाकडून Building चे Completion certificate आणि Occupancy Certificate प्राप्‍त करुन तक्रारकर्त्‍याला सदनिकेचे विक्रीपत्र करुन दिले नाही.  तसेच इमारतीत ठरल्‍याप्रमाणे लिफ्ट, पार्किंग जागा व इतर सोयी करुन दिलेल्‍या नाही. त्‍याचप्रमाणे वि.प. 1 व 2 ने इन्‍टेरियर कामाकरिता नियुक्‍त केलेले कंत्राटदार अजय वानखेडे याला इन्‍टेरियर पोटी संपूर्ण रक्‍कम अदा करुन ही वि.प. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍या  सोबत केलेल्‍या दि. 01.03.2016 रोजीच्‍या नोंदणीकृत करारनाम्‍याचे व वि.प. 1 व 2 द्वारे नियुक्‍त केलेले कंत्राटदार अजय वानखेडे याच्‍या सोबत तक्रारकर्त्‍याने दि. 13.11.2017 रोजी केलेल्‍या करारनाम्‍यातील शर्ती व अटीचे वि.प. व कंत्राटदार यांनी उल्‍लंघन केलेले आहे.  

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी मंजूर नकाशाप्रमाणे सदनिकेचे बांधकाम विक्री करारनाम्‍यापासून 3 वर्षाच्‍या आंत करणे आवश्‍यक होते. परंतु वि.प.ने जाणूनुबुजून हेतुपुरस्‍सर विक्री करारनामा करतांना मंजूर नकाशाप्रमाणे इमारतीच्‍या बांधकामाचा कालावधी नमूद केलेला नव्‍हता.  आणि तक्रारकर्त्‍याला सदनिकेचा ताबा घेण्‍याकरिता भाग पाडले आणि तक्रारकर्त्‍याला सदनिकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्‍याचे ही आश्‍वासन दिले होते, परंतु विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी मागील 5 वर्षापासून तक्रारकर्त्‍याला सदनिकेचे विक्रीपत्र करुन दिले नाही व हितेश्री प्‍लाझा या इमारतीचे संपूर्ण बांधकाम आवश्‍यक सोयीसुविधासह केलेले नाही. म्‍हणून तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष 1 व 2 च्‍या कार्यालयास अनेक वेळा भेटण्‍यास गेला असता प्रत्‍येक वेळी वि.प. 1 व 2 ने  सदरच्‍या इमारतीचे 3-4 महिन्‍यात पूर्ण बांधकाम करुन देण्‍याचे आश्‍वासन देऊन ही आजपर्यंत सदरच्‍या इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन दिले नाही. तसेच तक्रारकर्ता हा  बांधकामाच्‍या जागेवर बांधकाम पाहण्‍याकरिता गेला असता वि.प. 1 व 2 यांनी संपूर्ण बिल्‍डींगचा परिसर मागील 6 महिन्‍यापासून बंद करुन ठेवला व बांधकाम ही बंद केलेले असल्‍याचे आढळल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने याबाबत वि.प. 1 व 2 ला विचारणा केली असता संबंधित शासकीय विभागाकडून बिल्‍डींगच्‍या नकाशाला पुन्‍हा रिवाईज मंजूरी मिळण्‍याबाबत वाद सुरु असल्‍यामुळे बांधकाम थांबलेले आहे असे सांगितले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदनिका खरेदीपोटी स्‍टेट बॅंकेतून घेतलेल्‍या कर्जाचा मासिक हप्‍ता बॅंकेला अदा करावा लागत असल्‍यामुळे नाहकच तक्रारकर्त्‍याला मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपत्र करुन न दिल्‍यामुळे दि. 24.02.2020 ला वि.प. विरुध्‍द  कायदेशीर नोटीस बजाविली. परंतु वि.प.ने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने  प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 ने तक्रारकर्त्‍याला सदनिकेचे कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे. तसेच संबंधित विभागाकडून Building चे Completion certificate आणि Occupancy Certificate प्राप्‍त करुन द्यावे. किंवा कायदेशीर विक्रीपत्र करुन देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 70,50,000/-, द.सा.द.शे.   12 टक्‍के दराने व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. त्‍याचप्रमाणे झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च ही देण्‍याचा आदेश द्यावा.
  2.      विरुध्‍द पक्ष 1 व 2  यांना  आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष आयोगासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा दि. 26.02.2021 रोजी आदेश पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता  व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

            मुद्दे                                    उत्‍तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?          होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?   होय

 

  1. काय आदेश?                              अंतिम आदेशानुसार

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत –  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांच्‍याकडून मौजा- अंबाझरी,  अभ्‍यंकर नगर स्थितीत हितेश्री प्‍लाझा या इमारतीतील दुस-या मजल्‍यावरील सदनिका क्रं. 202  एकूण क्षेत्रफळ 51.937 चौ.मी. हा रुपये 50,,00,000/- खरेदी करण्‍याबाबतचा करारनामा दि. 01.03.2016 ला नोंदणी क्रं. 1171/2016 अन्‍वये केला असल्‍याचे नि.क्रं. 2(1) वरुन दिसून येते. तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी हितेश्री प्‍लाझा मधील इन्‍टेरियर कामाकरिता नेमलेले कंत्राटदार अजय वानखेडे यांच्‍याशी दि. 13.11.2017 ला सदनिका क्रं. 202 मधील अतिरिक्‍त आणि नविन बदलाकरिता रुपये 100/- च्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर रक्‍कम रुपये 20,00,000/- करिता करारनामा केला असल्‍याचे नि.क्रं. 2(3) वरुन दिसून येते. तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 व 2 व विरुध्‍द पक्ष 2 ची पत्‍नी मनिषा लाकुडकर यांच्‍या बॅंक खात्‍यात दि. 09.01.2014 ते 25.06.2019 पर्यंत रुपये 62,50,000/- व वि.प. 1 व 2 यांनी नेमलेले कंत्राटदार अजय वानखेडे याच्‍या बॅंक खात्‍यात दि. 23.02.2017 ते दि. 12.09.2017 पर्यंत एन.एफ.टी द्वारे रुपये 8,00,000/- जमा केले असल्‍याचे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते.  अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिका खरेदी पोटी व सदनिकेच्‍या इन्‍टेरियर कामापोटी मिळून एकूण रक्‍कम रुपये 70,50,000/- अदा केले असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून सदरच्‍या सदनिका विक्रीपोटी संपूर्ण रक्‍कम स्‍वीकारली आहे व सदनिकेच्‍या इन्‍टेरियर कामापोटी विरुध्‍द पक्षाने नियुक्‍त केलेले कंत्राटदार अजय वानखेडे यांना देखील इन्‍टेरियरच्‍या कामाकरिता संपूर्ण रक्‍कम अदा केलेली आहे. तरी ही विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्त्‍याला सदरच्‍या सदनिकेचे कायदेशीर विक्रीपत्र करुन दिले नाही तसेच कंत्राटदार याने ही इन्‍टेरियरचे काम केले नाही,  ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असून त्‍यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.
  2.      त्‍याचप्रमाणे दि. 01.03.2016 रोजी रजिस्‍टर्ड करण्‍यात आलेल्‍या उभय पक्षातील करारनाम्‍यात सदनिकेच्‍या बांधकामाबाबतचा कालावधी नमूद केलेला नाही, परंतु विरुध्‍द पक्ष 1 व 2 हे तक्रारकर्त्‍याला कायदेशीर विक्रीपत्र करुन देणार असल्‍याचे नमूद आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने संबंधित विभागाकडून Building चे Completion certificate आणि Occupancy Certificate प्राप्‍त करुन हितेश्री प्‍लाझा या इमारतीचे संपूर्ण बांधकाम इतर आवश्‍यक सोयी-सुविधासह तयार करुन तक्रारकर्त्‍याला दुस-या मजल्‍यावरील सदनिका क्रं. 202 चे कायदेशीररित्‍या नोंदणीकृत  विक्रीपत्र करुन देण्‍याची जबाबदारी आहे. तसेच कंत्राटदार अजय वानखेडे यांनी सदनिकेचे इन्‍टेरियर काम करुन देणे ही आवश्‍यक होते,  परंतु विरुध्‍द पक्षाने तसे न करुन उभय पक्षात झालेल्‍या करारनाम्‍याचा भंग केला असल्‍याचे दिसून येते. विरुध्‍द पक्षाने उभय पक्षात झालेल्‍या कराराप्रमाणे सदनिकेचे विक्रीपत्र करुन दिले नाही व विरुध्‍द पक्षाने नेमलेले इन्‍टेरियर  कंत्राटदार अजय वानखेडे यानी देखील रक्‍कम स्‍वीकारुन ही काम केले नसल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते व ही त्‍यांच्‍या सेवेतील त्रुटी असून त्‍यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते.

 

 सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी संबंधित विभागाकडून Building चे Completion certificate आणि Occupancy Certificate प्राप्‍त करुन हितेश्री प्‍लाझा या इमारतीचे संपूर्ण बांधकाम इतर आवश्‍यक सोयी-सुविधासह तयार करुन तक्रारकर्त्‍याला दुस-या मजल्‍यावरील सदनिका क्रं. 202 चे कायदेशीररित्‍या नोंदणीकृत  विक्रीपत्र करुन प्रत्‍यक्ष ताबा द्यावा. तसेच स‍दनिकेच्‍या विक्रीपत्राकरिता येणारा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.

अथवा

उपरोक्‍त सदनिकेचे विक्रीपत्र करुन देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 70,50,000/- व त्‍यावर दि. 25.06.2019 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला द्यावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.