Maharashtra

Gondia

CC/06/76

Munaf Qureshi - Complainant(s)

Versus

Hiresh Jain - Opp.Party(s)

26 Apr 2007

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGAON ROAD, GONDIA
 
Complaint Case No. CC/06/76
 
1. Munaf Qureshi
Gorelal chouck Gondia
Gondia
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Hiresh Jain
Gondia
Gondia
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. P. B. POTDUKHE PRESIDENT
 HON'ABLE MR. Shri. Ajitkumar Jain Member
 HON'ABLE MRS. MOHINI BHILKAR MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

--- आदेश --
                                                              (पारित दि. 27-04-2007 )
 
द्वारा -श्रीमतीप्रतिभाबा. पोटदुखे, अध्यक्षा :-
 
       तक्रारकर्ता श्री. मुनाफ गफुर कुरैशी यांनी दाखल केलेल्‍या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,.....................
  1. दि. 14 -08-2006 रोजी तक्रारकर्ता यांनी वि.प.यांच्‍या शो रुम मधून हिरो होंडा टाटा इंडिकॉम ब्‍लैक एन्‍ड व्‍हाईट मोबाईल हॅन्‍डसेट रुपये 3000/- मध्‍ये विकत घेतला . नंतर त्‍यांना कलर व कॅमेरावाला हॅन्‍डसेट विकत घेण्‍याची इच्‍छा झाल्‍याने विरुध्‍द पक्ष यांच्‍या मर्जीने ब्‍लैक एन्‍ड व्‍हाईट परत करुन तक्रारकर्ता यांनी एल.जी.कंपनीचा कलर व कॅमेरेवाला मोबाईल पसंद केला. तक्रारकर्ता यांचे, विरुध्‍द पक्ष यांनी ब्‍लॅक एन्‍ड व्‍हाईट मोबाईल बदलल्‍यामुळे रुपये 500/- कपात केले. त्‍या मोबाईलचे रुपये 2500/- विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे होते व पुन्‍हा 6500/- विरुध्‍द पक्ष यांना दिले.
  2. दि.15.09.2006 रोजी विरुध्‍द पक्ष यांनी इनव्‍हाईस रुपये 7500/- चा जारी केला. तक्रारकर्ता यांनी हॅन्‍डसेट निश्चित केल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांना तो हॅन्‍डसेट सक्रिय करायला एक तास लागेल त्‍यामुळे एक तासानंतर हॅन्‍डसेट घेऊन जा असे सांगितले.
  3. तक्रारकर्ता हे दोन तासानंतर विरुध्‍द पक्ष यांच्‍या दुकानात गेले असता विरुध्‍द पक्ष यांनी जुना वापरलेला हॅन्‍डसेट तक्रारकर्ता यांना पॅक करुन दिला.
  4. तक्रारकर्ता यांनी त्‍यांच्‍या मित्रानां तो हॅन्‍डसेट दाखविला तेव्‍हा त्‍यांच्‍या मित्रांनी तो हॅन्‍डसेट जुना असल्‍याचे सांगितले, तेव्‍हा तक्रारकर्ता यांनी दुस-या एजन्‍सीमध्‍ये जाऊन त्‍याच कंपनीचा नविन हॅन्‍डसेट दाखविण्‍यास सांगितले. तेव्‍हा त्‍यांना माहिती झाले की, हॅन्‍डसेट हा पॅक अवस्‍थेत असतो व त्‍यावर ओ.के. चा स्टिकर लागलेला असतो.
  5. दि. 16.09.06 रोजी जुना हॅन्‍डसेट दिल्‍याची तक्रार तक्रारकर्त्‍यानी वि.प.यांच्‍याकडे केली असता मी 17 तारखेला तुम्‍हाला नवीन हॅन्‍डसेट देतो असे सांगितले. परंतु रोज काही ना काही बहाणा करुन विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना नविन हॅन्‍डसेट दिला नाही.
  6. तक्रारकर्ता यांनी दि. 10.10.06, 21.10.06 व 14.11.06 रोजी नोटीस पाठवून विरुध्‍द पक्ष यांना नविन हॅन्‍डसेटची मागणी केली, परंतु त्‍यांनी तो दिला नाही.
  7. तक्रारकर्ता यांनी मागणी केली आहे की, हॅन्‍डसेटचे रुपये 9000/- मिळावे अथवा नविन हॅन्‍डसेट बदलून मिळावा. तसेच मानसिक त्रासासाठी रुपये 2000/- मिळावे.
  8. दि. 23.03.2007 रोजी विरुध्‍द पक्ष यांना विद्यमान न्‍याय मंचाची नोटीस प्राप्‍त झाली . परंतु ते न्‍याय मंचासमोर हजर झाले नाही अथवा त्‍यांनी ग्राहक तक्रारीचे उत्‍तर सुध्‍दा पाठविले नाही. तेव्‍हा दि. 24.04.2007 रोजी त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फी प्रकरण पुढे चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  9. तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष यांना पाठविलेली नोटीस पोस्‍ट रसिदसह रेकॉर्डवर दाखल आहे. तसेच तक्रारकर्ता यांनी रुपये 7500/- चा दि. 15.09.2006 चा इन्‍व्‍हाईस सुध्‍दा रेकॉर्डवर दाखल केला आहे.
अशा स्थितीत आदेश पारित करण्‍यात येत आहे.
 
                                                   
 
 
 
    .... आदेश ....
 
1                      विरुध्‍द पक्ष यांनी आदेश पारित तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आत तक्रारकर्ता  यांना नविन हॅन्‍डसेट बदलून द्यावा . अन्‍यथा विरुध्‍द पक्ष हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम -27 प्रमाणे दंडाहर्य कारवाईस पात्र असतील.
 
 
 
[HON'ABLE MRS. P. B. POTDUKHE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Shri. Ajitkumar Jain]
Member
 
[HON'ABLE MRS. MOHINI BHILKAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.