जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे
तक्रार क्र.१३८/११ रजि.तारीखः-२१/०७/११
निकाल तारीखः-२६/०६/२०१२
१. सौ.सुषमा सुनिल श्रावगे.
२. सुनिल माधवराव श्रावगे,
दोन्ही रा.प्लॉट नं.४, राजहंस कॉलनी,
चितोड रोड, धुळे. .......तक्रारदार
विरुध्द
श्री.हिंगलाज माता नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे,
(नोटीसची बजावणी चेअरमन यांचेवर व्हावी)
राजेंद्र मधुकर भावसार,
श्री.हिंगलाज माता नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे,
खोलगल्ली, धुळे. .......विरुध्द पक्ष
कोरम - श्री.डी.डी.मडके, अध्यक्ष
सौ.सुधा जैन, सदस्या
तक्रारदार तर्फेः-अॅड.एस.वाय.शिंपी
विरुध्द पक्ष तर्फे – अॅड.एम.जी.देवळे
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष श्री.हिंगलाज माता नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खात्यात रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
तक्रार क्र.१३८/११
मुदत ठेव पावती क्रमांक |
ठेव रक्कम |
ठेव दिनांक |
देय रक्कम |
देय दिनांक |
३३६१ |
१०००००/- |
०१/०५/२००८ |
१,००,००० + ९% व्याज |
२४ महिने |
३३६२ |
५०,०००/- |
०१/०५/२००८ |
५०,००० + ९% व्याज |
२४ महिने |
बचत खाते क्रमांक |
जमा रक्कम |
जमा दिनांक |
देय रक्कम |
देय दिनांक |
३६५ |
४४,०५१/- |
०५/०७/२०११ |
४४,०५१/- |
०५/०७/२०११ |
३. तक्रारदार यांनी गुंतवलेल्या रकमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता पतसंस्थेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावती बचत खात्यातील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
४. विरुध्द पक्ष पतसंस्था यांनी नि.१० वर लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यात त्यांनी तक्रारदार ही पतसंस्थेची मुळ ग्राहक नाही. तक्रारदार यांनी त्यांची मुदत ठेवीची रक्कम श्री.समर्थ सह. पतसंस्था, नगरपट्टी, धुळे या ठिकाणी ठेवली होती. सदर पतसंस्थेतील रक्कम मुदत संपून देखिल तक्रारदारास प्राप्त झालेली नव्हती म्हणून सदर रक्कम विरुध्द पक्ष पतसंस्थेत वर्ग केली परंतू पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने दरमहा रु.१०००/- याप्रमाणे रक्कम घेण्याचे तक्रारदार हिने मान्य केले. तक्रारदार तक्रार दाखल करेपर्यंत रु.३०००/- अदा करण्यात आलेले आहे. तक्रारदारास सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी रक्कम देणेत येत असल्याने पतसंस्थेने तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही असे नमुद केलेले आहे.
५. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचा खुलासा यांचा विचार होता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय? होय.
२. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
४. आदेश काय? खालील प्रमाणे.
तक्रार क्र.१३८/११
विवेचन
६. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी नि.५/१ वर मुदत ठेव पावती व नि.५/३ वर बचत खात्याची झेरॉक्स प्रत सादर केलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावती व बचत खातेची रक्कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावती व बचत खाते तसेच त्यातील रक्कम यांचा विचार होता तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती बचत खात्यात रकमा गुंतवल्या होत्या ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावती व बचत खात्यात गुंतवलेली रक्कम परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही विरुध्द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावती व बचत खात्यातील व्याजासह होणारी रक्कम श्री.हिंगलाज माता नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे यांच्याकडून मिळण्यास पात्र आहेत. तसेच रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना श्री.हिंगलाज माता नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे श्री.हिंगलाज माता नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे यांच्या कडून अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.१०००/- व मानसिक त्रासापोटी रु.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
९. मुद्दा क्र.४ - सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. श्री.हिंगलाज माता नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे यांनी तक्रारदार यांना खालील तपशीलात नमुद असलेल्या मुदत ठेव पावतीमधील मुदतअंती देय रक्कम व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज तसेच बचत खात्यामधील देय रक्कम व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटे पर्यंत
तक्रार क्र.१३८/११
द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.
मुदत ठेव पावती व बचत खात्याचा तपशील खालील प्रमाणे.
मुदत ठेव पावती क्रमांक |
ठेव रक्कम |
ठेव दिनांक |
देय रक्कम |
देय दिनांक |
३३६१ |
१०००००/- |
०१/०५/२००८ |
१,००,००० + ९% व्याज |
२४ महिने |
३३६२ |
५०,०००/- |
०१/०५/२००८ |
५०,००० + ९% व्याज |
२४ महिने |
बचत खाते क्रमांक |
जमा रक्कम |
जमा दिनांक |
देय रक्कम |
देय दिनांक |
३६५ |
४४,०५१/- |
०५/०७/२०११ |
४४,०५१/- |
०५/०७/२०११ |
३. श्री.हिंगलाज माता नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.
४. वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.सुधा जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे