तक्रार दाखलकामी आदेश
1. तक्रारदार यांचे वकील मिस. शितल दुमरालीया यांना तक्रार दाखलकामी ऐकण्यात आले.
2. तक्रार व त्यासोबत दाखल केली कागदपत्रे पाहण्यात आली. तसेच, दि. 07/02/2018 ला दाखल केलेली नोटीसची प्रत पाहण्यात आली. तक्रारदारानी, सामनेवाले यांनी उत्पादित केलेले सौंदर्य प्रसाधन ‘St Ives’ विकत घेतले. या सौंदर्य प्रसाधनाचा वापर ‘फेशियल स्क्रब’ म्हणून होतो. तक्रारदारानी याचा वापर केल्यानंतर, त्यांना त्वचेचा त्रास जाणवू लागला व चेह-यावर सूज आली. तक्रारदारानी जेव्हा-जेव्हा सौंदर्य प्रसाधनाचा वापर केला त्या-त्या वेळी त्वचेचा त्रास झाला. त्वचेला खाज येऊ लागली, तसेच ती लालसर झाली व रखरखीत झाली. तक्रारदारानी याबाबत इंटरनेटवर पाहणी केली असता, त्यांच्या असे लक्षात आले की, या सौंदर्य प्रसाधनामध्ये ‘अक्रोडची टरफले’ हे मुख्य घटक म्हणून वापरण्यात आले आहे व हे घटक अणकुचीदार असल्यामूळे त्वचेला इजा पोहचते. याबाबत विदेशामध्ये अशा घटकांच्या वापरावर बंदी करण्यात आली आहे. या घटकाचा वापर त्वचेकरीता योग्य नसल्याचे दिसून आले. सामनेवाले यांनी हे सौंदर्य प्रसाधन बाजारात विकतांना ग्राहकांना सूचीत केले नाही की, याच्या वापरामूळे त्वचेला हानी होऊ शकते. अमेरीकेच्या संघ राज्यांमध्ये अशा सौंदर्य प्रसाधनाबाबत कित्येक ग्राहकांनी एकत्रितपणे दावा दाखल केला आहे. तक्रारदारानी ही तक्रार दाखल करून, रूपया 1, नुकसान भरपाई म्हणून, सामनेवाले यांच्याकडून दंडात्मक नुकसान भरपाई वसुल करण्यात यावी व ती ग्राहक कल्याण निधीमध्ये जमा करण्यात यावी, सौंदर्य प्रसाधन विक्री करण्यास मनाई करण्यात यावी व जाहिरातीमध्ये सुधारणा करण्याकरीता आदेशीत करावे, अशी मागणी केली आहे.
3. तक्रारदारानी त्यांना उपरोक्त सौंदर्य प्रसाधन वापरल्यामूळे त्यांच्या चेह-याला इजा झाली याबाबत नमूद केले आहे. परंतू, त्यांनी त्याच्या पृष्ठर्थ कोणत्याही वैदयाचा दाखला दाखल केलेला नाही. हि बाब युक्तीवादाकरीता दुर्लक्षीत केली तरी, तक्रारदारानूसार सौंदर्य प्रसाधनामध्ये अक्रोडचे टरफले बारीक करून वापरण्यात आलेली आहे. परंतू ती अणकुचीदार असल्यामूळे त्वचेला इजा पोहचते. आमच्या मते, उपरोक्त सौंदर्य प्रसाधनामधील मुख्य घटक हा अणकुचीदार आहे किंवा नाही हे सकृतदर्शनी दाखविणे आवश्यक होते व याकरीता एखादया तज्ञांचा अहवाल सादर करणे आवश्यक होते. परंतू, तक्रारदारानी असा कोणताही अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनामधील घटक हा अणकुचीदार होता किंवा नाही याबाबत संचिकेत कोणताही पुरावा नाही.
4. तक्रादारांनी तक्रारीसोबत सौंदर्य प्रसाधनाचे छायाचित्र सादर केलेले आहे व त्यामध्ये “अॅप्रीकॉट स्क्रब” असे नमूद केल्याचे दिसून येते. परंतू तक्रारदारानी त्यांच्या तक्रारीमध्ये उपरोक्त सौंदर्य प्रसाधनामध्ये “क्रशड” वॉलनट शेल असल्याचे नमूद केले आहे. अॅप्रीकॉट व वॉलनट हे दोन वेगळे फळ आहेत. अशा परिस्थितीमध्ये तज्ञांचा अहवालाला फार महत्व प्राप्त होते.
5. वरील चर्चेनुरूप व निष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
- तक्रार क्र 409/2017 ग्रा.सं.कायदयाच्या कलम 12 (3) प्रमाणे फेटाळण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही
- आदेशाच्या प्रती उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
- अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
npk/-