Maharashtra

Nagpur

CC/484/2017

SHRI. HARSHAL GENDLAL PARATE - Complainant(s)

Versus

HINDUSTAN PETROLEUM CORPORATION LTD., A GOVERNMENT OF INDIA ENTERPRISE - Opp.Party(s)

ADV. MRS. S.K. PAUNIKAR

17 Nov 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/484/2017
( Date of Filing : 02 Nov 2017 )
 
1. SHRI. HARSHAL GENDLAL PARATE
R/O. ASHIRWAD NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. MRS. HEMLATA GENDLAL PARATE
R/O. ASHIRWAD NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. HINDUSTAN PETROLEUM CORPORATION LTD., A GOVERNMENT OF INDIA ENTERPRISE
17, JAMSHEDJI TATA ROAD, MUMBAI.
MUMBAI
MAHARASHTRA
2. M/S PRAYAGRAJ GAS AND DOMESTIC APPLIANCES, DEALER OF HP GAS
PLOT NO. 6, DATTATRAY NAGAR, NAGPUR-440024
NAGPUR
MAHARASHTRA
3. UNITED INDIA INSURANCE CO. LTD.
DIVI. OFF.NO.17, 226, CANADA BUILDING, 1ST FLOOR, DR. D.N. ROAD, FORT MUMBAI-440001
MUMBAI
MAHARASHTRA
4. NATIONAL INSURANCE CO. LTD.
AGENT BRANCH I, 5TH FLOOR, PAUL COMMERCIAL COMPLEX, AJANI, WARDHA ROAD, NAGPUR-4400015
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. MRS. S.K. PAUNIKAR, Advocate for the Complainant 1
 ADV. QUAZI, RAHATE, Advocate for the Opp. Party 1
 ADV. D. GAWAI, Advocate for the Opp. Party 1
 ADV. SURPAL, Advocate for the Opp. Party 1
 ADV. RAIPURE, Advocate for the Opp. Party 1
Dated : 17 Nov 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. अध्‍यक्ष, श्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, तक्रारकर्ता क्रं. 1 व 2 हे पती पत्‍नी आहेत. तक्रारकर्ते हे विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून घरगुती गॅसचे सिलेंडर खरेदी करीत असून त्‍यांचा ग्राहक क्रं. 660728 असा आहे. तक्रारकर्त्‍याने दि.31.12.2015 रोजी विरुध्‍द पक्ष क्रं. 2 या वितरकाकडून सिलेंडर खरेदी केले होते. तक्रारकर्ती क्रं. 2 ने रात्री 9.30 वाजता सदरहू सिलेंडर वापरण्‍याकरिता त्‍याची कॅप काढली. परंतु सदरहू सिलेंडर मधून गॅसची वायू गळती झाल्‍यामुळे सदरहू सिलेंडरमधील वायू हा स्‍वयंपाक घरातील सर्व बाजूने पसरला व त्‍याच वेळी स्‍वयंपाक घरातील कोप-यात देवा समोर दिवा जळत असल्‍यामुळे आग लागली आणि त्‍यामध्‍ये तक्रारकर्ती क्रं. 2 हेमलता ही भाजली आणि तिच्‍या सर्वांगावर जखमा झाल्‍या. तक्रारकर्तीला लगेच रात्री 10.15 मि. दवाखान्‍यात उपचाराकरिता भरती केले असता डॉक्‍टरांनी तपासल्‍यानंतर तक्रारकर्तीचा चेहरा,  हात,  छाती आणि पोट भाजलेले असल्‍याचे आढळले आणि डॉक्‍टरांच्‍या मते तक्रारकर्ती क्रं. 2 हेमलता ही 25 टक्‍के भाजलेली होती. तक्रारकर्ती क्रं. 2 हेमलता हिच्‍यावर दवाखान्‍यात दि. 15.01.2016 पर्यंत उपचार करण्‍यात आला व त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याला रुपये 97,950/- इतका खर्च आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, तक्रारकर्ती क्रं. 2 हेमलता ही कुशल कामगार आहे आणि ती मेसर्स शिव अॅन्‍ड कंपनी यांच्‍याकडे सर्व प्रकारचे तयार कपडे आणि शाळांचे गणवेष तयार करण्‍याचे काम करीत होती आणि याकरिता तिला प्रतिमाह रुपये 15,000/- पगार मिळत होता. वरील प्रसंगामुळे तक्रारकर्तीचे मोठे नुकसान झाले असून तक्रार दाखल करते वेळी तक्रारकर्ती  ही 52 वर्षाची होती.

 

 

  1.      तक्रारकर्त्‍यांनी पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 ने निर्मित केलेले गॅस सिलेंडरचे विरुध्‍द पक्ष  2 हे वितरक आहेत आणि विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यांना कुठल्‍याही प्रकारे आर्थिक मदत केली नाही व विरुध्‍द पक्ष 1  व 2 हे तक्रारकर्त्‍यांना दवाखान्‍यातील उपचाराची रक्‍कम आणि नुकसान भरपाई देण्‍यास जबाबदार आहेत.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी विरुध्‍द पक्ष 3 व 4 यांच्‍याकडून विमा दाव्‍याची रक्‍कम मिळविण्‍याकरिता कोणत्‍याही प्रकारची कार्यवाही केली नाही. विरुध्‍द पक्ष  3 व 4 यांनी अशा प्रसंगामध्‍ये नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी होती, परंतु त्‍यांनी विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांच्‍याशी केलेल्‍या करारनाम्‍यातील जबाबदारीचे पालन केले नाही. म्‍हणून वि.प. 1 ते 4 हे सर्व तक्रारकर्त्‍यांना नुकसान भरपाई देण्‍यास जबाबदार आहेत. तक्रारकर्त्‍यांनी वर्तमान तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.

अ. विरुध्‍द पक्ष 1 ते 4 यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे.

ब. सर्व विरुध्‍द पक्ष 1 ते 4 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍यांना दवाखान्‍यातील उपचाराचा खर्च रुपये 3,00,000/- 24 टक्‍के  व्‍याजासह द्यावे.

क. विरुध्‍द पक्ष 1 ते 4 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍यांना नुकसान भरपाईकरिता रुपये 15,60,000/- द्यावे.

ड. विरुध्‍द पक्ष 1 ते 4 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍यांना तसेच तक्रारीच्‍या खर्चाबाबत रुपये 50,000/- द्यावे

अशी विनंती केली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी त्‍यांचा लेखी जबाब नि.क्रं. 8 वर दाखल केला असून तक्रारीतील त्‍यांच्‍यावर लावलेले आक्षेप नाकारलेले आहेत. परंतु तक्रारकर्त्‍याचा ग्राहक क्रं. 660728 असल्‍याचे मान्‍य केलेले आहे. तसेच  तक्रारकर्त्‍यानी दि. 31.12.2015 च्‍या घटनेबाबत विरुध्‍द पक्ष 1 ला काहीही कळविलेले नाही आणि दोन वर्षानंतर दि. 11.09.2017 रोजी प्रथमच वकिला मार्फत नोटीस पाठविली होती. तक्रारकर्ते हे विरुध्‍द पक्ष 1 चे ग्राहक नसून तक्रारकर्त्‍यांनी त्‍यांच्‍या नुकसानीच्‍या दाव्‍याबाबत विरुध्‍द पक्ष 1 ला काहीही कळविलेले नाही. विरुध्‍द पक्ष 1 ने पुढे नमूद केले की, त्‍यांच्‍या तर्फे प्रत्‍येक गॅस सिलेंडरची कसून तपासणी करण्‍यात येते आणि त्‍यानंतरच सिलेंडर पुरवठादाराकडे (वितरकाकडे) पाठविण्‍यात येते. त्‍याचप्रमाणे अशा प्रकारच्‍या दुर्दैवी घटनेकरिता विरुद पक्ष 1 यांनी यु‍नायटेड इंडिया इन्‍श्‍युरन्‍स कंपनी यांच्‍याकडे विमा पॉलिसी काढलेली होती व तिचा क्रं. 0217002715P101332273 असा असून सदरची विमा पॉलिसी ही दि. 02.05.2015 ते दि.01.05.2016 या कालावधीकरिता होती. परंतु तक्रारकर्त्‍याने सदरहू विमा कंपनीला वर्तमान प्रकरणात आवश्‍यक पक्षकार केलेले नाही, म्‍हणून वर्तमान तक्रार खारीज करण्‍यात यावी.

विरुध्‍द पक्ष 1 ने पुढे नमूद केले की, त्‍यांच्‍या पॉलिसीप्रमाणे विरुध्‍द पक्ष  2 यांना सुध्‍दा अशा प्रकारच्‍या दुर्दैवी घटनेकरिता विमा पॉलिसी काढावी लागते आणि विरुध्‍द पक्ष 2 यांनी नॅशनल इन्‍श्‍युरन्‍स कंपनी, अजनी नागपूर यांच्‍याकडे पॉलिसी क्रं.  281107/48/15/2000000069 ही दि. 23.04.2015 ते 22.04.2016 या कालावधीकरिता काढली होती, परंतु तक्रारकर्त्‍याने सदरहू विमा कंपनीला आवश्‍यक पक्षकार केले नाही, म्‍हणून वर्तमान तक्रार खारीज करण्‍यात यावी. तसेच विरुध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारी मधील घटनेबाबतचा,  निष्‍काळजीपणाबाबतचा आरोप, वैद्यकीय उपचार केल्‍याबाबतच्‍या सर्व बाबी नाकारलेल्‍या आहेत. वि.प. 1 यांनी त्‍यांची वैयक्तिक आणि संयुक्तिक जबाबदारी नाकारलेली आहे आणि सदरची तक्रार खारीज करण्‍याची मागणी केलेली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष  2 ने आपला लेखी जबाब नि.क्रं. 14 अ वर दाखल केलेला असून त्‍यात नमूद केले की, दि. 31.12.2015 रोजी तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍याकडून गॅस सिलेंडर घेतले होते आणि सदरहू सिलेंडर त्‍यांनी सर्व तपासणी करुनच तक्रारकर्त्‍याला दिले होते. सदरहू सिलेंडर हे संपूर्ण दिवसभर व्‍यवस्थितीत होते व सदरची घटना ही रात्रीच्‍या वेळी घडलेली आहे असे दिसून येते, यावरुन तक्रारकर्ती क्रं. 2 ने सदरहू सिलेंडर योग्‍य रितीने हाताळले नाही,  म्‍हणून सदरहू अपघात घडलेला आहे. विरुध्‍द पक्ष 2 ने पुढे नमूद केले की, त्‍यांच्‍या तर्फे प्रत्‍येक ग्राहकाला गॅस सिलेंडर हे तपासणी करुनच दिल्‍या जाते आणि म्‍हणून तक्रारकर्त्‍याने चुकिच्‍या आधारावर प्रकरण दाखल केलेले आहे.

विरुध्‍द पक्ष 2 यांनी पुढे नमूद केले की, सदरहू अपघाताबाबत सक्‍करदरा पोलिस स्‍टेशनकडून कोणताही अंतिम अहवाल प्राप्‍त झालेला नाही आणि तक्रारकर्त्‍यांनी विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून रक्‍कम वसूल करण्‍याकरिता सदरची तक्रार दाखल केलेली आहे. विरुध्‍द पक्ष 2 ने आपली जबाबदारी आणि कर्तव्‍य म्‍हणून दि. 14.01.2016 ला नॅशनल इन्‍श्‍युरन्‍स कंपनीला अपघाताबाबत कळविले आणि विमा दाव्‍याबाबत पत्रव्‍यवहार केला. सदरहू विमा कंपनीने  काही कागदपत्रांची मागणी केली आणि ही बाब विरुध्‍द पक्ष 2 ने तक्रारकर्त्‍यांना सांगितलेली आहे, परंतु तक्रारकर्त्‍यांनी सदरहू कागदपत्रांबाबत कार्यवाही केलेली नाही. विरुध्‍द पक्ष 2 ने पुढे नमूद केले की, नियमानुसार प्रत्‍येक वितरकाला पॉलिसी काढणे आवश्‍यक असते. अचानक अपघात घडल्‍यास त्‍याबाबतची दाद विमा कंपनीकडून मागता येते. परंतु तक्रारकर्त्‍यांनी विमा कंपनीला वर्तमान प्रकरणात पक्षकार केलेले नाही, म्‍हणून सदरची तक्रार चालू शकत नाही ( या जबाबानंतर तक्रारकर्त्‍यानी तक्रारीत दुरुस्‍ती करुन विमा कंपनीला  विरुध्‍द पक्ष क्रं. 3 व 4 म्‍हणून पक्षकार केलेले आहे) .

 

  1.       विरुध्‍द पक्ष 2 यांनी पुढे असे नमूद केले की, आगीच्‍या घटनेबाबत जवळच्‍या अग्‍नीशामक दलाला माहिती देणे व त्‍यांचा अहवाल मागविणे आवश्‍यक असते. तक्रारकर्त्‍यांनी विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांना पक्षकार बनविण्‍याकरिता कोणतेही आधारभूत दस्‍तावेज दाखल केलेले नाही. विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्‍यांना दि. 17.01.2016 रोजी पंजाब नॅशनल बॅंकेचा धनादेश क्रं.  496647  प्रमाणे  रक्‍कम रुपये 19,000/- दिलेली आहे. वि.प. 2 यांनी पुढे नमूद केले की, सदरची घटना ही 2015 मध्‍ये घडली आणि तक्रारकर्त्‍यांनी तब्‍बल 2 वर्षापर्यंत कोणतीही कार्यवाही व पत्रव्‍यवहार न करता सदरची तक्रार सन 2017 मध्‍ये वर्तमान तक्रार दुष्‍ट हेतूने दाखल केली आहे, म्‍हणून सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी.  

 

  1.      वि.प. 2 यांनी तक्रारीतील परिच्‍छेद क्रं. 1 ते 12 मधील मजकूर नाकारलेला आहे आणि तक्रार खर्चासह खारीज करण्‍याची मागणी केलेली आहे. विरुध्‍द पक्ष 2 यांनी आयोगाच्‍या परवानगीने अतिरिक्‍त लेखी जबाब नि.क्रं. 28 वर दाखल केला आणि सदरहू जबाबात असे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी कोणत्‍याही प्रकारे सेवेत त्रुटी केलेली नाही किंवा अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. त्‍यांनी पुढे नमूद केले की, प्रत्‍येक सिलेंडर हे विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडून योग्‍य प्रकारे तपासणी केल्‍यावर डिलर कडे पाठविण्‍यात येते आणि ते ग्राहकांपर्यंत हस्‍तांतरीत करण्‍याची विरुध्‍द पक्ष 2 ची जबाबदारी आहे आणि यामध्‍ये विरुध्‍द पक्ष 2 यांनी कोणतीही चूक केलेली नाही. वि.प. 2 ने पुढे असा आक्षेप नोंदविला आहे की, तक्रारकर्त्‍यांनी सदरहू घटना ही गॅस सिलेंडरमध्‍ये दोष असल्‍यामुळे झाली असा तज्ञांचा अहवाल दाखल केलेला नाही. म्‍हणून सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांनी  त्‍यांचा जबाब नि.क्रं. 29 वर दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्त्‍यांनी त्‍यांच्‍या नौकरी, पगार याबाबत काहीही कागदपत्रे दाखल केलेली नाही आणि सदरहू रक्‍कम रुपये 15,60,000/- चे नुकसानभरपाई मागण्‍याकरिता पुरावा दाखल केलेला नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने कागदपत्रे विमा कंपनीकडे दाखल केलेली नाही.  विरुध्‍द पक्ष 3 यांनी कोणत्‍याही प्रकारे सेवेत त्रुटी केलेली नाही आणि कुठल्‍याही प्रकारे अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही, म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

 

  1.      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी त्‍यांच्‍या नि.क्रं. 45 वरील अधिकच्‍या जबाबात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 यांना सदरहू घटनेबाबत कोणतीही माहिती देण्‍यात आलेली नव्‍हती आणि विरुध्‍द पक्ष 1 विरुध्‍द दाखल केलेली तक्रार खोटी आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष क्रं. 4 ने आपला लेखी जबाब नि.क्रं. 24 वर दाखल केला असून तक्रारी मधील सर्व मजकूर नाकारलेला आहे. तसेच तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष 4 कडून कोणतेही विमा संरक्षण देण्‍यात आलेले नाही आणि तक्रारकर्ता यांच्‍याशी विरुध्‍द पक्ष 4 यांनी कोणताही प्रत्‍यक्ष व्‍यवहार केलेला नाही. विरुध्‍द पक्ष 4 यांनी विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून विमा पॉलिसी क्रं. 28/107/48/15/2000000069 ही दि.23.04.2015 ते 22.04.2016 या कालावधीकरिता काढलेली होती.  विरुध्‍द पक्ष 4 यांनी दि. 13.12.2016 ला पत्र पाठवून निरनिराळया कागदपत्रांची मागणी केली आणि सदरहू कागदपत्रे पाठविण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष 2 यांना दि.20.12.2016,  27.12.2016, 05.01.2017 इत्‍यादी तारखांना रजिस्‍टर्ड पोस्‍टाने पत्रे पाठविली होती, परंतु विरुध्‍द पक्ष 2 यांनी कोणतीही कागदपत्रे विरुध्‍द पक्ष 4 ला पाठविलेली नाही. विरुध्‍द पक्ष 2 यांनी कागदपत्रे न पुरविल्‍यामुळे सदरहू विमा दावा हा   No Claim असा शेरा देऊन बंद करण्‍यात आला.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 4 ने पुढे नमूद केले की, एल.पी.जी. ट्रेडर्स पॉलिसी प्रमाणे विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी कार्यवाही करावयाची असते आणि सदरहू पॉलिसी मधील  Section-X  प्रमाणे सर्व माहिती कळविणे आवश्‍यक असते. त्‍यामुळे  विरुध्‍द पक्ष 4 यांना सदरहू घटनेबाबत जबाबदार ठरविता येणार नाही. विरुध्‍द पक्ष 4 यांनी आपल्‍या जबाबासोबत आणि नि.क्रं. 25 च्‍या लिस्‍ट सोबत 7 कागदपत्रे दाखल केलेली आहे. विरुध्‍द पक्ष 4 यांनी सेवेत कुठलीही त्रुटी केलेली नाही, म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.

 

  1.      आम्‍ही तक्रारकर्ता तर्फे अॅड. श्रीमती एस.के. पौनीकर, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 तर्फे अॅड. काझी / राहाटे,  विरुध्‍द पक्ष 2 तर्फे अॅड. आर.जे.गवई,  विरुध्‍द पक्ष 3 तर्फे अॅड. सुरपाम व विरुध्‍द पक्ष क्रं. 4 तर्फे अॅड. रायपूरे यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतला व अंतिम आदेशाकरिता खालील मुद्दे विचारार्थ घेतले व त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविलेली आहेत.  

 

अ.क्रं     मुद्दे                                                                             उत्‍तर

1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहे काय ?          होय

2. वर्तमान तक्रार मुदतीत दाखल केलेली आहे काय ?             होय

3. विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या प्रति

सेवेत त्रुटी केली आहे काय आणि अनुचित व्‍यापारी

प्रथांचा अवलंब केला आहे काय ? होय

  1. विरुध्‍द पक्ष 1 , 3 व 4 यांनी सेवेत त्रुटी केली

काय आणि अनुचित व्‍यापारी प्रथांचा अवलंब

केला आहे काय ?                                                                नाही.

5. काय आदेश ?                                           अंतिम आदेशाप्रमाणे

  •     निष्‍कर्ष
  1. मुद्दा क्रमांक 1 बाबत -  तक्रारकर्त्‍याचे वकील श्रीमती पौनीकर यांनी थोडक्‍यात असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्ते यांनी दि. 31.12.2015 रोजी विरुध्‍द पक्ष 2 कडून गॅस सिलेंडर खरेदी केले होते आणि सदरहू गॅस सिलेंडर वापरण्‍यास घेतले असता त्‍यामध्‍ये मोठा स्‍फोट होऊन तक्रारकर्ती क्रं. 2 ही गंभीर जखमी झाली आणि ती दि. 15.01.2016 पर्यंत दवाखान्‍यात उपचाराकरिता भरती होती व त्‍याकरिता तक्रारकर्तीला रुपये 98,000/- इतका खर्च करावा लागला.  त्‍याचप्रमाणे तक्रारकर्ती क्रं. 2 ही कुशल कामगार असून ती प्रतिमाह रुपये 15,000/- इतके वेतन मिळवित होती आणि आता ती कोणतेही काम करु शकत नाही, म्‍हणून नुकसानभरपाई देऊन तक्रार मंजूर करण्‍यात यावी.

 

  1.      तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी युक्तिवादात असे ही कथन केले की, विरुध्‍द पक्ष 2 यांनी अशा अपघाताबाबत ग्राहकांना संरक्षण देण्‍याकरिता विमा पॉलिसी काढणे आवश्‍यक असते आणि नुकसानभरपाई देण्‍याची मुलभूत जबाबदारी ही  विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांची आहे आणि विमा पॉलिसी काढलेली असल्‍यास नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी विरुध्‍द पक्ष 3 व 4 ची देखील आहे. म्‍हणून सदरची तक्रार मंजूर करणे आवश्‍यक आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 यांनी असा युक्तिवाद केला की, त्‍यांच्‍या तर्फे पाठविण्‍यात येत असलेल्‍या प्रत्‍येक सिलेंडरची योग्‍यपणे तपासणी  केल्‍यानंतरच सिलेंडर हे वितरकाकडे पाठविण्‍यात येते आणि सदरहू घटना घडल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष 1 यांना कोणतीही माहिती देण्‍यात आलेली नाही. तक्रारकर्ते यांनी 2 वर्षानंतर प्रथमच त्‍यांना नोटीस पाठविलेली आहे,  म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांच्‍या विरुध्‍द तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार ही काल्‍पनिक आधारावर दाखल केलेली असून तक्रारकर्ती क्रं. 2 ही कोणतीही नौकरी करीत नाही, त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी.  

 

  1.      विरुध्‍द पक्ष क्रं. 2 च्‍या वकिलांनी थोडक्‍यात असा युक्तिवाद केला की, त्‍यांनी तक्रारकर्तीला अपघाताच्‍या घटनेनंतर रक्‍कम रुपये 19,000/- दिलेले आहे आणि त्‍यानंतर 2 वर्षापर्यंत तक्रारकर्ते हे विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडे कधीही आलेले नाही आणि तक्रार निवारण करणा-याकरिता सक्षम    अधिका-याकडे गेलेले नाही, त्‍याचप्रमाणे विमा दाव्‍याकरिता आवश्‍यक असलेली माहिती  दिलेली नाही. सदरहू अपघात हा कोणत्‍या कारणामुळे झाला याबाबत  तक्रारकर्त्‍यांनी तज्ञ अहवाल मा‍गविलेला नाही. विरुध्‍द पक्ष 2 ने कुठल्‍याही प्रकारे सेवेत त्रुटी केली नाही व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही, म्‍हणून त्‍याच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 3 च्‍या  वकिलांनी थोडक्‍यात असा युक्तिवाद केला की, विरुध्‍द पक्ष 1 यांनी विमा कंपनीकडे कोणत्‍याही प्रकारे दावा दाखल केलेला नाही आणि लेखी नोटीस दिलेली नाही. तसेच त्‍यांनी कुठल्‍याही प्रकारे सेवेत त्रुटी केलेली नाही, म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी.
  2.      विरुध्‍द पक्ष 4 च्‍या वकिलांनी थोडक्‍यात असा युक्तिवाद केला की,  त्‍यांनी विरुध्‍द पक्ष 2 यांना विमा पॉलिसी दिलेली आहे आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांना कागदपत्रे पाठविण्‍याकरिता पत्र पाठविले आणि त्‍यानंतर ही अनेक वेळा स्‍मरणपत्रे पाठवून ही तक्रारकर्त्‍याने आणि वि.प. 2 यांनी विमा दावा मंजूर करण्‍यासाठी आवश्‍यक ती कागदपत्रे दाखल केलेली नाही. तक्रारकर्ते यांनी सदरहू सिलेंडर हे दिव्‍याजवळ ठेवल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यानेच निष्‍काळजीपणा केलेला आहे. त्‍यामुळे वि.प. 4 विरुध्‍दची तक्रार  खारीज करण्‍यात यावी.

 

  1.      तक्रारकर्ते यांच्‍या वकिलांनी जबाबी युक्तिवादात नमूद केले आहे की, सदरहू सिलेंडर हे त्‍याच दिवशी खरेदी केलेले होते, म्‍हणून सिलेंडर हाताळण्‍यात तक्रारकर्ते यांची चूक आहे असे म्‍हणता येणार नाही. विरुध्‍द पक्ष 2 यांनी विमा कंपनीला सन 2016 मध्‍ये पत्र पाठविले होते, परंतु त्‍यानंतर कागदपत्रे पाठविली नाही, म्‍हणून तक्रार ही मुदतीत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍यानी सर्व कागदपत्रे विरुध्‍द पक्ष 2 कडे दिलेली होती, परंतु विरुध्‍द पक्ष 2 यांनीच सदरहू कागदपत्रे विमा कंपनी म्‍हणजेच विरुध्‍द पक्ष 4 यांच्‍याकडे पाठविलेली नाही आणि सेवेत त्रुटी केलेली आहे. म्‍हणून सदरची तक्रार मंजूर करण्‍यात यावी.

 

  1.      आम्‍ही उभय पक्षांच्‍या वकिलांचा युक्तिवाद विचारार्थ घेतले आणि अभिलेखावरील सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले.

 

  1. मुद्दा क्रमांक 1 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून सिलेंडर खरेदी केला असल्‍याबाबत वाद नाही. म्‍हणून तक्रारकर्ते हे विरुध्‍द पक्ष 1 व 2 चे ग्राहक आहेत हे स्‍पष्‍टपणे दिसून येते. विरुध्‍द पक्ष 3 यांनी विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍या सोबत विमा करार केलेला आहे आणि विरुध्‍द पक्ष 4 यांनी विरुध्‍द पक्ष 2 सोबत विमा करार केलेला आहे. सदरहू विमा करार हा अशा प्रकारच्‍या आगीबाबतच्‍या दुर्घटनेत झालेल्‍या नुकसानीकरिता आहेत, म्‍हणून तक्रारकर्ते हे विरुध्‍द पक्ष 1 ते 4 यांचे ग्राहक आहेत असे आमचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 वर आम्‍ही होकारार्थी उत्‍तर नोंदवित आहोत.

 

  1. मुद्दा क्रमांक 2 बाबत – आगीबाबतची घटना ही दि.31.12.2015 रोजी घडलेली आहे आणि तक्रारकर्ती क्रं. 2 ही दि. 15.01.2016 पर्यंत दवाखान्‍यात उपचाराकरिता भरती होती. त्‍यानंतर वर्तमान तक्रार ही दि. 23.10.2017 रोजी दाखल करण्‍यात आलेली आहे. म्‍हणून वर्तमान तक्रार ही मुदतीत आहे असे स्‍पष्‍ट आहे. करिता मुद्दा क्रमांक 2 वर होकारार्थी उत्‍तर नोंदवित आहोत.

 

  1. मुद्दा क्रमांक 3 व 4 बाबत -  तक्रारकर्ते यांनी आगीच्‍या घटनेबाबत पोलिस स्‍टेशन येथे दाखल केलेल्‍या एफ.आय.आर.ची प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे. दि. 01.01.2016 रोजीच म्‍हणजेच घटनेच्‍या लगेच दुस-या दिवशी घटनास्‍थळ पंचनामा केलेला आहे आणि आगीबाबतची घटना झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी तक्रारकर्ते यांना काही रक्‍कम ही दिलेली आहे, यावरुन सदरहू घटना घडल्‍याबाबत विरुध्‍द पक्ष 2 ला माहिती होती याबाबत वाद नाही. परंतु वि.प. 2 आणि वि.प. 4 यांनी सदरहू घटनेकरिता तक्रारकर्ती क्रं. 2 ला जबाबदार ठरविलेले आहे आणि तक्रारकर्ते यांनी सदरहू सिलेंडर मध्‍ये दोष असल्‍याबाबत कोणताही तज्ञ अहवाल दाखल केलेला नाही असा बचाव घेतलेला आहे.

 

तक्रारकर्ते हे विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून अनेक वर्षापासून सिलेंडर घेत असतात म्‍हणून त्‍यांना सिलेंडर वापराबाबतचे ज्ञान नाही असे म्‍हणता येणार नाही. सिलेंडर मध्‍ये आणि त्‍याला जोडण्‍यात येणा-या रेग्‍युलेटरमध्‍ये दोष असल्‍याशिवाय वायू गळती होऊ शकत नाही हे अगदी स्‍पष्‍ट आहे. त्‍यासाठी वर्तमान प्रकरणात तज्ञ अहवाल मागविण्‍याची आवश्‍यकता नाही. याबाबत तक्रारकर्ते यांच्‍या वकिलांनी मा. राष्‍ट्रीय आयोगाने M/S. Indian Oil Corporation Ltd. VS. Sanjeev Kumar Jhamb & 4 Others , First Appeal No. 111/2019 या प्रकरणातील न्‍यायनिवाडयाचा आधार घेतलेला आहे. सदरच्‍या न्‍यायनिवाडयातील परिच्‍छेद क्रं. 20 आणि 21 मध्‍ये खालीलप्रमाणे महत्‍वाची निरीक्षणे नोंदविलेली आहेत. ..........

  1. .   Complainants immediately reported the matter to the Department of Fire who reached the site and submitted their report. There was no attempt on the part of the complainants to conceal the incident. Plea thus raised by OP1 that the complainants should have obtained a report from the lab is of no avail as the defect was in the fixing of the valve and the lid  thereon. In normal course after lifting of the plastic cover, the valve closes the aperture, avoiding any type of leakage. It is only when some pressure is put by the regulator on the valve that a way for the gas to come out, is made.

21. Complainants have been able to discharge their initial burden that the valve and the lid upon it were not properly placed. Now the burden is shifted on the Ops to prove that opening of the lid in a particular manner not prescribed could cause the accident. A vague allegation that it was a case of the mishandling is of no avail to the Ops.

वरील निरीक्षणे वर्तमान प्रकरणाशी तंतोतंत लागू होतात. विरुध्‍द पक्ष यांनी पोकळ विधाने करुन आपली जबाबदारी टाळण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. परंतु त्‍यांच्‍यावर घटनेबाबत अधिक चौकशी करण्‍याची जबाबदारी आणि तज्ञा मार्फत पाहणी करण्‍याची जबाबदारी आहे आणि त्‍या जबाबदारीचे पालन विरुध्‍द पक्षाने केलेले नाही. म्‍हणून विरुध्‍द पक्षाने वर्तमान प्रकरणात घेतलेला बचाव हा अर्थहिन असून तो लागू होत नाही असे आमचे मत आहे. वर्तमान प्रकरणात तक्रारकर्ते हे निष्‍काळजीपणे सदरहू सिलेंडरचा वापर करीत होते असे विरुध्‍द पक्षाने सिध्‍द केलेले नाही आणि सिलेंडरचा वापर ज्‍या दिवशी खरेदी केला त्‍याच दिवशी सध्‍यांकाळी करण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ते यांनी सिलेंडर अयोग्‍य (Complainant kept the Cylinder many days and mishandled it)  पणे वापरले असे म्‍हणता येणार नाही.

त्‍याचप्रमाणे तक्रारकर्ते यांच्‍या वकिलांनी मा. राष्‍ट्रीय आयोगाने  Mrs. Madhuri Govilkar  VS. Hindustan Petroleum , IV (2006) CPJ 338 NC या प्रकरणात पारित केलेल्‍या न्‍यायनिवाडयाचा योग्‍यपणे आधार घेतलेला आहे व सदरच्‍या न्‍यायनिवाडयातील परिच्‍छेद क्रं. 22 व 24  मध्‍ये खालीलप्रमाणे निरीक्षणे नोंदविलेली आहे.

  1.  

In our view, this shows a typica negative approach on the part of the Officers of the Insurance Company and such type of preparation of false defence increases the litigation in this country. In any case, such defence on the part of the Nationalised Insurance Company is totally unjustifiable.

 

  1.                               From the aforesaid discussion, it is apparent that the gay cylinder supplied by the Opposite Party No. 2 was defective, and therefore the Opposite Party No. 2 would be liable to compensate the Complainants for the loss suffered by them due to the death of  Shri Govilkar, husband of complainant No. 1 and father of the rest of the Complaints.

वर्तमान प्रकरणात सुध्‍दा विरुध्‍द पक्ष क्रं. 2 वितरक असून त्‍यांनी  योग्‍य कार्यवाही करण्‍या ऐवजी नकारात्‍मक दृष्‍टी ठेवलेली आहे आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी घटनेबाबत वि.प. 4 विमा कंपनी यांना आणि वि.प. 1- गॅस कंपनी यांना योग्‍य माहिती दिलेली नाही आणि अशा प्रकारे वि.प. 2 यांनी तक्रारकर्त्‍याला त्रुटीपूर्ण सेवा दिली असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केले असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. तसेच विरुध्‍द पक्ष 2 यांनी विरुध्‍द पक्ष क्रं. 4 यांच्‍याकडे तक्रारकर्ते यांनी दिलेली कागदपत्रे पाठविलेली नाही. विरुध्‍द पक्ष क्रं. 4 यांनी विरुध्‍द पक्ष 2 यांना दि. 13.12.2016, 20.12.2016, 27.12.2016 व 05.01.2017 इत्‍यादी तारखांना स्‍मरणपत्रे पाठविलेली होती हे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते.  म्‍हणून  तक्रारकर्ते यांना नुकसानभरपाई देण्‍यास विरुध्‍द पक्ष 2 हेच जबाबदार आहे असे आमचे मत आहे. करिता मुद्दा क्रमांक  3 वर होकारार्थी व मुद्दा क्रमांक 4 बाबत नकारार्थी उत्‍तर नोंदवित आहोत.

  1. मुद्दा क्रमांक 5 बाबत -  वरील सर्व कारणास्‍तव तक्रारकर्ते यांना झालेल्‍या त्रासाकरिता योग्‍य ती नुकसानभरपाई देण्‍यास विरुध्‍द पक्ष क्रं. 2 हे जबाबदार आहेत. तक्रारकर्ती क्रं. 2 ही घटना घडल्‍यानंतर बरेच दिवस म्‍हणजेच दि. 15.01.2016 पर्यंत वैद्यकीय उपचाराकरिता श्री हॉस्‍पीटल अॅन्‍ड क्रिटीकल केअर सेंटर येथे भरती होती आणि ती 25 टक्‍के पर्यंत भाजलेली होती आणि  तक्रारकर्ती क्रं. 2 ला दवाखान्‍याच्‍या खर्चाबाबत रक्‍कम रुपये 97,950/- एवढा खर्च आला असल्‍याचे दाखल कागदपत्रावरुन दिसून येते. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्तीला काही दिवस आय.सी.यू. मध्‍ये देखील ठेवण्‍यात आल्‍याचे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्‍या फोटो वरुन तक्रारकर्ती क्रं. 2 चे हात, तोंड व शरीर भाजले असल्‍याबाबतचे पट्टे कायम स्‍वरुपी असल्‍याबाबत दिसून येते. तक्रारकर्ती क्रं. 2 ने वैद्यकीय उपचार केल्‍यानंतर काढलेली छायाचित्रे अभिलेखावर दाखल केलेली आहे. सदरच्‍या घटनेमुळे तक्रारकर्ती क्रं. 2 चे सौदंर्य देखील नष्‍ट झाले असल्‍याचे दिसून येते. तसेच तक्रारकर्तीचे कुशल काम करण्‍याची पात्रता ही सुध्‍दा दोन्‍ही हातांची बोटे भाजल्‍यामुळे कमी झालेली आहे. तक्रारकर्तीने 12 वी पर्यंतचे  शिक्षण घेतलेले आहे आणि तक्रारकर्ती ही रेडिमेट गारमेन्‍टस निर्माण करणा-या शिव अॅन्‍ड कंपनी मध्‍ये कुशल कामगार म्‍हणून जानेवारी 2012 पासून 31.12.2015 पर्यंत शिलाईचे आणि नक्षीकाम करीत होती आणि याकरिता तिला प्रतिमाह रक्‍कम रुपये 15,000/- इतका पगार मिळत असल्‍याचे शिव अॅन्‍ड कंपनीने दिलेल्‍या प्रमाणपत्रावरुन दिसून येते. सबब या घटनेमुळे तक्रारकर्तीचे शारीरिक, आर्थिक नुकसान झालेले आहे आणि तिचे सौंदर्य नष्‍ट झाल्‍यामुळे तिला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व आर्थिक नुकसानीकरिता रुपये 7,00,000/- आणि दवाखान्‍यातील वैद्यकीय उपचाराकरिता खर्चाबाबत रक्‍कम रुपये 1,00,000/- मंजूर करणे न्‍यायोचित व वाजवी आहे असे आमचे मत आहे.

   

वरील सर्व कारणास्‍तवखालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍यांची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1, 3 व 4 यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्ती क्रं. 2 च्‍या उपचाराकरिता आलेल्‍या वैद्यकीय खर्चाबाबत रक्‍कम रुपये 1,00,000/- द्यावे आणि सदरहू रक्‍कमेवर दि. 15.01.2016 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 18 दराने व्‍याज द्यावे. 

 

  1. विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्ते यांना झालेल्‍या  शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व आर्थिक नुकसानीकरिता रक्‍कम रुपये 7,00,000/- द्यावे.

 

  1.  विरुध्‍द पक्ष 2 यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.