Maharashtra

Akola

CC/14/31

Dr. Prashant Mannalal Agrwal - Complainant(s)

Versus

Himalaya Travelers Pvt. Ltd. - Opp.Party(s)

Agnihotri

12 Feb 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/14/31
 
1. Dr. Prashant Mannalal Agrwal
R/o. Civil Lines , Akola
Akola
M S
...........Complainant(s)
Versus
1. Himalaya Travelers Pvt. Ltd.
Through Executive director,Link Road,Malad(West) Mumbai-64.
Mumbai
M S
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: आ दे श :::

( पारीत दिनांक : 12/02/2015 )

आदरणीय दस्या श्रीमती भारती केतकर यांचे अनुसार

1.        ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …

          तक्रारकर्ता हा अकोला येथे वैद्यकीय व्यवसाय करतो व विरुध्दपक्ष हे विविध  ठिकाणी सहली आयोजीत करतात. तक्रारकर्त्याने काश्मिर सहलीबाबतची माहिती विरुध्दपक्षाकडून घेतली असता, विरुध्दपक्षाने सहल जेके 353 या नावाने सहा रात्र व सात दिवसांचा काश्मिर सहलीचा कार्यक्रम नियोजीत करुन ठरविला होता.  त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने एकूण 16 व्यक्तींकरिता म्हणजेच 4 कुटूंबाकरिता सदर सहलीला जाण्याचे ठरविले.  ही सहल 9 जुन 2013 रोजी सुरु होवून 16 जुन 2013 रोजी संपणार होती व प्रत्येक कुटूंबाने सहलीकरिता रु. 1,13,500/- देण्याचे ठरविले, ज्यामध्ये प्रत्येक कुटूंबाचे 2 मोठ्या व्यक्ती व 2 मुले यांचा मुंबई ते श्रीनगर विमान वाहतुक खर्च व श्रीनगर पासून संपुर्ण काश्मिरची सहल ही टेम्पो ट्रॅव्हलद्वारा घडवून आणण्याकरिता येणारा खर्च तसेच राहण्याचा खर्च ज्यामध्ये उत्तम हॉटेलमध्ये डिलक्स रुम प्रत्येक कुटूंबाकरिता पुरविण्याची हमी विरुध्दपक्षाने दिली होती.  सदर सहलीबाबतचा व्यवहार हा अकोला येथूनच करण्यात आला.  तक्रारकर्त्याने रु. 80,000/- ही रक्कम विरुध्दपक्ष यांचेकडे जमा केल्यानंतर विरुध्दपक्षाने दि.4/3/2013 रोजीचे बिल नं. जेके/353 नुसार तशी रक्कम प्राप्त झाल्याचे कबुल केले व  तशी रक्कम जमा केल्यानंतर हवाई वाहतुकीची तिकीटे तसेच सहलीचे व्हाऊचर्स सहल तारखेच्या 15 दिवसांपुर्वी तक्रारकर्त्याला पोहचतील, असे स्पष्ट आश्वासन विरुध्दपक्ष यांनी दिले होते.  परंतु विरुध्दपक्षाने त्याची पुर्तता केली नाही व वारंवार मागणी करुनही योग्य व संयुक्तीक कारण तक्रारकर्त्यास सांगू शकले नाही.  सहलीच्या 3 दिवस अगोदर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांचेशी संपर्क साधला असता, अचानक विरुध्दपक्ष यांनी विमान वाहतुकीची 16 पैकी फक्त 13 तिकीटे आरक्षीत केली असल्याचे व ती त्यांनी तक्रारकर्त्यास पाठविली असल्याचे व सहलीची इतर मान्य केलेली उर्वरित व्यवस्थेची पुर्तता ते करु शकले नसल्यामुळे विरुध्दपक्ष यांचेतर्फे त्यांनी सदर सहल रद्द केल्याचे तक्रारकर्त्यास कळविले.  अचानक सहल रद्द झाल्यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक त्रास सहन करावा लागला.  अशा प्रकारे चुकीचे व गैरकायदेशिर वर्तन विरुध्दपक्षाने करुन सेवेमध्ये त्रुटी दर्शविली असून अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला आहे.  विरुध्दपक्ष यांनी सहलीला 3 ते 4 दिवस बाकी असतांना सहल रद्द झाल्याचे कळविल्यावरुन तक्रारकर्त्यास दुस-या एजन्सीमार्फत जास्तीचे रुपये खर्च करुन सहल ठरवावी लागली. विरुध्दपक्षाने पाठविलेली विमान वाहतुकीची तिकीटे वापरात घेवून वेळेवर सहलीचे नियोजन करावे लागले.   तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षासोबत ठरलेल्या रकमेपेक्षा  रु. 22,000/- इतकी जास्तीची रक्कम सहलीकरिता खर्च करावी लागली. तक्रारकर्त्याने ही तक्रार वि. मंचासमोर दाखल करुन विनंती केली आहे की, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून सहल खर्चापोटी आगाऊ प्राप्त केलेली रक्कम रु. 80,000/- यामधून विमान वाहतुकीच्या तिकीटाची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम रु. 12,048/-  तसेच सदर रकमेवर दि. 4/3/2013 पासून द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.   तक्रारकर्त्यास सहलीकरिता म्हणून जास्तीचा झालेला खर्च रु. 22,000/- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास द्यावा.   तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु. 1,00,000/- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास द्यावे.  नोटीसचा खर्च रु. 1500/- व तक्रारखर्च  विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास द्यावा.

               सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्‍यासोबत एकंदर  06 दस्‍तऐवज पुरावे म्हणून  जोडण्‍यात आले आहेत. 

 

 

 

विरुध्‍दपक्ष यांचा लेखीजवाब :-

2.        सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्‍दपक्ष   यांना  मंचातर्फे पाठविण्यात आलेली नोटीस विरुध्दपक्षास बजावण्यात आल्यानंतरही विरुध्दपक्ष सदर प्रकरणात गैरहजर राहीला.  त्यामुळे प्रस्तुत प्रकरण विरुध्दपक्षाविरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दि. 19/11/2014 रोजी पारीत केला.

3.        त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला.

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

4.     सदर प्रकरणात नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्ष मंचासमोर हजर न झाल्याने सदर प्रकरण विरुध्दपक्षाविरुध्द एकतर्फी चालविण्यात आले.  सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची तक्रार व तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त यांचे अवलेाकन करुन सदर प्रकरणात अंतीम आदेश पारीत करण्यात आला.

     1) तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तक्रारकर्ता व त्यांचे कुटूंबियांनी  व मित्र परिवानाने 9 जुन 2013 ते 16 जुन 2013  दरम्यान विरुध्दपक्षाने आयोजीत केलेल्या काश्मीर सहलीला जाण्याचे ठरवले होते.  सदर सहलीचा मुंबई पासून विमान प्रवासासह संपुर्ण खर्च विरुध्दपक्ष करणार होते.  या सहलीचा 4 व्यक्तींसाठी म्हणजे एक कुटूंबाचा खर्च रु. 1,13,500/- इतका ठरला होता.  त्यापैकी रु. 80,000/- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे जमा केले व  विरुध्दपक्षाला दि. 4/3/2013 रोजी प्राप्त झाले,  त्याची पावती दस्त क्र. 3, पान क्र. 16 वर तक्रारकर्त्याने दाखल केली आहे.  सदर सहलीच्या विमान प्रवासाचे तिकीटे व व्हाऊचर्स सहलीच्या तारखेच्या 15 दिवस आधी मिळतील, असे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला आश्वासन दिले होते.  परंतु सहल तारखेच्या 3 दिवस आधी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांचेशी संपर्क साधला असता,  विरुध्दपक्षाने 16 पैकी फक्त 13 तिकीटे आरक्षित केली असल्याचे व ती तक्रारकर्त्याला पाठवली असल्याचे कळवले.   परंतु सहलीचे इतर मान्य केलेल्या उर्वरित व्यवस्थेची पुर्तता  न करु शकल्याने त्यांचेतर्फे सदर सहल रद्द केल्याचे तक्रारकर्त्याला कळवले.  याचा मानसिक त्रास तक्रारकर्त्याला झाला.  विरुध्दपक्षाने पाठवलेली विमान प्रवासाची तिकीटे उपयोगात आणण्यासाठी फार थोडा अवधी बाकी असल्याने जवळ जवळ रु. 22,000/- जास्त खर्च करुन दुस-या सहल एजन्सीतर्फे तक्रारकर्ता काश्मीरला कुटूंबासोबत गेला.

     तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन व दाखल दस्तांवरुन, तक्रारकर्ता विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याचे व तक्रार सदर मंचाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याचे सिध्द होते. ( दस्त क्र. 3 पृष्ठ 16 व पृष्ठ क्र. 26 )

     दस्त क्र. 2 वरील विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला पाठवलेल्या दि. 30/5/2013 च्या पत्रावरुन विरुध्दपक्षाने करारानुसार सेवा देण्यात त्रुटी केल्याचे दिसून येते व सदर पत्रात विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याने जमा केलेल्या रकमेतून विमान प्रवासाच्या तिकीटाची वजावट करुन उर्वरित रु. 12,048/- ही रक्कम 90 दिवसात देण्याचेही मान्य केल्याचे दिसून येते.  परंतु 90 दिवसानंतरही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याची उर्वरित रक्कम परत न केल्याने तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दि. 31/10/2013 रोजी नोटीस पाठवल्याचे दस्त क्र. 5 वरुन दिसून येते.  परंतु सदर नोटीस प्राप्त झाल्यावरही विरुध्दपक्षाने नोटीसला उत्तर दिले नाही.  अथवा कुठलीही कारवाई केली नाही.  त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला देण्यात येणा-या सेवेत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला दिसून येतो.  त्यामुळे तक्रारकर्ता व्याजासह उर्वरित रक्कम व नुकसान भरपाईसह प्रकरणाचा खर्च मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.

     तक्रारकर्त्याने सदर तक्रारीत विरुध्दपक्षाच्या निष्काळजीपणामुळे व त्रुटीपुर्ण सेवेमुळे रु. 22,000/- दुस-या सहल एजन्सीला देऊन विरुध्दपक्षाकडून मिळालेल्या विमानाच्या तिकीटांचा उपयोग करुन घ्यावा लागला, असे नमुद केले.  परंतु सदर विधानाच्या पुष्टयर्थ पुष्टयर्थ कुठलेही दस्त तक्रारकर्त्याने मंचासमोर दाखल केले नाही. तक्रारकर्ता कुठल्या एजन्सीतर्फे  सहलीला गेला, त्याने किती रुपये त्या नवीन एजन्सीला दिले, सहलीचे ठिकाण, मुक्काम केलेल्या  हॉटेल्सची बिले,  याचा कुठलाही तपशिल तक्रारीत नमुद केला नाही व पावत्याही मंचासमोर दाखल केल्या नाहीत.  त्यामुळे तक्रारकर्त्याचा रु. 22,000/- जास्तीचे लागल्याचा केवळ तोंडी आक्षेप, पुराव्या अभावी ग्राह्य धरता येत नसल्याने तक्रारकर्त्याची सदर मागणी खारीज करण्यात येत आहे.

       तक्रारकर्त्याच्या 4 जणांच्या संपुर्ण कुटूंबाला विरुध्दपक्षाकडून विमानाचे तिकीट प्राप्त झाल्याचे दिसून येते.  त्यामुळे रु. 80,000/- यातून सदर तिकीटाची रक्कम रु. 67,952/- वजा केले असता,  विरुध्दपक्षाकडे तक्रारकर्त्याचे रु. 12,048/- बाकी असल्याचे दिसून येते व तक्रारकर्त्याने तसे तक्रारीतही नमुद केले आहे.  सदरची   रु. 12,048/- ही रक्कम तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे जमा केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि. 4/3/2013 पासून देय तारखे पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास तक्रारकर्ता पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.  सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.

                                :::अं ति म  आ दे श:::

  1. तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे
  2. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ते यांना रु. 12,048/- ( रुपये बारा हजार  अठ्ठेचाळीस फक्त ) ही रक्कम  द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने दि. 4/3/2013 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदाई पर्यंत व्याजासहीत द्यावे
  3. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ते यांना झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु. 10,000/- ( रुपये दहा हजार फक्त ) व या प्रकरणाचा न्यायीक खर्च रु. 5000/- ( रुपये पांच हजार फक्त ) द्यावा.
  4. या आदेशाची पुर्तता विरुध्दपक्षाने निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावी
  5. सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना निशुल्‍क देण्‍यात याव्‍या.

 

   ( कैलास वानखडे ) (श्रीमती भारती केतकर )      (सौ.एस.एम.उंटवाले )

              सदस्‍य            सदस्‍या                अध्‍यक्षा    

                       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,अकोला

 
 
 
 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.