Maharashtra

Nagpur

CC/261/2021

SHALIGRAM GADIJI GANORKAR - Complainant(s)

Versus

HIMALAYA SAHAKARI PATSANSTHA MARYADIT NAGPUR, THROUGH BANK MANAGER - Opp.Party(s)

ADV. MR. ASHISH ADHE

21 Jan 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/261/2021
( Date of Filing : 08 Jun 2021 )
 
1. SHALIGRAM GADIJI GANORKAR
R/O. PLOT NO.38, MAYA NIVAS HAWARPETH MANEWADA RING ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. MINAKSHI SANDIP GANORKAR
R/O. PLOT NO.38, MAYA NIVAS HAWARPETH MANEWADA RING ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. HIMALAYA SAHAKARI PATSANSTHA MARYADIT NAGPUR, THROUGH BANK MANAGER
R/O. PLOT NO.10-A, RAJGRUHA NAGAR, I.C CHOWK, MANGALWARI BAZAR, HINGANA ROAD, NAGPUR-16
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 
PRESENT:ADV. MR. ASHISH ADHE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 21 Jan 2022
Final Order / Judgement

मा. सदस्या श्रीमती चंद‍्रिका बैसयांच्‍या आदेशान्‍वये

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केलेली आहे. वि.प. यांची नोंदणीकृत पतसंस्था असुन तिचा नोंदणी क्रं.380/88-80 असा असुन ते बॅकींग संबधी व्यवहार करतात. वि.प.ने जनतेकडुन मोठया प्रमाणात बचत खाते उघडले व त्यांचेकडुन भरपूर प्रमाणात रक्कम जमा केली व त्या रक्कमेचा ते उपयोग करीत असत. वि.प.चे प्रभावात येऊन तक्रारदारांनी त्यांचेकडे बचत खाते क्रं. 705 दिनांक 11.3.2016 रोजी उघडले. तक्रारदारांनी वि.प.कडे मुदत ठेव बचत खाते दरमहा रुपये 2,500/- प्रमाणे उघडले व त्याची मुदत दोन वर्षे इतकी होती. तक्रारदाराने वि.प.कडे रक्कम रुपये 2,50,000/- जमा केली व सदरच्या बचत खात्यामधुन तक्रारदारांनी वेळोवेळी रक्कम रुपये 76,075/- काढलेली आहे व वि.प.कडे रक्कम रुपये 1,73,925/- आजही तक्रारदारांचे खात्यात जमा असल्यामूळे वि.प. तक्रारदारांना हे सेवा देणारे पक्ष ठरतात.  तक्रारकर्ता पूढे नमूद करतो की, त्यांचे मूदत ठेव खाते हे परिपक्व झालेले असुन तक्रारदार वि.प.कडे त्यांचे बचत खाते क्रं.705 व लेजर क्रं.7-267 वरील जमा रक्कम काढण्‍याकरिता वि.प.बॅंकेत गेले असता, तक्रारकर्ते वारंवार वि.प.चे कार्यालयात गेले असता तक्रारदारांना उर्वरित जमा रक्कम वि.प.ने परत केली नाही. त्यामूळे तक्रारदारांनी दिनांक 28.12.2020 रोजी वि.प.चे शाखा अधिका-यांकडे लेखी तक्रार केली. परंतु शाखा अधिका-यांनी त्यांचे तक्रारीवर कोणतीही कार्यवाही केली नाही. अशा प्रकारे वि.प.ने तक्रारदारासोबत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे आणि तकारदारांची जमा रक्कम त्यांना परत न केल्याने वि.प.ने तक्रारांचे सेवेत त्रुटी केल्याचे दिसुन येते. तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे.  वि.प.ने तक्रारदारांची जमा असलेली रक्कम रुपये 1,73,925-3000=1,70,925/- परत करावी. तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 20,000/- ची मागणी केलेली आहे.
  2. तक्रादारांची तक्रार दाखल करुन वि.प.ला नोटीस काढण्‍यात आली. तक्रारीची नोटीस मिळुन वि.प. तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन सदर तक्रार वि.प.विरुध्‍द दिनांक 29.11.2021 रोजी एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.   
  3. तक्रारदाराची तक्रार व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थीत होतात.

          मुद्दे                                                                        उत्तरे

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?                 होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्राराचे सेवेत त्रुटी केली आहे काय?          होय  
  3. वि.प.ने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी

प्रथेचा अवलंब केला आहे काय ?                                           होय

  1. आदेश?                                                                        अंतीम आदेशाप्रमाणे

         का र  मि मां सा

  1. वि.प. ही नोंदणीक्रृत पतसंस्था आहे. वि.प.ने मोठया प्रमाणात जनतेकडुन बचत खाते उघडले व त्यांचे कडुन भरपूर प्रमाणात रक्कम जमा केली. तक्रारदारांनी वि.प.कडे बचत खाते क्रं. 705 दिनांक 11.3.2016 रोजी मुदत ठेव बचत खाते रुपये 2500/- दरमहा प्रमाणे उघडले व त्याची मुदत दोन वर्षे इतके होती त्यादरम्यान तक्रारदाराने वि.प.कडे रक्कम रुपये 2,50,000/- जमा केले व सदरच्या बचत खात्यामधुन तक्रारदारांनी वेळोवेळी रक्कम रुपये 76,075/- काढली असुन उर्वरित रक्कम रुपये 1,73,925/- वि.प. कडे आजही तक्रारदारांचे खात्यात जमा असल्यामूळे वि.प. तक्रारदारांना सेवा देणारे पक्ष ठरतात.  तक्रारकर्ता पूढे नमूद करतो की, त्यांचे मूदत ठेव खाते हे परिपक्व झालेले असुन तक्रारदार वि.प.कडे त्यांचे बचत खाते क्रं.705 व लेजर क्रं.7-267 वरील जमा रक्कम काढण्‍याकरिता वि.प.बॅंकेत गेले असता, तक्रारकर्ते वारंवार वि.प.चे कार्यालयात गेले असता तक्रारदारांना उर्वरित जमा रक्कम वि.प.ने परत केली नाही.  त्यामूळे तक्रारदारांनी दिनांक 28.12.2020 रोजी वि.प.चे शाखा अधिका-यांकडे लेखी तक्रार केली. परंतु शाखा अधिका-यांनी त्यांचे तक्रारीवर कोणतीही कार्यवाही केली नाही.अशा प्रकारे वि.प.ने तक्रारदारासोबत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे आणि तकारदारांची जमा रक्कम त्यांना परत न केल्याने वि.प.ने तक्रारांचे सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्‍ट होते. अभिलेखावर दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, तक्रारदारांनी वि.प.कडे संयुक्त खात्यामधे दिनांक 11.3.2016 पासुन दरमहा रुपये 2500/- प्रमाणे आवर्ती ठेव जमा करित होते. तक्रारदारांनी दिनांक 28.12.2020 पासबुक मधे नोंदणी केली असता त्यात केवळ रुपये 1,73,925/- इतकी रक्कम जमा असल्याचे दिसुन आले व  त्यामूळे दिनांक 11.3.2016 रोजीचे बचत खाते क्रं. 705 व लेजर क्रं. 7/267 बंद करुन त्यामधील मुदतठेवी स‍हीत संपूर्ण रक्कम व्याजासह परत करण्‍याकरिता तक्रारदारांनी दिनांक 28.12.2020 रोजी वि.प.ला पत्र दिल्याचे अभिलेखावर दाखल आहे. तसेच बचत ठेव खात्यांचे पासबुक व त्यामधे रक्कम रुपये 1,73,925/-शिल्लक असल्याची नोंद आहे. त्यामूळे आता वि.प.कडे रुपये 1,73,925/- इतकी रक्कम शिल्लक आहे असे दिसुन येते. यावरुन वि.प.ने तक्रारदारांसोबत अनुचित व्यापारी पध्‍दतीचा अवलंब केल्याचे स्पष्‍ट होते.  सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

अंतीम आदेश

  1. तक्रारकर्ता क्रं.1 व 2  यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प. यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्यांनी तक्रारकर्ता क्रं.1 व 2 यांची जमा रक्कम 1,73,925/- वर दिनांक 28.12.2020 पासुन द.सा.द.शे.14 टक्के व्याजदराने मिळून येणारी रक्कम तक्रारदारांना प्रत्यक्ष अदायगी पावेतो येणारी रक्कम परत करावी.    
  3. वि.प.ने तक्रारदारांना झालेल्या मानसिक,शारिरिक व आर्थिक नुकसानापोटी रुपये 25,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/-  तकारदारास द्यावे.
  4. सदर आदेशाचे पालन वि.प.ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
  5. उभयपक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.