जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 265/2008. प्रकरण दाखल तारीख - 30/07/2008 प्रकरण निकाल तारीख - 23/09/2008 समक्ष – मा.श्री.सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. चंद्रमूनी वामनराव सोनटक्के अर्जदार. रा. डॉ. आंबेडकर नगर, नांदेड जि. नांदेड. विरुध्द. हायटेक कम्यूनिकेशन नांदेड संचलित नोकिया केअर सेंटर नांदेड, गैरअर्जदार पहिला माळा, शुक्ला कॉम्प्लेक्स, आयटीआय रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार तर्फे वकील - अड.माधव पावडे. निकालपञ (द्वारा - मा.सतीश सामते, अध्यक्ष (प्र.) ) गैरअर्जदार हायटेक कम्यूनिकेशन नोकिया केअर सेटंर नांदेड यांच्या सेवेच्या ञूटीबददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे आपली तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी दि.26.12.2007 रोजी नोकिया कंपनीचा मॉडेल नंबर 6233 आय.एम.इ.आय. चा रु.8500/- ला गैरअर्जदाराच्याकडून विकत घेतला. हँडसेट अचानक बंद पडून आपोआप चालू होणे, आपोआप हँग होणे असा बिघाड निर्माण झाला. अर्जदाराने ही बाब गैरअर्जदार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तो हँडसेट पूण्यास पाठविला असे दोन-तिन वेळा झाले परंतु हँडसेट दूरुस्त झाला नाही. या बाबतची तक्रार नोकिया हेल्पलाईन यांच्याकडे करण्यात आली, तसेच हॅंडसेट सोबत असलेल्या 128 मेमरी कार्ड खराब होते ते नोकिया सेंटरकडे जमा केले. अर्जदाराची मागणी आहे की, त्यांना नवीन हँडसेट व मेमरी कार्ड गैरअर्जदार यांच्याकडून मिळावे व नूकसान भरपाई बददल रु.15,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराचा अर्ज खोटा व बिनबूडाचा आहे असे म्हटले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून नोकिया कंपनीचा मोबाईल नंबर 6233 रु.8,000/- ला विकत घेतला ही बाब मान्य केली आहे, परंतु लगेच त्यात बिघाड निर्माण झाला हे मान्य केले नाही. गैरअर्जदारास ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. दि.13.8.2008 रोजीच्या आधी गैरअर्जदाराकडे हा मोबाईल दूरुस्तीस आला नाही. मोबाईल हँडसेट मधील बिघाड दुरुस्त होत नसल्यामूळे तो मोबाईल जॉबशिट देऊन पूणे येथे दूरुस्तीसाठी पाठविला व तेथून दूरुस्त होऊन आल्यावर मोबाईल परत केला, परंतु नंतरही बिघाड निर्माण झाला म्हणून दोन वेळेस पूणे येथे पाठविला पण तो व्यवस्थित दूरुस्त न झाल्यामूळे सदरील मोबाईल वॉरंटी व गॅरंटी मध्ये असल्यामूळे गैरअर्जदाराने अर्जदाराची वेळोवेळी मदत करुन मोबाईल दूरुस्त करण्याचा प्रयत्न केला हे जॉबशिटवरुन दिसते. अर्जदाराच्या मोबाईलमध्ये कंपनीकडून बिघाड असल्यामूळे व हँडसेट कंपनीस पाठवून अर्जदार यांना नवीन मोबाईल घेऊन जाण्यास सांगितले असता, अर्जदारांनी तो देण्यास नकार दिला. आजही गैरअर्जदार नवीन मोबाईल देण्यास तयार आहेत. अर्जदाराने नोकिया हेल्पलाईनकडे तक्रार केलेली नाही अथवा कंपनीस पार्टी ही केलेले नाही. गैरअर्जदार हे नवीन 128 एमबी चे मेमरी कार्ड आजही देण्यास तयार आहेत. त्यामूळे गैरअर्जदाराने सेवेत कूठेही कमतरता केलेली नाही म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? अंशतः 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी व्यंकटेश्वरा मोबाईल शॉपी यांच्याकडून दि.26.12.2007 रोजी नोकिया कंपनीचा मॉडेल नंबर 6233 हा हँडसेट रु.8500/- खरेदी केल्याबददल त्यांचे बिल दाखल केलेले आहे, परंतु या प्रकरणात अर्जदार यांनी डिलरला पार्टी केलेले नाही. तरी देखील गैरअर्जदार हायटेक कम्यूनिकेशन यांनी आपल्या लेखी म्हणण्यात अर्जदाराने नोकिया मोबाईल हँडसेट नंबर 6233 हा त्यांच्याकडून विकत घेतला ही बाब मान्य केली आहे. तसेच हायटेक कम्यूनिकेशन हे नोकिया कंपनीचे अधिकृत सेंटर कंपनी चालविते असा आहे. दि.02.07.2008 रोजी एच.सी.एल. नोकिया केअर सेंटर पूणे यांना अर्जदाराने पञ लिहून नवीन हँडसेट देण्याबददल विनंती केली होती ते पञ दाखल केलेले आहे व यानंतरच्या तारखेची जॉबशिट दि.28.01.2008 रोजीची गैरअर्जदार यांनी बनवलेली आहे. तसेच दि.15.02.2008 रोजीचे जॉबशिट अर्जदाराने दाखल केलेले आहे. त्यात पॉवर, फोनलॉकड, नॉट रिस्पॉडींग इत्यादी दोष असल्याबददलचे जॉबशिट दाखल केलेले आहे. यानंतरचे परत जॉबशिट दि.13.06.2008 रोजीचे दाखल केलेले आहे. यात मोबाईल सेंट वॉरंटीमध्ये आहे व तो दोष दूरुस्त होत नाही म्हणून एच.सी.एल. नोकिया केअर सेटंर पूणे येथे गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे पाठविण्यात आला, तेथे तो दूरुस्त झाला नाही. गैरअर्जदार हे नोकिया कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटर आहे. म्हणजेच कंपनीचे प्रतिनीधी आहेत. त्यांनी हे प्रकरण चालू असताना कंपनीकडे अर्जदाराचा हँडसेट पाठवून देऊन त्याबदल्यात नवीन हँडसेट व मेमरी कार्ड अर्जदारांना हे प्रकरण चालू असताना आमच्या समोर दिले. म्हणजे थोडक्यात अर्जदार यांची मागणी त्यांनी पूर्ण केलेली आहे. गैरअर्जदार यांनी वेळोवेळी अर्जदार यांचे हँडसेटमधील दोष दूर करण्याचा प्रयत्न केला हे त्यांचे जॉबशिट वरुन दिसून येते. शिवाय येथे मोबाईल दूरुस्त होत नसल्याकारणांनी तो पूण्यास पाठविला व तेथून दूरुस्त होऊन येण्यास दोन-तीन वेळा उशिर झाला. यात काही महिने निघून गेले. त्यामूळे एवढा वेळ दोष दूर करण्यात जाणे साहजीकच आहे व हा दोष दूर होत नसल्याकारणाने नवीन मोबाईल हँडसेट दिला. त्यात विलंब झाला, एवढेच काय ती ञूटी दिसून येते. आता फक्त अर्जदार यांची मागणी त्यांना झालेल्या मानसिक ञासाबददल व नूकसानीबददलची एवढीच राहीलेली आहे. त्यात अर्जदार यांचे काही नूकसान झाले असे काही वाटत नाही. परंतु हँडसेट बदलून घेण्यासाठी त्यांना न्यायमंचात हे प्रकरण दाखल करावे लागले व जो मानसिक ञास झाला तेवढाच देय राहील. वरील सर्व बाबीचा विचार करता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदारांची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते. 2. अर्जदार यांची मागणी प्रमाणे गैरअर्जदार यांनी नवीन नोकिया हँडसेट व 128 एमबी मेमरी कार्ड देऊन पूर्ण केली आहे त्यामूळे त्याबददल आदेश नाही. 3. हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांनी मानसिक ञासाबददल रु.500/- व दावा खर्च म्हणून रु.500/- अर्जदारास दयावेत. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते सदस्या अध्यक्ष (प्र.) जे. यु. पारवेकर लघूलेखक |