जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/159 प्रकरण दाखल दिनांक – 13/07/2009. प्रकरण निकाल दिनांक – 11/09/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. औदुंबर रामहरी भिसे वय, 19 वर्षे, धंदा शिक्षण रा. एकुरगा ता.कळंब जि. उस्मानाबाद अर्जदार विरुध्द मा.प्राचार्य, शासकीय तंञनिकेतन नांदेड. गैरअर्जदार विर सावरकर मार्ग, बाबा नगर, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड. बी.आर. पवार. गैरअर्जदारा तर्फे - स्वतः निकालपत्र (द्वारा,मा.श्री. सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार शासकीय तंञनिकेतन यांनी सेवेत ञूटी केली म्हणून अर्जदार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे शासकीय तंञनिकेतन येथील महाविद्यालयात दि.15.08.2008 रोजी रु.7750/- चा डि.डि. देऊन प्रवेश घेतला. यानंतर अर्जदारांना लातूर येथील शासकीय तंञनिकेतन महाविद्यालयात दि.30.08.2008 रोजी प्रवेश मिळाला. त्यांना ते सोयीचे होते म्हणून अर्जदार यांनी दि..2.9.2008 रोजी टी.सी. व फिस वापस मिळण्या बददल गैरअर्जदार यांचेकडे अर्ज केला. त्याप्रमाणे गैरअर्जदारयांनी ताबडतोब प्रोफॉर्म एन व टि.सी. इतयादी कागदपञ दिले. पण भरलेली फिस वापस दिली नाही व यानंतरही ते टाळाटाळ करीत राहले. म्हणून अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना रितसर नोटीस दिली. तेव्हा त्यांनी फिस देण्यास साफ नकार दिला. नोटीसच्या उत्तरा दाखल गैरअर्जदार कलम 4 मधील सोबत दिलेले उच्च न्यायालयाचे आदेशाअन्वये शिक्षण शूल्क समितीच्या नीर्णयाची प्रत व कार्यालयीन आदेशाची प्रत यांचे अवलोकन केले असता गैरअर्जदार हे अर्जदारास फसवत आहेत व या आदेशाअन्वये देखील गैरअर्जदार यांनी किमान रु.6750/- परत करणे आवश्यक होते. पण त्यांनी तसेही केलेले नाही. म्हणून भरलेली एकूण फिस रु.76502- खर्च रु.2,000/-, नोटीसीचा खर्च रु.2,000/- मानसिक ञासापोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- देण्याचे आदेश व्हावेत म्हणून मागणी केली आहे. गैरअर्जदार यांनी स्वतः आपले म्हणणे दाखल केलेले आहे. यानुसार अर्जदार यांनी दि.08.08.2008 रोजी सरळ द्वितीय वर्षात यंञ अभियांञिकी शाखेमध्ये बोनाफाईड आधारे फिस रु.7750/- चा धनादेश देऊन प्रवेश घेतला व दि.16.08.2008 रोजी संस्थेमध्ये टि.सी. दाखल केली. यानंतर लगेच दि.29.08.2008 रोजी प्रोफॉर्म एन हे प्रमाणपञ दूसरे संस्थेत प्रवेश घेण्यासाठी घेतले. अर्जदाराला दि.30.08.2008 रोजी अंतीम प्रवेश फेरीमध्ये शासकीय तंञनिकेतन लातूर येथे प्रवेश मिळाला परंतु अंतीम प्रवेश फेरी पूर्वी म्हणजे दि.30.08.2008 पर्यत प्रवेश रदद करण्याची सूचना दिली नाही. बाहेरगांवचे विद्यार्थ्याना अशा प्रकारची सूचना ईमेल व फॅक्सद्वारे देण्याची व्यवस्था केली असताना अर्जदाराने असे कळविले नाही. दि.2.9.2008 रोजी प्रवेश रदद करण्या संबंधी अर्ज दिला. अर्जदाराच्या या कृतीने दूस-या एखादया होतकरु गरीब विद्यार्थ्यास प्रवेश देता आला असता परंतु अशामूळे त्यांचे प्रवेशाची संधी गेली आहे. यासाठी अर्जदार सर्वस्वी जबाबदार आहेत. अर्जदाराचा अर्ज प्राप्त झाल्या बरोबर त्यांना टी.सी. व इतर कागदपञ देण्यात आले. यासाठी फिस मिळावी म्हणून परत अर्ज केला. यासाठी गैरअर्जदार यांनी मा.सहसंचालक तंञशिक्षण यांना यावीषयी पञ लिहून मार्गदर्शन मागितले असे असताना अर्जदाराने जून,2009 मध्ये वकिलामार्फत नोटीस दिली. उपलब्ध कागदपञाचे आधारे शिक्षण शूल्क समितीच्या निर्देशनास अनूसरुनच कट ऑफ डेट दि.30.08.2008 नंतर प्रवेश रदद केला असल्यामूळे व सदरील जागा रिक्त राहिल्यामूळे फिस परत करता येत नाही असे नोटीसीस उत्तर देण्यात आले आहे. ही दिनांक अर्जदार हा विसरुन गेला. सहसंचालक तंञशिक्षण यांनी दि.13.08.2009रोजी वर्ष,2008-09 यासाठी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी वाढवून दिलेली कट ऑफ डेट दि.06.09.2008 अशी होती ती द्वितीय वर्षाच्या सरळ प्रवेशासाठी तिच दिनांक गृहीत धरण्यात येऊन विद्यार्थ्यास नियमाप्रमाणे प्रवेश फिस परत करावी असे पञ लिहीले व ते प्राप्त झाल्यावर ताबडतोब विद्यार्थ्यास रु.7650/- चा धनादेश परत घेऊन जाण्यास सांगण्यात आले तसे पञही लिहीले. प्रवेश रदद करण्या बाबतचे शूल्क रु.1,000/- जमा करण्यास सांगण्यात आले असा खूलासा केला आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- गैरअर्जदारांनी तंञशिक्षण कार्यालयातर्फे प्रवेश सन 2007-08 ही अधिसूचना दाखल केलेली आहे. अर्जदाराचा प्रवेश रदद करण्याचा अर्ज प्राप्त झाल्याबरोबर त्यांनी अर्जदाराचे कागदपञ व टी.सी. त्यांना दिली आहे. तक्रार फक्त फिस बददलची होती. त्यांचे कारण त्यांना कट ऑफ डेट ही दि.30.08.2008 ही होती पण त्या दिवसापर्यत अर्जदारानी त्यांना प्रवेश रदद करण्याची कळविले नाही व त्यांनी दि.02.09.2008 रोजी प्रवेश रदद करण्याचा अर्ज दिला त्यामूळे एका होतकरु विद्यार्थ्याची संधी गेली व त्यांचीही सिट रिकामी राहीली. त्यामूळे फिस वापस करण्यासंबंधी त्यांनी त्यांचे वरिष्ठ कार्यालय सहसंचालक तंञशिक्षण यांचे मार्गदर्शन मागितले तेपञ तयांनी सोबत जोडले व त्यात उल्लेख केला आहे की, दूस-या वर्षासाठीच्या प्रवेशा बाबत कट ऑफ डेट चा उल्लेख केला नाही. यानंतर परत अर्जदार हे ग्राहक मंचात आल्यामूळे त्यांनी दि.31.07.2009 रोजी परत एक पञ सहसंचालक, तंञशिक्षण यांना लिहीले व मार्गदर्शन देण्यावीषयी सांगितले ते पञही दाखल केलेले आहे. या पञास दि.13.08.2009 रोजी सहसंचालक तंञशिक्षण यांनी उत्तर पाठविले असून त्यात त्यांनी सन 2008-09 या वर्षासाठी सूधारित कट ऑफ डेट प्रथम वर्षासाठी दि.6.9.2008 अशी कळविण्यात आली होती तिच कट ऑफ डेट द्वितीय वर्षासाठी गृहीत धरावी व संबंधीत शूल्क परत करावे असे लिहीले आहे ते पञ देखील गैरअर्जदाराने दाखल केलेले आहे. या पञाच्या अनुषंगाने गैरअर्जदार यांनी दि.18.08.2009 रोजी अर्जदार यांना पञ लिहून त्यांचे रु.7750/- चा धनादेश संस्थेत येऊन घेऊन जावा व नियमानुसार प्रवेश रदद करण्याचे रु.1000/- संस्थेमध्ये जमा करावेत असे लिहीले आहे. हे पञ दाखल केले माहीतीसाठी सोबत जोडले आहे. सूरुवातीची कट ऑफ डेट दिनांका ही दि.30.08.2008 व सूधारित दि.06.09.2008 करण्यात आली या बाबतचा पूरावा म्हणून दि.02.09.2009 रोजी जी अधिसूचना जारी केली होती ती ही दाखल करण्यात आली आहे. पण दि.02.09.2009 रोजी देखील थोडेसे संदेह (कनफयूज ) होते. कारण कट ऑफ डेट ही प्रथम वर्षासाठी होती. यानंतर सहसंचालक यांचे पञात खूलासा करुन द्वितीय वर्षासाठी धरण्यात आलेली आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांना अर्जदाराची फि ची रक्कम ताबडतोब वापस देता आली नाही. यात त्यांना अर्जदार यांना ञास देण्याचा उददेश नव्हता हे दि.07.09.2009 रोजीच्या पञावरुन स्पष्टपणे दिसून येते. या पञात त्यांनी प्रवेश रदद करण्याच्या नियमाप्रमाणे रु.1,000/- भरण्यास सांगितले आहेत व अर्जदाराच्या विनंतीनुसार बॅक कमीशन रु.200/- माफ केलेले आहेत. म्हणजे फक्त रु.800/- भरुन घेतलेले आहेत. अर्जदाराने आपल्या तक्रारीत कमीत कमी रु.6750/- वापस करावयास पाहिजे होते ही गोष्ट मान्य केली आहे. यात देखील प्रवेशा बददलचे रु.1,000/- संरक्षण शूल्क म्हणून घेऊन बाकी फिस परत करावी असे सन 2006-07 च्या शैक्षणीक सञासाठी कळविले होते. हिच बाब सन 2008-09 साठीच्या प्रवेशासाठी लागू होती. एकंदर पाहता गैरअर्जदार यांचेकडून फिस वापस करण्यासंबंधी जो काही विलंब झाला तो मूददामहून केला गेला नसून केवळ कट ऑफ डेट ही स्पष्ट नसल्यामूळे कन्फूजनमूळे त्यांना वरिष्ठाचे मार्गदर्शन मागवावे लागले व कट ऑफ डेट ही स्पष्ट झाल्याचे नंतर त्यांना अर्जदाराची फिस परत करण्यासंबंधी त्यांनी ताबडतोब पावले उचलली व दि.20.08.2009 रोजी अर्जदाराचे पालक श्री. रामहरी भिसे यांना रु.7750/- चा धनादेश देण्यात आला ते पोहचवीषयीचे पञ गैरअर्जदाराने दाखल केलेले आहे. अर्जदारास झालेल्या ञासाबददल दिलगीरीही व्यक्त केली आहे. त्यामूळे झाला तो प्रकार कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाला व तो असा फार विलंब झाला नाही, महिना ते दिड महिन्याचा फरक आहे. एवढा वेळ लागू शकतो. अर्जदारास त्यांचे मागणी प्रमाणे पूर्ण रक्कम परत मिळाली आहे व इच्छित ठिकाणी प्रवेश ही मिळाला आहे. त्यामूळे गैरअर्जदाराकडून झालेला थोडाबहूत विलंब यांला सेवेतील ञूटी म्हणता येणार नाही. सबब वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यू.पारवेकर लघूलेखक |