Maharashtra

Nagpur

CC/11/113

Kunal Premanand Janbandhu - Complainant(s)

Versus

Hewlet Packerd India Sales Ltd. - Opp.Party(s)

16 Apr 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/113
 
1. Kunal Premanand Janbandhu
House No. 2948, Annapurna Nagar, Paithan, Aurangabad
Aurangabad
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Hewlet Packerd India Sales Ltd.
92, Industrial Suburb, Yashwantpur, Bengluru
Bengluru
Karnataka
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:
श्री. जयेश वोरा.
......for the Complainant
 
श्री. सचिन जैस्‍वाल (गैरअर्जदार क्र.1 तर्फे).
श्री. विनोद लालवानी (गैरअर्जदार क्र.2 तर्फे).
......for the Opp. Party
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 16/04/2012)
1. प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत मंचात दि.09.03.2011 रोजी विरुध्‍द पक्षा विरुध्‍द दाखल करुन मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्षाचे सेवेत त्रुटी आहे व अनुचित व्‍यापार पध्‍दती असल्‍याचे घोषीत करावे, तसेच तक्रारकर्त्‍याने अदा केलेली लॅपटॉपची रक्‍कम `.37,900/- या किमतीचा भारतात सेवा मिळेल असा नवीन लॅपटॉप देण्‍याचे व ते शक्‍य नसल्‍यास संपूर्ण रक्‍कम `.37,900/- दि.22.05.2009 पासुन द.सा.द.शे. 12% व्‍याजाने द्यावी, शारीरिक मानसिक त्रासाकरीता `.50,000/- व तक्रारीच्‍या खर्चाची मागणी केलेली आहे.
2. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे थोडक्‍यात खालिल प्रमाणे...
तक्रारकर्ता हा पैठणचा मुळ र‍हीवासी आहे, विरुध्‍द पक्ष क्र.1 संगणक, लॅपटॉप प्रिंटर्स इत्‍यादी वस्‍तुंचे उत्‍पादन आणि आयात व विक्रीचा व्‍यवसाय करतात, त्‍यांचे उत्‍पन्‍नाची विक्री देशभर विक्रेत्‍यांचे माध्‍यमातून करतात. विरुध्‍द पक्ष क्र.2 हे संगणक, लॅपटॉप व इतर वस्‍तु विकण्‍याचा व्‍यवसाय करतात व सदर उत्‍पादनाची गॅरंटी, वारंटी ग्राहकांना देतात व विक्रीनंतर सेवा पुरविण्‍याची हमी देतात. विरुध्‍द पक्ष क्र.2 हे विरुध्‍द पक्ष क्र.1 चे रिटेलर आहेत.
3. तक्रारकर्त्‍याने नुवा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग टेक्‍नॉलॉजी, पोस्‍ट खापरी तालूका कळमेश्‍वर, नागपूर येथे कॉम्‍प्‍युटर इंजिनिअरींग अभ्‍यासक्रमाकरीता 2008 मधे प्रवेश घेतला. सदर अभ्‍यासक्रमात लॅपटॉपचा वापर अतिशय आवश्‍यक असल्‍यामुळे त्‍याची निकड लक्षात घेऊन दि.22.05.2009 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.2 चे दुकानातून (डिलर) त्‍यांचे मार्गदर्शनानुसार विरुध्‍द पक्ष क्र.1 व्‍दारे उत्‍पादीत HP PAVILION G-60 विकत घेण्‍यांस प्रोत्‍साहीत केले व त्‍यावर 1 वर्षाची गॅरंटी देण्‍यांत येईल असे सुचित केले. तक्रारकर्त्‍याने `.37,900/- रोखीने लॅपटॉपची किंमत म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्र.2 ला दिले. विरुध्‍द पक्षाने डिलेव्‍हरी मेमोवर ठप्‍पा मारुन रक्‍कम प्राप्‍त झाल्‍याचे नोंदविले. परंतु आवश्‍यक बिल न देता डिलेव्‍हरी मेमो हेच बिल आहे असे समजा म्‍हणून सांगितले व काही अडचण आल्‍यास आम्‍ही येथे बसलेलो आहोत, त्‍यामुळे चिंता करण्‍याचे कारण नाही असे सांगितले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला HP PAVILION G-60 Product No. NBQ41UAR#ABA, Serial No.3CG90272GM दिला. डिलेव्‍हरी मेमोवर जी-60 ची नोंद न करता मॉडेल नंबर डी-60 लिहल्‍याची चुक विरुध्‍द पक्ष क्र.2 चे निदर्शनास आणली त्‍यावरसुध्‍दा विरुध्‍द पक्ष क्र.2 ने म्‍हटले की, चिंता करण्‍याचे काही कारण नाही त्‍यांने कुठल्‍याही प्रकारचा फरक पडत नसुन आम्‍ही सेवा देण्‍यांस बसलेलो आहोत, परंतु डिलेव्‍हरी मेमोमधे दुरुस्‍ती केली नाही.
4. सदर लॅपटॉपने खरेदी नंतर काही दिवस बरोबर कार्य केले परंतु त्‍यानंतर लहानमोठे त्रास येत होते, व ते दुरुस्‍त करण्‍याकरता कळमेश्‍वर वरुन नागपूर येथे विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे वारंवार चकरा माराव्‍या लागत होत्‍या. दुरुस्‍ती करीता विरुध्‍द पक्ष क्र.2 प्रत्‍येक वेळी एक चिठ्ठी देत होते व दुरुस्‍तीनंतर चिठ्ठी परत घेऊनच लॅपटॉप घेत होते. तक्रारकर्त्‍याने म्‍हटले की, वेळोवेळी येणा-या लॅपटॉपमधील दोषामधे सदर लॅपटॉप तक्रारकर्त्‍याकडे कमी वेळ राहून विरुध्‍द पक्षाकडे जास्‍त वेळ राहत होता त्‍यामुळे अभ्‍यासात खोळंबा होत होता. तक्रारकर्त्‍यानुसार विरुध्‍द पक्षाने काही महीने सेवा दिली, परंतु दि.27.02.2011 ला लॅपटॉपचे बिघाडाकरीता विरुध्‍द पक्ष क्र.2 शी संपर्क केला असता त्‍यांनी आत जाऊन लॅपटॉपची तपासणी केली व विरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या अधिकृत सेवा केंद्रात जाण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍यानुसार तक्रारकर्ता अधिकृत सेवा केंद्र मेसर्स सिमटेक कॉम्‍प्‍युटेक प्रा.लि., नागपूर यांचेशी दि.28.02.2011 रोजी संपर्क केला. अधिकृत प्रतिनिधीने तपासणीकरता सर्व्‍हीस कार्ड रिपोर्ट तयार केला व तपासणीनंतर, ‘सदर लॅपटॉपला भारतात सपोर्ट उपलब्‍ध नाही (लॅपटॉपचे सुटे भाग व दुरुस्‍तीची सुविधा उपलब्‍ध्‍द नसने) असे त्‍यांनी अहवालात नोंद केली, त्‍यामुळे सेवा देता येणार नाही व लॅपटॉप दुरुस्‍त न करता परत केला. सिमटेक कॉम्‍प्‍युटेकचे प्रतिनिधीने पुन्‍हा सांगितले की, तक्रारकर्त्‍यास विकण्‍यांत आलेला लॅपटॉप, भारतात विकण्‍याकरता उत्‍पादीत करण्‍यांत आलेला नसुन त्‍याचे भागही भारतात उपलब्‍ध नाही व पुढे सदर लॅपटॉप नवीन नसून परदेशातून वापरलेला प्राप्‍त करुन त्‍याला REFURBISH नवीन विकल्‍याचे सांगितले. त्‍यामुळेविरुध्‍द पक्ष क्र.2 ने तक्रारकर्त्‍याची फसवणूक केल्‍याचे स्‍पष्‍ट होते.
4. सदर घटनाक्रमानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 चे सेवाकेंद्र मे.महा इलेक्‍ट्रानिक्‍स, बंगलोर यांना ई-मेलने व स्पिड पोष्‍टाव्‍दारे दि.01.03.2011 रोजी माहिती पुरविली परंतु त्‍यांनी कुठल्‍याही प्रकारची दाद दिली नाही. सदर लॅपटॉप हा फेब्रुवारी-2011 ला बिघाड झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष व त्‍यांचे अधिकृत केंद्राने सेवा न पुरवीता तसाच परत केल्‍यामुळ तक्रारकर्ता लॅपटॉपचा उपभोग घेऊ शकला नाही, उलट पक्षी तक्रारकर्त्‍यास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्त्‍याने सदर्रहू लॅपटॉप हा नागपूर येथून खरेदी केल्‍यामुळे मंचास सदर तक्रार चालविण्‍यांचे अधिकार क्षेत्र आहे.
5. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत एकूण 4 दस्‍तावेज दाखल केले ते अनुक्रमे पृ. क्र.14 ते 19 वर आहे. त्‍यामुधे तक्रारकर्त्‍याचे ओळखपत्र, डिलेव्‍हरी मेमो, सर्व्‍हीस कॉल रिपोर्ट व पत्रव्‍यवहार आहे.
6. मंचाने विरुध्‍द पक्षांवर नोटीस बजावला असता दोन्‍ही पक्ष मंचात हजर झाले असुन त्‍यांनी आपला जबाब खालिल प्रमाणे सादर केले आहे..
विरुध्‍द पक्ष क्र.2 ने म्‍हटले की, विरुध्‍द पक्ष क्र.1 आंतरराट्रीय कंपनी असुन संगणक, लॅपटॉप व प्रिंटर्सचे उत्‍पादक असुन ते आयात व विक्रीचा व्‍यवसाय करतात. विरुध्‍द पक्ष क्र.2 हे त्‍यांचे विक्रेते असल्‍यामुळे संगणक व लॅपटॉप इत्‍यादी वस्‍तु विकण्‍याचा व्‍यवसाय करतात. विरुध्‍द पक्षाने तक्रारीचा परिच्‍छेद क्र.2 पूर्णतः नाकारला व त्‍यांनी मान्‍य केले की, तक्रारकर्ता दि.22.05.2009 रोजी त्‍याचे दुकानात आला व इतर कंपन्‍यांच्‍या लॅपटॉप बघितल्‍यानंतर स्‍वतःहून HP PAVILION G-60 ह्या कंपनीचा लॅपटॉप मागितला त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास कॉम्‍प्‍युटर बाबत पूर्ण कल्‍पना होती व विरुध्‍द पक्षावर केलेला आरोप खोटा आहे असे म्‍हटले आहे. सदर्रहू लॅपटॉपची किंमत `.37,900/- प्राप्‍त करुन तक्रारकर्त्‍यास रितसर बिल दिले व त्‍यामधे शर्ती व अटी अगोदरच नमुद केलेल्‍या असुन विकलेल्‍या मालाची वारंटी व गॅरंटी नाही असे नमुद केले आहे व त्‍याबाबतचा उल्‍लेख तक्रारकर्त्‍यास केलेला होता. विरुध्‍द पक्ष क्र. 2 ने म्‍हटले की, त्‍यांनी डी-60 याच मॉडेलची विक्री केली आहे त्‍यामुळे चुकीची दुरुस्‍ती करण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.
7. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने तक्रारीचा परिच्‍छेद क्र. 4 नाकारला व म्‍हटले की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास सदर्रहू लॅपटॉप विरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या सेवा केंद्रामधे दाखवा हे नाकारले. तक्रारकर्ता स्‍वतःहून सेवा केंद्राकडे गेला व सर्व्‍हीस रिपोर्ट मागितला, विरुध्‍द पक्षाने म्‍हटले की, सेवा केद्राच्‍या रिपोर्टमधे नोंदविलेला लॅपटॉप क्रमांक हा त्‍यांनी विकलेलाच नाही. तसेच फसवणूक झाल्‍याचे नाकारुन तक्रार खारिज करण्‍यांची मागणी केली व इतर तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे नाकारले.
8. विरुध्‍द पक्ष क्र.1 चे वकीलांनी दि.26.07.2011 ला वेळ मिळण्‍याबाबत अर्ज दाखल केला, मंचाने तो अर्ज `.500/- खर्चासह मंजूर केला त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र.1 चे वकीलाने दि.08.08.2011 ला वेळ मिळण्‍याचा अर्ज दाखल केला तो अर्ज मंचाने नामंजूर केला. विरुध्‍द पक्ष क्र.1 चे वकीलाने पून्‍हा दि.08.09.2011 ला लेखी उत्‍तराच्‍या मराठीचा अनुवाद दाखल करण्‍याकरीता वेळ मागण्‍याचा अर्ज सादर केला तो अर्ज मंचाने `.500/- खर्चासह मंजूर केला. संपूर्ण दस्‍तावेजांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता दि.26..07.2011 व दि.08.09.2011 चे आदेशान्‍वये विरुध्‍द पक्ष क्र.1 ने `.500/- प्रत्‍येकी कॉस्‍ट भरल्‍याचे स्‍पष्‍ट होत नाही, तरी सुध्‍दा विरुध्‍द पक्ष क्र.1 चे उत्‍तर रेकॉर्डवर दाखल असल्‍याचे दिसते.
9. मंचाने तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष क्र.1 चे वकीलांचा युक्तिवाद ऐकला, विरुध्‍द पक्ष क्र.2 ला युक्तिवादाकरीता अंतिम संधी देऊन सुध्‍दा ते गैरहजर. तक्रारीसोबत असलेल्‍या सर्व कागदपत्रांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्‍क र्ष //-
10. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र. 1 व्‍दारे उत्‍पादीत लॅपटॉप HP PAVILION G-60 Product No. NBQ41UAR#ABA, Serial No.3CG90272GM विरुध्‍द पक्ष क्र.2 मार्फत दि.22.05.2009 रोजी रु.37,900/- रोखीने देऊन खरेदी केला होता. त्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 चा ‘ग्राहक’ ठरतो. तक्रारकर्त्‍याने म्‍हटले की, विरुध्‍द पक्ष क्र.2 ने त्‍यास डिलेव्‍हरी मेमोवर ठप्‍पा मारून रक्‍कम प्राप्‍त झाल्‍याचे नमुद केले, परंतु बिल दिलेले नाही. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने आपल्‍या उत्‍तराच्‍या परिच्‍छेद क्र.3 मधे स्‍पष्‍टपणे नमुद केले की, त्‍याने तक्रारकर्त्‍यास रितसर बिल दिले व सदर बिलामधे शर्ती व अटी अगोदरच नमुद केल्‍याअसुन विकलेल्‍या मालाची वारंटी व गॅरंटी नसल्‍याचे नमुद केले आहे. मंचाने अनुक्रमे पृ.क्र.15 वरील डिलेव्‍हरी मेमोचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की, सदर्रहू दस्‍तावेज हा निव्‍वळ डिलेव्‍हरी मेमो आहे व त्‍यास लॅपटॉप खरेदी बिलाचे स्‍वरुप प्राप्‍त होत नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास बिल दिले आहे, असे शपथपत्रावरील म्‍हणणे पूर्णतः खोटे व खोडसाळ स्‍वरुपाचे आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.2 यांना विरुध्‍द पक्ष क्र.1 व्‍दारे उत्‍पादीत HP PAVILION G-60 Product No. NBQ41UAR#ABA, Serial No.3CG90272GM हा लॅपटॉप खरेदी करण्‍याबाबत सुचित केले होते व तोच लॅपटॉप त्‍यांनी खरेदी केला असतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्षांनी डिलेव्‍हरी मेमोवर मॉडेल नंबर जी-60 ऐवजी डी-60 म्‍हणून नोंदविले ही चुक विरुध्‍द पक्षांचे लक्षात आणून देताच, त्‍यांनी म्‍हटले की त्‍याने काही फरक पडत नाही व काही अडचण आल्‍यास व सेवा लागल्‍यास आम्‍ही येथे बसलो आहोत, ही विरुध्‍द पक्ष क्र.2 चे कृति पूर्णतः गैरकायदेशिर असुन त्‍यांनी अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केलला आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने परिच्‍छेद क्र.3 चे उत्‍तरात स्‍पष्‍टपणे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याने HP PAVILION G-60 या कंपनीचा लॅपटॉप मागितला त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची मुळ मागणी ही उपरोक्‍त लॅपटॉपबाबत असतांना विरुध्‍द पक्ष क्र.2 ने डी-60 क्रमांकाच्‍या लॅपटॉपची नोंदणी डिलेव्‍हरी मेमोवर हेतुपूरस्‍सर करुन तक्रारकर्त्‍याची फसवणूक केलेली आहे. त्‍याच उत्‍तरात तक्रारकर्त्‍याची पसंती ही जी-60 ची होती हे विरुध्‍द पक्षाचे उत्‍तरावरुनच स्‍पष्‍ट होते, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास डी-60 या मॉडेलची विक्री केली आहे हे विरुध्‍द पक्ष क्र.2 चे म्‍हणणे पूर्णतः बनवाबनवी करणारे व मंचाची दिशाभुल करणारे आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरुध्‍द पक्षाने म्‍हटले की, त्‍याचे बिलावर अटी व शर्ती नमुद असून त्‍यामधे गॅरंटी, वारंटी नाही. हे सुध्‍दा विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे पूर्णतः गैरकायदेशिर आहे, कारण सेल ऑफ गुड्स ऍक्‍टच्‍या तरतुदींनुसार impliedly सदर लॅपटॉपला गॅरंटी व वारंटी मिळते. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 चे कृत्‍य व डिलेव्‍हरी मेमोवरील तथाकथीत नोंद पूर्णतः गैरकायदेशिर असल्‍यामुळे मंचाने नाकारल्‍या.
11. तक्रारकर्त्‍याने म्‍हटले की, त्‍याच लॅपटॉपमधे बिघाड आल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र.2 चे सल्‍ल्‍यानुसार दि.28.02.2011 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 चे अधिकृत सेवाकेंद्र सिमटेक कॉम्‍प्‍यूट्रानीक्‍स प्रा.लि., यांना लॅपटॉप दाखविला असता त्‍यांनी डेमो इंजिनिअर डायग्‍नोसिस-need to diagnose, but checked with GSC. Says product is not supported in India. यावरुन स्‍पष्‍ट बोध होतो की, उपरोक्‍त लॅपटॉपचे सुटे भाग व दुरुस्‍ती सेवा भारतात उपलब्‍ध नाही, असे असतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्ष क्र.1 ने उत्‍पादीत माल भारतात विरुध्‍द पक्ष क्र.2 मार्फत विक्रीस पाठवणे व विरुध्‍द पक्ष क्र.2 ने त्याबाबत तक्रारकर्त्‍यास स्‍पष्‍ट सुचना न देता विरुध्‍द पक्ष क्र.2 ने तक्रारकर्त्‍याची फसवणूक केलेली आहे व ही कृति ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत अनुचित व्‍यापार पध्‍दतीत मोडते असा मंचाचा स्‍पष्‍ट निष्‍कर्ष आहे.
12. वरील परिच्‍छेद क्र.8 मधे हे स्‍पष्‍ट झाले आहे की, विरुध्‍द पक्ष क्र.1 यांना दि.26.07.2011 व 08.09.2011 ला प्रत्‍येकी `.500/- खर्चासह उत्‍तर दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यांत आली होती परंतु त्‍यांनी त्‍याची अंमलबजावणी न करताच उत्‍तर मंचात दाखल केल्‍याचे दिसते. मंचाचे दि.26.07.2011 व 08.09.2011 च्‍या आदेशानुसार अंमलबजावणी न झाल्‍यामुळे खालिल राष्‍ट्रीय आयोगाचे निकालपत्रांनुसार
‘रामप्रकाशपाल गुप्‍ता –विरुध्‍द- श्रीमती रंजना 2002 सीटीजे 221, या निकालपत्रात प्रमाणीत केल्‍याप्रमाणे मंचाने विरुध्‍द पक्षाने दाखल केलेले उत्‍तर गृहीत धरलेले नाही, “cost levied for adjournment not paid by O.P. & affidavits for petitioner was not taken on record and District Forum adjourned the complaint to 04.09.1999. we do not find any error in the order of the State Commission for us to exercise our jurisdiction under clause (b) of section 21 of CPA appeal dismissed’.
13. मंचाने तक्रार निकाली काढते वेळी विरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या लेखी उत्‍तराचे अवलोकन केले असता त्‍यामधे सदर्रहू लॅपटॉपकरीता गॅरंटी /वारंटी असते हे मान्‍य केले. त्‍यामुळे सुध्‍दा विरुध्‍द पक्ष क्र.2 ने डिलेव्‍हरी मेमोवर Goods sold without Warranty and Guarantee बाबतची नोंद फसवेगिरी करण्‍याच्‍या एकमेव हेतूने केलेली आहे असा मंचाचा स्‍पष्‍ट निष्‍कर्ष आहे. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 मधील व्‍यवहार हा ‘प्रिंसीपल टू प्रिंसीपल’, या तत्‍वावर असल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 ने सदर्रहू लॅपटॉपकरीता सुटे भाग व दुरुस्‍ती सेवा उपलब्‍ध नसतानासुध्‍दा तसेच सदर्रहू डी-60 लॅपटॉप हा भारतात विकण्‍याकरता नसतांना सुध्‍दा विक्री करणे हे पूर्णतः अनुचित आहे व सदर लॅपटॉप हा विदेशातील जुना लॅपटॉप Refurbish करुन विकला या तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍यास पूष्‍टी मिळते. विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 मधील व्‍यवहार हा ‘प्रिंसीपल टू प्रिंसीपल’, या तत्‍वावर असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या झालेल्‍या फसवणूकीस विरुध्‍द पक्ष क्र.2 सर्वस्‍वी जबाबदार आहे असे मंचाचे मत आहे, त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 ने `.37,900/- या किमतीचा भारतात सेवा मिळेल असा नवीन लॅपटॉप द्यावा जर हे शक्‍य नसल्‍यास सदर रक्‍कम दि.22.05.2009 पासुन तक्रारकर्त्‍याचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9% व्‍याजासह देणे न्‍यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. व विरुध्‍द पक्ष क्र.2 चे कृतिस विरुध्‍द पक्ष क्र.1 जबाबदार असल्‍याचे दिसत नसल्‍यामुळे त्‍यास तक्रारीतून वगळणे संयुक्तिक होईल असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्ता एक अभियांत्रीकीचा विद्यार्थी असुन त्‍याने खरेदी केलेल्‍या लॅपटॉपचा तो योग्‍य उपभोग घेऊ न शकल्‍यामुळे त्‍यास निश्चितच शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला या तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍याशी मंच सहमत आहे व तो `.5,000/- नुकसान भरपाई व `.3,000/- तक्रारीच्‍या खर्चाचे मिळण्‍यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
14. वरील विवेचनावरुन हे स्‍पष्‍ट झाले की, विरुध्‍द पक्ष क्र.2 ने तक्रारकर्त्‍यासोबत बनवाबनवी करुन फसवणुक केली, तसेच मंचासमक्ष शपथपत्रात खोटे व दिशाभुल करणारे कथन करुन तक्रारकर्त्‍यास न्‍यायापासुन वंचित ठेवण्‍याचा पुरेपूर प्रयत्‍न केला जेव्‍हा की, तक्रारकर्त्‍यास योग्‍य मार्गदर्शन व विक्री पश्‍चात योग्‍य सेवा देणे हे त्‍यांचे कर्तव्‍य होते ते त्‍यांनी योग्‍य प्रकारे पार पाडले नाही व खोटे विधान केल्‍यामुळे राष्‍ट्रीय आयोगाचे खालिल निकालपत्रात प्रमाणीत केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्र.2 ने भविष्‍यात सामान्‍य ग्राहकांची/ विद्यार्थांची फसवणूक करु नये व त्‍यांच्‍या ग्राहक सेवेत सुधारणा व्‍हावी म्‍हणून त्‍यांचेवर दंडात्‍मक नुकसान म्‍हणून `.40,000/- आकारुन त्‍यापैकी `.20,000/- तक्रारकर्त्‍यास देणे व उर्वरित रक्‍कम `.20,000/- मंचाचे लिगल एड खात्‍यात जमा करणे संयुक्तिक होईल, असे मंचाचे मत आहे.
NCDRC 2006 CTJ-631 (CP) Reliance India Mobile Ltd. –v/s- Harichand Gupta, - For filling false affidavits or making misleading statements in pending proceeding, the deponent are to be dealt with appropriately by imposing punitive damages on them so that in future they may not Indulge in any such practice.
सबब खालिल प्रमाणे आदेश पारित करण्‍यांत येतो.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2. गैरअर्जदार क्र.2 ला आदेश देण्‍यांत येतो की, त्‍याने तक्रारकर्त्‍यास `.37,900/- किमतीचा भारतात सेवा मिळेल असा नवीन लॅपटॉप द्यावा जर हे शक्‍य नसल्‍यास सदर रक्‍कम दि.22.05.2009 पासुन तक्रारकर्त्‍याचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9% व्‍याजासह अदा करावी.
3. गैरअर्जदार क्र.2 ला आदेश देण्‍यांत येतो की, भविष्‍यात सामान्‍य ग्राहकांची/ विद्यार्थांची फसवणूक करु नये व त्‍यांच्‍या ग्राहक सेवेत सुधारणा व्‍हावी म्‍हणून त्‍यांचेवर दंडात्‍मक नुकसान भरपाई म्‍हणून `.40,000/- आकारनीपैकी `.20,000/- तक्रारकर्त्‍यास द्यावे व उर्वरित रक्‍कम `.20,000/- मंचाचे लिगल एड खात्‍यात जमा करावी.
4. गैरअर्जदाराला आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक
व शारीरिक त्रासापोटी `.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी `.3,000/- अदा करावे.
5. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.