::: आ दे श :::
( पारित दिनांक : 27/12/2017 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणात, अर्जदार/तक्रारकर्ता यांनी, आज दिनांक 27/12/2017 रोजी, पुरसिस रेकॉर्डवर सादर केली, त्यामधील मजकूराचा, थोडक्यात आशय, आढळून येतो, तो येणेप्रमाणे -
सदरहू प्रकरणात वि. कोर्टाबाहेर तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांनी आपसात तडजोड केली आहे. सदरचे प्रकरण आपसात झाल्यामुळे अर्जदाराला गैरअर्जदार क्र.1 ने त्यांनी घेतलेले दुचाकी वाहनाचे कर्जाविषयी दिनांक 14/12/2017 रोजी नो ऑब्जेक्शन ( ना हरकत प्रमाणपत्र ) दिलेले आहे. त्यामुळे आता विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 विषयी कोणतीही तक्रार राहीलेली नाही. आता सदरचे प्रकरण गैरअर्जदार विरुध्द चालविणे नसल्यामुळे काढून टाकावे किंवा बंद करावे. करिता पुरसिस दिली आहे.
अशास्थितीत, सदर तक्रार प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर तक्रार, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व अशाप्रकारे, सदर तक्रार प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri