Maharashtra

Ratnagiri

CC/65/2016

Om Sai Dattakrupa Co.Op.Housing Society Ltd. Kherdi C/O Chairman Sandeep Vilas Kadam - Complainant(s)

Versus

Hemalata Madhukar Mestri - Opp.Party(s)

V.M.Sakhalkar,S.B. Shahane,Gurav

31 Aug 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, RATNAGIRI
Collector Office Compound, Ratnagiri
Phone No.02352 223745
 
Complaint Case No. CC/65/2016
( Date of Filing : 15 Nov 2016 )
 
1. Om Sai Dattakrupa Co.Op.Housing Society Ltd. Kherdi C/O Chairman Sandeep Vilas Kadam
At.Om Sai Dattakrupa Sahakari Gruh.Sanstha Kherdi,Chiplun
Ratnagiri
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Hemalata Madhukar Mestri
At.Shivajinagar,Kherdi,Chiplun
Ratnagiri
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Mr. V.A.Jadhav PRESIDENT
  Mr. D.S.Gawali MEMBER
 
For the Complainant:V.M.Sakhalkar,S.B. Shahane,Gurav, Advocate
For the Opp. Party: Shinde, Advocate
Dated : 31 Aug 2018
Final Order / Judgement

- आदेश- नि. 1 वर -

(दि. 31-08-2018)

 

व्‍दारा : मा. श्री. दिनेश शं. गवळी, सदस्‍य-

            1)   तक्रारदार यांनी सामनेवाला विरुध्‍द गाव मौजे खेर्डी, ता.चिपळूण येथील मिळकत 67अ1अ हिस्‍सा नं.17,क्षेत्र 0.10-9 या मिळकतीमध्‍ये सामनेवाला यांनी "मेस्‍त्री विहार" या नावाने व्‍यापारी व रहिवासी गाळे असलेली इमारत बांधली असून सामनेवाला बिल्‍डर व डेव्‍हलपर्स आहे. सदरची इमारत बांधून पुर्ण झालेनंतर इमारतीतील गाळे व सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्‍था स्‍थापन करणे व संस्‍था स्‍थापन झालेनंतर 4 महिन्‍याच्‍या आत इमारतीमधील सर्व मोकळया जागा टेरेस व भविष्‍यातील एफ. एस. आय तसेच बांधलेल्‍या जमिनीतील मोकळी जागा व इमारत इत्‍यादीबाबतचे सर्व अधिकार याचे खरेदीखत/कन्‍व्‍हेअन्‍स डीड करुन दिलेले नाही. तक्रारदार संस्‍थेला करुन देणे बंधनकारक होते. तथापि तक्रारदार संस्‍थेने सामनेवाला यांना खरेदीखत/कन्‍व्‍हेअन्‍स डीड करुन देणेबाबत कळवूनही सामनेवाला यांनी संस्‍था नोंदणी झालेनंतरही तक्रारदार संस्‍थेस कन्‍व्‍हेअन्‍स डीड करुन दिलेले नसलेमुळे तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून तक्रारदार संस्‍थेला मोकळया जागेचे, इमारतीचे यामधील जिने,सज्‍जे, टेरेस, मोकळी जागा याच्‍या सर्व हक्‍कासंबंधासहीत कन्‍व्‍हेअन्‍स डीड करुन दयावे व मानसिक त्रासापोटी व तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम रु.15,000/- नुकसानभरपाई मिळावी अशी तक्रारदार संस्‍थेने तक्रार अर्ज मंचात दाखल केलेला आहे.

2)  तक्रारदार व सामनेवाला यांनी आज दि. 31-08-2018 रोजी संयुक्‍त पुरशीस नि.23 दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी नि.20 कडे दि.22-06-2017 दिलेल्‍या तडजोड पुरशीसप्रमाणे तक्रार निकाली करणेत यावी असे नमूद केले आहे.

3)  नि.20 वरील संयुक्‍त पुरशीसवर उभय पक्षकांराचे सहया आहेत तसेच नि. 23 वर उभय पक्षकार व त्‍यांचे विधीज्ञ यांचे सहया आहे.  सदर पुरशीस मंचाने दाखल करुन घेतली.  सबब, नि. 20 व नि.23 चे पुरशीसनुसार तक्रारदाराचा तक्रार अर्ज क्र. 65/2016 निकाली करणेत येतो. सबब, आदेश खालीलप्रमाणे.

                              - आ दे श -

      1) तक्रार अर्ज नं. 65/2016 निकाली करणेत येतो.
      2) तक्रारदार व सामनेवाला यांची नि. 20 व 23 वरील पुरशीसी हया या आदेशाचा एक भाग समजणेत याव्‍यात. 

      3) प्रकरण दप्‍तरी दाखल.

      4) उभय पक्षकांराना सदरच्‍या आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात याव्‍यात.

 
 
[ Mr. V.A.Jadhav]
PRESIDENT
 
[ Mr. D.S.Gawali]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.