Maharashtra

Satara

CC/14/44

shri vijay bothala dhge - Complainant(s)

Versus

hem motor div pvt ltd - Opp.Party(s)

jagdale

31 Jul 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/14/44
 
1. shri vijay bothala dhge
sihdeshvr kuroli tal khtav dist satara
satara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. hem motor div pvt ltd
m i d c satara
satara
Maharshtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
 HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

           मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                          मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

           

              

                तक्रार अर्ज क्र. 44/2014

                      तक्रार दाखल दि.02-04-2014

                            तक्रार निकाली दि.31-07-2015. 

 

श्री. विजय बोधला ढगे,

रा. सिध्‍देश्‍वर कुरोली,

ता.खटाव, जि.सातारा.                           ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

 

1. मा. शाखा प्रबंधकसो,

   हेम मोट डिव्‍हीजन प्रा.लि.,,

   ए-2/ए,जुने एम.आय.डी.सी.,

   पुणे-बेंगलोर हायवे, सातारा

2. मा. शाखा प्रबंधकसो,

   टाटा मोटर्स,

   पॅसेंजर कार बिझनेस युनिट,

   के.डी.-03,कार प्‍लॉट,

   सेक्‍शन 15 व 15 अ पी.सी.एन.टी.डी.ए.चिखली,

   पुणे 410 501

 

3. मा. शाखा प्रबंधकसो,

   समर्थ मोटर्स,

   वडूज, ता.खटाव, जि.सातारा.                        ....  जाबदार

 

 

                                 तक्रारदारातर्फे अँड.व्‍ही.पी.जगदाळे

                                 जाबदार क्र.1 तर्फेअँड.व्‍ही.डी.निकम.

                                 जाबदार क्र.2 तर्फे- अँड.सी.एस.नाईक

                                 जाबदार क्र.3 तर्फे- एकतर्फा

 

-ः न्‍यायनिर्णय ः-

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला)

                                                                                     

1.  तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात मजकूर पुढीलप्रमाणे-

     तक्रारदार यांनी जाबदार क्र. 2 कंपनीची टाटा व्‍हीस्‍टा, व्‍ही.एक्‍स. ही गाडी रजि.नं.एम.एच.11-बी.एच.-112 ही गाडी जाबदार क्र.1 यांचेकडून दि.29/10/2012 रोजी खरेदी केली.  प्रस्‍तुत गाडीला वॉरंटी दोन वर्षे किंवा एक लाख किलोमीटर अशी दिली आहे. तक्रारदाराने पहिले सर्व्‍हींसिंग जाबदार क्र.1 कडून करुन घेतले होते.  परंतु प्रस्‍तुत वाहनाची वॉरंटी चालू असतानाच दि. 23/1/2014 रोजी सिध्‍देश्‍वर कुरोली येथे गाडीचे इंजिन गरम झाले.  त्‍यानंतर जाबदार क्र. 3 समर्थ मोटर्स यांचेकडील अजित सजगणे व सुधाकर माने यांनी गाडी त्‍याचदिवशी प्रत्‍यक्ष पाहून गाडीच्‍या इंजिनमध्‍ये कोणताही दोष नसल्‍याचे म्‍हणजेच गाडीचे ऑईल, ब्रेक ऑईल,गेयरऑईल, पाणी व कुलंट बरोबर असल्‍याची खात्री करुन गाडी वडूजला नेली.  त्‍यावेळी प्रस्‍तुत गाडी वडूजकडे घेवून जात असताना साधारण एक किलोमीटर अंतरावर पुन्‍हा गाडी गरम झाली.  त्‍यामुळे गाडी टो करुन वडूज येथे नेणेत आली.  तेथून जाबदार क्र. 3 समर्थ मोटर्स यांनी जाबदार क्र. 1 यांना फोनवरुन विचारणा केलेवर गाडी सातारा येथे आणणेस सांगितलेवरुन गाडी सातारा येथे आणली.  त्‍यावेळी जाबदार क्र. 1 यांनी गाडी चेक केल्‍यावर गाडीमध्‍ये ऑईल नसल्‍याचे व त्‍यामुळे गरम होत असलेचे सांगितले.  त्‍याचप्रमाणे इंजिनमधील काही सुटे भाग निकामी झालेचे सांगीतले व जाबदार नं. 3 ने दिलेले निष्‍कर्ष विपरीत असलेचे जाबदार क्र. 1 ने म्‍हटले आहे.  त्‍यामुळे संशयास्‍पद परिस्थिती निर्माण झाली असताना जाबदार क्र.1 ने दि.24/1/2014 रोजी रक्‍कम रु.70,000/- चे जॉब स्‍कीपने इस्‍टीमेट दिले.  त्‍यासोबत संगणीकृत रक्‍कम रु.64,212/- चे इस्‍टीमेट दिले. तसेच पुस्‍ती जोडली की, क्रँक व्‍यवस्थित नसेल तर रक्‍कम रु.70,000/- चे जॉब स्‍लीपने इस्‍टीमेंट दिले.  त्‍यासोबत संगणीकृत रक्‍कम रु.64,212/- चे इस्‍टीमेट दिले.  तसेच पुस्‍ती जोडली  की, क्रँक व्‍यवस्थित नसेल तर रक्‍कम रु.20,000/- ची वाढ इस्‍टीमेटमध्‍ये होईल.  वास्‍तविक सदर गाडीमध्‍ये मॅन्‍युफॅक्‍चरिंग डिफेक्‍ट असलेने प्रस्‍तुत गाडीत ऑईल व कुलंट असतानाही गाडी गरम होते असे तक्रारदाराचे मत आहे.  त्‍यामुळे जाबदार क्र. 2 टाटा मोटर्स हे सदोष उत्‍पादनाबाबत जबाबदार आहेत.  जाबदाराने त्‍यांच्‍या प्रत्‍येक कृतीचे रोखीकरण करण्‍यासाठी तक्रारदाराकडू टोईंग चार्जेस व डेमरेज चार्जेस वसूल केले आहेत हे सर्व गाडी ही वॉरंटी पिरियड मध्‍ये असताना घडलेने गाडी खरेदी केलेचा तक्रारदाराला मनःस्‍ताप झाला आहे.  गाडी वॉरंटी पिरियड मध्‍ये असतानादेखील जाबदाराने प्रत्‍येकवेळी तक्रारदाराची अडवणूक करुन प्रत्‍येक कामाचे चार्जेस आकारले आहेत.  म्‍हणजेच सेवेतील त्रुटी केली आहे. सबब तक्रारदाराने जाबदार यांना वकीलांमार्फत नोटीस पाठवली दि.14/2/2014 रोजी परंतु सदर नोटीसला जाबदार यांनी कोणतेही उत्‍तर दिलेले नाही.

      सबब तक्रारदारने जाबदार यांचेकडून प्रस्‍तुत गाडीच्‍या समान श्रेणीतील नवी गाडी बदलून मिळावी व नुकसानभरपाई मिळावी म्‍हणून प्रस्‍तुत  तक्रार अर्ज या मे. मंचात दाखल केला आहे.

2.  तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी जाबदार यांचेकडून सेवेतील त्रुटी झाली आहे असे घोषीत होवून मिळावे, तसेच जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना वादातीत गाडीचे समानदर्जाची समानश्रेणीची नवी गाडी द्यावी व खर्चाची रक्‍कम रु.25,000/- अलगरित्‍या मिळावेत तसेच मानसिक शारीरिक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- जाबदार कडून मिळावेत व अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.10,000/- जाबदारकडून मिळावा म्‍हणून विनंती केली आहे.

3.  तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी नि. 2 कडे अॅफीडेव्‍हीट, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते 5/7 कडे अनुक्रमे तक्रारदराचे गाडीचे आर.सी.टी.सी बुकचे सत्‍यप्रत, प्रस्‍तुत वादातीत गाडीच्‍या इन्‍श्‍यूरन्‍सची सत्‍यप्रत, गाडीचे टॅक्‍स इन्‍व्‍हाईस, गाडीच्‍या वॉरंटी कार्डची प्रत,गाडीचे जॉबकार्ड, सर्व्‍हीसिंगची बिले, तक्रारदाराने जाबदाराला  वकीलांमार्फत दिलेली नोटीस व नोटीसची पोहोचपावती नि.17 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 18 कडे तक्रारदारतर्फे मेकॅनिकचे अँफीडेव्‍हीट(2), तक्रारदारतर्फे साक्षीदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.        

4.    प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 यांनी नि. 15 कडे म्‍हणणे/कैफियत, नि. 16 कडे म्‍हणण्‍याचे अँफीडेव्‍हीट, नि. 21 कडे पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 25 कडे जाबदार क्र1 ने दाखल केलेले पुरावा हाच लेखी युक्‍तीवाद समजणेत यावा म्‍हणून पुरसीस, जाबदार क्र. 2 ने नि. 10 कडे म्‍हणणे/कैफीयत, नि. 11 कडे म्‍हणण्‍याचे अँफीडेव्‍हीट, नि. 12 कडे तज्ञांची नेमणूक करणेसाठी तक्रारदाराला आदेश होणेसाठी अर्ज,  नि. 22 कडे जाबदार क्र. 2 ने दाखल केलेली कागदपत्रे व म्‍हणणे हाच पुरावा समजणेत यावा म्‍हणून पुरसीस, नि.24 कडे जाबदार क्र. 2 चे लेखी युक्‍तीवाद, वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केली आहेत.

    जाबदार क्र. 1 यांनी त्‍यांचे म्‍हणणे/कैफियतमध्‍ये तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  जाबदार क्र. 3 यांना नवीन खरेदी केले वाहनांचे सर्व्‍हीसिंग अगर दुरुस्‍तीचे अधिकार कधीच दिलेले नव्‍हते.  त्‍यामुळे जाबदार क्र. 3 यांना तक्रारदाराने खरेदी केले वाहनाचे सर्व्‍हींसींग अगर दुरुस्‍तीचे अधिकार नव्‍हते व नाहीत.  तक्रारदाराने प्रस्‍तुत वाहन दि.29/10/2012 रोजी जाबदाराकडून खरेदी केलेल्‍या मजकूर मान्‍य आहे.  वास्‍तवीक तक्रारदाराने सदर वाहनखरेदी केलेनंतर सदर वाहनाचे मॅन्‍युअलप्रमाणे होणारे सर्व्‍हींसींग या जाबदाराकडून अगर अधिकृत सर्व्‍हीसींग सेंटरमधून करुन घेणे बंधनकारक होते.  सदर जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदाराला कधीही जाबदार क्र. 3 यांचेकडून वाहनाचे सर्व्‍हीसींग करणेस सांगितले नव्‍हते.  प्रस्‍तुत तक्रारदारने खरेदी केले वाहनामध्‍ये कोणताही दोष नव्‍हता व नाही.  प्रस्‍तुत वाहन तक्रारदाराने निष्‍काळजीपणाने, सदर वाहनाच्‍या मॅनुअलमध्‍ये नमूद सर्व्‍हींसींगचे अटी व शर्तींकडे दुर्लक्ष करुन सदर वाहन चालवल्‍याने सदर वाहनात तथाकथीत दोष निर्माण झाला आहे.  तक्रारदाराने प्रस्‍तुत वाहनाचे पहिले सर्व्‍हीसींग फक्‍त या जाबदाराकडे मॅन्‍यूअलप्रमाणे केले आहे.  मात्र इतर कोणतेही सर्व्‍हीसींग या जाबदाराकडे  तक्रारदाराने केलेले नव्‍हते व नाही.  त्‍यामुळे वाहनात झालेल्‍या दोषास तक्रारदार स्‍वतःच सर्वस्‍वी जबाबदार आहेत.  त्‍यामुळे तक्रारदाराला कोणतीही दाद मागता येणार नाही.  प्रस्‍तुत तक्रारदार हे तक्रारदाराचे ग्राहक असलेने जाबदार यांनी तक्रारदार यांना सदर वाहन खरेदी केलेनंतर विक्रीपश्‍चात सेवा दिली असून तशी सेवा देणेस हे जाबदार तयार होते व आजही आहेत.  सदर वाहनात आलेले दोष तक्रारदाराचे निष्‍काळजीपणाने आलेने सदर पार्टसचे दोष हे वॉरंटी कालावधीत नसलेने सदर दोष दूर करणेसाठी येणारा खर्च तक्रारदाराने दिल्‍याखेरीज सदर जाबदार प्रस्‍तुत वाहनातील कोणता‍ही दोष दूर करु शकत नाही.  सदर तक्रारी वॉरंटी कालावधीत असलेचे मानले तरीही तक्रारदाराने सदर वाहन जाबदार क्र.1 यांचेकडे वाहन दुरुस्‍तीसाठी आणले त्‍यावेळी जाबदार यांनी तक्रारदाराचे वाहनासाठी येणा-या खर्चाचे इस्‍टीमेट तक्रारदाराला दिले असून सदरची रक्‍कम तक्रारदाराने देणे गरजेचे असतानाही तक्रारदाराने सदरची रक्‍कम जाबदाराकडे जमा केली नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराचे वाहन जाबदाराने दुरुस्‍त केले नाही.  म्‍हणजे प्रस्‍तुत जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराला कोणतीही सदोष सेवा पुरविली नाही हे शाबीत होते.  सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळणेस पात्र आहे असे म्‍हणणे जाबदार क्र. 1 ने दाखल केले आहे. 

      तर जाबदार क्र. 2 ने नि. 10 कडे म्‍हणणे दाखल केले आहे.  त्‍यांनी प्रस्‍तुत म्‍हणण्‍यात तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे.  त्‍यांनी पुढे म्‍हटले आहे की, या जाबदाराने उत्‍पादित केलेली वाहने व मोटारी यांचे ऑटोमोटिव्‍ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ए.आ.ए.आय.)  मार्फत तपासणी होवून त्‍यांचे मान्‍यतेनंतरच सदर वाहनांचे वितरण होत असते.  प्रस्‍तुत जाबदार यांची देशभरात 800 पेक्षा जास्‍त कार्यशाळा सुरु आहेत.  कार्यशाळा, राखीव सेवा, तात्‍पुरती दुरुस्‍ती, मोटया दुरुस्‍त्‍या, स्‍पेअरपार्टस पुरवठा आणि अपघात झालेल्‍या वाहनांची दुरुस्‍ती व उपयुक्‍त आहने पुरवितात.  सदर प्रकारची एक कार्यशाळा सातारा शहरात सुरु आहे.  तक्रारदाराने उत्‍पादन दोषाबाबत केलेली विधाने ही मोघम असून प्रस्‍तुत विधानास कोणत्‍याही अधिकृत दखलपात्र प्रयोगशाळेच्‍या अहवालाचा आधार घेतलेला नाही.  तसेच सेवात्रुटीबाबत कोणताही पुरावा नाही.  त्‍याचप्रमाणे उत्‍पादन दोष आहे या म्‍हणण्‍याला पुष्‍टी देणेसाठी कोणत्‍याही तज्ञांचा अहवाल याकामी तक्रारदाराने दाखल केलेला नाही.  प्रस्‍तुत जाबदार क्र. 2 ने तक्रारदाराला कोणतीही सेवेतील त्रुटी दिली नाही.  सबब तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा अशास्‍वरुपाचे म्‍हणणे/कैफीयत तक्रारदाराने याकामी दाखल केले आहे.

    प्रस्‍तुत जाबदार क्र. 2 ने पुढीलप्रमाणे मे. वरिष्‍ठ न्‍यायालयाच्‍या न्‍यायनिवाडयांचा आधार घेतला आहे.

     ए.एन.आर. केस (जेटी 2006 एस.सी.113) सुप्रीम कोर्ट यामध्‍ये. सुप्रीम कोर्टाने प्रतिपादन केले आहे की, वॉरंटी दरम्‍यान जे उत्‍पादन दोष दूर करणे शक्‍य असतील अथवा दोषपूर्ण सुटे भाग बदलून असे दोष दूर करणे शक्‍य असेल अशा परिस्थितीत उत्‍पादकांकडून संपूर्ण मोटार बदलून देण्‍याची सक्‍ती करणे अथवा  किंमतीचा परतावा मागता येणार नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराने केलेली मोटारकारची मागणी समर्थनीय ठरत नाही.  तक्रारदाराचे वाहनामध्‍ये कोणताही उत्‍पादनदोष सिध्‍द होऊ शकलेला नाही. तसेच कोणतीही सेवात्रुटी जाबदाराने दिलेली नाही त्‍यामुळे प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने उत्‍पादन दोष असलेबाबत कोणत्‍याही तज्ञ इंजिनियरचे अथवा कार्यशाळेतील क्‍वॉलीटी इन्‍स्‍पेक्‍टरचा गाडी/वाहन तपासणी अहवाल मंचात दाखल केलेला नाही.  प्रस्‍तुत बाबतीत मा. राष्‍ट्रीय आयोगाने (2010) सीसी 19 (एम.सी) डॉ. के. कुमार सल्‍लागार (इंजिनियर) मारुती उद्योग लि., वि. ए.एस.नारायणण आणि के.एम.आर,आय. यामध्‍ये केलेल्‍या तक्रारीव्‍दारा वाहनातील उत्‍पादन दोष असल्‍याने प्रतिपादन करताना सदर विधान सिध्‍द करणेसाठी तज्ञांचा पुराव्‍याचा अहवाल असणे गरजेचे आहे असा कोणाताही तज्ञांचा अहवाल तक्रारदाराने मे मंचात दाखल केलेला नसलेने प्रस्‍तुत तक्रार अर्ज नामंजूर करावा.     

   प्रस्‍तुत वाहन हे दि. 29/10/2012 ते दि.21/2/2014 दरम्‍यान 35330 कि.मी. एवढा प्रवास करुन आलेले आहेत. जवळ-जवळ 15 महिन्‍यांच्‍या काळात हे वाहन 2355 कि.मी. अंदाजे प्रवास करणेस उपयुक्‍त व सक्षम होते व आहेत.  त्‍यामुळे उत्‍पादन दोष प्रस्‍तुत वाहनात आहे तक तक्रारदार सिध्‍द करु शकले नसलेमुळे प्रस्‍तुत तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे जाबदाराने म्‍हटले आहे.

5.    वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे व म्‍हणणे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मे मंचाने पुढील मुदद्यांचा विचार केला.

अ.क्र.                  मुद्दा                        उत्‍तर

 1.  तक्रारदार हे जाबदारांचे  ग्राहक आहेत काय?                  होय.                                        

 2.  जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा

     पुरवली आहे काय?                                      होय.

 3.  अंतिम आदेश काय?                                 खाली नमूद

                                                      आदेशाप्रमाणे.

 

विवेचन-

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार क्र. 2 कंपनीची टाटा व्‍हीस्‍टा व्‍हीएक्‍स ही चारचाकी गाडी खरेदी केली असलेने तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत.  प्रस्‍तुत बाबतीत सदर गाडी खरेदी केलेचे टॅक्‍स इनव्‍हाईस तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादी सोबत नि. 5/4 कडे दाखल केले आहे.  तसेच प्रस्‍तुत बाब जाबदाराने मान्‍य केली आहे. सबब तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत ही बाब निर्विवाद सत्‍य आहे.   तसेच प्रस्‍तुत गाडी टाटा व्‍हीस्‍टा व्‍ही.एक्‍स. रजि. नं. एम.एच.11-बी.एच.-112 या गाडीवर दि. 29/10/2012 या खरेदी दिनांकांपासून दोन वर्षे किंवा एक लाख कि.मी. अशी वॉरंटी दिली आहे. दरम्‍यानच्‍याकाळात दि. 23/1/2014 रोजी सदर गाडी  सिध्‍देश्‍वर कुरोली येथे गाडीचे इंजिन गरम झाले त्‍यानंतर समर्थ मोटर्स यांचेकडील (जाबदार क्र. 3 कडील) अजित सजगणे व सागर माने यांनी दि. 23/1/2014 रोजी गाडी प्रत्‍यक्ष पाहून गाडीच्‍या इंजिनमध्‍ये कोणताही दोष नसल्‍याचे म्‍हणजेच ऑईल, ब्रेक ऑईल, गेयरऑईल, पाणी कुलंट बरोबर असलेची खात्री करुन गाडी वडूजला नेण्‍याचे निश्चित केले.  त्‍यावेळी गाडी वडूजला नेणेचे निश्चित करुन उपस्थित लोकांच्‍यासमक्ष गाडी सजगणे व माने यांनी ताब्‍यात घेऊन ती वडूजकडे जात असता पुन्‍हा गरम झाली.  तेथून पुन्‍हा हेम मोटर्स यांनी फोनवरुन गाडी सातारा येथे जाबदार क्र. 1 कडे घेवून येणेस सांगितलेवर गाडी दुरुस्‍तीसाठी जाबदार क्र. 1 कडे आणला असता, जाबदार क्र. 1 कडे घेवून येणेस सांगितलेवर गाडी दुरुस्‍तीसाठी जाबदार क्र. 1 कडे आणला असता, जाबदाराने दि. 24/1/2014 रोजी रक्‍कम रु.70,000/- चे जॉबस्‍लीप दिले व रक्‍कम रु.64,212/- चे इस्‍टीमेट दिले. तसेच क्रँक व्‍यवस्‍थीत असेल तर ठीक नाहीतर ब्रँकचे साधारण रक्‍कम रु 20,000/- वाढतील असे सांगितले.  त्‍यामुळे गाडीमध्‍ये मॅन्‍युफॅक्‍चरींग डिफेक्‍ट असलेमुळे एवढया रकमेची दुरुस्‍ती गाडीत करावी लागणार आहे व टाटा मोटर्स (जाबदार क्र. 2) हेच या गाडीचे गैरविश्‍वसनीय उत्‍पादनाला जबाबदार आहेत.  प्रस्‍तुत चार्जेस तक्रारदाराला जाबदार क्र. 1 यांना द्यावे लागणार आहेत.  प्रस्‍तुत गाडीचा वॉरंटी पिरियड चालू आहे (संपलेला नाही) असे कागदपत्रांवरुन दिसून येते. परंतु तरीही वॉरंटी पिरीयडकडे दुर्लक्ष करुन सदर गाडीचे दुरुस्‍तीसाठी रक्‍कम प्रत्‍यक्ष भरलेखेरीज जाबदार क्र. 1 ने गाडीचे काम करणेस नकार दिला आहे व प्रत्‍येक कामाचे बील तक्रारदाराला देणे व तक्रारदाराकडून बिलाची रक्‍कम वसूल करणे यामुळे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा दिलेचे स्‍पष्‍ट होते.  सबब आम्‍ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थ दिले आहे.

7.  प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता, तक्रारदार यांनी त्‍याचे वाहन टाटा व्‍हीस्‍टा व्‍ही.एल.एक्‍स रजि. नं.एम.एच.11-बी.एच.112 मध्‍ये उत्‍पादन दोष (मॅन्‍युफॅक्‍चरींग डिफेक्‍ट) आहे हे सिधद करणेसाठी  योग्‍य त्‍या तज्ञ अंजिनियरचे अँफीडेव्‍हीट दाखल केले नाही तर जाबदार क्र. 3 यांचेकडील मेकॅनिकचे शपथपत्र दाखल केली आहेत.  प्रस्‍तुत शपथपत्रे नि.18 व 19 कडे दाखल आहेत.  मात्र या शपथपत्रावरुन सदर वाहनाचे गियर ऑईल, इंजिन ऑईल, ब्रेक ऑईल व कुलंट बरोबर असल्‍याची खात्री केलेचे दिसून येते.  तसेच वाहनामध्‍ये इतर दोष असलेचे आढळून येते.  परंतु मेकॅनिक हा तज्ञ इंजिनियर नाही.  तरीही गाडया दुरुस्‍त करणेचा जाबदार क्र. 3 यांचेकडील अनुभवावरुन सदर मेकॅनिक यांनी प्रस्‍तुत शपथपत्रे दाखल केली आहेत. मात्र तक्रारदाराने कोणत्‍याही अधिकृत दखलपात्र प्रयोगशाळेच्‍या अहवाल दाखल केलेला नाही

   तरीही जरी तक्रारदाराचे कथनानुसार प्रस्‍तुत वादातीत वाहनामध्‍ये उत्‍पादन दोष आहे हे गृहीत धरलेस तक्रारदाराचे मागणीप्रमाणे वाहनाच्‍या बदल्‍यात नवीन वाहन बदलून देणेचे प्रयोजन नाही किंवा सदर वाहनाचे पूर्ण किंमतीचा परतावा मागणी न्‍यायोचीत होणार नाही असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.  याकामी आम्‍ही पुढील न्‍यायनिवाडयांचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेत आहोत.

   1. जेटी.2006 (4) एस.सी.113 मारुती उद्योग लि.विरुध्‍द सुशिलकुमार गबगोत्रा मा. सुप्रीम कोर्ट यामध्‍ये मा. सुप्रीम कोर्टाने म्‍हटले आहे की, वॉरंटी दरम्‍यान जे उत्‍पादन दोष दूर करणे शक्‍य असेल अथवा दोषपूर्ण सुटे भाग बदलून असे दोष दूर करणे शक्‍य असेल अशापरिस्थितीत उत्‍पादकाकडून संपूर्ण मोटार बदलून देण्‍याची सक्‍ती अथवा पूर्ण किंमतीचा परतावा मागता येणार नाही.  त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारदार यांचे मागणीप्रमाणे जाबदार कडून नवीन वाहन तक्रारदार यांना बदलून देणे न्‍यायोचीत होणार नाही.  तसेच वाहनाची संपूर्ण्‍ रक्‍कमही देणे न्‍यायोचीत होणार नाही असे आम्‍हीस वाटते.

     सदर कामी आम्‍ही पुढील नमूद न्‍यायनिवाडयांचा आधार घेत आहोत.

Kamaljit Singh V/s. Broadway Auto Engineers Chandigarh S.C. D.R.C. 212

Head Note%  Manufacturing defect- vehicle was delivered to complainant in fully functional condition – No report of automobile expert/Mechanical engineers. Was produced on record by complainant, to prove that vehicle was found to be suffering from inherent manufacturing defects- Directions issued to rectify/ replaced defective parts- compensation for mental agony and harassment awarded.

8.       वर नमूद सर्व बाबींचा विचार करता प्रस्‍तुत तक्रार अर्जातील सदर वाहन हे वॉरंटी मुदतीत असलेने त्‍या वाहनाची योग्‍य ती दुरुस्‍ती करुन देणे न्‍यायोचीत होईल.  जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदाराचे वादातील वाहन आवश्‍यक ते पार्टस बदलून देवून योग्‍यरीतीने दुरुस्‍त करुन देणे न्‍यायोचीत होणार आहे.  तसेच प्रस्‍तुत दुरुस्‍तीचा खर्च जाबदार क्र. 2 कंपनीने करणे न्‍यायोचीत होणार आहे असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.    

9.    सबब आम्‍ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.    

                           -ः आदेश ः-

 

1.   तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2.   जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदाराचे वादतीत वाहन जरुर ते सर्व पार्ट बदलून   दुरुस्‍त करुन द्यावे.  प्रस्‍तुत दुरुस्‍तीसाठी येणारा सर्व खर्च जाबदार क्र. 2 कंपनीने करणेचा आहे.  तक्रारदारकडून कोणताही खर्चाचे बील घेवू नये.

3.   जाबदार क्र. 2 यांनी  तक्रारदार यांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम

     रु.50,000/-(रुपये पन्‍नास हजार फक्‍त) अदा करावेत तसेच व तक्रार

     अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्‍त) अदा

     करावेत.

4.  वरील सर्व आदेशाचे पालन जाबदार क्र. 1 व 2 यांनी आदेश पारीत

    तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे.

5.  आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत न केलेने तक्रारदाराला ग्राहक संरक्षण

    कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची  मुभा

    राहील.

6.   पस्‍तुत आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य द्याव्‍यात.

7.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

 

 ठिकाण- सातारा.

दि. 31-7-2015.

 

            (सौ.सुरेखा हजारे)   (श्री.श्रीकांत कुंभार)    (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या          सदस्‍य             अध्‍यक्षा

             जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.