जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 329/2008. प्रकरण दाखल तारीख - 13/10/2008 प्रकरण निकाल तारीख - 20/01/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. सोमनाथ पि. मुरलीधर मुरकूंदे वय, 24 वर्षे, धंदा, - शेती रा. विजय नगर, नांदेड. अर्जदार विरुध्द. प्रोप्रा. हॅलो पॉईट, द कॅम्प्लीट मोबाईल शॉपी गैरअर्जदार शॉप नंबर 7, विष्णू कॉम्ल्पेक्स आय.टी.आय.कॉर्नर, व्ही.आय.पी. रोड नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. एस.एन. हाके गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, पाटील, अध्यक्ष ) गैरअर्जदार मोबाईल शॉपी यांच्या सेवेच्या ञूटी बद्यल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात की, त्यांनी सहा महिन्यापूर्वी हॅलो पॉईट दि कंपलीट मोबाईल शॉपी येथून सोनी इरिक्सन जे-120 आय हा मोबाईल हॅडसेट रु.2000/- किंमतीस गैरअर्जदाराकडून खरेदी केला. मोबाईल हॅडसेट हा पाण्यात पडल्यानंतर दूरुस्तीसाठी गैरअर्जदार यांचेकडे दि.23.06.2008 रोजी दिला. तो हॅडसेट दूरुस्त करुन देतो असे सांगून ही दूरुस्त केला नाही व हॅडसेट परत मागितला असता तो त्यांचेकडून हरविला आहे व तया बददल सेंकड हॅड मोबाईल हॅडसेट घेऊन जा असे सांगितले. अर्जदाराने त्यांस इन्कार केला व त्यांचा हॅडसेट परत द्या असे सांगितले असता त्यांनी तो दिला नाही. म्हणून अर्जदाराची विनंती आहे की, त्यांचा मोबाईल हॅडसेट परत दयावा व मानसिक ञासापोटी रु.15,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे हजर झाले त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराने दि.26.06.2008 रोजी त्यांचा मोबाईल हॅडसेट पाण्यात बूडाल्यामूळे बंद झाला होता तो गैरअर्जदार यांचेकडे दिला आहे. त्यासाठी रु.300/- खर्च येईल असे त्यांनी म्हटले होते. हॅडसेट रिपेअर झाल्यानंतर पैसे देण्याचे अर्जदाराने मान्य केले आहे, परंतु प्रयत्न करुनही मोबाईल दूरुस्त होऊ शकला नाही. नंतर गैरअर्जदाराकडून हा हॅडसेट गहाळ झाला. अर्जदार त्यांची पूर्ण किंमत मागू लागला. वास्तविक पाहता हा मोबाईल हॅडसेट दूरुस्त होऊ शकत नाही व हयांची किंमत शून्य झालेली आहे तरी देखील त्यांचा हॅडसेट गहाळ झाल्यामूळे सेकंड हॅड मोबाईल नोकिया मॉडेल 2310 चालू स्थितीतला अर्जदार यांना दिला व त्यांचा वापर ते करीत आहेत. हा हॅडसेट देत असताना प्रशांत नरवाडे हा इसम हजर होता त्यामूळे गैरअर्जदाराने अनूचित प्रथेचा अवलंब केला नाही म्हणून त्यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदारांच्या सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी सोनी इरिक्सन जे 120 आय हा मोबाईल हॅडसेट रु.2,000/- दि.21.01.2008 रोजी विकत घेतला, त्या बददलचे कॅश मेमो बिल नंबर 4901 दाखल केलेले आहे. सहा महिन्यानंतर दि.23.06.2008 रोजी हा हॅडसेट गैरअर्जदार यांना दूरुस्तीसाठी दिल्याबददल पावती दाखल केली आहे. त्या बददल खर्च रु.300/- येईल असे त्यात म्हटले आहे. हा मोबाईल गैरअर्जदार यांचेकडून गहाळ झाल्याचे त्यांनी मान्य केले. मोबाईल हॅडसेट जर पाण्यामध्ये पडला असेल तर तो दूरुस्त होत नाही व वॉरंटीत येत नाही. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा हॅडसेट दूरुस्त करु म्हणून घेतला व त्यांस रु.300/- खर्च येईल असे सांगितले, तो दूरुस्त झाला नाही व गहाळ झाला. गैरअर्जदार आपल्या म्हणण्यात असे म्हणतात की, त्यांनी अर्जदार यांना सेंकडहॅड नोकिया या कंपनीचा मोबाईल दिला परंतु तो हॅडसेट मिळाल्याबददलची पावती गैरअर्जदार यांनी दाखल केलेली नाही. शिवाय ज्या प्रशांत नरवाडे यांचे समोर मोबाईल दिला असे त्यांनी म्हटले आहे त्यांची साक्ष किंवा शपथपञ गैरअर्जदारांनी दाखल केलेले नाही. म्हणून अर्जदाराचा जो मोबाईल घेतला तो त्यांना परत करण्यास हवा होता तो पूराव्या अभावी वापस केला असे सिध्द होऊ शकत नाही. अर्जदाराने मोबाईल हॅडसेट सहा महिने वापरला आहे व तो पाण्यात पडला आहे त्यामूळे त्यांची अर्धी किंमत देणे उचित होईल. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना मोबाईल हॅडसेट बददल रु.1,000/- नूकसान भरपाई म्हणून दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.500/- व दावा खर्च म्हणून रु,500/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जे.यु.पारवेकर लघूलेखक. |