::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या) (पारीत दिनांक :13/09/2019
1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 सह कलम 14 अन्वये प्रस्तूत तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार यांना काही घरगुती अडचणीमुळे हजर राहणे शक्य नसल्यामुळे त्यांनी त्यांचे सासरे श्री. सुभाष विठ्ठल कोडगिरे यांना सदरील प्रकरणाचे कामकाज पाहण्याकरता आममुख्त्यार म्हणून नियुक्त केलेले आहे. गैरअर्जदार ही शासकीय यंत्रणा आहे. गैरअर्जदार ग्राहकांना मनीऑर्डर, स्टॅम्प, रजिस्टर्ड पोस्ट, दैनिक व मासिक आवर्ती ठेवीच्या सेवा देते. अर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदाराकडे रु.4,50,000/- मासिक योजनेत गुंतवले होते, त्याचे खाते क्र. 3108851635 हा आहे. त्यांना या योजनेप्रमाणे रु. 3150/- दरमहा व्याजापोटी मिळत होते. सदर रक्कम संयुक्त बचत खाते क्र. 0289832462 यात जमा होत होती. अर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदाराकडे रिकरिंग डिपॉझिट खाते दिनांक 16.12.2015 रोजी उघडले होते. सदरील व्याजाची रक्कम रु.3150/- खाते क्र. 3123734302 या खात्यात डेबिट व क्रेडिट प्रमाणे जमा होणार होते. त्याप्रमाणे दिनांक 15.1.2016 पासून 13.8.2016 पर्यंत मासिक किस्त खात्यात जमा झाले परंतु त्यानंतर खात्यात दरमहा किस्त रक्कम जमा होणे बंद झाले. अर्जदार 1 यांनी गैरअर्जदाराकडे दिनांक 22.8.2017 रोजी बचत खात्यातील व्यवहाराबद्दल लेखी तक्रार दिली होती. अर्जदार क्र. 2 यांनी सुद्धा गैरअर्जदाराकडे रु. 4,50,000/- मासिक योजनेत गुंतवीले आहेत, त्याचा खाते क्र. 3240751527 हा आहे. अर्जदार क्र. 2 ला सुद्धा दरमहा रू.3,150/- व्याजाची रक्कम मिळणार होती. सदरील रक्कम संयुक्त बचत खाता क्र. 0289832462 यात जमा होत होती. अर्जदार क्र. 2 ने सुद्धा रिकरिंग डिपॉझिट खाते दिनांक 31.03.2016 काढले होते खाते क्र. 3241107446 आहे. सदरील व्याजाची रक्कम 3150/- सदर खात्यात आटोमॅटिक डेबिट व क्रेडिट प्रमाणे जमा होणार होती व त्याप्रमाणे खात्यात रक्कम जमा होत पण आहे पण अर्जदार क्र. 1 च्या नावाने असलेली रक्कम सुद्धा अर्जदार क्र. 2 च्या आरडी खाते क्र.3241107 445 मध्ये जमा होत आहे. अर्जदार क्र. 1 व 2 यांचे स्वतंत्र खाते आहे असे असताना गैरअर्जदाराच्या चुकीमुळे अर्जदार क्र. 1 ची व्याजाची रक्कम अर्जदार क्र. 2 च्या खात्यात जमा होत आहे जेव्हा की ती रक्कम अर्जदार क्र. 1 च्या खात्यात ठेवणे आवश्यक होते. अर्जदार क्र. 1 व 2 हे दोघेही नियमित आयकर रिटर्न भरतात परंतु आयकर रिटर्न दाखल करताना अडचण निर्माण होत आहे. अर्जदाराची कोणतीही चूक नसताना त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. उपरोक्त गैरअर्जदाराच्या अनुचित व्यापार पद्धतीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. अर्जदाराने दिनांक 3.2.18 रोजी त्यांचे वकिलामार्फत रजिस्टर्ड पोस्टाने अर्जदार गैरअर्जदाराला नोटीस पाठवून खात्यात जमा होणारी रक्कम अर्जदार क्र. 1 च्या खात्यात जमा करण्याची विनंती केली परंतु नोटीस प्राप्त होऊन सुद्धा गैरअर्जदाराने त्याचे उत्तर दिले नाही सबब सदर प्रस्तूत तक्रार गैरअर्जदारा विरुद्ध दाखल केलेली आहे.
अर्जदाराची मागणी अशी आहे कि गैरअर्जदाराने अर्जदाराला न्यूनता पूर्ण सेवा दिली आहे असे घोषित करावे. गैरअर्जदाराने अर्जदार क्र. 1 व 2 एमआयएस बचत खाते व आरडी खाते अनुक्रमे क्र. 313734302 व क्र. 3241107446 चे व्यवहार सुरळीत व व्यवस्थित करून द्यावे असा आदेश द्यावा तसेच अर्जदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल 15,000 तसेच गैरअर्जदाराने केसचा खर्च रु.15000/- अर्जदाराला द्यावा.
2. अर्जदाराची तक्रार दाखल करून गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आले.
गैरअर्जदाराने अर्जदाराचे तक्रारीतील म्हणणे खोडून काढीत पुढे नमूद केले कि अर्जदाराने रु. 4,50,000 मिळण्याकरता मासीक उत्पन्न योजनेअंतर्गत प्रत्येकी 1 प्रमाणे एकूण 2 खाते उघडले होते व त्याप्रमाणे त्यांना प्रत्येकी रु. 3150/- प्रत्येकी भरणे आवश्यक होते. सदर दोन्ही खात्यातील रक्कम आटोमॅटिक डेबिट-क्रेडिट प्रमाणे कपात होणार तसेच त्यांच्या खात्यातील रक्कम पुरेशी उपलब्ध नसल्यास ऑटोमॅटिक कपात होणार नाही व त्यांचे खाते बंद पडेल याबाबत माहिती वजा सूचना अर्जदाराला दिलेल्या होत्या. परंतु अर्जदारांची एका खात्यात दर महिन्यात होणा-या कपातीसाठी पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याने थांबली होती आणि त्यासंबंधाने आपली महिन्याची कपात नियमित होत आहे किंवा नाही याबद्दल अर्जदाराने माहिती घेणे आवश्यक होते. पोस्ट ऑफिस सेविंग बँक मॅन्युअल व्हॉल्युम नंबर 1 चे नियम 109 प्रमाणे पूर्तता करणे आवश्यक होते. अर्जदारांना दोन्ही बचत खाते संयुक्त बचत खाते होते व त्या बचत खात्यांचा दोन्ही अर्जदारांना मुक्तपणे वापर करण्याचा अधिकार होता आणि त्यांच्या बचत खात्यातून आवर्ती खात्यात जमा होणारी रक्कम ही वळती होणार होती. सदर एका खात्यातील कपात बंद झाल्याचा अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदाराच्या कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदाराने त्यांच्या अर्जातील मागणीची पूर्तता करण्याकरता त्यांचा अर्ज फायनान्शिअल सॉफ्टवेअर यांच्याकडे आवश्यक सुधारणा करून खाते पुर्ववत करण्याकरता पाठवला होता, परंतु सदर फायनान्शिअल सॉफ्टवेअर हे स्वयंचलित संगणक असल्याने सदर सॉफ्टवेअर कंपनीने चूक सुधारून दिली नाही. त्यामुळे सदर वाद हा तांत्रिक अडचणीमुळे झालेला आहे. त्यामुळे दोन्ही अर्जदारांच्या संयुक्त खात्यातून अर्जदाराच्या रकमेची कपात झाली असल्याने त्याचे दुसरे आवर्त खाते बंद झाले. सदरहू कार्य अर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे झालेले आहे. त्याकरता गैरअर्जदाराने कोणतेही गैरकृत्य सेवा दिली नाही. सोफ्टवेअर हे इन्फोसिस द्वारे बनवलेले असून त्यांच्याकडून देखभाल केली जाते आणि नियम 109 प्रमाणे खात्यात रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने अर्जदाराने आपल्या खात्यामध्ये कमीत कमी रक्कम ठेवली नाही त्यामुळे अर्जदार क्र. 2 चे आवर्त खाते निष्क्रिय झालेले आहे. अर्जदाराने तक्रारीत मागणी केलेली आहे ती मर्यादेच्या पलीकडे असल्यामुळे ती मागणी पूर्ण होणे शक्य नाही कारण नियमाप्रमाणे गैरअर्जदाराच्या हातात आता काहीच राहिलेले नाही तसेच गैरअर्जदाराने अर्जदारांची मागणी दुरुस्त करण्याच्या उद्देशाने संगणकच्या संबंधित विभागाला अर्ज पाठवला होता परंतु त्यांनी सुद्धा सदर चूक सुधरता येणार नाही असे सांगितले व ही माहिती अर्जदाराने गैर अर्जदाराला वेळोवेळी सांगितले आहे.तसेच अर्जदाराने योग्य गैरअर्जदार पक्षकार जोडलेला नाही असे दिसून येते. अर्जदार हे अर्जदाराचे ग्राहक आहे परंतु गैरअर्जदाराने अर्जदारास सोबत कोणत्याही प्रकारची न्यूनतापूर्ण सेवा दिली नाहीण् अर्जदाराने सदर व केस खोट्या व बनावट दस्तऐवजाच्या आधारे व स्वतःच्या हाताने चूक होऊन सुद्धा गैरअर्जदार यांना दोषी ठरवून स्वतःचा फायदा करण्याच्या उद्देशाने दाखल केलेली आहे.सबब सदर तक्रार खर्चासह खारीज करावी ही विनंती.
३ . तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार . यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प यांचे तोंडी युक्तिवादावरून प्रकरणातील विवादीत मुद्याबाबत मंचाची कारणमिमांसा व निष्कर्ष खालीलप्रमाणे
कारण मिमांसा
अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेल्या दस्तएवजाचे अवलोकन केले असता असे निर्देषनास येत आहे कि, अर्जदार क्र. १ ह्यांनी गैरअर्जदाराकडे दि. १६.१२.२०१५ रोजी काढलेले असून अर्जदार क्र. २ ह्यांनी दि. ३१.३.२०१६ रोजी आवर्त खाते काढलेले आहे. बचत खात्यातून आवर्ती खात्यात जमा होणारी रक्कम हि प्रत्येक महिन्यात आपोपाप दोनदा जमा होणार होती परंतु जेव्हा अर्जदार क्र. १ हिने रिकारिग खाते १६.१२.१५ रोजी उघडले तेव्हा पासून तिच्या खात्यात दि १३.०८.१६ पर्यंत ३१५०/- नियमित जमा होत होते परंतु त्यानंतर सदर खात्यात हि रक्कम जमा होणे बंद झाले हि बाब दस्त ऐवजावरून स्पष्ट होते परंतु अर्जदार क्र. 1.नी ज्या दिवशी रक्कम खात्यात जमा होणे बंद झाले,त्यादिवशी गैरअर्जदाराकडे तक्रार न करता आरडी खाते नियमित करण्याच्या सूचना १ वर्षा नंतर गैरअर्जदाराला दिल्या, परंतु या दरम्यान अर्जदार क्र. १ चे खाते निष्क्रिय झाल्यमुळे गैरअर्जदार ह्यांनी सदर रक्कम रु.3150/- अर्जदार क्र. 2 च्या खात्यात ऑटोमॅटीक क्रेडीट प्रमाणे जमा केली, हि बाब अर्जदाराला माहिती असून ती त्यांनी शपथपत्रात व युक्तीवादात कबुल केलेली आहे. तक्रारीत दाखल दस्तावेजांवरून उपरोक्त बाब स्पष्ट होत आहे. त्यामुळे गैरअर्जदारामुळे अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाले हि बाब मान्य नाही. तसेच अर्जदार क्र. १ ला रक्कम तिच्या खात्यात जमा होत नाही हि बाब माहित असून सुद्धा जवळपास १ वर्षानंतर लेखी तक्रार गैरअर्जदाराकडे दिली. त्यामुळे अर्जदाराचे खाते संगणकीयप्रणालीमध्ये सुधारित करणे शक्य झाले नाही, हे अर्जदाराला गैरअर्जदाराने कळविले होते सबब गैरअर्जदाराने अर्जदाराला कोणतीही सेवेत न्यूनता दिलेली नाही हि बाब सिद्ध झाल्यामुळे मंच खालील आदेश पारित करीत आहे .
अंतिम आदेश
1) अर्जदाराची तक्रार क्र. 126/2018 खारीज करण्यात येत आहे.
2) उभय पक्षांनी आप आपला तक्रारखर्च सोसावा.
3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष