Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/17/6

Shri Gajanan Tikaram Bakade - Complainant(s)

Versus

Head of Department Vodafone Mobile Service Limited & Other - Opp.Party(s)

Shri S S Dorle , A C Ghutke

13 Nov 2017

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/17/6
 
1. Shri Gajanan Tikaram Bakade
R/o B-147 UTKARSHA NAGAR NTPC COLONY KUMBHARI MOUDA -441104
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Head of Department Vodafone Mobile Service Limited & Other
Circle Head Office Maharashtra Goa Metropolition FP No. 27 Survey No. 21 Old Pune Mumbai Highway Wakadewadi Shivaji Nagar Pune 411003
pune
Maharashtra
2. Prachi Sahasrabudhe ,Vodafone Cellular Limited
Nexus Point 2 nd Floor Opp. Vidhan Bhavan Nesxt to Nagpur Municipal corporation, Civil Line Nagpur - 44001
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 13 Nov 2017
Final Order / Judgement

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा-सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्‍या.)

(पारीत दिनांक 13 नोव्‍हेंबर, 2017)

01.  तक्रारकर्त्‍याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्‍दपक्षा विरुध्‍द दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे कारणा वरुन नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी अतिरिक्‍त ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.

 

02.   तक्रारकर्त्‍याचे तक्रारी नुसार संक्षीप्‍त कथन पुढील प्रमाणे-

      यातील विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनी मोबाईल संबधी व्‍यवसाय करते. तक्रारकर्त्‍या कडे पूर्वी भारत संचार निगम यांची मोबाईल क्रं-8275045442 आणि क्रं-9422175442 वर सेवा होती आणि सदर दोन्‍ही मोबाईल संबधाने एकच लेखा क्रं-657306901 होता. विरुध्‍दपक्ष वोडाफोर कंपनीचे प्रतिनिधी     श्री रुपेश यांनी तक्रारकर्त्‍याशी मार्च-2016 मध्‍ये संपर्क साधला व हेच मोबाईल क्रमांक वोडाफोन कंपनीव्‍दारे कायम ठेवून (Portability) भारत संचार निगम पेक्षा चांगली कनेक्‍टीव्‍हीटी सेवा देण्‍याचे आश्‍वासन दिले आणि सदर दोन्‍ही मोबाईल क्रमांकावर वोडाफोन कंपनीची सेवा घेतली परंतु त्‍यानंतर कनेक्‍टीव्‍हीटीची समस्‍या जाणवू लागल्‍याने विरुध्‍दपक्ष कंपनीचे प्रतिनिधी                   श्री रुपेश  यांना सुचित केले असता त्‍यांनी प्राचि सहस्‍त्रबुध्‍दे, सर्व्‍हीस मॅनेजर, वोडाफोन कंपनी यांचेशी संपर्क साधण्‍यास सांगितले, 20 दिवसा पर्यंत प्रतिसाद न मिळाल्‍याने तक्रारकर्त्‍याने  दिनांक-27.04.2016 रोजी प्राचि सहस्‍त्रबुध्‍दे यांचे कडे ईमेल व्‍दारे तक्रार केली असता, प्राचि सहस्‍त्रबुध्‍दे यांनी दोन्‍ही मोबाईलचे एकच लेखा खाते करण्‍याचे आश्‍वासन ई-मेलव्‍दारे त्‍याच दिवशी दिले. त्‍यानंतर प्राचि सहस्‍त्रबुध्‍दे यांनी दिनांक-28.04.2016 व 29.04.2016 रोजी ई मेल व्‍दारे सुचित केले की, मोबाईल क्रं-9422175442 हा Clubbed with मोबाईल क्रं-8275045442 शी करण्‍यात आला अणि दोन्‍ही मोबाईलचे एकच बिल मिळेल. परंतु मोबाईल कनेक्‍टीव्‍हीटीची समस्‍या दुर झालेली नव्‍हती परंतु दिनांक-03/05/2016 पासून IVRS Message प्रमाणे तक्रारकर्त्‍याने या मोबाईल क्रमांकाची पूर्वीची थकबाकी भरलेली नाही, ती भरण्‍यात यावी असे सुचित करण्‍यात आले आणि अशी थकबाकी न भरल्‍यास मोबाईल क्रं-8275045442 ची सेवा खंडीत करण्‍यात येईल. सदर IVRS Message ऐकण्‍यास प्रत्‍येक वेळी 40 सेकंद लागत होते आणि त्‍यानंतर दुस-या व्‍यक्‍तीला फोन कनेक्‍ट होत होता. तक्रारकर्ता हा एन.टी.पी.सी. मौदा येथे उपव्‍यवस्‍थापक म्‍हणून मेकॅनिकल विभागात कार्यरत असून त्‍याला त्‍याचे कर्तव्‍याचे ठिकाणी दररोज 80 ते 100 फोन कॉल्‍स करावे लागतात. सदर IVRS Message मुळे त्‍याला रोज त्रास होत होता. एक आठवडया नंतर त्‍याने वोडाफोन टोल फ्री क्रमांक-199 वर संपर्क साधला असत त्‍यांनी मौदा येथील वोडाफोन सेंटरवर संपर्क साधण्‍यास सुचित केले, त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने मौदा येथील वोडाफोन सेंटरवर संपर्क साधून इन्‍व्‍हाईस आणि भारत संचार निगम कंपनी कडे बिलाचे पेमेंट केल्‍या बद्दल पावत्‍यांच्‍या प्रती दाखल केल्‍यात परंतु तेथील सेंटरवरील व्‍यक्‍तीने मॅनेजर नसल्‍याने नंतर येण्‍यास सांगितले, सदर व्‍यक्‍तीची वागणूक ही सौजन्‍यपूर्वक नव्‍हती. तक्रारकर्ता हा उपव्‍यवस्‍थापक या पदावर कार्यरत असल्‍याने त्‍याला कर्तव्‍याचे ठिकाण सोडून जाणे अडचणीचे आहे. तक्रारकर्त्‍याने संपूर्ण बाब विरुध्‍दपक्ष कंपनीचे प्राचि सहस्‍त्रबुध्‍दे यांना दिनांक-11/05/2016 रोजीचे ई मेल व्‍दारे सुचित केली तसेच मार्च-2016 व एप्रिल-2016 महिन्‍याचे इन्‍व्‍हाईस आणि बिलांचे पेमेंट केल्‍या बद्दल पावत्‍यांच्‍या प्रती सुध्‍दा त्‍याच दिवशी पाठविल्‍यात तसेच त्‍याने भारत संचार निगम लिमिटेड यांचे फायनल इन्‍व्‍हाईस प्रमाणे रुपये-1130/- चे पेमेंट केल्‍याचे कळविले. विरुध्‍दपक्ष कंपनीने त्‍याच दिवशी दिनांक-11.05.2016 रोजीचे ईमेल व्‍दारे त्‍याला सुचित केले की, त्‍याचे कडे अद्दापही भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचे रुपये-1919/- एवढया रकमेचे बिल प्रलंबित आहे, याचे उत्‍तरात तक्रारकर्त्‍याने रुपये-1130/- चे पेमेंट केल्‍याचे कळवून बिलाची प्रत सुध्‍दा पाठविली तसेच भारत संचार निगम कंपनीचा फोन क्रमांक देण्‍याची विनंती केली. त्‍यानंतर प्रतिसाद मिळाला नसल्‍याने तक्रारकर्त्‍याने दिनांक-17.05.2016 रोजी ई मेल पाठवून कनेक्‍टीव्‍हीटी मिळत नसल्‍या बद्दल तसेच IVRS Message बद्दल तक्रार नोंदविली. विरुध्‍दपक्षा तर्फे दिलेल्‍या सुचने प्रमाणे तक्रारकर्त्‍याने मोबाईल स्विच ऑफ करुन पुन्‍हा चालू करुन पाहिला परंतु तरीही IVRS Message (Interactive Voice Response System) येणे सुरुच होते, त्‍यामुळे पुन्‍हा दिनांक-20.05.2016 रोजी ईमेल व्‍दारे तक्रारकर्त्‍याने सुचित केले. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष कंपनी तर्फे तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईल क्रमांक-8275045442 वरील Out going सेवा बंद केली परंतु त्‍या नंतरही दिनांक-04.05.2016 रोजी ई मेल पाठवून सुध्‍दा मोबाईल क्रमांक- 8275045442 ची सेवा पुन्‍हा सुरु केली नाही. तीन महिने वाट पाहिल्‍या नंतर तक्रारकर्त्‍याने मोबाईल क्रमांक- 8275045442 ची सेवा पुन्‍हा सुरु करण्‍यास विनंती केली परंतु विरुध्‍दपक्ष कंपनीने दिनांक-19.07.2016 रोजीचे ई-मेल व्‍दारे सुचित केले की, सदरचा मोबाईल क्रमांक हा संपूर्णपणे Inactive केलेला आहे. परंतु विरुध्‍दपक्ष कंपनीने मोबाईल क्रं--9422175442  ची डिमांड पाठविणे सुरुच ठेवले. प्रथम डिमांड ही दिनांक-19.07.2016 रोजी रुपये-314/- ची पाठविली. त्‍यानंतर दिनांक-16.08.2016 रेजी दुसरी डिमांडनोट रुपये-1451/- ची पाठविली तर तिसरी डिमांडनोट दिनांक-31.08.2016 रोजी रुपये-862/- ची पाठविली. सदर डिमांड नोटची रक्‍कम कधी कमी व कधी जास्‍त करण्‍यात आल्‍याचे दिसते. विरुध्‍दपक्ष कंपनीने बिलाचे विस्‍तृत विवरण कधीच पाठविले नाही. विरुध्‍दपक्षाने असे सुचित केले की, दोन्‍ही मोबाईल क्रमांकाचे एकच बिल पाठविण्‍यात येत आहे. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष कंपनीने दोन्‍ही मोबाईल क्रमांकाची सेवा खंडीत केली आणि थकीत बिलाची मागणी करणे सुरुच ठेवले. मोबाईल क्रमांक-8275045442 ची सेवा खंडीत केल्‍यामुळे त्‍याला समुद्रपूर, जिल्‍हा वर्धा येथील भूखंड विक्री करण्‍यात अडचणी आल्‍यात कारण त्‍या ठिकाणी लावलेल्‍या बोर्डवर त्‍याने सदर मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्‍यास सुचित केले होते परंतु सदर मोबाईलची सेवा बंद असल्‍याने खरेदीदार यांना संपर्क साधणे कठीण झाले. तसेच तक्रारकर्त्‍याला आयकर विवरणा संबधीची कामे करण्‍यास अडचणी निर्माण झाल्‍यात. विरुध्‍दपक्ष कंपनीने दिलेल्‍या दोषपूर्ण सेवेमुळे झालेल्‍या आर्थिक त्रासा बद्दल तो  रुपये-10,00,000/- नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे, त्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍याने दिनांक-14.09.2016 रोजी कायदेशीर नोटीस विरुध्‍दपक्षास पाठविली परंतु सदर नोटीसला  विरुध्‍दपक्षा तर्फे योग्‍य उत्‍तर देण्‍यात आले नाही तसेच नुकसान भरपाई दाखल कोणतीही रक्‍कम देण्‍यात आली नाही.  

     

       म्‍हणून शेवटी तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचात दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा विरुध्‍द खालील मागण्‍या केल्‍यात-

(1)     विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचे झालेल्‍या आर्थिक हानी संबधाने रुपये-10,00,000/- नुकसान भरपाई देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(2)     या शिवाय तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- तसेच तक्रारीचा खर्च विरुध्‍दपक्षाने देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(3)    दिवाणी प्रक्रिया संहिते मधील तरतुदी प्रमाणे विरुध्‍दपक्षा विरुध्‍द चौकशी सुरु करण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(04)    या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्त्‍याचे बाजूने देण्‍यात यावी.

 

 

03.    विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनी तर्फे उपस्थित होऊन लेखी उत्‍तर दाखल करण्‍यात आले. विरुध्‍दपक्षाचे उत्‍तरा नुसार प्राथमिक आक्षेप घेण्‍यात आला की, तक्रारकर्ता हा स्‍वच्‍छ हाताने ग्राहक मंचा समक्ष आलेला नाही आणि त्‍याने खोटी तक्रार दाखल करुन नुकसान भरपाई मागण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनी ही ख्‍यातीप्राप्‍त कंपनी असून तिचा नावलौकीक आहे. तक्रारकर्त्‍याने भारत संचार निगम लिमिटेड यांना प्रतिपक्ष केलेले नाही, त्‍यामुळे सुध्‍दा योग्‍य त्‍या प्रतिपक्षाचे अभावी तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्त्‍याने भारत संचार निगम लिमिटेड यांचे कडून भ्रमणध्‍वनीची सेवा घेतलेली होती, भ्रमणध्‍वनीधारका कडे नविन मोबाईल कंपनीची सेवा घेण्‍यापूर्वी पूर्वीच्‍या कंपनीची कोणतीही थकबाकी नाही असे अंडरटेकींग द्दावे लागते. नविन कनेक्‍शन चलीत (Activate) होण्‍यास 07 दिवसांचा अवधी लागतो तसेच व्‍हेरिफीकेशन हे TRAI  (Telecom Regulating Authority of India) यांनी घालून दिलेल्‍या मार्गदर्शक सुचनां प्रमाणे करावे लागते. जुन्‍या कंपनीचा ग्राहक असल्‍यावर सुध्‍दा त्‍याने नविन कंपनीची सेवा घेतल्‍या वर तो नविन ग्राहक म्‍हणूनच धरल्‍या जातो. या प्रकरणात तक्रारकर्त्‍याने चुकीचे स्‍टेटमेंट केले की, त्‍याचे कडे भारत संचार निगम लिमिटेड कंपनीची कोणते‍ही बिल थकीत नाही. विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनी तर्फे Ported Numbers चे  Activation केले असता पूर्वीच्‍या भारत संचार निगम लिमिटेड कंपनी तर्फे असा संदेश आला की, तक्रारकर्त्‍या कडे अद्दापही बिलापोटी रुपये-1919/- एवढी रक्‍कम प्रलंबित आहे. अशाप्रकारची Service Request ही  National Porting Gateway (NPG) कडून आल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष कंपनीने  प्रथम, दहावा आणि चौदाव्‍या दिवशी एस.एम.एस.व्‍दारे तक्रारकर्त्‍याला कळविले की, पूर्वीच्‍या भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचे बिलाचे पेमेंट केले असल्‍यास पेमेंट केल्‍याच्‍या पावत्‍या वोडाफोन स्‍टोअर्स कडे सादर कराव्‍यात. परंतु तक्रारकर्त्‍याने पूर्वीचे भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचे बिलाचे पेमेंट केल्‍याच्‍या पावत्‍या सादर न केल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनीला तक्रारकर्त्‍याचे मोबाईलची Out going सेवा             15 व्‍या दिवशी बंद करणे भाग पाडले आणि त्‍याला पुन्‍हा 17 व्‍या आणि             19 व्‍या दिवशी स्‍मरण (Reminders)पाठविले की-‘Request payment proof of your bill with your previous operator by DD/MM without which your SIM will be disconnected & cannot be re-activated as per Regulation IC/OG barring applied from CRM on 21st Day 00:00 Hrs.’

     विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, TRAI  (Telecom Regulating Authority of India) यांनी घालून दिलेल्‍या मार्गदर्शक (Guidelines) सुचनां प्रमाणे पोर्टींग केलेल्‍या मोबाईल क्रमांकाची सेवा ही 29 व्‍या दिवसा पर्यंतच पुर्नचलीत (Reactivated) करता येऊ शकते, या मुदतीच्‍या आत तक्रारकर्त्‍याने त्‍याचे कडे पूर्वीची सेवा असलेल्‍या भारत संचार निमग लिमिटेड यांचे पेमेंट भरल्‍या बाबत पावत्‍या दाखल करणे आवश्‍यक होते. ही सर्व प्रक्रिया संगणकीय आहे, ज्‍यामध्‍ये मानवि हस्‍तक्षेपास वाव नाही, उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे पुर्तता न केल्‍यास 30 व्‍या दिवशी मोबाईल क्रमांकाची सेवा आपोआप खंडीत होते आणि एकदा सेवा खंडीत झाली तर नंतरची कंपनी म्‍हणजे विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनी ही ती सेवा पुन्‍हा सुरु करु शकत नाही त्‍यामुळे पूर्वीची कंपनी भारत संचार निगम लिमिटेड यांचेकडे ते कनेक्‍शन पुन्‍हा येते. सदरचे प्रकरणात सुध्‍दा पूर्वीचे भारत संचार निगम लिमिटेड यांचेकडे ते कनेक्‍शन पुन्‍हा 60 दिवसात परत झालेले आहे. तक्रारकर्त्‍या कडून फक्‍त ईमेल शिवाय कोणताही प्रतिसाद मिळला नसल्‍यामुळे त्‍याचे पूर्वीचे भारत संचार निगम लिमिटेड यांचे कडून घेतलेल्‍या भ्रमणध्‍वनी क्रं-9422175442 ची सेवा विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनी कडून बंद झालेली आहे. तक्रारकर्त्‍याने ही बाब मान्‍य केली आहे की, त्‍याचे कडील भारत संचार निगम कडील कनेक्‍शन सेवा चालू आहे, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनीने दोषपूर्ण सेवा दिल्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही.  विरुध्‍दपक्ष कंपनीने एस.एम.एस.व्‍दारे तक्रारकर्त्‍याला सुचित केले होते की, पूर्वीचे भारत संचार निगम लिमिटेड यांचे रुपये-1919/- चे बिल त्‍याचेकडे प्रलंबित असल्‍याने पेमेंट केले असल्‍यास वोडाफोन स्‍टोअर्स कडे पावती दाखल करावी परंतु वोडाफोन स्‍टोअर्सला भेट न देता तक्रारकर्त्‍याने ई मेल पाठवून रुपये-1130/- चे बिलाची प्रत पाठविली. तक्रारकर्त्‍याने या संदर्भात केलेला खुलासेवार ई मेल भारत संचार निगम लिमिटेड यांनी स्विकृत केला नाही. तक्रारकर्त्‍याला पुन्‍हा दुस-यांदा स्‍मरणपत्र पाठविण्‍यात आले  तसेच IVRS Message (Interactive Voice Response System)  सुध्‍दा पाठविण्‍यात आले. परंतु तक्रारकर्त्‍याने त्‍याचेकडे पूर्वीचे भारत संचार निगम लिमिटेड कंपनीची कोणतीही थकबाकी नसल्‍या बद्दल नो-डयू प्रमाणपत्राची प्रत दाखल केली नाही. त्‍यानंतरही दिनांक-20/05/2016 रोजी थकबाकी रुपये-1919/- संबधाने बिल भरले असल्‍यास ते पाठविण्‍यास सुचित करण्‍यात आले,परंतु पुर्तता न केल्‍याने तक्रारकर्त्‍या कडील क्रमांक-8275045442 ची Out going सेवा दिनांक-04.06.2016 रोजी बंद केली. तत्‍पूर्वी तक्रारकर्त्‍याचे पूर्वीचे भारत संचार निगम कंपनी लिमिटेडचे बिल रुपये-1919/- प्रलंबित असल्‍या बद्दल भारत संचार निगम कंपनी कडून खात्री केल्‍या नंतर दिनांक-30.04.2016 रोजी त्‍याला एस.एम.एस. पाठवून बिलाचे पेमेंट केले असल्‍यास त्‍याची पावती वोडाफोन स्‍टोअर्स मध्‍ये दाखल करण्‍यास सुचित केले तसेच काही अडचण आल्‍यास फोन क्रं 199 वर संपर्क साधण्‍यास सुचित केले होते परंतु तक्रारकर्त्‍याने  वोडाफोन स्‍टोअर्स मध्‍ये भेट न देता दिनांक-11/05/2016 रोजी ई मेल व्‍दारे प्रलंबित बिल रुपये-1919/- ऐवजी रुपये-1130/- भरल्‍या बाबतची पावती जोडली, सदर बाब तक्रारकर्त्‍यास सुचित केली असता त्‍याने त्‍याच दिवशी खुलासेवार ई मेल पाठविला परंतु भारत संचार निगम कंपनी तर्फे तो अस्विकार करण्‍यात आला. त्‍यानंतर त्‍याच दिवशी दुसरे स्‍मरण म्‍हणून एस.एम.एस. पाठविण्‍यात आला परंतु तक्रारकर्त्‍याने भारत संचार निगम कंपनीचे ना-देय-प्रमाणपत्राची पुर्तता केली नसल्‍याने  दिनांक-17.05.2016 रोजी IVRS Message व्‍दारे त्‍याला सुचित करण्‍यात आले. त्‍यानंतरही भारत संचार निगम कंपनी कडून बिल रुपये-1919/- संबधाने क्‍लेम करण्‍यात आला, त्‍यामुळे पुन्‍हा संदेश पाठवून तक्रारकर्त्‍याला वोडाफोन स्‍टोअर्स मध्‍ये पेमेंट पावती दाखल करण्‍यास सुचित केले परंतु तक्रारकर्त्‍या कडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्‍यामुळे दिनांक-04/06/2016 रोजी तक्रारकर्त्‍याचे मोबाईल क्रमांक-8275045442 ची Outgoing सेवा खंडीत करण्‍यात आली, त्‍याच दिवशी तक्रारकर्त्‍या कडून कोणतीही पुर्तता न करता मेल पाठवून सदर क्रमांकाची सेवा चालू करण्‍यास विनंती करण्‍यात आली. दिनांक-19.07.2016 रोजी तक्रारकर्त्‍याला सुचित करण्‍यात आले की, सदर क्रमाकांची सेवा पुन्‍हा सुरु (Activate) होऊ शकत नाही व तसे भारत संचार निगम यांना सुचित केले. दिनांक-14/07/2016 रोजी तक्रारकर्त्‍या कडे वोडाफोन क्र-9422175442 संबधाने रुपये-314/- एवढया थकीत रकमेची डिमांड नोटीस पाठविण्‍यात आली. दिनांक-16.08.2016 रोजी तक्रारकर्त्‍या कडे वोडाफोन क्र-8275045442 संबधाने रुपये-258/- एवढया थकीत रकमेची डिमांड नोटीस पाठविण्‍यात आली. दिनांक-16/08/2016 रोजी तक्रारकर्त्‍या कडील मोबाईल क्रं-9422175442 ची सेवा भारत संचार निगम आणि वोडफोन यांचे कडील थकीत रक्‍कम न भरल्‍याचे कारणा वरुन खंडीत करण्‍यात आली.  त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने वकीला मार्फतीने दिनांक-14.09.2016 रोजी नोटीस पाठविली, ज्‍याचे उत्‍तर विरुध्‍दपक्षाने दिनांक-28/10/2016 रोजी दिले.

       विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, या सर्व प्रकारात त्‍यांची कोणतीही चुक नाही कारण पूर्वीचे भारत संचार निगम कंपनी लिमिटेड यांचे कडून तक्रारकर्त्‍याने घेतलेल्‍या सेवे संबधाने पेमेंटची अद्दायावत स्थिती भारत संचार निगम लिमिटेड यांनी केली नाही आणि तक्रारकर्त्‍याने भारत संचार निगम लिमिटेड यांचे कडून दाद मागणे आवश्‍यक होते. भारत संचार निगम यांनी तक्रारकर्त्‍याने पेमेंट केल्‍या बद्दल Conformation दिले नाही. तक्रारकर्त्‍याने नोडल ऑफीसर कडे न जाता सरळ सरळ ही तक्रार ग्राहक मंचा कडे दाखल केली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षा विरुध्‍द केलेली अन्‍य सर्व विपरीत विधाने नाकबुल केलीत.  विरुध्‍दपक्षाचे वोडाफोन स्‍टोअर्स हे रात्री 8.00 पर्यंत उघडे असते. तक्रारकर्त्‍याने पेमेंट संबधाने दाखल केलेली पावती आणि भारत संचार निगम यांचे कडून केलेली डिमांड यातील रकमां मध्‍ये फरक होता.

     तक्रारकर्त्‍याने पूर्वीचे भारत संचार निगम लिमिटेड यांचे पेमेंट संबधाने स्‍वतः योग्‍य ती पाऊले उचलली असती तर हा प्रकार घडला नसता, या सर्व प्रकारा मध्‍ये तक्रारकर्ता हा स्‍वतःच जबाबदार आहे, सबब विरुध्‍दपक्षा विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍याची विनंती करण्‍यात आली.

 

04.  उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याची तक्रार, प्रतिज्ञालेख, तक्रारी वरील विरुध्‍दपक्षाचे लेखी उत्‍तर उभय पक्षांतर्फे दाखल दाखल   दस्‍तऐवजांचे तसेच तक्रारकर्त्‍याचे लेखी युक्‍तीवादाचे अवलोकन करण्‍यात आले, यावरुन अतिरिक्‍त ग्राहक मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे-

                                                                          :: निष्‍कर्ष ::

 

05.   या प्रकरणात विवाद निर्माण होण्‍याचे मुख्‍य कारण असे आहे की, तक्रारकर्त्‍याने पूर्वी भारत संचार निगम लिमिटेड यांचे कडून भ्रमणध्‍वनीची सेवा घेतली होती आणि पुढे तेच भ्रमणध्‍वनी क्रमांक कायम ठेऊन विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनीची सेवा घेतली. परंतु अशी सेवा घेण्‍यापूर्वी TRAI  (Telecom Regulating Authority of India) यांनी घालून दिलेल्‍या मार्गदर्शक तत्‍वा प्रमाणे पूर्वी ज्‍या कंपनी कडून सेवा घेतली त्‍यांचे बिलाचे पेमेंट थकीत राहणार नाही.

 

06.   विरुध्‍दपक्षाचे उत्‍तरा प्रमाणे TRAI  (Telecom Regulating Authority of India) यांनी घालून दिलेल्‍या मार्गदर्शक (Gudelines) सुचनां प्रमाणे पोर्टींग केलेल्‍या मोबाईल क्रमांकाची सेवा ही 29 व्‍या दिवसा पर्यंतच पुर्नचलीत (Reactivated) करता येऊ शकते, या मुदतीच्‍या आत संबधित मोबाईल कनेक्‍शनधारकाने म्‍हणजे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे कडे पूर्वीची सेवा असलेल्‍या भारत संचार निगम लिमिटेड यांचे पेमेंट भरल्‍या बाबत पावत्‍या दाखल करणे आवश्‍यक होते. ही सर्व प्रक्रिया संगणकीय आहे, उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे पुर्तता न केल्‍यास 30 व्‍या दिवशी मोबाईल क्रमांकाची सेवा आपोआप खंडीत होते आणि एकदा सेवा खंडीत झाली तर नंतरची कंपनी म्‍हणजे विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनी ही ती सेवा पुन्‍हा सुरु करु शकत नाही त्‍यामुळे पूर्वीची कंपनी भारत संचार निगम लिमिटेड यांचेकडे ते कनेक्‍शन पुन्‍हा येते. सदरचे प्रकरणात सुध्‍दा पूर्वीचे भारत संचार निगम लिमिटेड यांचेकडे ते कनेक्‍शन पुन्‍हा 60 दिवसात परत झालेले आहे

 

07.  विरुध्‍दपक्ष कंपनी तर्फे उत्‍तरात पुढे असे नमुद करण्‍यात आले की, एस.एम.एस.व्‍दारे तक्रारकर्त्‍याला सुचित केले होते की, पूर्वीचे भारत संचार निगम लिमिटेड यांचे रुपये-1919/- चे बिल त्‍याचेकडे प्रलंबित असल्‍याने पेमेंट केले असल्‍यास वोडाफोन स्‍टोअर्स कडे पावती दाखल करावी परंतु वोडाफोन स्‍टोअर्सला भेट न देता तक्रारकर्त्‍याने ई मेल पाठवून रुपये-1130/- चे बिलाची प्रत पाठविली. परंतु तक्रारकर्त्‍याने त्‍याचेकडे पूर्वीचे भारत संचार निगम लिमिटेड कंपनीची कोणतीही थकबाकी नसल्‍या बद्दल नो-डयू प्रमाणपत्राची प्रत दाखल केली नाही. त्‍यानंतरही दिनांक-20/05/2016 रोजी थकबाकी    रुपये-1919/- पाठविण्‍यास सुचित करण्‍यात आले. परंतु पुर्तता न केल्‍याने तक्रारकर्त्‍या कडील क्रमांक-8275045442 ची Out going सेवा दिनांक-04.06.2016 रोजी बंद केली. तत्‍पूर्वी तक्रारकर्त्‍याचे पूर्वीचे भारत संचार निगम कंपनी लिमिटेडचे बिल रुपये-1919/- प्रलंबित असल्‍या बद्दल भारत संचार निगम कंपनी कडून खात्री केल्‍या नंतर दिनांक-30.04.2016 रोजी त्‍याला एस.एम.एस. पाठवून बिलाचे पेमेंट केले असल्‍यास त्‍याची पावती वोडाफोन स्‍टोअर्स मध्‍ये दाखल करण्‍यास सुचित केले तसेच काही अडचण आल्‍यास फोन क्रं 199 वर संपर्क साधण्‍यास सुचित केले होते परंतु तक्रारकर्त्‍याने  वोडाफोन स्‍टोअर्स मध्‍ये भेट न देता दिनांक-11/05/2016 रोजी ई मेल व्‍दारे प्रलंबित बिल रुपये-1919/- ऐवजी रुपये-1130/- भरल्‍या बाबतची पावती जोडली.

 

08.   तक्रारकर्त्‍याने दिनांक-11.05.2016 रोजी विरुध्‍दपक्ष कंपनीच्‍या प्राचि सहस्‍त्रबुध्‍दे यांना पाठविलेल्‍या ईमेल प्रतीचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये सोबत भारत संचार निगम यांची मार्च महिन्‍याची इन्‍व्‍हाईस रुपये-1919/- आणि एप्रिल महिन्‍यात सदर रुपये-1919/- मधून रुपये-789/- वजा करुन रुपये-1130/- चे बिल व बिल भरल्‍याची पावती प्रत जोडली असल्‍याचे नमुद केलेले आहे. त्‍याच दिवशी तक्रारकर्त्‍याने पाठविलल्‍या ई मेल मध्‍ये मार्च मधील इन्‍व्‍हाईस मध्‍ये रुपये-1919/- प्रलंबित दाखविलेले अहे परंतु त्‍यानंतर एप्रिल महिन्‍यात त्‍या मधून रुपये-789/- समायोजित केल्‍या नंतर अंतिम बिल रुपये-1130/- चे देण्‍यात आले व ते अंतिम बिल त्‍याने भरले आहे व त्‍याची पावती जोडण्‍यात येत आहे.

 

 

09.    तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या बिलाच्‍या प्रतीवरुन माहे एप्रिल-2016 चे बिला मध्‍ये रुपये-789/- समायोजित केल्‍या नंतर रुपये-1130/- दाखविलेले आहे. सदर बिल  रुपये-1130/- हे पावती क्रं-711605072601204 अनुसार दिनांक-07/05/2016 रोजी  भारत संचार निगम लिमिटेड यांचेकडे भरल्‍याचे पावतीच्‍या प्रतीवरुन दिसून येते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनीचे नविन सीमस हे दिनांक-05/04/2016 रोजी पूर्वीच्‍या भारत संचार निगम यांचे कडून घेतलेल्‍या मोबाईल क्रमांकावर घेतले. असे नविन सीम घेण्‍यापूर्वी त्‍याने पूर्वीचे भारत संचार निगम लिमिटेड यांचे बिलाची थकबाकी समाप्‍त करणे आवश्‍यक आहे परंतु त्‍याने त्‍यानंतर दिनांक-07/05/2016 रोजी भारत संचार निगम कंपनीची थकबाकी भरली.

 

 

10.   तक्रारकर्त्‍याचे भारत संचार निगम कंपनीचे बिलाच्‍या रकमे मध्‍ये तफावत होती म्‍हणजे पूर्वी त्‍याला माहे मार्च मध्‍ये रुपये-1919/- चे बिल देण्‍यात आले होते व त्‍यानंतर ते एप्रिल 2016 मध्‍ये दुरुस्‍त करुन ते रुपये-1130/- एवढया रकमेचे देण्‍यात आले व त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने ते बिल दिनांक-07/05/2016 रोजी भारत संचार निमग कंपनी मध्‍ये भरले.

 

11.   विरुध्‍दपक्षाचे उत्‍तरा नुसार TRAI  (Telecom Regulating Authority of India) यांनी घालून दिलेल्‍या मार्गदर्शक (Guidelines) सुचनां प्रमाणे पोर्टींग केलेल्‍या मोबाईल क्रमांकाची सेवा ही 29 व्‍या दिवसा पर्यंतच पुर्नचलीत (Reactivated) करता येऊ शकते, या मुदतीच्‍या आत संबधित मोबाईल कनेक्‍शनधारकाने म्‍हणजे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे कडे पूर्वीची सेवा असलेल्‍या भारत संचार निगम लिमिटेड यांचे पेमेंट भरल्‍या बाबत पावत्‍या दाखल करणे आवश्‍यक होते. ही सर्व प्रक्रिया संगणकीय आहे, उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे पुर्तता न केल्‍यास 30 व्‍या दिवशी मोबाईल क्रमांकाची सेवा आपोआप खंडीत होते आणि एकदा सेवा खंडीत झाली तर नंतरची कंपनी म्‍हणजे विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनी ही ती सेवा पुन्‍हा सुरु करु शकत नाही त्‍यामुळे पूर्वीची कंपनी भारत संचार निगम लिमिटेड यांचेकडे ते कनेक्‍शन पुन्‍हा येते. सदरचे प्रकरणात सुध्‍दा पूर्वीचे भारत संचार निगम लिमिटेड यांचेकडे ते कनेक्‍शन पुन्‍हा 60 दिवसात परत झालेले आहे.

 

12.   या प्रकरणात  तक्रारकर्त्‍याने वोडाफोन कंपनीचे नविन सीमस हे दिनांक-05/04/2016 रोजी घेतले म्‍हणजे त्‍यानंतर 30 दिवसांची मुदत धरली असता ती 05/05/2016 येते व त्‍या मुदती नंतर म्‍हणजे दिनांक-07/05/2016 रोजी तक्रारकर्त्‍याने पूर्वीचे भारत संचार निगम कंपनीचे बिल भरलेले आहे. तक्रारकर्त्‍याचे प्रलंबित बिलाचे रकमे मध्‍ये सुध्‍दा फरक होता, तक्रारकर्त्‍याने ई मेल व्‍दारे जरी भरलेल्‍या बिलाची प्रत जोडली असली तरी विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनीने दिलेल्‍या सुचने नुसार त्‍याने बिलाची प्रत वोडाफोन स्‍टोअर्स मध्‍ये जमा केली नाही किंवा त्‍या बिलाच्‍या प्रती दाखल केल्‍या असल्‍यास ते दाखल केल्‍या बद्दल विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनीचे स्‍टोअर्सची  पोच (Acknowledgement) दाखल केलेली नाही. तक्रारकर्त्‍याचे सुध्‍दा कर्तव्‍य होते की, त्‍याने भारत संचार निगम कंपनी मध्‍ये भेट देऊन त्‍याचे प्रलंबित बिला संबधाने लेखी खुलासा करावयास हवा होता परंतु भारत संचार निगम कंपनी कडे त्‍याने या संबधाने कोणताही लेखी खुलासा केलेला नाही वा त्‍या संबधाने योग्‍य तो पुरावा दाखल केलेला नाही.  विरुध्‍दपक्ष वोडाफोन कंपनीचे उत्‍तरा प्रमाणे तक्रारकर्त्‍याने या प्रकरणात भारत संचार निगम लिमिटेड यांना आवश्‍यक प्रतिपक्ष करणे आवश्‍यक होते परंतु ते सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने केलेले नाही.

 

13.   तक्रारकर्त्‍याने त्‍याचे भ्रमणध्‍वनीची सेवा बंद असल्‍याने त्‍याची मालमत्‍ता विकल्‍या गेली नाही असाही आरोप केला व त्‍यामुळे त्‍याचे आर्थिक नुकसान झाले असल्‍या बद्दल नुकसान भरपाई मागितली परंतु त्‍या संबधाने योग्‍य असा पुरावा आलेला नाही, तक्रारकर्त्‍याचे भ्रमणध्‍वनी वरील Out going सेवा बंद करण्‍यात आली होती, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे त्‍या कथनात तथ्‍य दिसून येत नाही. तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे तो एन.टी.पी.सी. मध्‍ये अधिकारी असल्‍याने त्‍याला वेळ मिळत नाही म्‍हणून त्‍याने विरुध्‍दपक्ष वोडाफोन यांचेकडे ईमेल व्‍दारे बिलाची प्रत पाठविली परंतु तक्रारकर्ता जो पर्यंत मूळ बिलाची प्रत दाखल करत नाही तसेच जो पर्यंत भारत संचार निगम कंपनीचे कार्यालयात भेट देत नाही तो पर्यंत त्‍याचे तक्रारीचे निराकरण होणे कठीण होते. तक्रारकर्त्‍या कडे जर वेळ नव्‍हता तर तो जवळच्‍या कोणत्‍याही व्‍यक्‍तीला पाठवून आक्षेपा संबधी योग्‍य ती पुर्तता करु शकला असता परंतु त्‍याने केवळ ई मेल संदेश पाठविलेत या व्‍यतिरिक्‍त कोणतीही पुर्तता केलेली नाही, अशा परिस्थितीत तक्रारकर्त्‍याची तक्रार ही खारीज होण्‍यास पात्र आहे, त्‍यावरुन आम्‍ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-                    

                 ::आदेश::

 

1)   तक्रारकर्ता श्री गजानन टिकाराम बाकडे यांची, विरुध्‍दपक्ष हेड ऑफ   डिपार्टमेंट, वोडाफोन मोबाईल सर्व्‍हीस लिमिटेड, सर्कल हेड ऑफीस महाराष्‍ट्र व गोवा आणि वि.प.क्रं-(2) प्राचि सहस्‍त्रबुध्‍दे, वोडाफोन सेल्‍युलर लिमिटेड, नागपूर यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2)    खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.

3)     निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन  देण्‍यात याव्‍यात.

             

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.