जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –28/2011 तक्रार दाखल तारीख –01/02/2011
शारदा अशोक नेवाडे
वय 40 वर्षे,धंदा शेती व घरकाम, ..तक्रारदार
रा.खामखेडा, ता.बीड जि.बीड
विरुध्द
1. विभाग प्रमुख,
कबाल इंश्युरन्स ब्रोकींग सर्व्हिस प्रा.लि.
शॉप नं. 1, दिशाअलंकार कॉम्लेक्स टॉऊन सेंटर,
सिडको, औरंगाबाद
2. शाखा व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इंश्युरन्स कंपनी लि.,
19, रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्टेट, मुंबई ...सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.आर.बी.धांडे,
निकालपत्र
( नि.1 वरील आदेश)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार ही खामखेड ता.जि.बीड येथील रहीवाशी असुन तीने पतीचे मृत्यू बाबत विमा दावा दाखल केला होता. दि. 15.9.2011 रोजी तक्रारदाराचे वकिल यांनी सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाईची रक्कम अदा झाली आहे याबाबत पुर्सिस दाखल केली.
तक्रारदारास सामनेवाले यांनी नुकसानभरपाईची रक्कम दिल्यामुळे त्यांचे विरुध्द तक्रार चालविणे नाही, अशी पुर्सिस दिली असल्याने सदर प्रकरण निकाली करणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील आदेश करीत आहे.
आदेश
1. तक्रारदारास तक्रार चालविणे नसलेची पुर्सिस, तक्रार निकाली करण्यात
येते.
2. तक्रारदार व सामनेवाले आपआपला खर्च सोसावा.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावेत.
( अजय भोसरेकर ) ( पी.बी.भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड