जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 26/2011 तक्रार दाखल तारीख –03/02/2011
रेऊबाई विठठल सोनसाळे
वय 60 वर्षे धंदा शेती व घरकाम .तक्रारदार
रा.भानकवाडी ता.शिरुर (का.) जि.बीड
विरुध्द
1. विभाग प्रमुख,
कबाल इन्शुरन्स कंपनी लि.
शॉप नं.1,दिशा अंलकार कॉम्प्लेक्स, टाऊन सेंटर
सिडको,औरंगाबाद सामनेवाला
2. शाखा व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
19,रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलांर्ड इस्टेट, मुंबई
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.रविंद्र धांडे
सामनेवाला क्र.1 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.2 तर्फे ः-अँड.ए.पी.कूलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांनी सदरची तक्रार शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा रक्कम न मिळाल्याने सामनेवाला विरुध्द दाखल केली आहे.
सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना रक्कम रु.1,00,000/- चा धनादेश दिलेला आहे.त्यामुळे तक्रारदारांनी सदरची तक्रार फक्त मानसिक त्रास, व खर्चा पुरताच चालविण्या बाबत पुरशिस दिलेली आहे.
सदरची पुरशिस पाहता तक्रारदारांना रक्कम रु.1,00,000/- कधी मिळाले यांचा कूठलाही उल्लेख नाही. तक्रारीतील घटना पाहता तक्रारदाराचे पती विठठल राघू सोनसाळे रा. भानकवाडी ता.शिरुर कासार यांचा मृत्यू दि.01.01.2009 रोजी वाहन अपघातात झालेला आहे. त्यानंतर त्यांनी सदरचा प्रस्ताव परिपत्रकानुसार तहसीलदार यांचेकडे दिला होता. तहसीलदार यांनी तो परिपत्रकाप्रमाणे कबाल इन्शुरन्स कंपनी कडे दिला, कबालने विमा कंपनीकडे पाठविला आहे व सदरचा दावा मंजूर करुन विमा कंपनीने रक्कम दिलेली आहे. त्यात फारसा विलंब झालेला प्रथमदर्शनी दिसत नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होत नसल्याने तक्रारदारांना मानसिक त्रास व खर्चाची रक्कम देणे उचित होणार नाही. मूळ विमा रक्कम तक्रारदारांना मिळाली आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार निकाली काढण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड