जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 33/2011 तक्रार दाखल तारीख –11/08/2011
1. राजेंद्र पि गहिनीनाथ वारंगुळे
वय 19 वर्षे धंदा शिक्षण
2. विजय पि.गहिनीनाथ वारंगुळे
वय 17 वर्ष, धंदा शिक्षण, अ.पा.क्र.आई,
3. सुरेखा भ्र. गहिनीनाथ वारंगुळे
3.वय 46 वर्ष, व्यवसाय, घरकाम .तक्रारदार
सर्व रा.वारंगुळे वस्ती,आष्टी ता.आष्टी जि.बीड
विरुध्द
1. विनीत आठल्ये, कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा. लि.
दिशालंकार शॉप नं.1,कॅनॉट टाऊन सेंटर, सिडको,औरंगाबाद
2. जिल्हाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
3. मा.तहसीलदार, सामनेवाला तहसील कार्यालय, आष्टी ता.आष्टी जि.बीड
4. शाखा व्यवस्थापक,
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.मुंबई
फोड मुंबई. नोटीसी तामीली पत्ता
विभागीय कार्यालय, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.
हजारी चेंबर्स, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.भगत डी.जी.
सामनेवाला क्र.1 ते 3 तर्फे ः-स्वतः
सामनेवाला क्र.4 तर्फे ः- अँड.आर.एस.थिगळे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार क्र.3 चे पती तक्रारदार क्र.1 व 2 चे वडील मयत झाले. गहिनीनाथ हे शेती व्यवसाय करुन कूटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांची आष्टी शिवारात सव्हे नंबर 124,127,141,143 मध्ये 46 आर जमिन होती. वाहन अपघातात तक्रारदाराचे पतीदि.28.7.2007 रोजी मयत झाले. दि.29.7.2007 रोजी घटनेची फिर्याद आष्टी पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी पंचनामा केला, मृत्यूची नोंद केली. प्रस्ताव अर्ज तहसीलदार आष्टी येथे दि.2.7.2008 रोजी आवश्यक त्या कागदपत्रासह दाखल केला. सामनेवाला क्र.3 यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन माहीती दिली नाही. सामनेवाला यांनी विम्याची रक्कम देऊन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र.1 ते 4 यांचेकडून वैयक्तीक अथवा संयूक्तीकरित्या खालील प्रमाणे नूकसान भरपाई मिळण्यास हक्कदार व पात्र आहेत.
अ. शेतकरी व्यक्तीगत अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/-
ब. शारीरिक व मानसिक त्रासाबददल व प्रवास रु.50,000/-
व इतर खर्चाबददल
क. पत्रव्यवहाराचा खर्च रु.1,000/-
ड. प्रस्तुत तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/-
एकूण रु.1,56,000/-
विनंती की, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे सामनेवालाकडून देण्या बाबत आदेश व्हावेत, त्यावर द.सा.द.शे. 18 टक्के व्याज तक्रार दाखल दिनांकापासून देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा दि.10.03.2011 रोजी दाखल केला. गहिनीनाथ वारंगुळे रा.वारंगुळे वस्ती,आष्टी ता. आष्टी यांचा अपघात दि.28.7.2007 रोजी झाला. त्यांचा दावा दि.7.1.2008 रोजी विमा कालावधी दि.15.7.2006 ते दि.14.7.2007 आणि वाढीव एक महिना दि.14.8.2007 या कालावधीपर्यत नॅशनल इन्शुरन्स कंपनी मुंबई यांचे शर्ती व अटी नुसार विमापत्र संपलेल्या शेवटच्या दिनांकापासून 90 दिवसांचे आंत दाखल करणे म्हणजेच दि.14.11.2007 पर्यत दाखल करणे आवश्यक होते. दावा या कार्यालयात दि.7.1.2008 रोजी मिळाला. त्यामुळे त्यांची तपासणी न करता तो तहसीलदार यांनादि.16.2.2008 रोजी परत करण्यात आला.
सामनेवाला क्र.2 व 3 यांनी त्यांचा एकत्रित खुलासा दि.15.4.2011 रोजी दाखल केला. श्री.सुलेखा गहिनीनाथ वारंगुळे यांनी दि.19.12.2007 रोजी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावा रक्कम मिळणे बाबत प्रस्ताव या कार्यालयात दाखल केला. सामनेवाला क्र.2, 3 बाबत आरोप फेटाळण्यात यावेत.
सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचा खुलासा दि.24.10.2011 रोजी दाखल केला.खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदारास कोणतेही कारण घडले नाही. यात सामनेवाला यांचे सेवेत कसूर नाही.तक्रार मूदतीत नाही. तक्रार रदद करावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 ते 4 यांचा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.भगत व सामनेवाले क्र.4 यांचे विद्वान वकील श्री.थिंगळे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी प्रस्ताव अर्ज तहसीलदार यांचेकडे दि.19.12.2007 रोजी दाखल केला. सदरचा प्रस्ताव अर्ज सामनेवाला क्र.3 यांनी सामनेवाला क्र.1 कबाल इन्शुरन्स औरंगाबाद यांचेकडे दि.26.12.2007 रोजी पाठविला. सदरचे प्रस्ताव सामनेवाला क्र.1 यांना दि.7.1.2008 रोजी मिळाला आहे. सदरचा प्रस्ताव हा विमा पत्रातील कालावधी संपल्यानंतर 90 दिवसांचे कालावधीत वाढीव मूदत एक महिना म्हणजेच दि.14.8.2007 पर्यत किंवा विम्याची मूदत संपल्यानंतर 90 दिवसांचे आंत म्हणजे दि.14.11.2007 रोजी पर्यत दाखल करणे आवश्यक आहे. सदरचा प्रस्ताव हा मूदतीत दाखल न झाल्याने तो तहसीलदार यांचेकडे परत करण्यात आलेला आहे.
या संदर्भात मुळात तक्रारदारांनी प्रस्ताव उशिरा दाखल केल्याने सदरचा प्रस्ताव हा सामनेवाला क्र.1 यांचे स्तरावरुन परत आलेला आहे. यात तक्रारदारांनी जरी तक्रारीसोबत विलंब माफीचा अर्ज दाखल केला असला तरी विलंब माफीचे संदर्भात योग्य व सबळ कारणे नाही. त्यामुळे विलंब माफ करणे उचित होणार नाही.तसेच प्रस्ताव हा मूदतीत नसल्याने तो सामनेवाला क्र.1 च्या स्तरावरुन परत आल्याने सामनेवाला क्र.1 ते 4 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. विलंब अर्ज रद्य करणेत येत आहे.
2. तक्रार निकाली काढण्यात येते.
3. खर्चाबददल आदेश नाही.
4 ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड