(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक :07.06.2011) अर्जदार यांनी सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये, गै.अ. चे विरुध्द दाखल केले आहे. तक्रार नोंदणी करुन, तक्रार मुदतीत आहे काय ? याबद्दल खुलासा अर्जदाराने करावा असा आदेश नि.1 वर दि.25.4.2011 ला पारीत करण्यात आला. प्रकरण पुढील तारखेवर प्राथमीक सुनावणी करीता ठेवण्यात आले. सदर तक्रार दि.5.4.2011 ला प्राथमीक सुनावणी करीता ठेवण्यात आले. परंतु, त्यादिवशी अर्जदाराचे वकीलाने सुनावणी करीता वेळ मागण्याचा अर्ज दिल्याने प्रकरण दि.7.5.2011 ला ठेवण्यात आले. त्यानंतर, प्रकरण 16.5.2011 ला पुन्हा प्राथमिक सुनावणी करीता ठेवण्यात आले. परंतु, अर्जदाराचे वकीलाने पुढे प्रकरण न चालविण्याची इच्छा असल्याबाबत (nolle prose qui no instruction) पुरसीस नि.8 नुसार दाखल केली. तसेच, अर्जदारास, नोटीस पाठविल्याची प्रत नि.9 नुसार दाखल केली आहे. अर्जदाराचे वकीलाने नि.8 नुसार पुरसीस दाखल केल्यामुळे मंचामार्फत अर्जदारास नोटीस पाठवून हजर राहण्यास सांगीतले. परंतु, अर्जदार हजर झाला नाही व तक्रार मुदतीत आहे काय ? याबद्दल, काहीही खुलासा केला नाही. अर्जदार सतत गैरहजर राहून प्राथमिक सुनावणी केली नाही, त्यामुळे प्रकरण दि.25.4.2011 पासून प्रलंबीत आहे. अर्जदारास प्रकरण पुढे चालवायचे नसल्याने आजपर्यंत हजर झाला नाही. त्यामुळे, अर्जदाराची तक्रार डिसमीसल फॉर डिफाल्ट (Dismissal for Default) म्हणून काढून टाकून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
अर्जदाराची तक्रार डिसमीसल फॉर डिफाल्ट (Dismissal for Default) म्हणून काढून टाकण्यात येत आहे.
| | [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT | |