Maharashtra

Thane

CC/643/2014

Mr. Ratnakant Mahadev Sane - Complainant(s)

Versus

HDFC Standard Life Insurance co Ltd. - Opp.Party(s)

Adv. Poonam V. Makhijani

15 Jun 2016

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/643/2014
 
1. Mr. Ratnakant Mahadev Sane
At.C-01,R.No. 24, Thamas co op Hsg Soc Ltd, Near Mahadev Homes ,Godrej, Hill, Khadak Pada, Kalyan 420301
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. HDFC Standard Life Insurance co Ltd.
Through Director At 2nd floor, Chandra Bhushan Plaza, Sahajanand Chowk, Next to Raymand Showroom, kalyan City, Thane 421301
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

  (द्वारा मा. सदस्‍या – श्रीमती. माधुरी एस. विश्‍वरुपे)                              

1.         तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदारांनी सामनेवाले यांचे कडे रक्‍कम रु.25,000/- प्रत्‍येकी दोन विमा पॉलीसीकरता ता.24/07/2012 रोजीच्‍या प्रपोजलप्रमाणे भरणा केला.  सामनेवाले यांनी ता.28/07/2012  रोजीच्या पत्रान्‍वये प्रपोजल मान्‍य करुन दोन विमा पॉलीसी प्रत्‍येकी 5 लाख रुपये  किमतीच्या  इश्‍यु  केल्‍या.  तथापी  ता. 30/08/2012 रोजीच्‍या पत्रान्‍वये दोन्‍ही  पॉलीसीची किंमत (sum assured) प्रत्‍येकी रु. 2,50,000/- असल्‍याचे कळवले.  सामनेवाले यांची सदरची कृती व्‍यापाराची अनुचित पध्‍दती असल्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.

2.         सामनेवाले यांना मंचाची नोटिस प्राप्‍त होवुनही गैरहजर असल्‍यामुळे त्‍यांचे विरध्‍द एकतर्फा आदेश पारित झाला आहे.

3.         तक्रारदाराची तक्रार दाखल कागदपत्रे, पुरावाशपथपत्र यांचे सखोल वाचन केले तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र हाच लेखी युक्तिवाद समजण्‍यात यावा अशी पुर्सिस दाखल केली.  तक्रारदारांच्‍या वकीलांचा तोंडी युक्तिवाद ऐकला यावरुन मंच खालील प्रमाणे निष्‍कर्ष काढत आहे.

कारण मिमांसा

अ) तक्रारदारांनी H.D.F.C SL young star super Premium Plan, Life Oprion Save Benefit चा 10 वर्षाच्‍या कालावधीच्या दोन विमा पॉलीसी प्रत्‍येकी वार्षिक प्रिमियम रक्‍कम रु. 25,000/- च्‍या रक्‍कम रु. 5 लाख (sum assured)  किमतीच्या सामनेवाले यांचे कडुन घेतल्‍या.  तक्रारदारांनी सदर दोन्‍ही विमा पॉलीसीचा प्रिमीयम सामनेवाले यांचेकडे ता. 25/07/2012 रोजीचे चेक क्र. 018101 व 018102 प्रत्‍येकी रक्‍कम रु. 25,000/- अन्‍वये भरणा केला.  सामनेवाले यांनी या संदर्भात तक्रारदारांना ता. 24/07/2012 रोजी पावती क्र. AU134347 वU134347 ांनी या न स्‍पष्‍ट झाले AU134348  दिल्‍या.  तक्रारदारांची ता.25/07/2012 रोजीचे दोन्‍ही प्रपोजल व ता. 24/07/2012 रोजीच्‍या दोन्‍ही पावत्‍या मंचात दाखल आहेत.

ब) सामनेवाले यांनी ता. 28/07/2012 रोजीच्‍या पत्रान्‍वये तक्रारदारांना विमा पॉलीसी पाठवल्‍याबाबत नमुद केले आहे.  तसेच तक्रारदारांना ता. 18/09/2012   रोजी दोन्‍ही मुळ विमा पॉलीसीच्‍या प्रती प्राप्‍त झाल्‍या बाबतची पावती शिक्‍का सदर पत्रावर नमुद आहे.

क) सामनेवाले यांनी तक्रारदारांना ता. 30/08/2012 रोजीच्‍या पत्रान्‍वये तक्रारदारांच्‍या विमा पॉलीसीची प्रत्‍येकी किंमत रु. 2,50,000/- (sum assured)  असल्‍याचे नमुद केले आहे.  सदर पत्राची प्रत मंचात दाखल आहे.  सामनेवाले यांनी प्रपोजल फॉर्म मध्‍ये रु. 5,00,000/- प्रत्‍येकी पॉलीसीची किंमत नमुद केली असुनही ता. 30/08/2012 रोजीच्‍या पत्रात प्रत्‍येकी पॉलीसीची किंमत रक्‍कम रु.2,50,000/- नमुद केल्‍याचे तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन स्‍पष्‍ट होते.

ड) सामनेवाले यांनी ता. 15/10/2012 रोजीच्‍या पत्रान्‍वये तक्रारदारांच्‍या प्रपोजल क्र. 15321502 व 15319275 च्‍या  विमा पॉलीसी “withdrawn”  केल्‍या असुन सामनेवाले यांची तक्रारदारांना नवीन प्रपोजल पाठविण्‍याबाबतची  कार्यवाही चालु असल्‍याचे नमुद केले आहे.  तक्रारदारांनी प्रपोतल बदलुन घेण्‍यासाठी आवश्‍यक ती पुर्तता करण्‍याबाबत सुचना केली आहे.

इ) तक्रारदारांच्या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांना सामनेवाले यांचे ता. 30/08/2012 रोजीचे पत्र प्राप्‍त झाल्‍यानंतर संपर्क केला असता सामनेवाले यांनी दोन्ही मुळ पॉलीसीच्‍या प्रतीमध्‍ये रक्‍कम रु. 2,50,000/- ऐवजी रु. 5,00,000/- प्रपोजलप्रमाणे दुरूस्‍ती करुन देण्‍याचे आश्‍वासन दिले तथापी ता. 15/10/2012 रोजीच्‍या पत्रान्‍वये मुळ पॉलीसी “withdrawn” करुन नविन प्रपोजल करीता “further requirement” असल्‍याचे नमुद केले तथापी “further requirement” काय करावयाची?  याबाबत खुलासा केला नाही. सामनेवाले यांचेकडे या संदर्भात  संपर्क केला असता तक्रारदारांना समर्पक उत्‍तर सामनेवाले यांचेकडुन प्राप्‍त झाले नाही. 

ई) प्रस्‍तुत प्रकरणात सामनेवाले यांचेकडुन आक्षेप दाखल नाही. सबब तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे.  तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांना दोन्‍ही विमा पॉलीसीच्या प्रपोजलमध्‍ये प्रत्‍येकी रक्‍कम रु.5,00,000/- विमा पाम्‍लीसीची किंमत (sum assured) नमुद करुन प्रत्‍यक्षात दोन्‍ही पॉलीसी प्रत्‍येकी रक्‍कम रु.2,50,000/- किमतीच्‍या इश्‍यु केल्‍याची बाब तक्रारीतील दाखल पुराव्यावरून दिसुन येते. सामनेवाले यांची सदरची कृती व्‍यापाराची अनुचित पध्‍दती असल्‍याचे स्‍पष्‍ट होते असे मंचाचे मत आहे.

           उपरोक्‍त चर्चेनुरुप व निष्‍कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो. या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही .

आदेश

1)  तक्रार क्र. 643/2014 अंशतः मंजुर करण्‍यात येते.

2) सामनेवाले यांनी तक्रारदारांना प्रपोजलमध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे दोन्‍ही विमा पॉलीसी प्रत्‍येकी 5,00,000/- रुपये किमतीच्या न देता प्रत्‍येकी रु.2.5 लाख किमतीच्‍या देवुन व्‍यापाराच्या अनुचित पद्धतीचा वापर केल्‍याचे जाहीर करण्‍यात येते.

3) सामनेवाले यांना आदेश देण्‍्यात येतो की, तक्रारदारांना दोन्‍ही मुळ विमा पॉलीसी क्र. 15321502 व क्र. 15319275 ता. 24/07/2012 रोजीच्‍या प्रपोजल फॉर्ममध्ये नमुद केल्याप्रमाणे प्रत्‍येक विमा पॉलीसी रक्‍कम रु. 5,00,000/- (Sum assured)  किमतीच्‍या मा. 30/09/2016 पर्यंत इश्‍यु कराव्‍यात.

                  4) तक्रारदारांना आदेश देण्‍यात येतो की, सामनेवाले यांनी वरील आदेश क्र. 3 ची पुर्तता केल्‍यानंतर ता. 24/07/2012 नंतर पुढील कालावधीची प्रिमियमची रक्‍कम प्रपोजल फॉर्ममध्‍ये नमुद केल्‍यानुसार नियमानुसार सामनेवाले यांचेकडे भरणा करावी.    

5) सामनेवाले यांना तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चाची रक्‍कम रु. 10,000/- (रु. दहा हजार फक्‍त) ता.30/9/2016 पर्यंत द्यावी विहीत मुदतीत अदा न केल्‍यास ता.01/10/2016 पासून सदर रक्‍कम आदेशाच्‍या पुर्ततेपर्यंत 9% व्याजदरासह द्यावी.

5) आदेशाच्या प्रती उभय पक्षकाराना विनाविलंब, विनाशुल्क पाठविण्यात याव्यात.

6) तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदारांना  परत करावेत.

ठिकाण ठाणे.

दिनांक 15/06/2016

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.