Maharashtra

Kolhapur

CC/08/398

Gautam Sumatilal Shah - Complainant(s)

Versus

HDFC Standard Life Insurance - Opp.Party(s)

V.F.Nathan,

10 Oct 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/08/398
1. Gautam Sumatilal Shah103 Jhivaji Park.Tashant,Kolhaplur ...........Appellant(s)

Versus.
1. HDFC Standard Life Insurance Basant Bahar Road kolhapur, ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :V.F.Nathan,, Advocate for Complainant
D.M.Patil, Advocate for Opp.Party

Dated : 10 Oct 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 निकालपत्र :- (दि.10/10/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले. उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकणेत आला.  
 
           सदरची तक्रार तक्रारदारास सामनेवाला विमा कंपनीने चुकीच्‍या तारखेची पॉलीसी देऊन सेवेत त्रुटी केलेमुळे दाखल करणेत आली आहे. 
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- तक्रारदार हे शुगर मर्चंट व कमिशन एजंट असून तक्रारदारांची मे.गौतम शुगर ट्रेडींग कंपनी नावाची फर्म आहे. ऑगस्‍ट-2007 मध्‍ये सामनेवाला विमा कंपनीचे मार्केटींग ऑफिसरनी तक्रारदारास इन्‍शुरन्‍स पॉलीसी घेणेस भाग पाडले व सांगितले की प्रिमियम भरल्‍यापासून पॉलीसी सुरु होते. त्‍यांचेवर विश्‍वास ठेवून तक्रारदाराने दि.08/09/2007 रोजी रक्‍कम रुपये पाच लाखाचा प्रिमियम भरला. परंतु सामनेवालांनी तक्रारदारास पॉलीसी क्र.11266704 NAV सह  दि.25/10/2007 तारखेची दिली. तसेच रक्‍कम रुपये पाच लाखाच्‍या प्रिमियमला huge processing fee Rs.75,000/- इतके लावली व रक्‍कम रु.4,25,000/- चे युनीटस तक्रारदारास अदा केले. दि.08/09/2007 रोजी NAV चा दर प्रति युनीट रु.59.13 होता. तर दि.25/10/2007 रोजी NAV चा दर प्रति युनीट रु.73.19 इतका होता. त्‍यामुळे तक्रारदारास दि.08/09/2007 चे NAV नुसार 7187 युनीटस मिळावयास हवे होते. मात्र सामनेवाला यांनी दि.25/10/2007 चे NAV नुसार 5806.43 इतके युनीट दिलेले आहे. त्‍यामुळे तक्रारदारास रु.5,26,016.53/- ऐवजी रु.4,24,972.61 इतक्‍याच रक्‍कमेचा लाभ झालेला आहे. सबब तक्रारदारास रक्‍कम रु.1,01,043.92 इतके नुकसान सोसावे लागले. त्‍यामुळे तक्रारदाराने दि.07/11/2007 व दि.14/11/2007 रोजी सामनेवाला यांना तोंडी तसेच लेखी तक्रार केली असता सामनेवाला यांनी दि.22/11/2007 रोजी खोटी व चुकीचे उत्‍तराचे पत्र तक्रारदारास पाठवले आहे. ही सामनेवालांचे सेवेतील त्रुटी आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारदारास दि.08/09/2007 च्‍या NAV नुसार 7187 युनीट देणेबाबत आदेश व्‍हावा अथवा युनीटच्‍या फरकाची रक्‍कम रु.1,01,043.92/-मा‍नसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/-व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत  अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ पॉलीसी शेडयूलचे अपेंडिक्‍स, फर्स्‍ट प्रिमियम रिसीट, दि.25/10/07 चे युनीट स्‍टेटमेंट, बँक स्‍टेटमेंट, सामनेवाला यांनी तक्रारदारास पाठविलेले पत्र, सामनेवाला यांना तक्रारदाराने पाठविलेली नोटीस, सामनेवाला यांनी सदर नोटीसला दिलेले उत्‍तर इत्‍यादी कागदपत्र दाखल केली आहेत.
 
(4)        सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार प्रस्‍तुतची तक्रार खोटी, बनावट असून कायदयाचे दृष्‍टीने चालणेस पात्र नाही. सामनेवाला यांनी मान्‍य केले कथनाखेरीज परिच्‍छेदनिहाय तक्रार नाकारली आहे. तक्रारदाराने वस्‍तुस्थिती लपवून ठेवलेली आहे. तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूराबाबत वाद नाही. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराने युनिट लिंक्‍ड एन्‍डॉलमेंट प्‍लॅन 10 वर्षाचे कालावधीसाठी हप्‍ता कालावधी 10 वर्षे व पॉलीसी कालावधी 30 वर्षे विमा निर्धारित रक्‍कम रु.75,00,000/- घेतलेला होता. तक्रारदाराने प्रपोजल फॉर्मसोबत रक्‍कम रु.5,00,000/- चा चेक दिलेला होता. तो दि.06/9/2007 रोजी कोल्‍हापूर शाखेकडे सुपूर्द करणेत आला. तसेच चेक मिळालेवर लगेच तो वटवणेसाठी पाठवला व प्रपोजल फॉर्म पुढील कार्यवाहीसाठी पाठवून दिला. प्रपोजल फॉर्ममधील तपासणी केली असता आवश्‍यक असणारी काही कागदपत्रे यामध्‍ये वैद्यकीय कागदपत्रे, मागील विमा, तसेच मागील पॉलीसीच्‍यामधील विमा संरक्षीत रक्‍कम इत्‍यादीबाबतची पूर्तता केल्‍यानंतर दि.25/10/2007 रोजी तक्रारदारास पॉलीसी कोणताही विलंब न लावता अदा केलेली आहे. तक्रारदाराने सही केलेल्‍या प्रपोजल फॉर्ममध्‍ये कलम ई मध्‍ये पॉलीसी स्विकारुन (Acceptance) प्रभावित झालेपासून एनएव्‍ही व्‍हॅल्‍यू लागू असून ती पॉलीसीच्‍या प्रपोजल वेळेपासून नाही. सबब दि.25/10/2007 च्‍या NAV नुसार 5806.43927 इतके युनीटस तक्रारदारास दिलेले आहेत. सबब सामनेवाला यांची सेवात्रुटी नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. तसेच तक्रारदाराकडून सामनेवाला यांना कॉम्‍पेसेंटरी कॉस्‍ट रु.10,000/- देणेबाबत हुकूम व्‍हावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(5)        सामनेवाला यांनी आपले लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ इन्‍टेरियम स्‍टेटमेंट अस्‍सल प्रत दाखल केलेली आहे. तसेच गाईडलाईन्‍स फॉर्म, तक्रारदाराने पॉलीसीकरिता भरलेला फॉर्म, सामनेवाला यांनी तक्रारदारांना पाठवलेले पत्र, तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेले पत्र, तक्रारदाराने सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, पॉलीसी स्‍टेटसची कागदपत्रे, पॉलीसी शेडयूल, फर्स्‍ट प्रिमियम रिसीट, प्रिमियम पेड सर्टीफिकेट इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(6)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, दाखल कागदपत्रे व उभय पक्षाच्‍या वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                 --- होय अंशत.
2) काय आदेश ?                                      --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1:- सामनेवाला यांनी तक्रारदारास पॉलीसी क्र.11266704 दि.25/10/2007 रोजी अदा केलेचे मान्‍य केलेले आहे. सदर पॉलीसीसाठी रक्‍कम रु.5,00,000/- इतका हप्‍ता आहे. सदर पॉलीसीनुसार युनीट लिंक्‍ड एन्‍डॉलमेंट प्‍लॅन घेतलेला असून सदर प्‍लॅन हा दि.25/10/2007 रोजी सुरु झाला व दि.25/10/2037 रोजी सदर प्‍लॅनची मुदत संपते. त्‍याचप्रमाणे रु.75,00,000/- इतकी विमा संरक्षीत रक्‍कम आहे. सदरची पॉलीसी दि.25/10/2007 पासून प्रभावीत झालेचे दाखल कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे.
 
           तक्रारदाराने तक्रारीत केले कथनाप्रमाणे सदर पॉलीसीचा प्रथम हप्‍ता रु.5,00,000/- दि.08/09/2007 रोजी अदा केलेचे नमुद केले आहे. व सदर तारखेपासून NAV व्‍हॅल्‍यूनुसार युनीटस दयावयास हवे होते. यासाठी नमुद प्‍लॅनच्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार(Guideline) 10.6 क्‍लॉजनुसार Uniforms Cut of timing for applicability of net asset value: The allotment of units to the policyholder should be done only after the receipt of premium proceeds as stated below-
10.6.1 Allocations (premium allocations switch in):
10.6.1.1 in respect of premiums/funds switched received upto 4.15 p.m. by the insurer along with a local cheque or a demand draft payable at per at the place where the premium is received. The closing NAV of the day on which premium is received shall be applicable.
10.6.1.2 in respect of premium funds switched received after 4.15p.m.by the insurer along with a local cheque or a demand draft payable at per at the place where the premium is received. The closing NAV of the next business day shall be applicable.
10.6.1.3 in respect of premium received with outstation cheques/demand drafts at the place where the premium is received, the closing NAV of he day on which cheque/demand draft is realized shall be applicable.
10.6.2 Redemotions:
10.6.2.1 in respect of valid applications received (e.g. surrender, maturity claim, switch etc.) upto 4.15p.m. by the insurer. The same day’s closing NAV shall be applicable.
10.6.2.2 in respect of valid applications received (e.g.surrender, maturity claim, switchetc) after 4.45 p.m. by the insurer, the closing NAV of the next business day shall be applicable.
 
                        सदर तारखेपासून NAV व्‍हॅल्‍यू अदा न करता सामनेवाला यांनी हेतूपूर्वक दि.25/10/2007 पासून पॉलीसी प्रभावीत करुन तक्रारदाराचे नुकसान केलेचे प्रतिपादन केले आहे. तक्रारदाराच्‍या सदर कथन व युक्‍तीवादाचा विचार करता तक्रारदाराने दि.06/09/2007 रोजी प्रपोजल फॉर्म भरुन दिलेला आहे. सदर फॉर्मसोबत रु.5,00,000/- चा चेक तक्रारदाराने दिला होता ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. नमुद क्‍लॉजमधील Cut off time ची व्‍याख्‍या नमुद प्‍लॅनच्‍या पान 6 वरील कलम 2 मध्‍ये पुढीलप्रमाणे नमुद केली आहे. Cut off time- is the time by which we much have accepted your instructions to invest in or encash units from a fund for us to invest in or encash units at the associated valuation time. Current Cut-off-times conform to those specified in the Unit Linked Guidelines and details are given in the appendix to the Policy Schedule.
 
सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेमध्‍ये तक्रारदारास विमा संरक्षणही दिले असलेने आवश्‍यक कागदपत्रे -हप्‍ता अदा करणेबाबतचे पत्र,विमा निर्धारित केलेले डिक्‍लरेशनचे पत्र, तसेच वैद्यकीय, मागील विम्‍याबाबतचे व निर्धारित विमा रक्‍कमेबाबतची माहिती इत्‍यादी कागदपत्रे प्राप्‍त झालेनंतरच दि.25/10/2007रोजी तक्रारदाराचे प्रपोजल स्विकारुन (Acceptance)  पॉलीसी अदा केलेली आहे ही वस्‍तुस्थिती नाकारता येत नाही.ज्‍या दिवशी पॉलीसीसाठी प्रपोजल दिले त्‍याचदिवशी पॉलीसी प्रभावीत झालेली नाही अथवा तशी तरतुदही नाही. वर नमुद तरतुद व व्‍याख्‍येचा विचार करता सदर बाब निर्विवाद आहे. पॉलीसी प्रभावीत झालेपासूनच व पॉलीसीधारकाकडून सुचना आलेनंतरच गुंतवणूक केलेचे स्‍पष्‍ट होते. सदर बाबींचा विचार करता NAV बाबतची Cut of time व त्‍यास अनुषंगीक असणारे 10.6.1 ते 10.6.2.2 क्‍लॉजचा विचार करता प्रिमियम फंड स्विच करणेबाबत दिलेल्‍या वेळा व अॅलोकेशनचा विचार करता केवळ प्रिमियम रक्‍कम मिळाले तारखेपासून
NAV सुरु होते असा तक्रारदाराने काढलेला अर्थ सदर तरतुदीमध्‍ये 7.3-Unit pricing and Cut-off-time for applicability of Net Asset Value(NAV) – Our current unit pricing and Cut-off-time conform to the following extract from the insurance Regulatory and Development Authority’s Guidelines for Unit-Linked Life Insurance Products. These times are subject to change by us at any time with prior approval from the Insurance Regulatory and Development Authority. चा विचार करता सामनेवाला कंपनीचे मान्‍यते नंतरच NAV सुरु होते या तरतुदीचा विचार करता चुकीचा आहे. सबब ज्‍यावेळी पॉलीसी प्रभावीत झाली त्‍याचवेळी NAV सुरु होते व त्‍याप्रमाणे युनीट अदा केले जातात ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. सबब तक्रारदाराचे दि.08/09/2007 NAV व त्‍याप्रमाणे युनीट देणेचे कथन हे मंच ग्राहय धरु शकत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
           तक्रारदाराने विमा हप्‍ता रक्‍कम रु.5,00,000/- भरलेली आहे. मात्र सामनेवाला यांनी युनीट अलॉट करताना रु.75,000/- इतकी मोठी रक्‍कम प्रोसेस फी म्‍हणून कट करुन घेऊन रक्‍कम रु.4,25,000/- इतक्‍याच रक्‍कमेचा लाभ दिलेला आहे. या तक्रारीचा विचार करता सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्रांचे अवलोकन केले असता अशा प्रकारचे रक्‍कम रु.75,000/- इतक्‍या मोठया रक्‍कमेचे प्रोसेसिंग चार्जेस पान 10 वरील क्‍लॉज 14 चार्जेस मध्‍ये कट करणेबाबत कुठेही नमुद केलेले नाही. तसेच सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेमध्‍ये सदर रु.75,000/- का कपात केली किंवा NAV मध्‍ये सदर रक्‍कम का समाविष्‍ट नाही याचा स्‍पष्‍ट खुलासा केलेला नाही. तसेच त्‍या अनुषंगीक पुरावा व स्‍पष्‍टीकरण दिलेले नाही अथवा सदर मुद्दयावर युक्‍तीवादही केलेला नाही. सबब सदर पॉलीसीप्रमाणे नमुद असणारे पान 10 वरील क्‍लॉज 14 चार्जेस मध्‍ये नमुद असणारे चार्जेस वगळता अन्‍य चार्जेस सामनेवाला कंपनीला घेता येणार नाही. सबब रु.75,000/- इतकी रक्‍कम कोणत्‍याही आधाराशिवाय कपात करुन सामनेवाला विमा कंपनीने सेवात्रुटी केलेली आहे. तसेच रक्‍कम रु.5,00,000/- ही 100 टक्‍के ग्रोथ असलेमुळे नियमाप्रमाणे चार्जेस आकारुन सदर रक्‍कमेवर NAV नुसार युनीटस अदा न करुन सेवात्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   
            
मुद्दा क्र.2:- मुद्दा क. 1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता रक्‍कम रु.5,00,000/- वर दि.25/10/2007 च्‍या  NAV नुसार युनीटस अदा करावेत अथवा त्‍याप्रमाणे येणा-या फरकाची रक्‍कम अदा करावी या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांनी केलेल्‍या सेवात्रुटीमुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत.
                           आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.
 
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास रक्‍कम रु.5,00,000/- वर दि.25/10/2007 च्‍या  NAV नुसार युनीटस अदा करावेत अथवा त्‍याप्रमाणे येणा-या फरकाची रक्‍कम अदा करावी.
 
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/-(रु.तीन हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्‍त) दयावेत.
 
 
 
          
                 
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT