संयुक्त निकालपत्र :- (दि.12/10/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुत ग्राहक तक्रार क्र.355/2011 ते 361/2011 या सातही प्रकरणामध्ये सामनेवाला हे एकच आहेत. तसेच वाद विषयातही साम्य असलेने प्रस्तुत सातही तक्रारीमध्ये एकत्रितपणे निकाल पारीत करणेत आला आहे. (2) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराची विमा रक्कम न देऊन सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी केलेमुळे दाखल करणेत आली आहे. (3) तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला ही ख्यातनाम विमा कंपनी असून ती विमा सेवा देते. तक्रारदारांचे सामनेवालांकडे खालील नमुद तपशीलाप्रमाणे एक वर्षीय एकरकमी प्रिमियमच्या विमा पॉलीसी उतरविल्या होत्या. ग्राहक तक्रार क्र.355/2011 मध्ये पॉलीसी क्र.11545577244 व 6644332129 अन्वये अनुक्रमे रक्कम रु.10,000/- व रु.1,000/- पाच वर्षाचे मुदतीकरिता भरलेले होते. प्रस्तुतच्या पॉलीसी अनुक्रमे दि.07/12/2007 व 05/03/2007 रोजी (सुरु) प्रभावीत झालेल्या आहेत. पॉलीसीची मुदत 07/12/2012 व दि.05/03/2012 रोजी बंद होती. मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.20,000/- व रु. 2,000/- आहे. ग्राहक तक्रार क्र.356/2011 मध्ये पॉलीसी क्र.11431573506 अन्वये रक्कम रु.10,000/- पाच वर्षाचे मुदतीकरिता भरलेले होते. प्रस्तुतच्या पॉलीसी अनुक्रमे दि.02/08/2008रोजी (सुरु) प्रभावीत झालेल्या आहेत. पॉलीसीची मुदत 02/08/2012 रोजी बंद होती. मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.20,000/-आहे. ग्राहक तक्रार क्र.357/2011 मध्ये पॉलीसी क्र.6644332197 अन्वये रक्कम रु.15,000/- पाच वर्षाचे मुदतीकरिता भरलेले होते. प्रस्तुतच्या पॉलीसी अनुक्रमे दि.20/04/2007रोजी (सुरु) प्रभावीत झालेल्या आहेत. पॉलीसीची मुदत 20/04/2012 रोजी बंद होती. मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.30,000/-आहे. ग्राहक तक्रार क्र.358/2011 मध्ये पॉलीसी क्र.11431571507 अन्वये रक्कम रु.15,000/- पाच वर्षाचे मुदतीकरिता भरलेले होते. प्रस्तुतच्या पॉलीसी अनुक्रमे दि.10/11/2007रोजी (सुरु) प्रभावीत झालेल्या आहेत. पॉलीसीची मुदत 10/11/2012 रोजी बंद होती. मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.30,000/-आहे. ग्राहक तक्रार क्र.359/2011 मध्ये पॉलीसी क्र.11545577225 अन्वये रक्कम रु.5,000/-पाच वर्षाचे मुदतीकरिता भरलेले होते. प्रस्तुतच्या पॉलीसी अनुक्रमे दि.29/11/2007रोजी (सुरु) प्रभावीत झालेल्या आहेत. पॉलीसीची मुदत 29/11/2012 रोजी बंद होती. मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.10,000/-आहे. ग्राहक तक्रार क्र.360/2011 मध्ये पॉलीसी क्र.11431571510 अन्वये रक्कम रु.10,000/- पाच वर्षाचे मुदतीकरिता भरलेले होते. प्रस्तुतच्या पॉलीसी अनुक्रमे दि.22/07/2008रोजी (सुरु) प्रभावीत झालेल्या आहेत. पॉलीसीची मुदत 22/07/2009 रोजी बंद होती. मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.11,600/-आहे. ग्राहक तक्रार क्र.361/2011 मध्ये पॉलीसी क्र.11431571515 अन्वये रक्कम रु.50,000/- पाच वर्षाचे मुदतीकरिता भरलेले होते. प्रस्तुतच्या पॉलीसी अनुक्रमे दि.18/12/2007रोजी (सुरु) प्रभावीत झालेल्या आहेत. पॉलीसीची मुदत 18/12/2008 रोजी बंद होती. मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.58,000/-आहे. वरील सर्व तक्रारीमध्ये वर नमुद केलेप्रमाणेच्या प्रस्तुत रक्कमांची तक्रारदारांनी मागणी वेळोवेळी सामनेवालांकडे केली असता रक्कम अदा करणेस टाळाटाळ केलेने दि.19/09/2009 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठवली. सदर नोटीसला पोकळ बिनबुडाचे उत्तर पाठवलेले आहे. सामनेवालांचे कर्मचा-याने अफरातफर केलेचे तक्रारदारांना समजले. विमा रक्कम देणेचे कायदेशीर जबाबदारी सामनेवाला कंपनीची आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल करावी लागली आहे. सबब प्रत्येक तक्रारदारांची तक्रार मंजूर करुन प्रत्येक तक्रारदारांची पॉलीसीची देय रक्कम द.सा.द.शे.20 टक्के व्याजासह, मानसिक व शारिरीक त्रासापोटी, तक्रारीच्या खर्चापोटी व वकील फी सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदारांनी आपल्या तक्रारींच्या पुष्टयर्थ पॉलीसींच्या प्रिमियम रिसीट, सामनेवाला यांना तक्रारदाराने पाठविलेल्या वकील नोटीसची प्रत, सदरची नोटीस सामनेवाला यांना मिळालेची पोष्टाची पोहोच पावती इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार- अ) तक्रारदाराचा तक्रार अर्ज खोटा व लबाडीचा असून तो मान्य व कबूल नाही. तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. सामनेवाला व तक्रारदार यांचेत ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(ड) प्रमाणे ग्राहक व सेवा देणार असे नातेच प्रस्थापित होत नाही. सबब अर्ज चालणेस पात्र नाही. प्रस्तुतची बिमा बचत योजना पॉलीसी ही फक्त ग्रामीण भागातील लोकांसाठी जाहीर केली होती व विक्रीस काढली होती. सदर पॉलीसी ही फक्त रु.100/- किंमतीस होती. पाच वर्षाचे मुदतीनंतर पॉलिसीप्रमाणे रु.200/- देणेचे योजलेले होते. ब) तक्रारदाराने पॉलीसी विकत घेणेबाबत प्रपोजल फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे करार झालेला नाही. तक्रारदाराकडून कोणतीही रक्कम स्विकारलेली नव्हती व नाही. तक्रारदाराने मोघमात माहिती दिली आहे. तक्रारदाराने किती तारखेला व कशी रक्कम सामनेवालांकडे दिली याबाबतचा खुलासा नाही. तसेच सामनेवाला कंपनीस रक्कम पोहोचलेबाबतची पावती याकामी हजर केली नाही. क) तक्रारदारांनी दाखल केलेली पॉलीसी मुलत: चुकीची, बेकायदेशीर आहे. प्रस्तुतची पॉलीसी रु.100/-इतक्या एकरकमी प्रिमियची होती. सामनेवालांनी अशी कोणतीही वर्षासाठी पॉलीसी जाहीर केलेली नव्हती व विकली नव्हती. सबब सदरची तक्रार कायदयाने चालणेस पात्र नाही. ड) सामनेवाला कंपनीचे अधिकारी श्री आर.एस.तापेकर यांनी अधिकाराचा गैरवापर करुन सामनेवाला कंपनीने अधिकार दिले नसताना अधिकार क्षेत्राबाहेर वर्तन करुन गैरव्यवहार केले आहेत. खोटे कागद तयार करुन कंपनीची तसेच ग्राहकाची फसवणूक केली आहे. या कारणास्तव दि.22/02/2008 पासून त्यांना सेवेतून कमी केले आहे. तक्रारदारांनी जी पॉलीसी हजर केली ती त्या तारखेला तापेकर यांचा सामनेवालांशी कोणताही संबंध नाही. तसा पॉलीसी विकणेचा अधिकार तापेकर यांना नव्हता. तापेकर व अर्जदार यांनी बोगस पॉलीस तयार केली आहे. सदर पॉलीसी तापेकर यांनी त्यांचे सहीनिशी दिलेली आहे. त्यांचे बेकायदेशीर कृत्यास सामनेवाला कंपनीस जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदाराचे सामनेवालांना पाठविलेल्या नोटीस, पॉलीसी कशी व कोणाकडून आली याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला आहे. सदर नोटीसला सामनेवालांनी दि.24/10/2009 रोजी उत्तर देऊन पॉलीसी रक्कम व प्रपोजल फॉर्म त्यांचेकडे आला नसलेने पॉलीसी देणेचा प्रश्न उदभवत नसल्याचे कळवले होते. तक्रारदार व श्री तापेकर एकमेकांस सामील असून सामेनवालांकडील प्रामाणिक आमजनतेचा पैसा हडप करणेच्या विचारात आहेत. तापेकर यांनी फ्रॉड व चिटींग करुन केलेल्या कामकाजास सामनेवाला कंपनीस जबाबदार धरता येणार नाही. त्यास तापेकर व्यक्तीश: जबाबदार आहेत. तापेकर यांनी आम जनतेची व कंपनीची फसवणूक केली आहे. त्याबाबत सामनेवालांचे शाखा मॅनेजर शशिकांत तिवारी यांचे मार्फत शाहूपुरी पोलीस स्टेशनला 301/2008 नंबरच फिर्याद दाखल झाली होती. मे. मुख्य न्यायदंडाधिकारीसो, कोल्हापूर यांचे कोर्टात रे.क्रि.केस नं.449/2009 ची केस दाखल केली आहे् सबब तक्रारदाराची कोणतीही रक्कम सामनेवालांकडे जमा झालेली नाही. त्यास पॉलीसी दिलेली नाही. पॉलीसी देणेपूर्वी कायदेशीर पूर्तता केली नाही. सबब सामनेवाला यांनी कोणतीही कसूर केलेली नाही. सबब तक्रारदारांना सामनेवालांकडून रक्कम मागणेचा अधिकार नाही. तसेच तक्रारदारांचे तक्रार अर्ज हे अपरिपक्व असे आहेत. त्याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. सबब तक्रारदारांचे तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावेत अशी विंनती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (6) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, उभय पक्षाच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे का? --- होय. 1) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2) तक्रारदार रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? --- होय. 3) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- अ) सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणेमध्ये तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(ड) नुसार ग्राहक व सेवा देणार असे नाते प्रस्थापित होत नसलेचा आक्षेप घेतलेला आहे. याचा विचार करता तक्रारदारांनी प्रिमियमच्या रिसीट प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या आहेत. यावरुन तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत हे निर्विवाद आहे. ब) तक्रारदाराने दाखल केलेली पॉलीसी ही मूलत: चुकीची व बेकायदेशीर आहे. कारण प्रस्तुतची पॉलीसी ही ग्रामीण भागातील लोकांसाठी जाहीर केलेली होती; तसेच पॉलीसी ही रु.100/- एकरकमीची असून पाच वर्षानंतर रु.200/- देणेचे ठरले होते. प्रस्तुतच्या पॉलीसी हया सदर रक्कमेपेक्षा जास्त आहेत. सदरच्या पॉलीसी सामनेवाला कंपनीचे अधिकारी आर.एस.तापेकर यांनी अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन गैरव्यवहार करुन दिलेले आहे. सबब सदरच्या पॉलीसी बेकायदेशीर असलेचा आक्षेप घेतलेला आहे. याचा विचार करता तक्रारदाराने विश्वासाने श्री आर.एस.तापेकर यांचेकडे रक्कमा दिलेल्या आहेत या रक्कमा सामनेवाला ही नामांकित कंपनी आहे. या विश्वासावर दिली असलेने सर्वसामान्य मनुष्यास पॉलीसीबाबत सविस्तर माहिती संबंधीत अधिका-याने न देता दिशाभूल करुन दिली असेल तर त्यासाठी तक्रारदारास जबाबदार धरता येणार नाही. सबब सदरच्या पॉलीसी या बेकायदेशीर आहेत हा सामनेवाला यांनी घेतलेला आक्षेप हे मंच फेटाळत आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता प्रस्तुतच्या तक्रारी या मंचामध्ये चालवणेचा अधिकार या मंचास असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 व 3:- प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी दाखल केलेल्या प्रिमियम रिसीट रक्कमा भरलेबाबत पावत्या दाखल केलेल्या आहेत. प्रस्तुतच्या रक्कमा हया एच.डी.एफ.सी. विमा बचत योजनेअंतर्गत स्विकारले असून त्यासाठी पॉलीसी प्रभावित केलेली आहे. सदर कालावधी हा पाच वर्षाच्या कालावधीकरिता आहे. सदर पावत्यांवर आर.एस.तापेकर एम्लॉई कोड 9228 असून त्यांची सही आहे. तसेच सदर पावत्यांवर ऑथोराईज्ड सिग्नेटरी यांचीही सही दिसून येते. प्रस्तुत रक्कमा हया तक्रारदाराने आपल्या कुटूंबाच्या कल्याणासाठी भरुन पॉलीसी उतरविलेल्या होत्या. सामनेवालांकडे सदर रक्कमेची मागणी करुनही प्रस्तुत रक्कमा देणेबाबत टाळाटाळ केलेने दि.19/09/2009 रोजी वकीलांमार्फत सामनेवालांना नोटीस पाठविलेली आहे. प्रस्तुत नोटीसची सत्यप्रत प्रस्तुत कामी दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी सन-2007 मध्ये रक्कमा गुंतवलेल्या होत्या हे दाखल नोटीसच्या मजकूरावरुन तसेच प्रिमियम रिसीटवरुन दिसून येते. तसेच सामनेवाला यांनीही आपले लेखी म्हणणेमध्ये श्री तापेकर यांनी चिटींग व फ्रॉड करुन ग्राहकांची व कंपनीची फसवणूक केलेली आहे. त्यांचेविरुध्द फौजदारी कारवाई केलेचे नमुद केलेले आहे. वादाचा मुद्दा उपस्थित होतो तो तक्रारदारांनी भरलेल्या वर नमुद रक्कमा या तापेकरांकडे भरलेल्या असून या सामनेवाला कंपनीत भरलेल्या नाहीत. तसेच तक्रारदारांनी कोणतीही कायदेशीर पूर्तता म्हणजे प्रपोजल फॉर्म व प्रिमियम रक्कम इत्यादी केलेले नाही. त्यामुळे सदर रक्कमा कंपनीकडे नसल्याने श्री तापेकरांच्या बेकायदेशीर कृतीसाठी सामनेवाला कंपनीस जबाबदार धरता येणार नाही. युक्तीवादाच्या वेळेस सामनेवालांचे वकीलांनी कर्मचा-यांच्या क्रिमिनल अॅक्टसाठी कंपनीस जबाबदार धरता येणार नाही असे प्रतिपादन केलेले आहे. कारण तापेकरांनी केलेली कृती ही त्यांचे अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन केली असलेने त्यास सामनेवाला कंपनी जबाबदार असणार नाही. वादाकरिता अशी जबाबदारी निश्चित करावयाची झालेस ती रु.100/- एक रकमी पॉलीसीप्रमाणे परतावा रक्कम रु.200/- इतकीच मर्यादित राहील असे युक्तीवादाच्या वेळेस सामनेवालांचे वकीलांनी प्रतिपादन केले आहे. तसेच प्रस्तुतचे अर्ज हे अपरिपक्व आहेत. (प्रिमॅच्यूर) सदर पॉलीसीच्या मुदती या सन-2012 मध्ये संपतात. मुदतीपूर्वीच प्रस्तुतचा अर्ज दाखल असलेने तो चालणेस पात्र नसलेचे युक्तीवादाच्या वेळेस प्रतिपादन केलेले आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदारांनी नमुद रक्कमा भरल्या त्यावेळी तापेकर सामनेवालांचे कर्मचारी म्हणून काम करत होते. तसेच सदर पावत्यांवर तापेकरांचेबरोबरच ऑथोराईज्ड सिाग्नेटरीची सही आहे. सर्वसामान्य माणसाला प्रस्तुत कर्मचारी हा पुढे फ्रॉड अथवा चिटींग करणार असलेचे माहिती असणेचे कारण नाही. तसेच त्याला कोणते अधिकार दिले याचीही माहिती असत नाही. नमुद विमा कंपन्यांनी आपल्या व्यवसाय वाढीसाठी विविध प्रकारे जाहिरात करुन ग्राहकांचा विश्वास संपादन करुन त्यांचे कर्मचा-यांमार्फत ग्राहक मिळवत असतात व प्रस्तुत कर्मचारी हे नमुद कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी असलेने त्यांचेवर विश्वास ठेवून पॉलिसी घेतल्या जातात व आर्थिक व्यवहार केले जातात. अशा प्रकारचा व्यवहार तक्रारदारांनी कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी/कर्मचारी म्हणून श्री तापेकरशी केलेला आहे. यामध्ये तक्रारदारांचा कोणताही दोष नाही. तदनंतर श्री तापेकर यांनी फ्रॉड अथवा चिटींग केले असेल अथवा त्यांना कामावरुन काढून टाकले असेल म्हणून तक्रारदारांनी कंपनीशी केलेल्या व्यवहारापोटीच्या रक्कमा वर नमुद कारणाखाली देता येणार नाहीत असे कळवणे ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. वादाकरिता तापेकरांनी असा फ्रॉड केलेला आहे. त्यांचेवर फौजदारी झाली आहे. त्यांना कामावरुन काढून टाकले आहे. सदर घटना घडणेपूर्वी तक्रारदाराने गुंतवणूक केलेली आहे. सबब रक्कम देण्याचेवेळी कर्मचा-याच्या फ्रॉडचा आधार सामनेवालांना घेता येणार नाही. सबब व्हिकॅरस लायबलेटी तत्वाचा विचार करता प्रस्तुत रक्कमा देणेस सामनेवाला कंपनी जबाबदार आहे. ही जबाबदारी टाळणेचा प्रयत्न सामनेवाला कंपनीने करुन सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे. सामनेवाला यांचे वकीलांनी युक्तीवादाच्या वेळेस त्यांचे कर्मचारी श्री तापेकर यांचे क्रिमिनल अॅक्टसाठी कंपनीस जबाबदार धरता येणार नाही असे प्रतिपादन केलेले आहे. याचा विचार करता सामनेवाला कंपनीच्या नमुद कर्मचा-याने केलेल्या फ्रॉडसाठी तक्रारदारांना जबाबदार धरता येणार नाही. यात तक्रारदारांचा कोणताही दोष नाही. सामनेवाला कंपनी व तिचे कर्मचा-यांनी केलेला फ्रॉड हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्याबाबत सामनेवाला कंपनी त्याविषयी कार्यवाही केलेली आहे. सबब सामनेवाला कंपनीची रक्कमा देणेचे उत्तरदायित्वातून या कारणास्तव मुक्तता होणार नाही या निष्कषाप्रत हे मंच येत आहे. सामनेवालांचे वकीलांनी युक्तीवादाच्या वेळेस वादाकरिता क्षणभर अशा पॉलीसीज दिलेचे ग्राहय धरले तरी पॉलीसीच्या मुदती अजून संपल्या नसलेचे प्रतिपादन केलेले आहे. तक्रारदारांच्या पावत्यांच्या मुदती संपणेसाठी अदयाप एक वर्ष बाकी आहे. सबब प्रस्तुतचे अर्ज हा अपरिपक्व आहे असे प्रतिपादन केले आहे. याचा विचार करता सबब पाच वर्षाचे मुदतीसाठी दामदुप्पट रक्कम देय होती. सबब आजअखेर अंदाजे 4 वर्षे पूर्ण झालेली आहेत. मात्र तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीचे श्री तापेकर यांचेबाबत दैनिकामध्ये बातम्या प्रसिध्द केल्यामुळे तक्रारदारास अविश्वास निर्माण झालेने तक्रारदारांनी प्रस्तुत रक्कमांची मागणी केलेली आहे. याचा विचार करता सर्व तक्रारदार नमुद रक्कमा भरणा केले तारखेपासून व्याजासह रक्कमा मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3 :- वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवालांनी तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीस वेगवेगळे कारण घडलेले आहे व तक्रारदार वेगवेगळे आहेत. तक्रार अर्ज प्रि मॅच्यूअर आहे, कर्मचा-याने फ्रॉड केला त्यामुळे प्रस्तुतच्या तक्रार चालणेस पात्र नाही इत्यादी सामनेवालांनी घेतलेले आक्षेप हे मंच फेटाळत आहे. सामनेवाला यांनी प्रस्तुत रक्कमा तक्रारदारांस अदा न करुन केलेल्या सेवात्रुटीमुळे प्रत्येक तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला कंपनीने खालीलप्रमाणे प्रत्येक तक्रारीतील तक्रारदारास तक्रारदारास रक्कम अदा करावी ग्राहक तक्रार क्र.355/2011 मधील तक्रारदारास पॉलीसी क्र.11545577244 व 6644332129 च्या अनुक्रमे रक्कमा रु.10,000/-व रु.1,000/- अदा करावेत. सदर रक्कमेवर अनुक्रमे दि.07/12/2007 व 05/03/2007 रोजी पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 % व्याजासह अदा करावेत. ग्राहक तक्रार क्र.356/2011 मध्ये तक्रारदारास पॉलीसी क्र.11431573506 ची रक्कम रु.10,000/- अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.02/08/2008 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 % व्याजासह अदा करावेत. ग्राहक तक्रार क्र.357/2011 मध्ये तक्रारदारास पॉलीसी क्र.6644332197 ची रक्कम रु.15,000/- अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.20/04/2007 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 % व्याजासह अदा करावेत. ग्राहक तक्रार क्र.358/2011 मध्ये तक्रारदारास पॉलीसी क्र.11431571507 ची रक्कम रु.15,000/- अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.10/11/2007 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 % व्याजासह अदा करावेत. ग्राहक तक्रार क्र.359/2011 मध्ये तक्रारदारास पॉलीसी क्र.11545577225 ची रक्कम रु.5,000/-अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.29/11/2007 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 % व्याजासह अदा करावेत. ग्राहक तक्रार क्र.360/2011 मध्ये तक्रारदारास पॉलीसी क्र.11431571510 ची रक्कम रु.10,000/- अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.22/07/2008 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 % व्याजासह अदा करावेत. ग्राहक तक्रार क्र.361/2011 मध्ये तक्रारदारास पॉलीसी क्र.11431571515 ची रक्कम रु.50,000/- अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.18/12/2007 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 % व्याजासह अदा करावेत. 3) सामनेवाला यांनी प्रत्येक तक्रारीमध्ये मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |