(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 02/11/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.20.11.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार त्याने टाटा 909, आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन नं.एमएच-40/एन-0318 या वाहनाचा मालक असुन सदरचे वाहन गैरअर्जदारांकडे मालवाहू वाहन म्हणून पॉलिसी क्र. व्ही.जी.0057055000100 नुसार दि.11.09.2009 ते 10.09.2010 या कालावधीकरीता कॉम्प्रेंसिव्ह पॉलिसी अंतर्गत रु.7,00,000/- एवढया रकमेकरीता विमाकृत होते. त्याकरीता तक्रारकर्त्याने रु.14,267/- एकूण प्रिमियम गैरअर्जदारांकडे अदा केला होता. सदर वाहन आर.टी.ओ. कडे एल.सी.व्ही. म्हणून नोंदणीकृत असुन त्याचे रिकामे (Unloaded) वजर 3260 किलोग्रॅम एवढे नमुद आहे. तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार सदरचे वाहन हे Light Motor Vehicle (LMV) आहे. सदरच्या वाहनाचा दि.04.08.2010 रोजी काटोल रोड, नागपूर येथे एका ट्रकने Overtake केल्यामुळे अपघात झाला. सदरच्या वाहनाचा चालक श्री. रोहीत राकसे यांनी ताबडतोब अपघाताची सुचना देऊन दि.05.08.2010 रोजी पोलिस स्टेशन, गिट्टीखदान, नागपूर येथे रिपोर्ट दाखल केला व संबंधीत पोलिस अधिका-यांनी पंचनामा करुन सदर अपघाताची किरकोळ अपघात म्हणून नोंद केली. तक्रारकर्त्याने दि.05.08.2010 रोजी क्षतीग्रस्त वाहन मे. नांगीया मोटर्स यांचेकडे हलवुन तशी सुचना गैरअर्जदाराला दिली. गेरअर्जदारांचे सर्वेअर यांनी दि.12.08.2010 रोजी रु.4,03,752/- संभाव्य खर्चाचा तपशिल क्लेमर्फार्मसह गैरअर्जदारांकडे पाठविला तसेच आवश्यक ती कागदपत्रे गैरअर्जदारास सादर केलीत. परंतु गैरअर्जदारांनी क्षतीग्रस्त वाहन दुरुस्त करण्यासंबंधी सुचना न दिल्यामुळे ते वाहन तसेच नांगीया मोटर्सकडे पडून राहीले व रु.2,007/- प्रति दिवस प्रमाणे पार्कींग चार्जेस पडलेत. गैरअर्जदारांनी सदरचे वाहन हे passenger carrying commercial vehicle असुन चालकाजवळ LMV परवाना असल्यामुळे चालकाजवळ योग्य परवाना नाही, या कारणास्तव तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केला व तसे दि.30.06.2010 च्या पत्राव्दारे तक्रारकर्त्यास कळविले. त्यामुळे तक्रारकर्त्याने क्षतीग्रस्त वाहन सुटे भाग इतरत्र खरेदी करुन दुरुस्त करुन घेतले व त्याकरीता त्याला रु.3,34,406/- एवढा खर्च आला. गैरअर्जदारांनी आरटीओ, नागपूर येथे Light commercial vehicle असे सदरच्यावाहनाचे वर्गीकरण केले असतांना, वाहनाचे चुकीचे वर्गीकरण करुन गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचा दावा नाकारला म्हणून झालेल्या खर्चाची परतफेड व भरपाईकरीता त्याने सदरची तक्रार मंचापूढे सादर केलेली आहे.
3. गैरअर्जदाराने आपल्या जबाबत हे भाष्य केले की, तक्रारकर्त्याचे वाहनाला दि.04.08.2010 रोजी अपघात झाला व क्षतीग्रस्त वाहनाचा तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे विमा दि.11.09.2009 ते 10.09.2010 या कालावधीकरीता विमा उतरविलेला होता. परंतु गैरअर्जदारांने तक्रारकर्त्याचे इतर आरोप अमान्य केलेले आहेत. गैरअर्जदाराचे मते सदरचे वाहनाची आरटीओ, नागपूर येथे नोंदणी Light Motor Vehicle (LMV) म्हणून आहे, परंतु विमा उतरविलेल्या पत्रात ते GCV म्हणून त्याचा उल्लेख आहे. सदर वाहनाचे वजन स्थुलमानाने 1000 किलोग्रॅम आहे व त्याची वर्गवारी “Medium Commercial Vehicle” (MCV), म्हणून येते. सदर वाहनाचे चालकाजवळ अपघाताचे वेळी MCV चा परवाना नव्हता. वाहनाचे वर्णन “Public Commercial Vehicle” म्हणून चुकून विमा पॉलिसीत नोंदवण्यांत आला आहे हे तक्रारकर्त्याचे विधान गैरअर्जदाराने अमान्य केले असुन तक्रारकर्त्याने तसे कधी या आधी गैरअर्जदाराला कळविले नव्हते. गैरअर्जदाराचे मते सदरचे वाहन हे “Medium Commercial Vehicle” या वर्गात येते, कारण वाहनाचे वजन Registration Certificate नुसार 9050 किलोग्रॅम आहे व Motor Vehicle Act च्या कलम 2(21) नुसार जर वाहनाचे वजन 7500 किलोग्रॅम पेक्षा जास्त असेल तर त्या वाहनाचे “Medium Commercial Vehicle” म्हणून वर्गीकरण होते. वाहन चालकाजवळ योग्य तो वाहन परवाना नव्हता व त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग झाला आहे. त्यामुळे विमा क्लेम नाकारण्याची गैरअर्जदारांची कृति योग्यच आहे.
तक्रारकर्त्याने दिलेला वाहन ठेवण्याचे शुल्क व दुरुस्तीकरीता आलेला खर्च गैरअर्जदाराने अमान्य केलेला असुन सदरची तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे.
4. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 16 च्या छायांकीत प्रती पान क्र.8 ते 44 वर जोडलेल्या आहेत.
5. सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्तीवादाकरीता दि.1.09.2011 रोजी आली असता दोन्ही पक्षांचे वकील हजर मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला व तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
6. सदरच्या प्रकरणामध्ये निर्वीवादपणे तक्रारकर्त्याने गेरअर्जदारांकडे त्याच्या मालकीच्या टाटा 909, आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन नं.एमएच-40/एन-0318 या वाहनाचा विमा गैरअर्जदाराकडे उतरविला होता व विम्याचा कालावधी दि.11.09.2009 ते 10.09.2010 असा होता (दस्तावेज क्र.4) तसेच सदरच्या वाहनाला दि.04.08.2010 रोजी अपघात झाला व तयासंबंधीचा विमा क्लम तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे सादर केला, हे उभय पक्षांनी मान्य केलेले आहे.
7. या तक्रारीतील महत्वाचा वादाचा मुद्दा हा आहे की, सदरचे वाहनाचे विमा पॉलिसीतील व आरटीओ नोंदणीबुकातील वर्गीकरण बरोबर आहे काय ? व वाहन ज्या वर्गात मोडते त्याचा परवाना वाहन चालकाजवळ अपघाताचे वेळी होता काय ?
8. दस्तावेज क्र.4 वरील विमा पॉलिसीवरुन स्पष्ट दिसते की, विमा पॉलिसीमध्ये क्षतिग्रस्त वाहनाचे वर्गीकरण “Public Commercial Vehicle” असे केलेले आहे. परंतु दस्तावेज क्र.24 वरील सदरच्या आरटीओ नोंदणी पत्रकामधे वाहनाचे रिकामे वजन 3260 किलोग्रॅम आहे, तर Gross वजन 9050 कीलोग्रॅम आहे. Motor Vehicle Act च्या कलम 2(21) नुसार जर एखादे वाहनाचे रिकामे वजन 7500 किलोग्रॅम असेल तर ते वाहन Light Motor Vehicle (LMV) या वर्गात मोडते. आरटीओ च्या नोंदणी पत्रकातील वाहनाच्या रिकाम्या वजणाचा विचार करता सदरचे वाहन हे Light Motor Vehicle (LMV) या वर्गात यावयास पाहीजे. कारण तीचे रिकामे वजन 3260 किलोग्रॅम नमुद केलेले आहे. परंतु विमा पॉलिसीमध्ये वाहनाचे वर्गीकरण “Public Commercial Vehicle” असे केलेले आहे. व्हेईकल नंबर व इतर वाहनाच्या बाबी मात्र बरोबर आहे.
9. आरटीओ च्या नोंदणी पत्रकामध्ये सदरचे वाहन हे Light Commercial Vehicle (LCV) म्हणून दाखविलेले आहे व चालकाजवळ अपघाताचे वेळी LMV-TR परवाना होता (पान 17) म्हणजेच चालकाजवळ अपघाताचे वेळी योग्य वाहन परवाना होता, असे म्हणावे लागेल. विमा पॉलिसीमध्ये वाहनाचे वर्गीकरण चुकून लिहील्या गेले या तांत्रीक कारणावरुन तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारणे संयुक्तिक होणार नाही. तेव्हा वाहकाजवळ योग्य तो वाहन परवाना नव्हता या कारणास्तव विमा दावा नाकारण्याची गैरअर्जदारांचे कृति सेवेतील कमतरता आहे.
10. तक्रारकर्त्याने सादर केलेल्या पान क्र.8 वरील वाहनचालकाचा रिपोर्ट, पान क्र.12 वरील पंचनामा यावर वाहनाचे नुकसान अंदाजे रु.50,000/- झाल्याचे नमुद केलेले आहे. गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या बिलावरुन वाहनाचे नुकसान अधिक झाल्याचे दिसुन येते, परंतु तक्रारकर्त्याने केलेल्या रकमेइतकी खर्चाची मागणी प्रकरणातील वस्तुस्थितीत पाहता मान्य करणे योग्य होणार नाही. तेव्हा वरील वस्तुस्थितीचा विचार करता वाहनाचे दुरुस्तीच्या खर्चापोटी रु.1,30,000/-य एवढी रक्कम तक्रारकर्त्यास देणे योग्य राहील, असे मंचाचे मत आहे,
वरील सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास वाहन दुरुस्तीसाठी आलेला खर्च रु.1,30,000/- एवढी रक्कम दि. 30.08.2011 पासुन ते प्रत्यक्षात रक्कम मिळे पर्यंत द.सा.द.शे. 9% दराने व्याजासह परत करावी.
3. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावे.