Maharashtra

Nagpur

CC/11/83

M/s. New Gulwill Tours and Travels Through Sheikh Harun - Complainant(s)

Versus

HDFC Irgo General Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv.Shabana Karim

21 Mar 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/83
 
1. M/s. New Gulwill Tours and Travels Through Sheikh Harun
Habaib Mazil, Rambag Road, Ganesh Peth, Near Bus Stand,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. HDFC Irgo General Insurance Co.Ltd.
6th floor, Leela Business Park, Andheri Kurla Road, Andheri, Mumbai and Shriram Tower, Sadar Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv.Shabana Karim, Advocate for the Complainant 1
 Adv.C.B.Pande, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

श्री नरेश बनसोड, सदस्‍य यांचे कथनांन्‍वये.
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 21/03/2012)
 
1.           तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल करुन मंचास मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने वाहनाच्‍या नुकसानीच्‍या फरकाची रक्‍कम रु.88,558/- व आग विझविण्‍याकरीता आलेला खर्च, शारिरीक व मानसिक त्रासाचा खर्च, तक्रारीचा खर्च अशी एकूण रु.2,00,938/- ची मागणी केली.
2.          तक्रारकर्त्‍याची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, तो एम एच 31 सी क्‍यू 3592 या आयशर कंपनीच्‍या मीनीबसचा मालक आहे व प्रवासी वाहतूक करतो. त्‍यातून येणा-या उत्‍पन्‍नातून कुटुंबांचे एकमेव पालनपोषणाचे साधन आहे. सदर वाहनाचा पॉलिसी क्र. 2314200003601600003 असून त्‍याचा विमा अवधी 26.02.2010 ते 25.03.2011 पर्यंत वैध होता. सदर वाहनाचे सै.मुश्‍ताक सै.मुक्‍कदर यांनी 11.08.2010 रोजी मुक्‍काम मौजा वणी, ता.वणी, जिल्‍हा यवतमाळ येथे वरोरा रोडवर घराजवळ वाहन उभे केले होते. वाहनास अचानक आग लागली व ती विझविण्‍याचा प्रयत्‍न केला. तसेच अग्‍नीशामक दलास पाचारण केले व आगीमध्‍ये वाहनाचे बरेच नुकसान झाले. त्‍याची सुचना तक्रारकर्त्‍याने पोलिस स्‍टेशन वणी येथे दिली. तसेच गैरअर्जदारास विनाविलंब सुचना दिली.
            गैरअर्जदाराने नियुक्‍त सर्व्‍हेयरमार्फत वाहन निरीक्षण व घटनेची चौकशी पूर्ण केली व अपघातग्रस्‍त वाहन गीरनार मोटर्स, नागपूर अधिकृत सर्व्‍हीस स्‍टेशन येथे दुरुस्‍त करावे असे सुचविल्‍याने, तक्रारकर्त्‍याने ते वाहन तेथे दुरुस्‍त केले. तक्रारकर्त्‍याने वाहन दुरुस्‍तकरीता रु.2,58,258/- चा खर्च आला, त्‍यामध्‍ये लेबर चार्जेस, सुटे भाग इ. चा समावेश आहे. ही रक्‍कम गैरअर्जदाराने गीरनार मोटर्स यांना परस्‍पर द्यावयास पाहिजे होते. वाहन दुरुस्‍तीचा खर्च तक्रारकर्त्‍याने गीरनार मोटर्स यांना अदा केला, तरीहीसुध्‍दा तक्रारकर्त्‍याची कायदेशीर विमा दाव्‍याची रक्‍कम रु.2,58,258/- पैकी रु.1,69,500/- चा धनादेश दिला. तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराकडे उर्वरित विमा दाव्‍याची रक्‍कम रु.88,558/- व आग‍ विझविण्‍याच्‍या खर्चाची मागणी केली व मागणीनुसार रक्‍कम न मिळाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक त्रास सहन करावा लागला. तसेच गैरअर्जदाराने उर्वरित विमा दाव्‍याची रक्‍कम मान्‍य केली नाही. सोबत दस्‍तऐवज हे पृष्‍ठ क्र. 6 ते 29 वर दाखल केलेले आहेत.
 
3.          गैरअर्जदारांनी आपल्‍या लेखी उत्‍तरातील प्राथमिक आक्षेपात म्‍हटले की, तक्रारकर्त्‍याचा दावा योग्‍य ती छाननी व पडताळणी करुन 09.12.2010 रोजी निकाली काढला. त्‍यांचे परवानाधारक सर्व्‍हेयर श्री. वडस्‍कर यांनी वाहनाची छाननी करुन नुकसानीचे मुल्‍यांकन करुन विमा पत्रांतर्गत पात्र रक्‍कम रु.1,69,500/- दि.09.12.2010 रोजी तक्रारकर्त्‍याला धनादेशाद्वारे फुल अँड फायनल सेटलमेंट म्‍हणून अदा केली व तक्रारकर्त्‍याने त्‍यावर कुठलाही आक्षेप न घेता स्विकृत केली, त्‍यामुळे सदर तक्रार मंचासमोर चालविण्‍यास योग्‍य नाही व प्रींसीपल ऑफ ईस्‍टापेलच्‍या (Principle of Estoppels)  तत्‍वानुसार ग्राह्य नाही व त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी नाही. गैरअर्जदाराने सर्वोच्‍च न्‍यायालयाचे व राष्‍ट्रीय आयोगाचे निकालपत्रानुसार सदर तक्रार खर्चासह खारीज करण्‍याची मागणी केली. गैरअर्जदाराने सदर तक्रार ही गैरकायदेशीरीत्‍या फायदा मिळविण्‍याकरीता असून विचाराअंती दाखल केलेली असल्‍याने योग्‍य नाही. गैरअर्जदाराने नमूद केले की, प्रस्‍तुत प्रकरणातील व्‍यवहार हा विमापत्र व्‍यावसायिक वापराचे वाहनाकरीता घेतलेला आहे. तक्रारकर्ता ट्रांसपोर्ट व्‍यवसायी असल्‍याने ग्राहक संज्ञेत मोडत नाही. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे खोटे असल्‍याचे कथन करुन नाकारले व गैरअर्जदाराने सर्व्‍हेयरने केलेल्‍या मुल्‍यांकनानुसार रु.1,69,500/- फुल अँड फायनल सेंटलमेंट “Full & Final settlement” म्‍हणून तक्रारकर्त्‍यास दिले. त्‍यामुळे सदर तक्रार खारीज करण्‍याची मागणी केली.
 
 
4.          तक्रारकर्त्‍याने प्रतिउत्‍तरात नमूद केले की, गैरअर्जदाराने कोणतेही सक्षम कारण न दर्शविता नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी असतांना विमा दावा रु.2,58,058/- पैकी रु.1,69,500/- तक्रारकर्त्‍यास दिले व गैरअर्जदाराने अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला.
 
5.          गैरअर्जदाराने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ सर्व्‍हेयरचा मुल्‍यांकन अहवाल, पंचानामा, पोच इ. पृष्‍ठ क्र. 50 ते 61 वर दाखल केले.
 
 
-निष्‍कर्ष-
6.          मंचाने तक्रारकर्त्‍याचे वकिलांचा युक्‍तीवाद ऐकला. गैरअर्जदार गैरहजर. मंचाने दाखल दस्‍तऐवजांचे व लेखी युक्‍तीवादाचे सुक्ष्‍म अवलोकन केले. गैरअर्जदाराने आपल्‍या उत्‍तरात आक्षेप घेतला की, तक्रारकर्ता हा ट्रासंपोर्ट व्‍यवसाय करतो व सदर वाहनाचा वापर व्‍यावसायिक वापरासाठी करत असल्‍याने तो गैरअर्जदाराचा ग्राहक ठरत नाही व तक्रार खारीज करण्‍याची मागणी केली. तक्रारकर्त्‍याने तक्रारीचे सुरुवातीसच स्‍पष्‍ट केले की, विमाकृत मिनी बस ही प्रवासी वाहतूक करण्‍याकरीता होती व त्‍याचे उत्‍पन्‍न एकमेव तक्रारकर्त्‍याचे उत्‍पन्‍नाचे साधन असून, त्‍यावर कुटूंबाचे पालनपोषण करतो. तक्रारकर्त्‍याने वाहनाचे घेतलेले विमापत्र हे अतिरिक्‍त नफा/लाभ मिळविण्‍यासाठी घेतलेले नव्‍हते व सदर वाहनास अपघात इतर कारणाने नुकसान झाल्‍यास ते नुकसान भरुन काढण्‍याकरीता विमापत्र घेतले होते. राष्‍ट्रीय आयोगाने मे. हरसोलिया मोटर्स वि. नॅशनल इंशुरंस कंपनी, 2005 (1) सीपीजे 27 (एनसी) या निकालपत्रात वाहन विमाबाबतची वस्‍तूस्थिती नमूद केली त्‍यानुसार गैरअर्जदाराचे कथन तथ्‍यहीन ठरते.
7.          सदर वाहनाचे अपघातानंतर गैरअर्जदाराने श्री प्रमोद वडस्‍कर या सर्व्‍हेयर मार्फत नुकसान भरपाईचे मुल्‍यांकन करुन घेतले व त्‍या मुल्‍यांकनानुसार गैरअर्जदाराने 09.12.2010 रोजी फुल अँड फायनल सेंटलमेंट म्‍हणून तक्रारकर्त्‍यास रु.1,69,500/- चा धनादेश पाठविला, सदर रकमेवर तक्रारकर्त्‍याने आक्षेप वा उजर न करता स्विकृत केला, त्‍यामुळे प्रींसीपल आफ इस्‍टॉपेलच्‍या (Principle of Estoppels)  तत्‍वानुसार मागणी ग्राह्य नाही व त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी नाही. गैरअर्जदाराने आपल्या म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ पृ.क्र.67 ते 85 वरील चार निकालपत्रे दाखल करुन तक्रार चालविण्‍यास पात्र नसल्‍याची मागणी केली.
 
1)   Appeal (civil) 619 of 2005 National Insurance Company Ltd. Vs. Nipha Exports   Pvt. Ltd.
2)    Appeal (civil) 1602 of 2008 National Insurance Company Ltd. Vs. Sehtia Shoes
3)    Oroginal Petition No. 131 of 2001 The Swan Energy Limited Vs. The New India Assurance Co. Ltd.
4)      526 of 2010 Sunil Goyal Vs. K.A.Somshekaran, Distirct Forum, Nagpur order.
 
तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रारीत परिच्‍छेद क्र. 9 मध्‍ये उर्वरित विमा दावा रकमेची मागणी केली एवढेच नेमके नमूद केले. परंतू उर्वरित विमा दाव्‍याची मागणी केव्‍हा केली व त्‍याबाबतचा पत्रव्‍यवहार/वस्‍तूनिष्‍ठ पूरावा मंचासमोर सादर केलेला नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने उर्वरित दावा रकमेची मागणी केली होती हे म्‍हणणे मंचास संयुक्‍तीक वाटत नाही. गैरअर्जदाराने पृष्‍ठ क्र. 25 व 26 वर दाखल दस्‍तऐवजावर खालीलप्रमाणे नमूद आहे.
 
“In the event enclosed cheque/Draft is deposited in your Bank Account, It will be understood that you have accepted the amount and given your discharge for the same in full and final settlement of the amount due to you.
 
If the enclosed amount is not acceptable to you, please do not deposit the cheque/Draft into you bank account and return to the same to HDFC Ergo Gen. Ins.Co. Ltd./O.P., along with a letter giving reason for non acceptance.”
 
तक्रारकर्त्‍याने विमा दाव्‍यापोटी प्राप्‍त झालेला धनादेश खात्‍यात जमा करुन रक्‍कम प्राप्‍त केली, त्‍यामुळे फुल अँड फायनल सेंटलमेंट म्‍हणून तक्रारकर्त्‍याने रक्‍कम प्राप्‍त केली, असे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याचे हे म्‍हणणे नाही की, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याशी बेकायदेशीर व्‍यवहार करुन, दडपण आणून किंवा चुकीची माहिती देऊन विमा दावा निकाली काढलेला आहे. तसेच गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या निकालपत्रात प्रमाणित केल्‍याप्रमाणे, तक्रारकर्त्‍याची तक्रार मंचासमोर प्रींसीपल ऑफ ईस्‍टॉपेलच्‍या (Principle of Estoppels)  तत्‍वानुसार खारीज होण्‍यास पात्र आहे. म्‍हणून सदर तक्रार खारीज करण्‍यात येते.
 
-आदेश-
1)          तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2)          उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्‍वतः वहन करावा. 
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.