आदेशः- एम.वाय.मानकर अध्यक्ष द्वारा.
तक्रारदार यांचे वकील मिस. राधीका दवे हजर.
यांना पिक्युनरी अधिकार क्षेत्राबाबत ऐकण्यात आले.
तक्रार व त्यासोबत दाखल करण्यात आलेली कागदपत्रे पाहण्यात आली. तक्रारदारानी ही तक्रार विमा पॉलीसी अंतर्गत दाखल केलेली आहे व जवळपास 18,00,000/-,(अठरा लाख )नुकसान भरपाई, व्याज व खर्चासह मागीतली आहे. तक्रारदार यांनी घेतलेली विमा पॉलीसी ती Insured Value अंदाजे 15,00,000/-,(पंधरा लाख) आहे. सबब, सेवेचे मुल्य व मागणी केलेली रक्कम विचारात घेता ही रक्कम 20,00,000/-,(वीस लाख) पेक्षा जास्त होते. ग्रा.सं.कायदयाच्या कलम 11 प्रमाणे या मंचाचे अधिकार क्षेत्र रू. 20,00,000/-,(वीस लाख) पर्यंत मर्यादित आहे. सबब ही तक्रार या मंचात चालु शकत नाही. मा. राष्ट्रीय आयोगानी प्रथम अपील क्र 1194/2016 संतोष आर्या विरूध्द इमार एम.जी.एफ लॅण्ड लि. निकाल तारीख 07/10/2016 चा आधार घेत आहोत. सबब खालील आदेश.
आदेश
1 तक्रार क्र 380/2016 ही पिक्युनरी अधिकार क्षेत्राअभावी तक्रारदार यांना परत करण्यात येते.
2. तक्रारदारानी लिमीटेशनच्या तरतुदींच्या अधीन राहून योग्य त्या मा.आयोगात/न्यायालयात तक्रार दाखल करावी.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
4. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात यावे.
5. अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
npk/-