Complaint Case No. CC/789/2021 | ( Date of Filing : 21 Dec 2021 ) |
| | 1. KUMAR KRUSHNARAO SAWWASHERE | R/O. FLAT NO.D-2/3, RADHAKRISHNA APARTMENT, WARDHA ROAD, NEAR STATE BANK OF INDIA, JAYPRAKASH NAGAR, SOMALWADA, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. HDFC ERGO GENERAL INSURANCE CO. LTD. | OFF.AT, 1ST FLOOR, HDFC HOUSE, 165/166, BACKBAY RECLAMATION, HT PAREKH MARG, CHURCHGATE, MUMBAI-400020 AND ALSO AT- D-301, 3RD FLOOR EASTERN BUSINESS DISTRICT MAGNET MALL LBC MARG BHANDUP (WEST) MUMBAI-400078 | MUMBAI | MAHARASHTRA | 2. HDFC ERGO GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH MANAGER | B WING, 5TH FLOOR, SHRIRAM TOWER, NEAR NIT BUILDING, KINGSWAY, SADAR, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. अध्यक्ष, श्री. सचिन शिंपी यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, तक्रारकर्त्याने टाटा मोटर्स कंपनीचा टाटा एल.पी.टी. 3118 CR BS IV, रजि. नं. ट्रक क्रं. MH-31,FC-3391 या वाहनाचा विरुध्द पक्षाकडून दि. 10.01.2020 ते 09.01.2021 या कालावधीकरिता विमा पॉलिसी विमामुल्य रक्कम रुपये 29,15,100/- करिता विमाकृत केले होते.
- पॉलिसी कालावधी दरम्यान तक्रारकर्त्याचा ड्रायव्हर शेख रहीम शेख गफार नागपूर येथून बुटीबोरी येथे जात असतांना वाहनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सदरचे वाहन नाईलाजास्तव नवीन रिंग रोड, विहिरगांव पुलाजवळ रस्त्याच्या बाजूने योग्यरित्या काळजीपूर्वक सुरक्षित ठिकाणी लॉक करुन ट्रक उभा केला असता तो दि. 01.09.2020 ते 02.09.2020 च्या दरम्यान चोरीस गेला. दि. 02.09.2020 रोजी सकाळी तक्रारकर्ता, त्याचा मुलगा आणि ड्रायव्हर हे ज्या ठिकाणी ट्रक उभा केला होता त्या ठिकाणी ट्रक पाहणी करिता गेले असता जागेवर ट्रक आढळून आला नाही. म्हणून ट्रकचा शोध घेतला, त्यानंतर ही ट्रक मिळून न आल्यामुळे याबाबत विरुध्द पक्षाच्या टोल फ्रि क्रं. 022-62346234 वर संध्यांकाळी 5.30 मी. ने सुचना दिली असता विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला SMS द्वारे ट्रक चोरीबाबत सुचना मिळाल्याचे क्लेम नं. C230020123990 रजिस्टर्ड झाल्याचे कळविले व त्यानंतर धीरज निंबारे यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती केली. त्याबाबतचे SMS.ची प्रत तक्रारी सोबत जोडली आहे. तक्रारकर्ता हुडकेश्वर पोलिस स्टेशन येथे फिर्याद देण्यास गेला असता पोलिसांनी फिर्याद घेण्यास नकार दिल्यामुळे तक्रारकर्त्याने पोलिस उपआयुक्त यांच्याकडे ट्रक चोरीबाबतची दि. 04.09.2020 रोजी लेखी पत्राद्वारे तक्रार दिली. त्यानंतर बरेच प्रयत्न केल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी दि. 12.10.2020 रोजी ट्रक चोरीबाबत फिर्याद क्रं. 463/2020 असा नोंदविण्यात आला. तसेच पोलिसांना देखील चोरीस गेलेला ट्रक मिळून न आल्याने न्यायालयात दि. 31.05.2021 रोजी अ-समरी रिपोर्ट दाखल करण्यात आला. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन विमा दावा मिळण्याकरिता प्रस्ताव सादर केला असता, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा सदरचे वाहन योग्यरित्या व सुरक्षित ठिकाणी पार्किंग न केल्याचे कारण नमूद करुन दि. 08.09.2021 रोजी नाकारला. तक्रारकर्त्याने सदरचे वाहन खरेदीकरिता बॅंकेतून कर्ज घेतले असून विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा कायदेशीररित्या देय असलेला विमा दावा नाकारल्यामुळे तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसान होत आहे. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन विमा दावाप्रमाणे वाहनाची विमामुल्य रक्कम रुपये 29,15,100/- व्याजासह देण्याचा, तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा.
- विरुध्द पक्षाने आपल्या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून विमा पॉलिसी घेतली होती व पॉलिसी कालावधी दरम्यान वाहन चोरीस गेले ही बाब विवादित नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील इतर सर्व मजकूर मुद्दे निहाय नाकारलेला आहे. तक्रारकर्त्याने वाहन चोरीबाबत विरुध्द पक्षाला 3 दिवस उशिराने कळविले असून वाहन चोरीबाबत फिर्याद 72 दिवसांनी उशिरा दिली आहे. वाहन ज्यावेळेस चोरीला गेले, त्यावेळी तक्रारकर्त्याने वाहन असुरक्षित ठिकाणी पार्किंग केले होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडे वाहनाच्या चावीची मागणी केली असता तक्रारकर्त्याने वाहनाची जी चावी विरुध्द पक्षाकडे दिली होती त्या चावीची Investigation दरम्यान ICS Assure Services Pvt. Ltd. यांच्या मार्फत (Forensic examination) फॉरेन्सीक तपासणी केली असता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे दिलेली चावी ही ओरिजनल नसल्याचे त्या रिपोर्टवरुन स्पष्ट झाले. तक्रारकर्त्याने ट्रक चोरीबाबत विलंबाने फिर्याद दिली, तसेच वाहन योग्य प्रकारे सुरक्षित ठिकाणी पार्क केले नाही, त्यामुळे पॉलिसीतील अटी शर्तींचा भंग झाल्याने सदरचा विमा दावा योग्य त्या कारणाने नाकारण्यात आला आहे. म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्षाने जबाबा सोबत पॉलिसीची कव्हर नोट, तक्रारकर्त्यास पाठविलेले पत्र, तसेच फॉरेन्सीक लॅबचा चावी तपासणीबाबतचा अहवाल दाखल केला आहे.
- उभय पक्षाने दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? होय.
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत –. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून ट्रक क्रं. MH-31,FC-3391 या वाहनाचा विरुध्द पक्षाकडून दि. 10.01.2020 ते 09.01.2021 या कालावधीकरिता विमामुल्य रक्कम रुपये 29,15,100/- करिता विमाकृत केले होते, ही बाब नि.क्रं. 2(1) वर दाखल पॉलिसीवरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते.
- तक्रारकर्त्याचे वाहन दि. 01.09.2020 व 02.09.2020 रोजीच्या दरम्यान चोरीला गेल्यानंतर तक्रारकर्त्याने सुरुवातीला गाडीचा शोध घेतला व त्यानंतर पोलिसांनी फिर्याद नोंदवून न घेतल्यामुळे पोलिस उपआयुक्त यांना दि. 04.09.2020 रोजी लेखी पत्र दिल्याची बाब नि.क्रं. 2(4) वर दाखल दस्तावेजावरुन स्पष्ट होते. परिणामी फिर्याद दाखल करण्यास तक्रारकर्त्याने विलंब केला हा विरुध्द पक्षाचा आक्षेप ग्राहय धरण्या योग्य नाही.
- त्यानंतर हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे दि 31.05.2021 रोजी फिर्याद दिल्याची बाब नि.क्रं. 2 (6) वर दाखल एफ.आय.आर. वरुन स्पष्ट होते. तसेच चोरीला गेलेले वाहन मिळून न आल्याबाबतचा पोलिसांचा अ-समरी रिपोर्ट हा न्यायालयात दि. 21.06.2021 रोजी दाखल केल्याचे नि.क्रं. 2 (6) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. यावरुन चोरीस गेलेले वाहन मिळून न आल्याची बाब स्पष्ट होते.
- तक्रारकर्त्याने वाहनाच्या चोरीबाबत विरुध्द पक्षाला टोल फ्रि क्रं. 022-62346234 वरुन संध्यांकाळी 5.30 मी. ने सुचना दिली असल्याचे व विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला SMS द्वारे ट्रक चोरीबाबत सुचना मिळाल्याचे क्लेम नं. C230020123990 रजिस्टर्ड झाल्याचे कळविले ही बाब नि.क्रं. 2 वर दाखल दस्तावेजावरुन स्पष्ट दिसून येते. परिणामी विरुध्द पक्ष यांना वाहन चोरीबाबत उशिरा सुचना दिली हा विरुध्द पक्षाचा आक्षेप ग्राहय धरण्या योग्य नाही.
- विरुध्द पक्षाने युक्तिवाद करतांना ICS Assure Forensic लॅब यांच्या अहवालाचा आधार घेऊन असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे जमा केलेली चावी ही बनावट होती. त्यामुळे तक्रारकर्त्याने चावीबाबत खरी वस्तुस्थिती लपवून ठेवल्याने विमा दावा नाकारण्यात आला.
11 तक्रारकर्त्याच्या वकिलांचा असा युक्तिवाद आहे की, विरुध्द पक्षाने दाखल केलेला ICS Assure Forensic लॅबचा अहवाल बनावट असून ज्या व्यक्तीने सदरचा अहवाल तयार केला त्याचे कोणतेही शपथपत्र दाखल केले नाही. तसेच वाहन चोरीस गेलेले असल्यामुळे मूळ लॉकची तपासणी न करता केवळ चावीची पाहणी करुन ती बनावट आहे असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. तसेच पॉलिसी देतांना चावी बाबत कोणत्याही अटी शर्ती पॉलिसी मध्ये नमूद नाही, त्यामुळे पॉलिसीतील कोणत्याही Fundamental condition Breach झालेला नाही. तक्रारकर्त्याने आपल्या कथनाच्या समर्थनार्थ JAINA CONSTRUCTION COMPANY VS. ORIENTAL INSURANCE COMPANY LTD. AND ANOTHER (2022) 4 Supreme Court Cases 527 तसेच मा. राष्ट्रीय आयोग यांनी PRADEP KUMAR TIWARI VS. ORIENTAL INSURANCE CO. LTD. & ANR REVISION PETITION NO. 991 OF 2016 (NCDRC) व NEW INDIA ASSURANCE CO. LTD.VS. TRILOCHAN JANE 2009 SCC(NCDRC) 201 या प्रकरणातील न्यायनिवाडे दाखल केले आहेत. - उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारतांना विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडे सादर केलेल्या चावी बाबतचा ICS Assure Forensic यांचा अहवाल दाखल केला असला तरी ही ज्या व्यक्तिने तो अहवाल तयार केला त्याचे कोणतेही शपथपत्र अभिलेखावर दाखल केले नाही. तसेच तक्रारकर्त्याने केलेला युक्तिवाद विचारात घेता तक्रारकर्त्याचे वाहन चोरीस गेलेले असल्यामुळे मूळ लॉकची तपासणी न करता केवळ चावीची पाहणी करुन ती बनावट आहे असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. तसेच पॉलिसीतील ज्या अटी शर्तीच्या आधारावर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारला त्या पॉलिसीच्या अटी शर्ती देखील विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या नाहीत. चोरीस गेलेल्या वाहनाबाबत विमा दावा मंजूर करतांना वाहनाची मूळ चावी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे सादर केल्यानंतरच वाहन चोरीचा दावा मंजूर केल्या जाईल अशी कोणतीही पूर्व अट (Condition precedent )नसल्यामुळे त्या अटीवर विरुध्द पक्षाला विमा दावा नाकारण्याचा कायदेशीर अधिकार नाही.
13 वर नमूद बाबींवरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने फिर्याद देतांना हेतूपुरस्सर कोणताही विलंब केलेला नाही. तसेच घडलेल्या वाहन चोरीच्या घटनेबाबत विरुध्द पक्षाला त्वरित सुचना देण्यात आली होती. त्याचप्रमाणे वाहनाच्या चावी बाबत पॉलिसी मध्ये कोणतीही पूर्व अट (Condition precedent ) नमूद नव्हती. विरुध्द पक्षाने ज्या अटी शर्तींच्या आधारावर तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारला, त्या अटी शर्ती विरुध्द पक्षाने अभिलेखावर दाखल केलेल्या नाहीत. परिणामी पॉलिसीतील कोणत्याही Fundamental condition Breach झालेला नसतांना विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा योग्य व वैध असलेला विमा दावा तांत्रिक कारणावरुन नाकारणे ही दोषपूर्ण आहे असे आमचे मत आहे. यास्तव आम्ही मा. राष्ट्रीय आयोग यांनी Ajit Singh Vs. M/s Reliance General Insurance Co. Ltd. REVISION PETITION NO. 1566 OF 2018 CPJ 2024 Page 251 या प्रकरणात पारित केलेल्या न्यायनिवाडयाचा आधार घेऊन मुद्दा क्रमांक 1 व 2 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत. 14 मुद्दा क्रमांक 3 बाबत - मुद्दा क्रमांक 1 व 2 वरुन विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून नि.क्रं. 2(2) वर दाखल पॉलिसी मधील विमामुल्य रक्कम रुपये 29,15,100/- ची मागणी केली आहे. सदरच्या वाहनाची विमामुल्य रक्कम विचारात घेता तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडून वाहनाची विमामुल्य रक्कम रुपये 29,15,100/- व त्यावर विमा दावा नाकारल्याचा दि. 08.09.2021 पासून ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह रक्कम, तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. यास्तव मुद्दा क्रं. 3 चा निष्कर्षा पोटी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत. - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला त्याचा ट्रक क्रं. MH-31,FC -3391 या वाहनाची विमामुल्य किंमत रुपये 29,15,100/- व त्यावर दि. 08.09.2021 पासून ते प्रत्यक्ष रक्कमेच्या अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजसह रक्कम तक्रारकर्त्याला अदा करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावा.
- विरुध्द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आंत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |