Maharashtra

Kolhapur

CC/14/248

Mr.Namdev Dnyanu Lad - Complainant(s)

Versus

HDFC Ergo Gen.Ins.Co.Ltd. - Opp.Party(s)

Mr.D.M.Dhavate, Mr.A. B. Jawale

31 Jul 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/14/248
 
1. Mr.Namdev Dnyanu Lad
At post Krantinagar, Kundal, Tal.Palus,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. HDFC Ergo Gen.Ins.Co.Ltd.
off.:1st flr.165-166, Bank-bay Reclimation, H.T.Parekh Marg, Chuchgate, Mumbai / for Gen,Manager - Audhtorised Person.
Kolhapur
2. HDFC Ergo Gen.Ins.Co.Ltd.
James Stone Building, 2nd flr. Above HDFC Bank, near S.T.Stand, R.L.Jewellers, New Shahupuri, Kolhapur for Branch Manager-Authorised Person
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकालपत्र (दि.31.07.2015)   व्‍दाराः- मा. सदस्‍या - सौ. रुपाली डी. घाटगे  

 

1           सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम-12 अन्‍वये सेवेत‍ त्रुटी ठेवलेने तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.

 

2           प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाले विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले. उभय वकिलांचा तोंडी अंतिम युक्‍तीवाद ऐकला.

 

3     तक्रारदारांची थोडक्‍यात तक्रार अशी :-

           

      तक्रारदार हे मौजे कुंडल येथे त्‍यांची शेतजमिन असून त्‍या जमीनीत द्राक्षबाग, ऊस अशी पिके घेतात. या पिकाकरिता औषधफवारणी करणेसाठी दि.25.03.2013 रोजी दि महाराष्‍ट्र अॅग्रो इंडस्‍ट्रीज डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशन लि., कोल्‍हापूर येथून रक्‍कम रु.3,01,950/- रुपयास मित्‍सुबिशी शक्‍ती एम.टी.-180 डी या मॉडेलचा ट्रॅक्‍टर खरेदी केला त्‍याचा चेसिस नं.T12K-037660 व इंजिन नं.C12K039187 याचा रजिस्‍ट्रेशन क्र.MH-10/AY-5081 हा लहान ट्रॅक्‍टर खरेदी केला. या खरेदी केलेल्‍या वाहनाचा सामनेवाले यांचे विमा कंपनीकडे उतरविलेला असून त्‍याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सदरहू पॉलीसीचा क्र.2316200465585600000, पॉलीसी प्रारंभ दि.26.03.2013 ते पॉलीसी संपण्‍याची दि.24.03.2014 व क्‍लेम नंबर – C230013027735 अशी आहे. दि.13.06.2013 रोजी सायंकाळी 6 वाजता शेतातील औषधफवारणीचे काम पूर्ण करुन ट्रॅक्‍टर शेतातील शेडमध्‍ये उभा करुन शेडला असलेल्‍या दरवाजास कुलूप लावण्‍यात आले. दि.14.06.2013 रोजी सकाळी 08.30 वाजता तक्रारदारांचा मुलगा नाथाजी लाड हा शेतात गेला असता, त्‍या शेडमधील ट्रॅक्‍टर नसलेचे निदर्शनास आले. लगेच तक्रारदार व त्‍यांच्‍या घरच्‍यांनी वाहनाचा आजूबाजूला तपास केला असता वाहन आढळून आले नाही. त्‍यामुळे तक्रारदारांनी कुंडल येथील पोलीस ठाणे येथे त्‍यादिवशी सायंकाळी तक्रार नोंदवण्‍याचा प्रयत्‍न केला असता पोलीस अधिका-यांनी गावात प्रथम तपास करा, त्‍यानंतर फिर्याद नोंदवून घेवू असे सांगितल्‍याने आमच्‍या अशिलांनी आजूबाजूच्‍या गावात जाऊन वाहनाचा तपास केला तरी वाहन आढळून आले नाही, अशी माहिती तक्रारदारांनी कुंडल पोलीस ठाण्‍यात दि.28.06.2013 रोजी दिली असता, त्‍या दिवशी दुपारी 2.30 वा. MH-10-AY-5081 हा ट्रॅक्‍टर अज्ञात इसमाने चोरुन नेला असल्‍याबाबतची फिर्याद नोंदविण्‍यात आली व त्‍याच दिवशी प्रत्‍यक्ष पंचनामाही करण्‍यात आला. दि.14.06.2013 रोजी पूर्ण दिवस वाहनाचा तपास केला असता, वाहन आढळून आले नाही. ज्‍या दिवशी वाहन चोरीस गेल्‍याची खात्री झाली. त्‍यानंतर दि.15.06.2013 व दि.16.06.2013 रोजी दोन दिवस सामनेवाले विमा कंपनीच्‍या कार्यालयास सुट्टी असल्‍याने ही घटना तक्रारदार हे कंपनीस कळवू शकले नाहीत. त्‍यानंतर लगेच दि.17.06.2013 रोजी तक्रारदाराने सामनेवाले कंपनीस कळविले व त्‍यांनी नोंद करुन घेतली असे तक्रारदारास सांगितले व त्‍याचवेळी सदर घटनेबाबत 15-20 दिवस गेलेनंतर वाहन न सापडल्‍यास क्‍लेमबाबतची कागदपत्रे सादर करणेबाबत तक्रारदारांना सांगण्‍यात आले. तदनंतर तब्‍बल वर्षभरानंतर दि.29.05.2014 रोजीच्‍या पत्राने तक्रारदारांचे वाहनाचा क्‍लेम चुकीच्‍या आणि बेकायदेशीर कारणास्‍तव नामंजूर करुन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. त्‍याकारणाने, तक्रारदारांनी सदरहू वाहनाची रक्‍कम रु.3,01,950/- व क्‍लेम दाखल दि.17.06.2013 ते दि.17.07.2014 पावेतो द.सा.द.शे.12टक्‍के प्रमाणे व्‍याज  रक्‍कम रु.36,000/- व तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- अशी एकूण रक्‍कम रु.3,87,950/- सामनेवाले यांचेकडून तक्रारदारास मिळावी अशी विनंती सदरहू मंचास केली आहे.

 

4           तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत अनुक्रमे 11 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्‍यामध्‍ये अनुक्रमे, पॉलीसी सर्टिफिकेट, महाराष्‍ट्र अॅग्रो इं‍डस्ट्रिज डेव्‍हलपमेंट कार्पोरेशन लि. यांचेकडील तक्रारदारांनी खरेदी केले ट्रॅक्‍टरचे डिलीव्‍हरी चलन, तक्रारदारांनी ट्रॅक्‍टरची रक्‍कम अदा केलेबाबतची पावती, पोलीस स्‍टेशन, कुंडल येथे दिलेल्‍या फिर्यादीची प्रत, पंचनामा, सी.आर.पी.सी.173(1)(ब) प्रमाणे दिलेले पत्र, तक्रारदारांनी उपप्रादेशीक परि.अधि.सांगली यांना दिलेले पत्र, सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदारास दिलेले पत्र, तक्रारदाराच्‍या शेडला असलेला कोयंडा कापणेत आला त्‍याबाबतचा फोटो, तक्रारदारांनी सामनेवाले यांना पाठविलेली रजि. नोटीस व नोटीस पाठविलेबाबत पोस्‍टाची पावती व पोहोच व दि.21.01.2015 रोजी तक्रारदारांचे पुराव्‍याचे शपथपत्र इत्‍यादी कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.

 

5           सामनेवाले यांनी तक्रारदारांचे तक्रारीस दि.31.10.2014 रोजी म्‍हणणे  दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे.  तक्रारदारांचा ट्रॅक्‍टर दि.14.06.2013 रोजी चोरीस गेलेबाबत सकाळी माहिती होताच त्‍याबाबत सामनेवाले कंपनीस ताबडतोब कळविणे जरुर होते. तक्रारदारांनी त्‍यांचा ट्रॅक्‍टर दि.14.06.2013 रोजी चोरीस गेलेनंतर तीन दिवसांनी प्रथमत: सामनेवाले क्र.2 यांना सदर ट्रॅक्‍टरचे चोरीबाबत कळविले.  तथापि सामनेवाले यांनी केव्‍हाही तक्रारदारास 15-20 दिवसानंतर वाहन न सापडल्‍यास क्‍लेमबाबतची कागदपत्रे सादर करणेबाबत तक्रारदारांना सांगितले नव्‍हते व नाही. तक्रारदारांनी सदरील क्‍लेमची सुचना सामनेवाले कंपनीस चोरी झालेनंतर 3 दिवसांनी दिलेचे तसेच प्रथम वर्दी रिपोर्ट ही तब्‍बल 14 दिवसांनी दिलेचे आढळून आले. तथापि तक्रारदार व सामनेवाले विमा कंपनी दरम्‍यान झाले विमा पॉलीसीचे अटी व नियमाप्रमाणे विमाधारकाने अपघात अगर चोरीची घटना घडलेनंतर ताबडतोब विमा कंपनीस त्‍यांची सुचना देणे बंधनकारक आहे तसेच सदर चोरीची प्रथम वर्दीही तक्रारदारांनी चोरीचे तारखेपासून 14 दिवसांनी दिलेचे दिसून आले. तक्रारदारांनी ट्रॅक्‍टरची चावी ही योग्‍य व सुरक्षित ठिकाणी ठेवणे जरुर होते.  तक्रारदारांनी ट्रॅक्‍टरची व फार्म हाऊस शेडची चावी ही फार्म हाऊसमध्‍ये ठेवलेने सदर ट्रॅक्‍टरची चोरी ही तक्रारदारांचे निष्‍काळजीपणामुळे झालेली असलेचे आढळून आले. तक्रारदार हे त्‍याचे चुकीचा व निष्‍काळजीपणाचा फायदा घेऊन सामनेवाले यांचेकडून विमा क्‍लेमची मागणी करत आहेत. स‍बब, विमा पॉलीसीतील अट क्र.1 व 4 चा तक्रारदारांनी भंग केलेने तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर केलेला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांना देणेचे सेवेमध्‍ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही अगर अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही व तक्रारदारांच्‍या तक्रारीतील सर्व मजकुर खोटा, लबाडीचा व चुकीचा आहे, म्‍हणून तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्‍यात यावी.     

 

6           तक्रारदारांचा तक्रार, सामनेवाले यांची कैफियत, दाखल अनुषांगिक कागदपत्रे, पुराव्‍याचे शपथपत्र तसेच उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद यांचा विचार होता, न्‍यायनिर्णसाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.

             

क्र.

मुद्दे

उत्‍तरे

1

सामनेवाले-विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?

होय.

2

तक्रारदार हे विमा पॉलीसीची विमा रक्‍कम मिळणयास पात्र आहेत का ?

होय.

3

तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत काय ?

होय.

4

आदेश काय ?

अंतिम निर्णयाप्रमाणे.

               

कारणमिमांसाः-

मुद्दा क्र.1:- तक्रारदारांनी मित्‍सुबिशी शक्‍ती एम.टी.180 डी या मॉडेलचा ट्रॅक्‍टर रजि.नं.एम.एच.-10-ए.वाय.-5081 रजिस्‍टर केलेला असून सदर वाहनाचा विमा सामनेवाले यांचेकडे पॉलीसी क्र.2316200465585600000 ने उतरविलेला आहे. सदरचा टॅक्‍टर औषधफवारणी करुन तक्रारदारांनी, तक्रारदारांचे शेतातील शेडमध्‍ये उभा केला होता. सदरचा ट्रॅक्‍टर शेतामधील शेडमध्‍ये उभा असताना, सदर शेडचा कोयंडा कटरने कापून, सदरचा ट्रॅक्‍टर चोरीस गेला.  दि.17.06.2013 रोजी तक्रारदाराने सामनेवाले विमा कंपनीस सदरचे घटनेची माहिती दिली.  तदनंतर, पोलीसाकडे नोंदविलेला वर्दी जबाब, पंचनामा, वगैरे सर्व कागदपत्रे सामनेवाले यांचेकडे दाखल केले असता, तब्‍बल एक वर्षानंतर दि.29.05.2014 रोजी सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदारांनी सामनेवाले विमा कंपनीस चोरी झालेनंतर तीन दिवसांनी व प्रथम वर्दी रिपोर्ट 14 दिवसांनी दिलेने पॉलीसीतील अटी व शर्तींचा भंग केला तसेच तक्रारदारांनी सदरच्‍या वाहनाची चावी योग्‍य व सुरक्षित ठिकाणी ठेवणे जरुरीचे होते.  तथापि तक्रारदारांच्‍या निष्‍काळजीपणामुळे सदरच्‍या चोरीची घटना घडली असल्‍यामुळे तक्रारदारांनी विमा पॉलीसीतील अटींचा भंग केल्‍याने तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर केला. सबब, तक्रारदारांने सदर वाहनापोटी सामनेवाले विमा कंपनीने विमा हप्‍ता भरुन देखील सदर कारणाने सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदारांचा क्‍लेम नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. पॉलीसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. सदर मुद्दयाचे अनुषंगाने, या मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अ.क्र.1 ला पॉलीसी प्रत दाखल असून सदर पॉलीसीवर तक्रारदारांचे नांव, Engine No.C12K039187, Total Premium Rs.5,248/-, Total IDV –Rs.2,57,370/- नमुद आहे. यावरुन तक्रारदारांनी सदरचे वाहनापोटी सामनेवाले यांचेकडे रक्‍कम रु.5,248/- विमा हप्‍ता भरलेचे दिसून येते.  अ.क्र.2 ला सदर वाहनाचे डिलेव्‍हरी चलन असून अ.क्र.3 ला सदरचे वाहन रक्‍कम रु.3,01,950/- रक्‍कमेस खरेदी केलेचे दिसून येते. अ.क्र.4 ला एफ.आय.आर.ची प्रत दाखल आहे. Occurrence of Offence Date-13.06.2012 to 14.06.2013, Information Received – 28.06.2013.

 

               F.I.R. Content- कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे मालकीचा शिदोबाची खडी नावचे रानातील शेडमधून चटईखाली ठेवलेल्‍या चावीने वरील नंबरचा ट्रॅक्‍टर चालू करुन अज्ञात चोरटयाने चोरुन नेला आहे. अ.क्र.6 ला पोलीस स्‍टेशन, कुंडल यांनी सीआरपीसीचे कलम-173(1)(61) याप्रमाणे तक्रारदारांना दिलेले पत्र. सदर पत्रामध्‍ये परिच्‍छेद-3-तपासअंती आपली फिर्याद खरी आहे. परंतु आरोपी न मिळाल्‍यामुळे पुढील तपास तहकूब करण्‍यात आला आहे. आरोपी मिळून आलेस पुढील तपास चालू केला जाईल असे नमुद असून वरील सर्व कागदपत्रांवर पोलीस स्‍टेशन, कुंडल, पोलीस ठाणे (सांगली) यांची सही आहे. अ.क्र.7 ला तक्रारदारांनी मा.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली यांना सदर वाहन चोरीस गेलेचे तक्रारदारांनी कळविलेचे पत्र, अ.क्र.9 ला तक्रारदारांचे शेडला असलेला कोयंडा कापलेला असलेचा फोटो. वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे सदरचे वाहन हे शेतामधील शेडमध्‍ये उभे असताना अज्ञात इसमाने चोरुन नेल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

 

               सामनेवाले यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये, तक्रारदारांनी सदरील क्‍लेमची सुचना सामनेवाले कंपनीस चोरी झालेनंतर 3 दिवसांनी दिलेचे तसेच प्रथम वर्दी रिपोर्ट ही तब्‍बल 14 दिवसांनी दिलेचे आढळून आले.  तक्रारदारांनी ट्रॅक्‍टरची चावी ही योग्‍य व सुरक्षित ठिकाणी ठेवणे जरुर होते.  तक्रारदारांनी ट्रॅक्‍टरची व फार्म हाऊस शेडची चावी ही फार्म हाऊसमध्‍ये ठेवलेने सदर ट्रॅक्‍टरची चोरी ही तक्रारदारांचे निष्‍काळजीपणामुळे झालेली असलेचे आढळून आले. त्‍याकारणाने तक्रारदारांने पॉलीसीतील अट क्र.1 व 4 चा भंग केला आहे असे म्‍हणणे दाखल केले आहे.  सदर मुद्दयाचे अनुषंगाने, या मंचाने या मंचाने पॉलीसीतील Condition no.1 चे अवलोकन केले असता, In case of theft or criminal act which may be subject of claim under this policy the insured shall give immediate notice to the police and co-operate with the company in securing the conviction of the offender  म्‍हणजेच For securing conviction of the offender, it is necessary to inform the Police and co-operate the Company.   तक्रारदारांचे दि.21.01.2015 रोजीचे पुराव्‍याचे शप‍थपत्रामध्‍ये, तक्रारदारांनी कुंडल पोलीस ठाणे येथे दि.14.06.2013 रोजी तक्रार नोंदविण्‍याचा प्रयत्‍न केला असता, संबंधीत पोलीस अधिका-याने आजूबाजूच्‍या गावात प्रथम तपास करा. तदनंतर, फिर्याद नोंदवून घेऊ असे सांगितल्‍याने पलूस, बलवडी, ठाणापूर, कुंभारगाव तसेच शेतातील कामगारांच्‍या गावी सोलापूर संख, करजंगी, झिणती या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता, सदरचे वाहन आढळून आले नाही. दि.14.06.2013 रोजी वाहनाचा तपास केला असता, वाहन आढळून आले नाही. तथापि दि.15.06.2013 व दि.14.06.2013 रोजी सामनेवाले विमा कंपनीचे कार्यालयास सु्ट्टी असल्‍याने घटनेबाबत कळवू शकले नाही. दि.17.06.2013 रोजी सामनेवाले विमा कंपनीस कळविले व त्‍याबाबतची नोंद त्‍यांच्‍याकडे करुन घेतली असे तक्रारदारांच्‍या पुराव्‍याच्‍या शपथपत्रामध्‍ये नमुद आहे. सदर तक्रारदारांच्‍या पुराव्‍याचे शपथपत्रावरुन, सदरचे वाहन चोरीस गेलेनंतर तक्रादारांनी सदरचे वाहन शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला. म्‍हणजेच सदरचा ट्रॅक्‍टर चोरी करण्‍याच्‍या गुन्‍हेगाराला (offender) ला शोधण्‍याचा प्रयत्‍न केला हे स्‍पष्‍टपणे दिसून येते. त्‍या अनुषंगाने, तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या दि.20.09.2011 रोजीचे Insurance Regulatory and Development Authority (IRDA) चे परीपत्रकाचे या मंचाने अवलोकन केले असता, It may be noted that such limitation clause does not work in Isolation and it is not absolute.  One needs to see the merits and good spirit of the clause, without compromising or bad claims.  Rejection of the claims on purely technical grounds in mechanical fashion will result in policy holders losing the confidence in the insurance Industry, giving rise to excessive litigation  असे नमुद आहे.

 

               त्‍याकारणाने, वरील सर्व बाबींचा व IRDA चे परीपत्रकाचा विचार करता, तक्रारदारांनी जाणूनबुजून सदरची तक्रार एफआयआर उशिरा दाखल केलेली नाही हे स्‍पष्‍टपणे दिसून येते. तसेच सदर घटनेची माहिती (intimation) सामनेवाले विमा कंपनीस दोन दिवस सुट्टी असलेने लगेचच कळविता आलेले नाही हे तक्रारदारांनी केलेले कथन या मंचास योग्‍य आहे असे या मंचाचे मत आहे.

              

               सामनेवाले यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये, सदरचे वाहनाची व फार्म हाऊसची शेडची चावी ही तक्रारदारांनी फार्म हाऊसमध्‍ये ठेवलेने सदरची चोरी तक्रारदारांचे निष्‍काळजीपणामुळे झालेली आहे.  त्‍याकारणाने, तक्रारदारांनी पॉलीसीतील अटींचा भंग केल्‍याने तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर केला आहे. सदर मुद्दयाचे अनुषंगाने, एफ.आय.आर.चे अवलोकन केले असता, शेडमधून चटईखाली ठेवलेल्‍या चावीने सदरचे वाहन चालू करुन चोरुन नेलेचे नमुद आहे.  यावरुन, सदरचे शेडची चावी ही फार्महाऊसमध्‍ये नव्‍हती असे दिसून येते. तसेच सदरचे शेडचे कोयंडा कटरने कापलेचे तक्रारदारांने पुराव्‍याचे शपथपत्रामध्‍ये नमुद असून त्‍याअनुषंगाने, तक्रारदारांनी तक्रारीसोबत वस्‍‍तुस्थिती दर्शविणारा फोटो दाखल केलेला आहे. सदरचा कागद सामनेवाले यांनी नाकारलेला नाही. सबब, सदर वाहन चोरीची घटना केवळ सदर वाहनाची चावी चटईखाली ठेवलेमुळे झालेचे सदर कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होत नसलेने, केवळ तक्रारदारांनी निष्‍काळजीपणा केल्‍यामुळे सदरची चोरी झाली व त्‍याकारणाने, सामनेवाले विमा कंपनीच्‍या अटी व शर्तींचा भंग झाला हे सामनेवाले यांचे म्‍हणणे हे मंच विचारात घेत नाही. सदर मुद्दयाचे अनुषंगाने, सामनेवाले यांनी 2015 (1) CPJ P 387, Revision Petition No.1896 of 2008 चे न्‍यायनिवाडे या मंचाने दाखल केलेले आहेत.  सदर न्‍यायनिवाडयाचे या मंचाने अवलोकन केले असता, Complainant left the vehicle unattended and unlocked नमुद आहे.  त्‍याकारणाने, सदर न्‍यायनिवाडयातील Facts या सदर तक्रारीतील Facts शी विसंगत असलेने सदरचे सामनेवाले यांनी दाखल केलेले न्‍यायनिवाडे हे मंच विचारात घेत नाही.

              

               सबब, वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांचा मित्‍सुबिशी शक्‍ती एम.टी.180 डी या मॉडेलचा ट्रॅक्‍टर रजि.नं.एम.एच.-10-ए.वाय.-5081 हा शेतातील शेडमध्‍ये उभा असताना अज्ञात इसमाने चोरी केल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते. त्‍याकारणाने, सदरचे वाहन चोरी झालेबाबतची घटना तक्रारदारांनी सामनेवाले विमा कंपनीस कळवून देखील सामनेवाले विमा कंपनीने तांत्रिक व अयोग्‍य कारणाने, तक्रारदारांचा क्‍लेम नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे. 

 

मुद्दा क्र.2:–  उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता, सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे.  तक्रारदारांने सदर तक्रारीमध्‍ये वाहनाची किंमत रक्‍कम रु.3,01,950/- इतक्‍या रक्‍कमेची मागणी मा.मंचास केलेली आहे.  तथापि या मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या पॉलीसीप्रतीचे अवलोकन केले असता, TOTAL  IDV Rs.2,57,370/- नमुद आहे. त्‍याकारणाने, तक्रारदारांची पॉलीसी क्र.2316200465585600000 नुसार विमा रक्‍कम रक्‍कम रु.2,57,370/- इतकी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत व सदर रक्‍कमेवर तक्रार दाखल दि.25.07.2014 ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.3:– उपरोक्‍त मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनाचे अवलोकन करता, सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारलेमुळे तकारदारास झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.2,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.4:- सबब, हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

आदेश

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्‍यात येतो.
  2. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा पॉलीसी क्र.2316200465585600000 नुसार विमा रक्‍कम रु.2,57,370/-(रु.दोन लाख सत्‍तावन्‍न हजार तीनशे सत्‍तर फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर तक्रार दाखल दि.25.07.2014 पासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9% व्‍याज अदा करावे. 

3     सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.2,000/- (रु.दोन हजार फक्‍त) तसेच या तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त)  या आदेशाची प्रत मिळालेपासुन 30 दिवसांचे आत अदा करावेत.

4     आदेशाच्‍या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.