Maharashtra

Pune

PDF/116/2010

RAMESH GAIKWAD - Complainant(s)

Versus

HDFC BANK - Opp.Party(s)

30 Sep 2011

ORDER

 
Complaint Case No. PDF/116/2010
 
1. RAMESH GAIKWAD
KATRAJ, PUNE 46
...........Complainant(s)
Versus
1. HDFC BANK
LAW COLLEGE ROAD, PUNE 16
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्‍य,
                              :- निकालपत्र :-
 
तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे-
1.           तक्रारदारांनी जाबदेणार क्र 1 व 2 यांचे करवी वाहन कर्ज घेतले होते. सदर कर्जाची व्‍याजासहित संपुर्ण रक्‍कम परतफेड केलेली असतांनाही जाबदेणार तक्रारदारांच्‍या वाहनावरील बोजा कमी करुन देत नाहीत अगर [H.P. ] उतरवून देत नाहीत, म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार वाहनावरील बोजा उतरवून मागतात व त्‍यासंदर्भातील एन.ओ.सी, वाहनावरील कर्ज परत फेड केली म्‍हणून ना हरकत प्रमाणपत्र, तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 1,00,000/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रुपये 20,000/- मागतात. तक्रारीसोबत प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केले आहेत.
2.          जाबदेणार क्र.1 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्‍या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1 यांच्‍याकडून तवेरा सी टी गाडी साठी रक्‍कम रुपये 6,75,000/- कर्ज घेतले होते. सदरहू गाडी व्‍यावयायिक वापरासाठी घेतली होती. कर्जासंदर्भात दोघांत दिनांक 31/7/2007 रोजी करारनामा झाला. रुपये 19,820/- EMI 46 महिन्‍यांसाठी ठरविण्‍यात आला. तक्रारदारांचे कर्ज खाते जाबदेणार क्र.2 यांनी जाबदेणार क्र.1 यांच्‍याकडून विकत घेतले. सबब तक्रारदार व जाबदेणार क्र.1 यांच्‍यातील व्‍यवहार संपुष्‍टात आला. तक्रारदार जाबदेणार क्र.2 यांच्‍याकडे रकमेचा भरणा व पत्रव्‍यवहार करीत आहेत. सेवेत कमतरता नाही. व्‍यवहार संपुष्‍टात आल्‍याने तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1 यांच्‍याविरुध्‍द केलेली तक्रार खर्चासह नामंजुर करण्‍यात यावी अशी विनंती जाबदेणार क्र.1 करतात. लेखी जबाबासोबत जाबदेणार क्र.1 यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले.
 
3.          जाबदेणार क्र.2 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्‍या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी तवेरा एम एच 12 डी टी 5946 तक्रारदारांनी उपरोक्‍त गाडी खरेदीसाठी जाबदेणार क्र.1 यांच्‍याकडून कर्ज घेतले होते. तसेच सदर गाडी व्‍यावयायिक कारणासाठी मे. पुजा ट्रॅव्‍हल्‍स यांना भाडयाने दिली होती. म्‍हणून तक्रारदार ग्राहक नाहीत. ग्राहक मंचासमोर प्रस्‍तूत तक्रार चालविता येणार नाही. जाबदेणार क्र.2 यांनी दिनांक 2/7/2009 च्‍या कराराद्वारे जाबदेणार क्र.1 यांच्‍याकडून तक्रारदारांचे कर्ज खाते विकत घेतले होते. जाबदेणार क्र.1 व तक्रारदार यांचा उपरोक्‍त कर्ज खात्‍यासंदर्भात व्‍यवहार नाही, संबंध नाही. तक्रारदार श्री. दिनेशकुमार भुरमल यांच्‍या कर्जास जामीन राहिले होते. करारानुसार तक्रारदार श्री. दिनेशकुमार भुरमल यांना जामीन असल्‍याने, तक्रारदारांच्‍या मालमत्‍तेवर जाबदेणार क्र.2 यांचा lien आहे. श्री. भुरमल यांनी कर्जाची परतफेड न केल्‍याने, रुपये 4,82,536/- कर्ज श्री. दिनेशकुमार भुरमल यांच्‍या खाती येणे आहेत. उपरोक्‍त कर्जास तक्रारदार जामीनदार असल्‍याने जाबदेणार क्र.2 यांनी तवेरा गाडीवरील एच.पी मार्क काढला नाही. हप्‍ते थकविल्‍यामुळे तक्रारदारांची तवेरा गाडी ताब्‍यात घेण्‍यात आली होती, रक्‍कम/हप्‍ता भरल्‍यानंतर तक्रारदारांना गाडीचा ताबा देण्‍यात आला होता. सन 2009 मध्‍ये तक्रारदारांनी कर्जाची संपुर्ण रक्‍कम परतफेड केली होती. जाबदेणार क्र.2 यांच्‍या सेवेत कमतरता नाही, म्‍हणून तक्रार नामंजुर करण्‍यात यावी अशी विनंती जाबदेणार क्र.2 यांनी केली आहे. सोबत प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली.
4.          उभय पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारांनी तवेरा गाडी खरेदीसाठी जाबदेणार क्र.1 यांच्‍याकडून कर्ज घेतले होते, नंतर सदरहू कर्ज जाबदेणार क्र.2 यांनी विकत घेतले, त्‍यांनतर तक्रारदारांनी कर्जाची संपुर्ण रक्‍कम परतफेड केली आहे, हया बाबी निर्विवाद आहेत. त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदेणार क्र.1 यांचे ग्राहक नाहीत असे मंचाचे मत आहे. तक्रारदार श्री. भुरमल यांना कर्जापोटी जामीनदार होते. सदरहू कर्ज श्री. भुरमल यांना जाबदेणार क्र.2 यांनी दिले होते. जाबदेणार क्र.2 यांनी यासंदर्भात दाखल केलेल्‍या दिनांक 10/5/2011 च्‍या कर्ज खातेउता-याचे अवलोकन केले असता श्री. भुरमल यांच्‍या खाती रुपये 4,82,536/- चे कर्ज शिल्‍लक असल्‍याचे दिसून येते. Agreement For Loan And Guarantee चे अवलोकन केले असता त्‍यातील कलम 19.2 मध्‍ये
            “Until the ultimate balance owing by the Borrower or the Guarantor (s) to the Bank has been paid or satisfied in full the Bank shall have a lien on all property and assets of the Borrower and /or the Guarantor (s) from time to time in the possession of the Bank and a charge over all stocks, shares and marketable or other security from time to time and get any or all of them registered in the name of the Bank or its nominees whether the same be held for safe custody or otherwise including but not limited to the dematerialized shares or other securities of the Borrower(s) , held by the Bank as a depository participant.
 
19.3     The Bank shall be entitled to set off all monies, securities, deposits and other assets and properties belonging to the Borrower and/or the Guarantor (s) in the possession of the Bank, whether in, or on any account of the Bank or otherwise, whether held singly or jointly by the Borrower and/or the Guarantor (s) with others and may appropriate the same for the settlement of dues hereunder.”
असे नमूद करण्‍यात आलेले आहे.
5.          तक्रारदारांनी जाबदेणार क्र.2 यांच्‍याकडील कर्जाची परतफेड केलेली आहे.  परंतू तक्रारदार श्री. भुरमल यांना जामीन  होते. श्री. भुरमल यांनी जाबदेणार क्र.2 यांच्‍याकडून घेतलेल्‍या कर्जाची परतफेड केलेली  नव्‍हती. तक्रारदार, श्री. भुरमल व जाबदेणार क्र.2 यांच्‍यातील झालेल्‍या करारातील उपरोक्‍त अटींनुसार, तक्रारदारांच्‍या मालमत्‍तेवर जाबदेणार क्र.2 यांचा lien असल्‍यामुळे तक्रारदारांनी त्‍यांच्‍या गाडीवरील बोजा उतरवून ना हरकत दाखला  [NOC ] मिळण्‍यासंदर्भातील केलेली मागणी मंजुर करणे शक्‍य नाही. तक्रारदार यांनी जाबदेणार क. 2 यांच्‍या सेवेत कमतरता नाही सिध्‍द केली नाही, असे मंचाचे मत आहे. सबब तक्रारअर्ज नामंजुर करण्‍यात येतो.
            वर नमूद विवेचनावरुन व कारणमिमांसेवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्‍यात येतो-
                             :- आदेश :-
1.     तक्रार नामंजुर करण्‍यात येते.
2.    खर्चाबद्यल आदेश नाही.
3.    आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.