तक्रार क्रमांक 324/2009 तक्रार दाखल दिनांक – 30/01/2009 निकालपञ दिनांक – 17/04/2010 कालावधी - 01 वर्ष 02 महिने 18 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री. अशोक मेसाजी कांबळे रा. रुम नं. 301, बी/3, पुर्णोदय पार्क, आधारवाडर जेल रोड, ता. कल्याण(प) जि - ठाणे. .. तक्रारदार विरूध्द मा. शाखा व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक 4था मजला, टायटॉनिक बिल्डिंग, 26-अ, नारायण प्रॉपर्टीज, चांदीवली, अंधेरी(पुर्व), मुंबई 400 072. .. विरुध्दपक्ष समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा सौ. भावना पिसाळ - सदस्या श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल ए.बी.बाबर वि.प एकतर्फा आदेश (पारित दिः 17/04/2010) मा. प्र. अध्यक्षा सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार श्री.अशोक कांबळे यांनी एच.डि.एफ.सी बँके विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी कर्जाचे हप्ते फेडल्यावरही वाहन ताब्यात दिले नाही म्हणुन सदर भरलेली रक्कम रु.59,452/-व इतर खर्च मिळुन रु.64,452/- एवढी रक्कम परत देण्याची मागणी केली आहे.
2. तक्रारदार यांनी विरुध्द पक्षकार बँकेतर्फे त्यांच्या कडुनच कर्ज रक्कम रु.64,267/- घेऊन हप्ता ठरवून घेऊन मोटर सायकल नं.UNI CORM HONDA-MH-05-Ak-6176 दि.11/07/2009 रोजी व्ही.जे.आटोमोबाईल्स प्रा. लि., उल्हासनगर नं.3 यांचे कडून घेतली व गाडीचे डाऊन पेमेंट रु.11,460/- दिले ते पावती नं. 2259 ने सिध्द होते. नंतर ठरलेले हप्ते भरुन रु.55,052 योग्य रितीने भरुन फेडले. त्यांचा दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती को.ऑप.बँक लि.,मध्ये खाते नं.13316 असून सदरचे स्टेटमेंट पुरावा दाखल आहे परंतु पुढील तारीख 24/12/2008 रोजीचे रु.4,400/-चे 2 हप्ते बाकी होते म्हणुन दि.24/12/2008 रोजी विरुध्द पक्षकार बँकेने सदर मोटरसायकल ताब्यात घेतली. तक्रारकर्ता यांनी लगेच दि.26/12/2008 रोजी सदर हप्ते भरले व उरलेली रु.34,000/- रक्कम .. 2 .. तदनंतर आठ दिवसांनी नेली असता विरुध्द पक्षकार बँकेने सर्व रक्कम तक्रारकर्ता यांनी भरुन सुध्दा सदर मोटरसायकल तक्रारकर्ता यांच्या ताब्यात देण्यास नकार दिला.
3. तक्रारकर्ता यांची शपथपत्रे व पुराव्याची कागदपत्रे मंचाने पडताळुन पाहीली. विरुध्द पक्षकार यांना मंचाने नोटीस बजावणी करुनही ते मंचापुढे हजर राहीले नाहीत व त्यांनी लेखी कैफीयत सादरही केली नाही. त्यामुळे मंचाने दि.8/10/2009 रोजी विरुध्द पक्षकार विरुध्द नो डब्ल्यु एस चा आदेश पारीत करुन व एकतर्फा सुनावणी केली म्हणुन मंच पुढील एकतर्फा आदेश पारीत करत आहे. अंतीम आदेश
1.तक्रार क्र. 324/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. विरुध्द पक्षकार नं. 1 यांनी या तक्रारीचा खर्च रु.1,500/-(रु.एक हजार पाचशे फक्त) तक्रारदार यांस द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास त्याचे वाहन परत केले नसल्याने त्यांनी फेडलेली रक्कम रु.59,452/-(रु.एकोनसाठ हजार चारशे बावन्न फक्त) तक्रारकर्ता यांस जानेवारी 2009 पासून 9% व्याजाने परत करावी. या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन एक महिन्याच्या आत करावे अन्यथा तदनंतर वरील रक्मेवर 3% ज्यादा दंडात्मक व्याज द्यावे लागेल. 3.विरुध्द पक्षकार न.1 यांनी तक्रारदारास मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी रु.5,000/-(रु. पाच हजार फक्त) द्यावे. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही. दिनांक – 17/04/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे D:\judg.aft.02-06-08\Pisal Madam
|