Maharashtra

Pune

CC/10/59

MR. Hrshad S Takawala - Complainant(s)

Versus

HDFC Bank. - Opp.Party(s)

Mahesh Gosavi

31 Mar 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/10/59
 
1. MR. Hrshad S Takawala
Hagude Tal.purandar
Pune
Mana
...........Complainant(s)
Versus
1. HDFC Bank.
Shankarsheth Raod Pune 42
Pune
Maha
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा-  श्री. एस. के. कापसे, मा. सदस्‍य 

                                     निकालपत्र

                      दिनांक 31 मार्च 2012

 

तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे-

 

1.                     तक्रारदारांनी जाबदेणार यांच्‍याकडून ऑटो कर्ज- तवेरा गाडीसाठी घेतले होते, त्‍यापैकी रुपये 3,69,946.96 इतके कर्ज परतफेड करणे बाकी होते. घरगुती अडचणींमुळे तक्रारदार सहा हप्‍ते भरु शकले नाहीत. मासिक हप्‍ता रुपये 16,030/- होता. जाबदेणार यांनी कोर्ट ऑर्डर न दाखवता, तक्रारदारांच्‍या गावाकडील पत्‍त्‍यावर दिनांक 23/9/2009 रोजी वसूली संदर्भात नोटिस पाठविली. नोटिस पोहचण्‍याच्‍या अगोदरच तक्रारदारांची तवेरा बी 3 गाडी क्र.एम एच 12/डी टी 2394 जाबदेणार यांनी ताब्‍यात घेतली, पंचनामा केला नाही. तक्रारदार कर्जाची संपुर्ण रक्‍कम भरण्‍यास तयार असतांनाही जाबदेणार यांनी ती भरुन घेण्‍यास टाळाटाळ केली. तक्रारदारांची ही गाडी टुरिस्‍टची होती, त्‍यापासून तक्रारदारांना दरमहा रुपये 30,000/- उत्‍पन्‍न मिळत होते, तक्रारदारांचे गाडी उचलल्‍यामुळे आर्थिक नुकसान झाले. म्‍हणून दिनांक 11/11/2009 रोजी नोटीस पाठविली. परंतू उपयोग झाला नाही. जाबदेणारांकडे संपर्क साधला असता गाडी विकल्‍याचे कळले. जाबदेणार यांच्‍या संगणकावर स्‍टेटमेंट पाहिले असता दिनांक 24/9/2009 रोजी तक्रारदारांच्‍या खात्‍यावर रुपये 3,00,000/- भरण्‍यात आल्‍याचे निदर्शनास आले, वास्‍तविक तक्रारदारांनी ही रक्‍कम भरलेलीच नव्‍हती, बँकेच्‍या रेकॉर्डवर खोटया सहया करण्‍यात आल्‍या होत्‍या, खाते बंद करण्‍यात आले होते. म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून गाडीचा ताबा, तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदारांचे झालेले आर्थिक नुकसान रुपये 1,40,000/-, एक महिन्‍यापुर्वी झालेल्‍या इंजिन दुरुस्‍तीचा खर्च रुपये 25,000/-, नोटिस व इतर खर्च अशी एकूण रुपये 2,00,000/- नुकसान भरपाई मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.

2.          जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्‍या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदार पुरंदर ट्रॅव्‍हल्‍स या नावे टुर्स अॅन्‍ड ट्रॅव्‍हल्‍सचा व्‍यवसाय करतात, तवेरा गाडीसाठी तक्रारदारांनी जाबदेणार यांच्‍याकडून रुपये 6,00,000/- कर्ज घेतले होते, यासंदर्भात दोन्‍ही पक्षकारात दिनांक 2/1/2007 रोजी करार झाला होता, करार दोन्‍ही पक्षकारांवर बंधनकारक होता, कर्ज मासिक 48 हप्‍त्‍यात रुपये 16,030/- दरमहा प्रमाणे परतफेड करावयाचे होते. या कर्जाव्‍यतिरिक्‍त तक्रारदारांनी आय सी आय सी आय बँकेकडून दोन कर्जे घेतली होती, तक्रारदारांनी तवेरा गाडी व्‍यावसायिक कारणासाठी घेतली होती म्‍हणून तक्रारदार ग्राहक नाहीत. सप्‍टेंबर 2009 मध्‍ये तक्रारदारांकडून रुपये 1,24,047/- कर्ज बाकी होते. कराराच्‍या कलम 14.2 नुसार जाबदेणार यांनी कारवाई करुन तक्रारदारांची गाडी ताब्‍यात घेतली होती, त्‍यावेळी तक्रारदारांचे ड्रायव्‍हर श्री. विजय खोले यांच्‍या उपस्थितीत दिनांक 23/9/2009 रोजी पंचनामा करण्‍यात आला होता. दिनांक 23/9/2009 रोजीच तक्रारदारांना सात दिवसांच्‍या आत रुपये 3,84,946.96 भरण्‍यास सांगण्‍यात आले होते. तक्रारदारांनी पुर्तता केली नाही. म्‍हणून रुपये 2,74,999.96 या किंमतीस गाडीची विक्री करुन, ती रक्‍कम तक्रारदारांच्‍या कर्ज खात्‍यात वर्ग करण्‍यात आली, तरीदेखील तक्रारदारांकडून रुपये 1,09,947/- येणे बाकी आहेत. जाबदेणार यांच्‍या सेवेत त्रुटी नाही म्‍हणून तक्रार खर्चासह नामंजुर करावी, रुपये 1,09,947/- तक्रारदारांनी जाबदेणार यांना दयावेत असे आदेश व्‍हावेत अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.

3.          उभय पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणार यांनी दाखल केलेल्‍या तक्रारदारांचा लोन अप्‍लीकेशन फॉर्म दिनांक 30/11/2006 चे अवलोकन केले असता त्‍यात [1]तक्रारदारांचा पत्‍ता पोस्‍ट- हरगुडे, ता. पुरंदर, जिल्‍हा पुणे [2] बिझनेस डिटेल्‍स- पुरंदर ट्रॅव्‍हल्‍स [3] नेचर ऑफ बिझनेस- टुर्स अॅन्‍ड ट्रॅव्‍हल्‍स असे नमूद करण्‍यात आलेले आहे. तसेच तवेरा गाडीच्‍या कर्जाव्‍यतिरिक्‍त आय सी आय सी आय बँकेकडून दोन ऑटो लोन घेतले होते, त्‍यांचा तपशिल देखील कर्जाच्‍या फॉर्ममध्‍ये नमूद केलेला आहे. यासर्वांवरुन तक्रारदारांनी जाबदेणार यांच्‍याकडून तवेरा गाडीसाठी जे कर्ज घेतले होते, तिचा उपयोग तक्रारदार व्‍यावसायिक कारणासाठी करणार होते, तक्रारदारांचा टुर्स अॅन्‍ड ट्रॅव्‍हल्‍सचा बिझनेस होता, म्‍हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2[1][d] नुसार तक्रारदार ग्राहक नाहीत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

      तसेच तक्रारदारांनी रुपये 6,00,000/- कर्ज घेतले होते, त्‍याची परतफेड दरमहा 48 हप्‍त्‍यात करावयाची होती. कराराच्‍या कलम 14.2 मध्‍ये -

“any of the “Event of Default” pursuant to the terms of clause 11 arise (whether demand for repayment is actually made or not) then and in such case and at any time thereafter, the Bank through its officers, agents or nominees shall have the right (without prejudice to the right the clause 7) to take any one or more than one of the following actions without the specific intervention of a Court or any Court Order-

            (iii)       sell by auction or any private contract or tender, dispatch or consign for realization or otherwise dispose of or deal with the hypothecated vehicle in the manner the Bank may think fit.” असे नमूद करण्‍यात आलेले आहे. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीतच परिच्‍छेद क्र.2 पान क्र.2 मध्‍ये घरगुती अडचणींमुळे तक्रारदार सहा हप्‍ते भरु शकले नाहीत, ते डिफॉल्‍टर असल्‍याचे मान्‍य केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. जाबदेणार यांनी तक्रारदारांनी दिलेले पोस्‍ट डेटेड 25 चेक्‍स बाऊन्‍स झाल्‍यासंदर्भातील स्‍टेटमेंट मंचासमोर दाखल केलेले आहे. त्‍यामुळे जाबदेणार यांनी वर नमूद केल्‍याप्रमाणे कराराच्‍या कलम 14.2 नुसार कारवाई केल्‍याचे स्‍पष्‍ट होते, त्‍यामध्‍ये कोर्टाच्‍या आदेशाशिवाय जाबदेणार कारवाई करु शकतात असे स्‍पष्‍ट नमूद करण्‍यात आलेले आहे, करारावर तक्रारदारांच्‍या सहया आहेत, त्‍यामुळे तक्रारदारांना ही बाब माहित होती, म्‍हणून कोर्टाच्‍या आदेशाशिवाय जाबदेणार यांनी कारवाई केल्‍याचे तक्रारदारांचे म्‍हणणे मंच अमान्‍य करीत आहे. तसेच करारात नमूद केलेल्‍या पोस्‍ट- हरगुडे, ता. पुरंदर, जिल्‍हा पुणे या पत्‍तावरच जाबदेणार यांनी प्रिसेल नोटिस दिनांक 23/9/2009 पाठविल्‍याचे दाखल नोटिसवरुन स्‍पष्‍ट होते.  तक्रारदारांनी दिनांक 23/9/2009 ची नोटिस प्राप्‍त झाल्‍यानंतर ते सर्व रक्‍कम रोख स्‍वरुपात भरण्‍यास तयार होते, यासंदर्भात पुरावा दाखल केलेला नाही. यासर्वांवरुन तक्रारदार जाबदेणार यांचे ग्राहक संरक्षण कायदयाप्रमाणे ग्राहक नाहीत, जाबदेणार यांच्‍या सेवेतील त्रुटी तक्रारदारांनी कागदोपत्री पुराव्‍यासह सिध्‍द केलेल्‍या नाहीत, कराराच्‍या अटी व शर्तीचे पालन केलेले नाही, म्‍हणून तक्रार नामंजुर करण्‍यात येत आहे.

            जाबदेणार यांनी लेखी जबाबात नमूद केल्‍याप्रमाणे काऊंटर क्‍लेमची मागणी मंच मंजुर करु शकत नाही.

            वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे-

                           :- आदेश :-

      1.     तक्रार नामंजुर करण्‍यात येत आहे.

      2.    खर्चाबद्यल आदेश नाही.

      आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.