तक्रारदार : स्वतः हजर. सामनेवाले : प्रतिनिधी तसेच वकील(श्री.दिवेकर) मार्फत हजर. -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाले हे एच.डी.एफ.सी. बँकेचा क्रेडीट कार्ड विभाग आहे. तक्रारदारांचे सा.वाले बॅकेकडे बचत खाते असून सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्ड सुविधा पुरविली आहे. 2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांचे संमतीशिवाय क्रेडीट कार्ड खात्यामधून रु.5,478/- एच.डी.एफ.सी. इरगो जनरल इन्शूरन्स कंपनी या विमा कंपनीस अदा केले. तक्रारदारांनी त्या कंपनीकडून कधीही विमा पॉलीसी घेतली नव्हती व त्यांचे संमतीशिवाय ती रक्कम विमा कंपनीस अदा करण्यात आली.या प्रकारे सा.वाले यांनी क्रेडीट कार्डचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा अरोप तक्रारदारांनी केला व नुकसान भरपाईची मागणी केली.ि 3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व प्रस्तुतचा व्यवहार हा तक्रारदार व विमा कंपनी यांचे दरम्यान असल्याने विमा कंपनी पक्षकार असणे आवश्यक आहे असे कथन केले. त्याचप्रमाणे विमा कंपनी यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनेवरुन सा.वाले यांनी ती रक्कम नावे टाकलेली आहे. तक्रारदारांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सा.वाले यांनी विमा कंपनीकडे चौकशी केली. व त्याबद्दल विमा कंपनीने कागदपत्र सा.वाले यांना दाखविले. या प्रमाणे तक्रारदारांचा आक्षेप रद्द करण्यात आला. या प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या अरोपास नकार दिला. 4. तक्रारदार व सा.वाले यांनी आपले पुरावे शपथपत्र दाखल केले. त्याच प्रमाणे लेखी युक्तीवाद दाखल केला. 5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्रं व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी विमा कंपनीकडे परस्पर रु.5,478/- अदा करुन तक्रारदारांना क्रेडीट कार्डचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. | 2 | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाईची रक्कम वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | प्रश्न उदभवत नाही. | 3 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 6. तक्रारदारांनी आपल्या प्रतिउत्तराचे शपथपत्रासोबत विमा कंपनीकडे दिलेल्या अर्जाची प्रत हजर केलेली आहे. व तक्रारदारांचे कथना प्रमाणे तक्रारदारांनी विमा पॉलीसी कधीही घेतली नाही. व त्या अर्जावरील सही तक्रारदारांची नाही. तकारदारांच्या अभिलेखात असलेल्या सहया व त्या अर्जावरील सही मंचाने तपासली आहे. व त्यावरुन असे दिसते की, विमा कंपनीकडे तक्रारदारांनी दिलेल्या अर्जावरील सही ही मिळती जुळती आहे. क्षणभर असे जरी गृहीत धरले की, अर्जावरील सही तक्रारदारांचे सहीशी जूळत नाही. तरी देखील विमा कंपनी पक्षकार नसल्याने तसा निष्कर्ष नोंदविता येत नाही. मुळातच तक्रारदारांचे कथना प्रमाणे हा संपूर्ण व्यवहार हा क्रेडीट कार्डाने झालेला असल्याने क्रेडीट कार्डाचे वापरानेच ती रक्कम विमा कंपनीकडे गेलेली आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध करुन दिलेली होती ही बाब तक्रारदारांना मान्य आहे. या व्यतिरिक्त विमा कंपनीने तक्रारदारांची सही असलेला प्रस्ताव अर्जाची प्रत तक्रारदारांकडे पाठविली त्याची प्रत तक्रारदारांनी हजर केलेली आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 25.9.2009 रेाजी पाठविलेल्या ई.मेलची प्रत सा.वाले यांचे कैफीयतीसोबत दाखल आहे. त्यामध्ये असे कथन आहे की, तक्रारदारांनी विमा कराराचे संदर्भात आक्षेप नोंदविल्यानंतर सा.वाले बँकेने विमा कंपनीकडे अर्जाची प्रत क्रेडीट कार्ड व पॅन कार्डची प्रत पाठविली होती. व चौकशी करण्यास सांगीतले होते. त्या चौकशीनंतर विमा कंपनीने सा.वाले बँकेला असे कळविले की, तक्रारदारांनी दिलेल्या अर्जावरुनच व सूचनेवरुन ती रक्कम वसुल करण्यात आलेली आहे. 7. उपलब्ध पुराव्यावरुन असे दिसते की, सा.वाले बँकेने अनाधिकाराने विमा कंपनीकडे रक्कम पाठविली ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. सबब सा.वाले यांनी तक्रारदारांना सुवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द होत नाही. सहाजिकच तक्रारदार प्रस्तुत मंचाकडून कुठल्याही प्रकारची दाद मिळण्यास पात्र नाहीत. 8. वरील चर्चेवरुन व निष्कर्षानुरुप पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 654/2009 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |