निकालपत्रः- , श्री.वि.गं.जोशी, सदस्य ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* न्यायनिर्णय <!--[if !supportLists]-->1. <!--[endif]--> तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे. <!--[if !supportLists]-->2. <!--[endif]--> सा.वाले हे क्रेडीट कार्डाची सेवा पुरविणारी बँक आहे. <!--[if !supportLists]-->3. <!--[endif]-->तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी सा.वाला यांच्याकडून 5176521002967323 या नंबराचे क्रेडीट कार्ड नोव्हेंबर, 2006 मध्ये घेतले. हे क्रेडीट कार्ड दिलेल्या तारखेपासुन वापरात होते. तक्रारदारांना या कार्डाव्दारे होणा-या व्यवहाराचे विवरणपत्र नियमितपणे मिळत होते. 4. तक्रारदार असे निवेदन करतात की, सा.वाले यांनी विवरणपत्रात त्यांनी वापरावयाच्या रक्कमेपेक्षा जास्तीची रक्कम वापरल्यामुळे त्याचे वेगळे शुल्क दाखवले होते.तसेच काही इतर शुल्कसुध्दा दाखविले होते. त्याबाबत आक्षेप घेतल्यामुळे ती पुढील विवरणपत्रात काढून घेतली जातील असे आश्वासन सा.वाले यांनी दिले होते. परंतु त्यानंतर पाठविण्यात आलेल्या विवरणपत्रात तशा प्रकारची सुधारणा सा.वाले यांनी केली नाही. म्हणून दिनांक 14.8.2008 रोजी तक्रारदारांनी सा.वाले यांना कळविले की, सदर क्रेडीट कार्ड बंद करावे. आणि काही थकबाकी असेल तर परत करावी. त्यानंतर तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सा.वाले यांनी तडजोडीपोटी देय रक्कमेवर 30 टक्के सुट देण्याचे कबुल केले. परंतु पुढील विवरणपत्रात अशा प्रकारची सुट दिली गेली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी सा.वाले यांना कळविले की, जोपर्यत विवरणपत्रात सुट नमुद करीत नाहीत. तो पर्यत अशा प्रकारचे विवरणपत्र पाठवू नये. 5. तक्रारदार असे म्हणतात की, सा.वाला यांनी मागीतलेले शुल्क ही नियम बाहय आहेत. त्यामुळे थकबाकीची रक्कम रु.17,500/- ऐवजी रु.15,000/- घ्यावेत. त्यानंतर सा.वाला यांनी वरील विनंतीची दखल न घेता दिनांक 10.2.2009 व 24.2.2009 रोजी नोटीस पाठवून तक्रारदारांचे बचत खाते " निलंबीत दर्जा " या सदराखाली गोठवण्यात आले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सा.वाले यांची ही कृती बेकायदेशीर आहे. क्रेडीट कार्डाच्या रक्कमेसाठी सा.वाले त्यांचे बचत खाते गोठवू शकत नाहीत. 6. या बाबत तक्रारदारांनी लेखी व तोंडी संपर्क साधला परंतु त्याची काही फलश्रृती झाली नाही. त्यामुळे त्यांनी या मंचापुढे आपली तक्रार नोंदविली व खालील प्रमाणे मागण्या केल्या. 1) गोठवलेले बचत खाते पुन्हा सुरु करावे. 2) सा.वाले यांना असे निर्देश देण्यात यावेत की तक्रारदार यांनी देवू केलेली रक्कम रु.15,000/- त्यांनी स्विकारावेत. 3) या तक्रार अर्जाचा खर्च द्यावा. 7. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल करुन तक्रारदारांच्या आरोपांचे खंडण केले. सा.वाले यांचे म्हणणे आहे की, त्यांनी तक्रारदारांना शुल्क न आकारण्याचे किंवा त्यात सुट देण्याचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते. आकारलेले सर्व शुल्क हे क्रेडीट कार्डाच्या नियमानुसार आहे. तसेच थकबाकीचे वसुली बाबत 30 टक्के सुट देण्याचे कबुल केले नव्हते. 8. तक्रारदार यांचे क्रेडीट कार्ड निलंबीत दर्जात दाखल करण्यात आले. कारण तक्रारदार हे त्यांच्या देय रक्कमेचे नियमितपणे भरणा करीत नसत. त्याचप्रमाणे बँकेने त्यांच्या हक्काची अंमलबजावणी म्हणून सद्य परिस्थितीत तक्रारदार यांचे बचत खाते गोठवले. या बचत खात्यात तक्रारदारांची रक्कम रु.42,424.87 येवढी आहे. सदर बचत खाते गोठविण्याची प्रक्रिया ही बँक व तक्रारदार यांच्यात झालेल्या करारानुसार व कॉन्ट्रॅक अक्टच्या कलम 171 प्रमाणे केलेले आहे. त्यामुळे ते पूर्णपणे कायदेशीर आहे. 9. सा.वाले यांचे म्हणणे की, तक्रारदार यांनी सेवेत कमतरता असल्याचे सिध्द केले नाही. तसेच तक्रार खोटी व बिनबुडाची आहे व सा.वाले बँकेचे पत बाजारात कमी करण्याच्या उद्देशाने ही तक्रार दाखल केली आहे, तेव्हा ती रद्द करावी. 10. तक्रार अर्ज कैफीयत व त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषंगीक कागदपत्रे, शपथपत्र तसेच बँकेचे विवरणपत्रे ई-मेल, इ. पहाणी व अवलोकन केले. तक्रारदार हे मागील दिड वर्षापासुन सतत गैरहजर आहेत. सा.वाले यांनी जरी तक्रार रद्द करण्याचा अर्ज दिला तरी, प्रकरण गुणदोषावर निकाली काढणे संयुक्तीक राहील असे मंचास वाटले. वरील सर्व बाबींचा साकंल्याने विचार केल्यानंतर तक्रार निकालाकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तर | 1. | सा.वाला यांनी सेवेत कमतरता तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे काय ? | नाही. | 2. | तक्रारदार यांचे गोठविलेले बचत खाते पुन्हा सुरु करण्यात यावे का ? | नाही. | 4. | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळविण्यास पात्र आहेत का ? | नाही. | | आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 11. या प्रकरणात सा.वाला यांनी क्रेडीट कार्ड धारक सभासद व सा.वाले यांच्यात झालेली कराराची प्रत व त्यातील शर्ती अटी, पुराव्याचे शपथपत्रासह दाखल केल्या आहेत. त्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सा.वाला यांना त्यांची देय रक्कम क्रेडीट कार्ड धारकाकडून मिळाली नाही, तर क्रेडीट कार्ड धारकाच्या त्यांच्याकडे असलेल्या कोणत्याही रुपातल्या ठेवी किंवा बचत खाते यातुन त्याची वसुली करण्याची मुभा आहे. तसे तक्रारदारांनी या करारान्वये मान्य केले आहे. त्यामुळे सा.वाले यांची ही कृती बेकायदेशीर आहे असे म्हणता येत नाही. 12. तक्रारदार यांनी दाखल केलेली विवरणपत्रे (स्टेटमेंटस्) यांचे अवेलोकन केले असता असे आढळून येते की, तक्रारदार हे वापरलेल्या रक्कमेचा वेळच्या वेळी भरणा करीत नव्हते. या परिस्थितीत विलंब शुल्क आकारल्यास ते चुकीचे ठरु शकत नाही. तक्रारदारांना लावलेली इतर शुल्क ही नियमबाहय नाहीत असे दिसून येते. तक्रारदार यांचा हलगर्जीपणा वेळोवेळी दिसून येतो. तक्रारदार यांनी ही तक्रार शुध्द हेतुने दाखल केलेली नाही असेही दिसून येते. तक्रारदार यांनी तक्रारीत केलेल्या कथनाबाबत कोणताही लेखी पुरावा शपथपत्राव्दारे मंचास सादर केलेला नाही. तसेच आपली कायदेशीर देणी चुकविण्याकरीता मंचाचा वापर करुन घेतला असे मंचाच्या सदस्यास वाटते. वरील कारणे तक्रारदारांची तक्रार खारीज करण्यास पुरेसी आहेत असे मंचास वाटते. 13. उक्त विवेचन लक्षात घेता या प्रकरणी मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्रमांक 151/2009 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |