Maharashtra

Kolhapur

CC/14/371

Mahedra Jwellers Tarfe Parner Chandrakant Sonmal Osawal - Complainant(s)

Versus

HDFC Bank Ltd. - Opp.Party(s)

Luis Shah

29 Sep 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/14/371
 
1. Mahedra Jwellers Tarfe Parner Chandrakant Sonmal Osawal
Rajarampuri, 3rd Lane,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. HDFC Bank Ltd.
Gemstone, Raosaheb Vichare Complex, 517, E Ward, New Shahupuri
Kolhapur
2. HDFC Bank Ltd.
Regd. Office HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lowerparel (W)
Mumbai
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
Adv.Luis S.Shah, Present
 
For the Opp. Party:
Adv.N.B.Ranavare, Present
 
Dated : 29 Sep 2016
Final Order / Judgement

                                                                         तक्रार दाखल दि.14.11.2014

तक्रार निकाली दि.29/09/2016

न्‍यायनिर्णय

द्वारा:- - मा. सदस्‍या–सौ. मनिषा एस.कुलकर्णी.

 

1.         सदरची तक्रार तक्रारदारने जाबदार क्र.1 बँकेला तक्रारदारांना नॉन सबमीशन ऑफ इन्‍शुरन्‍स पॉलीसी या नावाखाली आकारलेल्‍या दंडाची रक्‍कम रु.2,74,265/- परत मिळणेसाठी तसेच त्‍यावरील व्याज मिळणेकरीता केलेली आहे.   तसेच जाबदार क्र.1 बँकेने तक्रारदारांचे खातेवर काही चार्जेस या नावाखाली कापून घेतलेली रक्‍कम रु.6,47,276/- व त्‍यावरील व्याज परत मिळणेकरीता सदरची तक्रार दाखल केलेली आहे. प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत होऊन जाबदार यांना नोटीस आदेश होऊन जाबदार मंचासमोर हजर होऊन त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केले.

 

2.         तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की–

           तक्रारदार ही भागीदारी फर्म आहे व यातील तक्रारदारांचे महेंद्र ज्‍वेलर्स या नावाने राजारामपूरी, 3री गल्‍ली, कोल्‍हापूर व भाऊसिंगजी रोड, कोल्‍हापूर येथे दागिन्‍यांचे दोन शोरुम्‍स आहेत. जाबदार क्र.2 ही बँक आहे. ठेवी स्विकारणे, कर्ज देणे, कॅश क्रेडीट सुविधा देणे, इत्‍यादी जाबदार क्र.2 बँकेचा व्यवसाय आहे.  जाबदार क्र.1 ही जाबदार क्र.2 बँकेची कोल्‍हापूर येथील शाखा आहे. तक्रारदार हे जाबदार क्र.1 यांचे ग्राहक आहेत. जाबदार क्र.1 च्‍या संबंधित अधिका-यांनी यातील तक्रारदारांचेकडे येऊन जाबदार बँकेमध्‍ये कॅश क्रेडीट खाते उघडणेबद्दल विचारणा केली व यातील तक्रारदारांना विविध सोयीसुविधा देण्‍याची हमी दिली. सदरच्‍या सोई सुविधांमुळे यातील तक्रारदारांनी जाबदार क्र.1 बँकेमध्‍ये राजारामपुरी, कोल्‍हापूर व भाऊसिंगजी रोड, कोल्‍हापूर या त्‍यांच्‍या दोन शोरुमच्‍या नावांनी दोन कॅश क्रेडीट खाती उघडली. सदरची खाती तक्रारदारांनी सन-2010-2011 च्‍या सुमारास उघडली व सदरची खाती यातील तक्रारदारांनी जाबदार यांच्‍या सांगण्‍याप्रमाणे वेळोवेळी रिन्‍यु केली. जाबदार क्र.1 बँकेने नोव्‍हेंबर-2012 पासून यातील तक्रारदारांच्‍या खात्‍यामधून कॅश डिपॉझिट चार्जीस, पिनल इंटरेस्‍ट, नॉन सबमीशन ऑफ इन्‍शुरन्‍स पॉलीसी, या नावांखाली वेगवेगळया रकमा बेकायदेशीरपणे डेबीट करणे चालू केले. जाबदार क्र.1 बँकेने तक्रारदारांच्‍या खात्‍यामधून वेगवेगळया चार्जीसच्‍या नावाखाली नोव्‍हेंबर-2012 पासून एकूण रक्‍कम रु.6,47,276/- व नॉन सबमीशन ऑफ इन्‍शुरन्‍स पॉलीसीचा दंड म्‍हणून जुलै-2011 पासून एकूण रक्‍कम रु.2,74,265/- तक्रारदारांच्‍या खात्‍यावर बेकायदेशीर व अनाधिकाराने नावे टाकली. त्‍यांच्‍या खात्‍यावर लावलेल्‍या बेकायदेशीर चार्जीसच्‍या रक्‍कमा परत त्‍यांच्‍या खात्‍यावर क्रेडीट करणेत येतील अशी हमी बँकेचे संबंधीत अधिका-यांनी तक्रारदारांना दिली. दि.28.05.2013 रोजी यातील जाबदार क्र.1 बँके तर्फे त्‍यांचे अधिकारी-श्री.केदारनाथ वागळे व श्री.श्रीधर खोचीकर यांनी तक्रारदारांकडे भेट दिली व त्‍यांच्‍या खात्‍यावर लावलेले सर्व बेकायदेशीर चार्जीस लवकरात लवकर तक्रारदारांच्‍या खात्‍यावर परत क्रेडीट केले जातील असे तक्रारदारांतर्फे श्री.भरत ओसवाल यांना हमी दिली. तक्रारदारांना त्‍यांच्‍या खात्‍यावर लावलेले बेकायदेशीर चार्जीस परत क्रेडीट करणेबाबत खोटी आश्‍वासने दिली.  जर तक्रारदारांनी कॅश क्रेडीट अकौंटस रिन्‍यु नाही केली तर तक्रारदारांच्‍या खातेवर 4टक्‍के क्‍लोजर चार्जीस लावले जातील.  Collateral Security म्‍हणून यातील जाबदार क्र.1 बँकेने तक्रारदारांच्‍या सि.स.नं.1809/ख व 1810/1 राजारामपुरी, कोल्‍हापूर व सि.स.नं.647 पन्‍हाळा, जि.कोल्‍हापूर या मिळकतींचे कागदपत्रे त्‍यांच्‍या ताब्‍यात ठेवलेली होती.  तक्रारदारांनी जाबदार क्र.1 बँकेच्‍या संपूर्ण रक्‍कमा भागवून सुध्‍दा यातील तक्रारदार बँकेने सदरचे कागदपत्रे तक्रारदारांना न दिलेमुळे तक्रारदारांनी त्‍यांचे वकीलांचेमार्फत जाबदार क्र.1 बँकेला दि.30.10.2003 रोजी नोटीस पाठवून सदरची कागदपत्रे परत देणेबाबत कळविले.  त्‍यानुसार जाबदार क्र.1 बँकेने तक्रारदारांना त्‍यांची कागदपत्रे परत दिलेली आहेत.  तक्रारदारांचे अकौंटवर लावलेले सर्व बेकायदेशीर चार्जीस क्रेडीट केले जातील अशी हमी दिली.  जाबदार क्र.1 बँकेच्‍या अधिकारी यांना पहिल्‍यांदा रकमा क्रेडीट करणेस सांगितले व तदनंतर रिन्‍युअलचा विचार करु असे सांगितले. त्‍यानंतर तक्रारदारांनी दि.02.01.2014 रोजी व दि.06.02.2014 रोजी पत्र पाठवून बँकींग Ombudsman R.B.I. यांचेकडे तक्रारी केल्‍या व सदर तक्रारीच्‍या जाबदार क्र.1 बँकेस सुध्‍दा पाठविल्‍या.  सदरच्‍या तक्रारी झालेनंतर यातील जाबदार क्र.2 बँकेच्‍या पुणे ऑफीसने दि.03.04.2014 रोजी पत्र पाठवून तक्रारदारांना त्‍यांच्‍या खात्‍यावर वेगवेगळया चार्जीसच्‍या नावाखाली डेबीट केलेली रक्‍कम रु.6,47,276/-, 48 तासात क्रेडीट करत असलेबाबत कळविले.  तक्रारदारांना दि.07.04.2014 रोजी पत्र पाठवून त्‍यांच्‍या खात्‍यावर नॉन सबमीशन ऑफ इन्‍शुरन्‍स पॉलीसीसाठी दंड म्हणून लावलेली रक्‍कम रु.2,74,265/- बरोबर असलेबाबत कळविले.  निवांत बंगलो पन्‍हाळा हया मिळकतीची एकूण किंमत जरी एक कोटी ऐंशी लाख असली तरी त्‍यातील बहुतांश किंमत ही रिकाम्‍या प्लॉटची आहे व जाबदार क्र.1 बँकेच्‍या स्‍वत:च्‍या व्‍हॅल्‍युएशन अनुसार बंगल्‍याची किंमत केवळ रु.7,50,000/- लाख आहे व सदर बंगल्‍याच्‍या इन्‍शुरन्‍ससाठीचा प्रिमीयम रु.506/- इतका होता.  सदरचा मुद्दा यातील तक्रारदारांनी प्रस्‍तुत केलेनंतर जाबदार क्र.1 बँकेने दि.12.04.2012 रोजी तक्रारदारांचे अकौंट डेबीट करुन प्रॉपर्टी इन्‍शुर केली.  जाबदार क्र.1 बँकेने वेळेत प्रॉपर्टी इन्‍शुर न करणे ही त्‍यांची चुक असून त्‍यासाठी जाबदार क्र.1 बँकेने तक्रारदारांच्‍या खात्‍यावर रक्‍कम रु.2,74,265/- हा बेकायदेशीर दंड लावलेला आहे. तक्रारदाराने सदरहू तक्रार या मंचात दाखल करुन पुढीलप्रमाणे विनंती केलेल्‍या आहेत. जाबदार क्र.1 ला तक्रारदारांना नॉन सबमीशन ऑफ इन्‍शुरन्‍स पॉलीसी या नावाखाली आकारलेल्‍या दंडाची रक्‍कम रु.2,74,265/- परत देणेबाबत आदेश व्‍हावा, सदरहू रक्‍कम तक्रारदारांना नोव्‍हेंबर-2012 पासून सदरची रक्‍कम पूर्णपणे परतफेड करेपर्यंत द.सा.द.शे.15.5टक्‍के प्रमाणे व्याज देणेविषयी आदेश व्‍हावा. जाबदार क्र.1 बँकेने तक्रारदारांच्‍या खात्‍यावर विविध चार्जीस या नावाखाली कापून घेतलेली रक्‍कम रु.6,74,276/- वर नोव्‍हेंबर-2012 पासून सदरची रक्‍कम जाबदार क्र.1 बँकेने तक्रारदारांना परत दिलेली तारीख म्‍हणजेच दि.05.04.2014 रोजीपर्यंत द.सा.द.शे.15.5टक्‍के प्रमाणे व्याज देणेविषयी आदेश व्‍हावा. जाबदार यांच्‍या बेकायदेशीर कृत्‍यामुळे झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाच्‍या भरपाईपोटी यातील तक्रारदारांना जाबदार यांचेकडून रक्‍कम रु.1,00,000/- मिळावी अशी सदरहू मंचास विनंती केलेली आहे.

 

3.         तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत पुढीलप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदारांनी जाबदार यांना दिलेले पत्र, जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारांना पाठविलेले ई-मेल्‍स, तक्रारदारांनी जाबदार क्र.1 यांना पाठविलेले र्इ-मेल्‍स, तक्रारदारांनी जाबदार क्र.1 यांना पाठविलेली पत्रे, तक्रारदारांनी जाबदार क्र.1 यांना त्‍यांचे वकीलामार्फत पाठविलेल्‍या नोटीसा, तक्रारदारांनी ओम्‍बुंडम्‍सन यांना पाठविलेली पत्रे, जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारांना पाठविलेली पत्रे, इत्‍यादीं कागदपत्रे तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेली असून तक्रारदारांनी दि.21.05.2015 रोजी चंद्रकांत सोनमल ओसवाल, सदरहू फर्मचे भागीदार यांचे सरतपासाचे शपथपत्र दाखल केलेले आहे.

 

4.          जाबदार यांना नोटीस आदेश होऊन ते या मंचासमोर हजर होऊन त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केले.  जाबदार यांचे कथनानुसार, सदरचा तक्रार अर्ज जाबदार क्र.1 व 2 यांना मान्‍य व कबूल नसून तो त्‍यांनी परिच्‍छेदनिहाय नाकारलेला आहे.  तक्रारदारचा तक्रार अर्ज खोटा असून तक्रारदाराने काही गोष्‍टी मंचापासून लपवून ठेवलेल्‍या आहेत.  तक्रारदारांचे तक्रार अर्जाचे अवलोकन करता, Commercial Purpose दिसून येतो.  तक्रारदारांचे दोन शॉपस असलेने व त्‍यांचा व्यवसाय आहे हे स्‍पष्‍ट कथन केले असून सदरचे कॅश क्रेडीट हे या दोन्‍हीं शॉपसचे नावेच उघडलेले असलेकारणाने सदरचा व्यवसाय हा तक्रारदार यांचे उपजिवीकेचे साधन नसून त्‍याचे व्यावसायिक स्‍वरुप दिसून येते व या कारणास्‍तव सदरचा तक्रार अर्ज नामंजूर करावा.  तक्रारदारास जे कागदपत्र जाबदार क्र.1 बँकेस सहयां करुन दिले आहेत.  यावरुन त्‍याला कॅशक्रेडीट अन्‍वये कोणकोणते चार्जेस देय असतात याची पूर्ण कल्‍पना होती व आहे.  तक्रारदारास याचीही पूर्ण कल्‍पना आहे की सदरचे कॅशक्रेडीट हे एका वर्षासाठी वैध असते व ते दरवर्षी रेन्‍यु करावे लागते.  कॅश क्रेडीटसाठी सेक्‍युरिटी ठेवावी लागते व त्‍यासाठी तक्रारदाराने काही स्‍टॉक आणि बुक डेटस तारण म्‍हणून ठेवले होते व आहेत.  तसेच कोलॅटरल सिक्‍युरिटी म्‍हणून तक्रारदाराने काही Immovable Property तारण म्‍हणून ठेवलेली आहे व सदरचे या सर्वाचा विमा उतरवावा लागतो व तक्रारदारास तो पॉलीसी संपण्‍यापूर्वी रेन्‍यु करावा लागतो.  तक्रारदाराने जर तो रेन्‍यु केला नाही तर तक्रारदाराचे अकौंटमधून रेन्‍यु करण्‍याचा अधिकार जाबदार यांना आहे व तसे झाल्‍यास 2टक्‍के पिनल इंटरेस्‍ट बसत असतो.  सदरची अटही तक्रारदारास sanction पत्राद्वारे माहित आहे. तसेच कर्जाचे कागदपत्रांवर सुध्‍दा नमुद आहे. तक्रारदार हा सदरचे विमा पॉलीसीचे नूतनीकरण करणेस असमर्थ ठरलेला असून तक्रारदारास कथनानुसार, जाबदार बँकेने ते रेन्‍युल केले नाही. सदरची जबाबदारी ही तक्रारदाराची असून जाबदार यांची नाही. विमा पॉलीसींचा विचार करता तो जाबदार यांचा ग्राहक नाही. तसेच तक्रारदारांचे याही विधानाचा जाबदार स्‍पष्‍टपणे इन्‍कार करतात की, बँकेचे अधिकारी श्री.खोचीकर व श्री.वागळे हे भारत ओसवाल यांना भेटले होते. सबब, Non-submission of Policy करीता घेतलेली रक्‍कम ही योग्‍य असलेने तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा असे जाबदार यांचे कथन आहे.

 

5.          जाबदार यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यासोबत सॅनक्‍शन लेटर, रेन्‍युअल सॅनक्‍शन लेटर, मास्‍टर फॅसिलीटी अॅग्रीमेंट ऑफ महेंद्र ज्‍वेलर्स तसेच दि.07.03.2015 रोजी जाबदार तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री.अजय एस.ढोणे यांचे शपथपत्र, इत्‍यादीं कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

 

6.          तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे, युक्‍तीवाद तसेच जाबदार यांचे लेखी कथन व युक्‍तीवाद यावरुन मंचासमोर खालील मुद्दा उपस्थित होतो. 

 

क्र.

मुद्दे

उत्‍तरे

1

तक्रारदार हा जाबदार बँकेचा ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम-2(1)(डी) खाली ग्राहक होतो काय ?

नाही

2

अंतिम आदेश काय ?

खालील नमुद आदेशाप्रमाणे

 

विवरण:-

 

7.  मुद्दे क्र.1 व 2 :- तक्रारदारांची भागीदारी फर्म असून “महेंद्र ज्‍वेलर्स” या नावाने राजारामपूरी 3री गल्‍ली, येथे दागिन्‍यांचे दोन शोरुमन्‍स आहेत. याबद्दल उभय पक्षांमध्‍ये वाद नाही.  जाबदार क्र.2 ही बँक असून ठेवी स्विकारणे, कर्ज देणे, कॅश क्रेडीट सुविधा देणे, इत्‍यादी व्यवसाय ही जाबदार बँक करते व जाबदार क्र.1 ही जाबदार क्र.2 बँकेची कोल्‍हापूर येथील शाखा आहे. तक्रारदारांनी जाबदार क्र.1 बँकेमध्‍ये कॅश क्रेडीट खाते उघडले.  सदरची खाती राजारामपूरी व भाऊसिंगजी रोड या दोन शो रुम्‍सचे नावे उघडली. सन-2011 रोजी खाती उघडली व वेळोवेळी जाबदार यांचे सांगणेप्रमाणे रिन्‍यु केली. तथापि जाबदार क्र.1 बँकेने नोव्‍हेंबर, 2012 पासून तक्रारदारांचे खात्‍यामधून कॅश डिपॉझिट चार्जेस पिनल इंटरेस्‍ट, नॉन स‍बमीशन ऑफ इन्‍शुरन्‍स पॉलीसी या नावाखाली वेगवेगळया रकमा काढणे चालू केले अशी एकूण रक्‍कम रु.6,47,276/- व नॉन सबमीशन ऑफ इन्‍शुरन्‍स पॉलीसीचा दंड म्‍हणून जुलै-2011 पासून रक्‍कम रु.2,74,265/- तक्रारदारांचे खात्‍यावर नावे टाकली.  तक्रारदारांनी याबाबत विचारणा केली असता, बँकेचे संबंधीत अधिका-यांनी त्‍यांना सदरची रक्‍कम क्रेडीट करणेची हमी दिली व सदरचे हमीवर विश्‍वास ठेऊन तक्रारदारांनी रक्‍कम जमा करणे चालू ठेवले व संबंधीत अधिका-यांबरोबर दि.30.09.2013, दि.10.10.2013 व दि.25.10.2013 रोजी मिटींग होऊन सदरचे चार्जेस कमी करणेबाबत आशवासने दिली. 

 

8.          तदनंतर बँकेचे अधिकारी श्री.वागळे व श्री.खोचीकर यांनी तक्रारदारांचे शो रुमला भेट देऊन कॅश क्रेडीट अकौंटस रिन्‍यु केले नाही तर 4टक्‍के क्लोअर चार्जेस लावले जातील अशी धमकी दिली व सदरचे सर्व रेकॉडींग तक्रारदारांचे भाऊ भरत ओसवाल यांनी केले आहे असेही तक्रारदारांचे कथन आहे.

 

9.          तक्रारदारांनी सदरचे सर्व बेकायदेशीर चार्जेस Under Protest भरलेली आहे व अकौंट बंद करत असलबाबत कळविले. तदनंतर जाबदार बॅंकेने तक्रारदारांचे भाऊसिंगजी रोड शाखेचे अकौंटमध्‍ये व्याज रक्‍कम रु.33,391.46 पैसे येणे असलेबाबत कळविले.  तीहि रक्‍कम तक्रारदारांनी भरली असे तक्रारदारांचे कथन आहे.

 

10.        तक्रारदारांनी Collateral Security म्‍हणून जाबदार क्र.1 बँकेने तक्रारदारांच्‍या  सि.स.नं.1809/ख व 1810/1 या राजारामपूरी येथील व सि.स.नं.647 पन्‍हाळा या मिळकतीची कागदपत्रे त्‍यांचे ताबेमध्‍ये ठेवलेली होती व ती परत मिळाली आहेत. 

 

11.          जाबदार बँकेने तदनंतर दि.21.11.2013 रोजी रक्‍कम रु.21,078.92पैसे बाकी असलेबाबत कळविले तक्रारदारानेही आपण देणे लागत नसलेबाबत कळविले. 

 

12.         तक्रारदाराने दि.06.02.2014 रोजी बँकींग Ombudsman यांचेकडे लेखी तक्रार केली. सदरची तक्रार झालेनंतर जाबदार क्र.2 बँकेचे पुणे ऑफीसनेही तक्रारदारांना दि.03.04.2014 रोजी पत्र पाठवून वेगवेगळया चार्जीसखाली डेबीट केलेली रक्‍कम रु.6,47,276/- व नॉन सबमीशन ऑफ इन्‍शुरन्‍स पॉलीसीसाठी दंड म्‍हणून लावलेली रक्‍कम रु.2,74,265/- या रकमांबाबत तीन दिवसांत कळवित असलेबाबत कथन केले मात्र प्रत्‍यक्षात तसे केले नाही.

 

13.         तक्रारदाराने असे कथन केले आहे की, जाबदार क्र.1 बँकेने तक्रारदार यांचे खातेवर लावलेली रक्‍कम पूर्णत: बेकायदेशीर असून तक्रारदारांनी पन्‍हाळा येथील Collateral Security ची मिळकत ही मिळकतीचा इन्‍शुरन्‍स संपलेनंतर वेळेत इन्‍शुरन्‍स केली नाही. सबब, सदरचे मिळकतीची किंमत जरी एक कोटी ऐंशी लाख असली तरी बहुतांश किंमत ही रिकाम्‍या प्‍लॉटची आहे. बंगल्‍याची किंमत केवळ रक्‍कम रु.7,50,000/- इतकीच आहे व बहुतांश किंमत ही रिकाम्‍या प्‍लॉटची आहे इतकीच आहे व बंगल्‍याचा प्रिमीयम रक्‍कम रु.506/- इतकाच आहे. सबब, अकौंट इन्‍शुरन्‍स न करणेही बँकेची चुक आहे व त्‍यासाठी तक्रारदारांचे खात्‍यावर बेकायदेशीर दंड लावलेला आहे. रक्‍कम रु.2,74,265/- तसेच त्‍यावरील होणारे व्याज तसेच विविध चार्जेस या नावाखाली लावलेली रक्‍कम रु.6,47,276/- ही तक्रारदारांचे खातेवर जमा करणेची विनंती केलेली आहे.

 

14.         जाबदार बॅंकेने स्‍वत:चे कथन वर नमुद कलम-4 मध्‍ये केलेप्रमाणे असलेने पुन:श्‍च नमुद करीत नाही.

 

15.         वर नमुद तक्रारदार व जाबदार यांचे कथनांचा विचार करता, मंचासमोर महत्‍त्‍वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्‍हणजे तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो का? तक्रारदाराने वर कथन केलेप्रमाणे भागिदारी फर्म आहे व त्‍यातील “महेंद्र ज्‍वेलर्स” या नावाने राजारामपुरी 3 री गल्‍ली, कोल्‍हापूर व भाऊसिंगजी रोड, कोल्‍हापूर येथे दागिन्‍यांचे दोन शोरुमन्‍स आहेत ही बाब उभयपक्षी मान्‍य आहे.  तथापि तक्रारदाराने जाबदार बँकेचे अधिका-यांनी कॅश क्रेडीटची विचारणा केली असता, तक्रारदारांनी दोन शोरुमच्‍या नावानी दोन कॅश क्रेडीट खाती उघडली असे स्‍वत:च कथन केले आहे.  तसेच सदरची खाती ही सदरचे खातेवरुन स्‍वत:चे उदरनिर्वाहाकरीता जो व्यवसाय सुरु होता तो तक्रारदारांचे उदरनिर्वाहाकरीता सुरु होता असेही कुठेही नमुद नाही. इतकेच नव्‍हेतर सदरचे कॅश क्रेडीट हे त्‍याने व्यवसायाकरीता उघडले होते असे नमुद केले आहे.  यावरुन तक्रारदारांचा व्‍यावसायिक हेतु दिसून येतो व सदरचे कॅश क्रेडीट खातेवरुनच जाबदार यांनी कॅश डिपॉझिट चार्जेस, पिनल चार्जेस (इंटरेस्‍ट), नॉन सबमिशन ऑफ इन्‍शुरन्‍स पॉलीसी या नावाखाली वेगवेगळया रक्‍कमा काढणे सुरु केले होते. या बाबींचा विचार करता, जो कॅश क्रेडीटच्‍या तक्रारदार यांचे व्यावसायिक उद्देशाचा/वादाचा मुद्दा या मंचासमोर येतो. त्‍याच कॅश क्रेडीटवरुन जाबदार यांनी सदरचा व्‍यवहार केलेला आहे.  सबब, जो वादाचा मुद्दाच आहे की, ज्‍यामुळे तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा    कलम-2(1)(डी) खाली ग्राहक या संज्ञेतच बसत नाही.  त्‍या कॅशक्रेडीटवर होणारा सर्व व्यवहार हाही एक व्यावसायिक उद्देशच म्‍हणजे चुकीचे ठरणार नाही असे या मंचाचे ठाम मत आहे.  सबब, सदरचा तक्रारदार हा या मंचासमोर ग्राहक या नात्‍याने आलेला नसलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

 

16.         वर नमुद तक्रारदार हा ग्राहक होत नसलेने सदरचा तक्रार अर्ज या कारणास्‍तव नामंजूर करणेत येतो व या अनुषांगिक तक्रारदाराने आपल्‍या तक्रार अर्जात मागितलेल्‍या मागण्‍या तक्रारदार हा ग्राहकच नसलेने मिळणेस पात्र नाही.  वर नमुद कारणास्‍तव तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो. 

 

                आदेश

[1]      तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो.

[2]   खर्चाबाबत आदेश नाहीत.

[3]   सदर निकालपत्राच्‍या प्रती उभय पक्षकारांना द्याव्‍यात. 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.