तक्रारदार : गैर हजर. सामनेवाले : वकीलामार्फत हजर. -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाली ही बँक आहे. तर तक्रारदार यांचे सा.वाले बँकेकडे बचत खाते ज्याचे शेवटचे चार अंक 1334 आहेत असे होते. तक्रारदार हे आपसात पती पत्नी आहेत. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांचे बचत खाते परस्पर बंद करुन टाकले. तक्रारदारांनी बरीच चौकशी केल्यानंतर तक्रारदारांना असे सांगण्यात आले की, तक्रारदारांनी त्यांचे पक्षकारांना वेळोवेळी दिलेले धनादेश न वटल्याने सा.वाले यांनी खाते बंद केले. तक्रारदारांनी सेंच्युरीयन बँकेकडून कर्ज घेतले होते. त्याचा मासीक हप्ता तक्रारदारांचे खात्यातून अदा केजा जात होता. तथापी सा.वाले यांनी खाते बंद केल्याने तक्रारदारांचे कर्जाचे हप्ते सेंच्युरीयन बँकेकडे जावू शकले नाहीत. तक्रारदारांनी सा.वाले बँकेला दिनांक 3 डिसेंबर, 2008 व 12 डिसेंबर, 2008 रोजी पत्र देवून बचत खाते पुन्हा सुरु करण्यास सांगीतले. तथापी सा.वाले यांनी त्या प्रमाणे कार्यवाही केली नाही. उलट 15 डिसेंबर, 2008 रोजीच्या पत्राने आपल्या कार्यवाहीचे समर्थन केले. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. 2. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांचे खात्यामध्ये पुरेसी शिल्लक नसल्याने तक्रारदारांनी त्यांचे पक्षकारांना दिलेले धनादेश परत केले जात होते. या बद्दलच्या घटना सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये नोंदविल्या आहेत. त्यानंतर सा.वाले यांनी दिनांक 22.8.2008 रोजी तक्रारदारांना पत्र देवून 21 दिवसाचे आत खाते बंद करावे अशी सूचना दिली. तथापी तक्रारदारांनी काही कार्यवाही न केल्याने सा.वाले यांनी खाते बंद केले. व तक्रारदारांचे नांवे शिल्लक रक्कम रु. 3,008.92 धनादेश तंयार केला व तक्रारदारांना दिनांक 31.1.2009 रोजी तो अदा केला. या प्रमाणे सा.वाले यांनी आपल्या कार्यवाहीचे समर्थन केले. 3. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कैफीयतीला प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. व त्यामध्ये सा.वाले यांच्या कैफीयतीमधील कथने नाकारली. तथापी बचत खात्यातील शिल्लक रक्कमेचा धनादेश प्राप्त झाल्याचे मान्य केले. दोन्ही बाजुंनी पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्र दाखल केले. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत,शपथपत्रे, कागदपत्रे यांचे वाचन केले. त्यानुसार तक्रारीच्या निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. . | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांचे बचत खाते बंद करुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. | 2 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 4. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीच्या शपथपत्राचे परिच्छेद क्र.1 मध्ये असे कथन केले की, तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये नेहमीच शिल्लक कमी रहात होती व तक्रारदारांनी त्यांचे पक्षकारांना दिलेले धनादेश परत केले जात होते. त्या धनादेशांचे दिनांक , क्रमांक व रक्कम सा.वाले यांनी कैफीयतीत दिलेली आहे. त्या माहितीची पडताळणी तक्रारदारांचे बचत खात्याच्या उता-याशी केलेली आहे. व कैफीयतीमधील नोंदी त्या बचत खात्यातील उता-यातील नोंदीशी जुळतात. या वरुन तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे असलेल्या बचत खात्यावर दिलेले धनादेश 14 वेळेस परत करण्यात आले होते असे दिसून येते. कैफीयतीमधील या नोंदी सा.वाले यांचे कैफीयतीमधील कथनास पुष्टी देतात. 5. सा.वाले यांनी आपल्या लेखी युक्तीवादासोबत तक्रारदारांनी बचत खाते सुरु करताना ज्या शर्ती व अटी कबुल केल्या होत्या त्याची प्रत जोडलेली आहे. शर्ती व अटीचे कलम 1.4 प्रमाणे सा.वाली बँक तक्रारदारांना 30 दिवसाची नोटीस देवून खाते बंद करु शकेल अशी तरतुद आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 22.8.2008 रोजी नोटीस दिली व त्यानंतर दि.31.1.2009 रोजी खाते बंद केले. सा.वाले यांनी दिनांक 22.8.2008 चे नोटीसची प्रत कैफीयत सोबत जोडली आहे. तसेच तक्रारदारांना शिल्लक रक्कम रु.3,008.92 या रक्कमेचा धनादेश अदा केल्याची पावती निशाणी क्र.3 वर कैफीयत सोबत जोडलेली आहे. तक्रारदारांनी तो धनादेश प्राप्त झाल्याची बाब मान्य केली आहे. 6. उपलब्ध पुराव्यावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांचे खाते बंद करण्यापूर्वी तक्रारदारांना नोटीस दिली होती ही बाब सिध्द होते. त्याचप्रमाणे सा.वाले यांना तक्रारदारांचे खाते बंद करणेकामी सबळ कारण होते. व ती कार्यवाही आकसाने झाली नाही असेही दिसून येत नाही. शर्ती व अटी प्रमाणे सा.वाले यांना तसा अधिकार होता हे देखील सिध्द होते. एकूणच सा.वाले यांनी तक्रारदारांना बचत खाते बंद करुन सेवा सुविधा पुरविणत कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. सबब पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 240/2009 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 3 आदेशाच्या प्रमाणि त प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |