Maharashtra

Kolhapur

CC/19/546

Rajnanda Mallikarjun Pise - Complainant(s)

Versus

HDFC Bank Ltd. Ritel Loan Service Karita Adhikrut Adhikari & Others 3 - Opp.Party(s)

Phansalkar

27 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/19/546
( Date of Filing : 08 Jul 2019 )
 
1. Rajnanda Mallikarjun Pise
Ramnagar,Latwadi Road, Vadgaon,Kolhapur
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. HDFC Bank Ltd. Ritel Loan Service Karita Adhikrut Adhikari & Others 3
HDFC House,Senapati Bapat Marg,Lower Parel (West) Mumbai 400 013.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 27 Jan 2023
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्‍या

 

1.    तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रारदार यांचे मयत पती यांनी वि.प. क्र.2 यांचेकडून “अर्टिगा” ही गाडी खरेदी करणेकरिता कर्ज उचल केले होते व सदर कर्जाची उचल करताना वि.प.क्र.2 यांनी तक्रारदार यांचे जीवन विमा पॉलिसी वि.प.क्र.4 यांचेकडून उतरवून घेतली होती व ही पॉलिसी सर्व सुरक्षा अशी आहे.  याची जोखीम रक्‍कम रु.6 लाख इतकी होती व विम्‍याचा कालावधी दि.7/5/2023 अखेर होता व आहे.  सदर विम्‍याचा हप्‍ता रु.6,761/- असा होता व आहे.  तक्रारदार यांचे पती यांचा ह्दयविकाराच्‍या झटक्‍याने दि.8/5/2019 रोजी मृत्‍यू झाला.  तदनंतर सदर घटनेची सूचना दि. 31/5/2019 रोजी तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे विम्‍याची रक्‍कम देणेबाबत योग्य त्‍या कागदपत्रांसहीत क्‍लेम दाखल केला.  मात्र वि.प. यांनी कोणत्‍याही सबळ कारणाशिवाय तक्रारदार यांचा कायदेशीर क्‍लेम हा तक्रारदार यांचे पतीने पॉलिसी उतरवित असताना खोटी माहिती दिली या कारणास्‍तव दि. 2/6/2019 रोजी नामंजूर केलेला आहे.  सबब, प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदारास दाखल करणे भाग पडले.

 

2.    क्रारदाराची तक्रार थोडक्‍यात पुढीलप्रमाणे

 

      तक्रारदार यांचे मयत पती कै. मल्‍लीकार्जुन धोंडी पिसे यांनी वि.प. क्र.2 यांचेकडे अर्टिगा ही गाडी खरेदी करणेकरिता कर्ज उचल केलेले होते.  सदर कर्जाची उचल करताना वि.प.क्र.2 यांनी तक्रारदार यांचे जीवन विमा पॉलिसी वि.प. क्र.4 यांचेकडे उतरवून घेतली होती. सदर पॉलिसीचा क्र.2950202214048800009 असा असून रक्‍कम रु. 6 लाखचा विमा होता.  मल्‍लीकार्जुन पिसे हे दि. 8/5/2019 रोजी मयत झाले व वारस या नात्‍याने तक्रारदार यांनी सदरचा विमादावा दाखल केला.  सदर विम्‍याचा कालवधी दि. 7/5/2023 अखेर आहे व विम्‍याचा प्रिमियम हा रक्‍कम रु.6,761/- असा ठरला होता व आहे.  तक्रारदार यांचे पती मल्‍लीकार्जुन पिसे यांचे ह्दयविकाराच्‍या झटक्‍याने दि.8/5/2019 रोजी छ.प्रमिलाराजे रुग्‍णालय येथे निधन झाले.  पती मयत झालेनंतर वि.प. यांना सदर घटनेची सूचना देवून दि. 31/5/2019 रोजी विम्‍याची रक्‍कम देणेबाबत योग्‍य त्‍या कागदपत्रांसहीत क्‍लेम दाखल केला होता.  मात्र तक्रारदाराचा कायदेशीर व बोनाफाईड क्‍लेम तक्रारदार यांचे पतीने पॉलिसी उतरवित असताना खोटी माहिती दिली या कारणास्‍तव दि. 2/6/2019 रोजी वि.प. विमा कंपनीने नामंजूर केलेला आहे.  विमा  उतरविणेपूर्वी  वि.प. यांनी नेमलेल्‍या वैद्यकीय   अधिका-कडून विमाधारकाची वैद्यकीय तपासणी करुन सदर विमाधारक पात्र आहे किंवा नाही याची खात्री करुन वि.प. मार्फत विमा उतरविला जातो.  असे असताना सुध्‍दा केवळ रक्‍कम देय लागू नये या कारणास्‍तव तक्रारदार यांचा विमादावा वि.प. यांनी नाकारलेला आहे.  सबब, याकरिता सदरची रक्‍कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्‍के इतके व्‍याज वसूल होवून मिळणेकरिता व तक्रारदार यांना झाले मानसिक व शारिरिक त्रासपोटी रु.1 लाख व अर्जाचा खर्च रु.25,000/- इतकी रक्‍कम वि.प. यांचेकडून मिळणेकरिता प्रस्‍तुतचा अर्ज तक्रारदार यांनी दाखल केलेला आहे. 

 

3.    तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत तक्रारदार यांची पॉलिसी, विमा क्‍लेम नामंजूर केलेचे पत्र, तक्रारदार यांचे पतीचे मृत्‍यूपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. 

 

4.    वि.प. यांना आयोगाची नोटीस लागू झालेनंतर त्‍यांनी हजर होवून या आयोगासमोर आपले म्‍हणणे दखल केले.  वि.प.क्र.1 व 2 यांचे कथनानुसार, तक्रारदार यांची तक्रार ही खोटया व खोडसाळ कथनांआधारे दाखल केली असलेमुळे तक्रार फेटाळणेस पात्र आहे.  तक्रारदार हा आयोगासमोर स्‍वच्‍छ हाताने आलेला नाही.  त्‍याने महत्‍वाच्‍या गोष्‍टी आयोगापासून लपवून ठेवलेल्‍या आहेत. सबब, याही कारणास्‍तव तक्रारदार यांची तक्रार फेटाळणेत यावी.  तक्रारीमध्‍ये वि.प. क्र.1 व 2 विरुध्‍द कोणतीही दाद मागितलेली नाही.  सबब, सदरची तक्रार वि.प. क्र.1 व 2 यांचेविरुध्‍द फेटाळणेस पात्र आहे.  वि.प. बँक व तक्रादार यांचेमध्‍ये ग्राहक व सेवा देणार असे कोणतेही नाते नव्‍हते व नाही.  बँकींग सेवेव्‍यतिरिक्‍त वि.प. बँक कोणत्‍याही प्रकारची सेवा तिच्‍या ग्राहकांना पुरवित नाही.  वि.प. क्र. 4 यांचेकडून विमा पॉलिसी उतरवून घेतली हे तक्रारदार यांचे कथन धादांत खोटे आहे.  तक्रारदार यांचे सदरचे कथनाबाबत बँकेत कोणत्‍याही प्रकारची माहिती नाही.  तक्रारदार यांचे पतीने वि.प. बँकेकडून कर्ज घेतले होते तथापि तक्रारदार व वि.प. बँकेमध्‍ये विम्‍याच्‍या संदर्भात कोणतेही तसे नाते नाही.  तक्रारदार यांच्‍या पतीच्‍या मृत्‍यूबाबत व तदनंतर तक्रारदार या एकमेव वारस असल्‍याबाबत वि.प. बँकेस कोणत्‍याही प्रकारची माहिती नाही.  सबब, वि.प. बँक त्‍याबाबत कोणतेही भाष्‍य करीत नाही.  कर्ज कराराप्रमाणे फक्‍त कर्जसुरक्षा अथवा वाहन विमा उतरविणेची जबाबदारी कर्जदाराची होती व आहे व त्‍या प्रमाणे कर्जदारास त्‍याच्‍या सोयीने विमा कंपनीकडून विमा उतरविता येतो.  मात्र तथा‍कथित जीवन विम्‍याबाबत वि.प. बँकेस कोणतही माहिती नाही.  तक्रारदारने मागितलेली मागणीही मुळातच त्‍यांचे पतीचे विम्‍याबाबत असून तक्रारीचे अवलोकन केले असता सर्व तक्रार ही वि.प. विमा कंपनीबाबत असून वि.प. बँकेविरुध्‍द कोणताही आरोप अथवा दाद प्रस्‍तुतकामी मागितलेली  नाही.  सबब, वि.प. बॅंकेविरुध्‍द लबाडीने तक्रार दाखल करणेत आली आहे.  वि.प. बॅंकेने सदर विम्‍याचा आजतागायत कोणताही हप्‍ता भरलेला नाही.  सबब, वि.प. बँकेने सेवेमध्‍ये कोणत्‍याही प्रकारची त्रुटी देणेचा प्रश्‍नच उद्भवत नाही.  मात्र उपरोक्‍त कथनास बाधा न येता यातील वि.प. बँक मा. आयोगास नमूद करु इच्छितात की, वाद जीवन विमा हा प्रस्‍तुत तक्रारदारांचे पतीचा काढण्‍यात आला असून त्‍यांचे पश्‍चात त्‍यांचे विम्‍याची रक्‍कम तक्रारदार यांचे कर्ज खातेस जमा होणे आवश्‍यक आहे. सबब, सदरची रक्‍कम पतीचे कर्जखातेस वर्ग करणेबाबत योग्‍य ते आदेश व्‍हावेत असे वि.प. यांनी म्‍हणणे दाखल केले आहे.

 

5.    वि.प.क्र.1 व 2 यांनी याकामी कर्ज मागणी अर्ज, कर्ज करारपत्र, व खाते उतारा तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

6.    वि.प.क्र.3 व 4 यांनी हजर होवून म्‍हणणे दखल केले.  त्‍यांचे कथनानुसार, तक्रारदाराचे पतीचे मृत्‍यूबाबत तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे क्‍लेम दाखल केलेला होता.  तक्रारदाराचे पतीने घेतले विमा पॉलिसीप्रमाणे तक्रारदार यांचे पतीचा मृत्‍यू हा पॉलिसी मध्‍ये समाविष्‍ट असले अनन्‍यसाधारण आजार (क्रिटीकल इलनेस) या आजारामध्‍ये समाविष्‍ट होत नसलेने वि.प. यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नामंजूर केलेला असून वि.प. ची सदर कृती ही येाग्‍य व कायदेशीर आहे.  तक्रारदार यांचे पतीने पॉलिसी उतरवित असताना खोटी माहिती दिली या कारणास्‍तव त्‍यांचा क्‍लेम नामंजूर केला आहे हे तक्रारदार यांचे कथन चुकीचे आहे.  विमा उतरविणेपूर्वी वि.प. यांनी नेमलेल्‍या वैद्यकीय अधिका-याकडून विमाधारकाची वैद्यकीय तपासणी करुन विमा धारक सदर विम्‍यास पात्र आहे किंवा नाही याची खात्री करुनच वि.प. मार्फत विता उतरविला जातो हे तक्रारदार यांचे कथन चुकीचे आहे.  सर्व सुरक्षा विमा पॉलिसीचे अवलोकन करता पॉलिसीप्रमाणे क्रिटीकल इलनेसचे व्‍याख्‍येप्रमाणे खालील आजार अंतर्भूत होतात.

 

Critical illness included under Sec.1 of Policy terms and conditions means –

  1. First Heart attack of specified severity
  2. Open chest CABG
  3. Stroke resulting in permanent symptoms
  4. Cancer of specified severity
  5. Kidney failure requires Dialysis
  6. Major organ/bone marrow transplantation
  7. Multiple sclerosis with persistent symptoms
  8. Surgery of Aorta
  9. Primary pulmonary Arterial Hypertension
  10. Permanent paralysis of limbs
  11.  

7.    तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा वैद्यकीय अहवालानुसार ह्दयविकाराने झालेला असून ह्दयविकाराचा मृत्‍यू हा अपघाती नसून नैसर्गिक आहे व क्रिटीकल इलनेस या व्‍याख्‍येखाली मोडत नाही.  सबब, नियमाप्रमाणे तक्रारदार यांचा क्‍लेम देय होत नाही.  तसेच क्रिटीकल इलनेसचे आजारचा लाभ घेणेसाठी विमाधारक हा आजाराचे प्रथमतः निदान झालेनंतर 30 दिवसापर्यंत जीवंत राहणे हे विमा पॉलिसीचे अटीप्रमाणे जरुरी आहे.  मात्र तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा 30 दिवसांचे अगोदरच झाला असलेने वरील क्‍लेम देय होत नाही.  सबब, प्रस्‍तुतचा अर्ज लबाडीचा व चुकीचा असून तो वि.प. यांना मान्‍य नसलेकारणाने अर्ज नामंजूर करणेत यावा. 

 

8.    वि.प.क्र.3 व 4 यांनी या संदर्भात विमा पॉलिसी तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. 

 

9.    तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्‍हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.   

 

­अ.क्र.

                मुद्दा

      उत्‍तरे

1

तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे  काय ?     

होय. वि.प.क्र. 3 व 4 यांनी

3

तक्रारदारांनी केलेल्‍या मागण्‍या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ?     

होय, अंशतः.

4

अंतिम आदेश काय ?

खालीलप्रमाणे

 

 

 

 

विवेचन

 

मुद्दा क्र.1

     

10.   तक्रारदार यांनी वि.प. नं.2 यांचेकडून अर्टिगा ही गाडी खरेदी करणेकरिता कर्ज उचल केलेले आहे व वि.प. नं. 4 यांचेकडून सर्व सुरक्षा पॉलिसी उतरविलेली आहे.  याबाबत उभय पक्षांमध्‍ये वादाचा मुद्दा नाही व सदरचे विमा पॉलिसीचा नं. 2950202214048800009 असा आहे व कालावधी दि. 7/5/2023 अखेर आहे.  सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्‍ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे.  याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्‍कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.

 

मुद्दा क्र.2 ते 4

 

11.   तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत पॉलिसी पेपर्स तसेच विमा नामंजूर केलेले पत्रही दाखल केलेले आहे.  तक्रारदार यांचे पतीचा मृत्‍यू हा दि. 8/5/2019 रोजी झालेला आहे  व तक्रारदार यांचे विमा पॉलिसीचा कालावधी हा दि.7/5/2023 पर्यंत आहे.  वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमादावा हा तक्रारदार यांचा मृत्‍यू हा ह्दयविकाराने झाला असलेने तो “क्रिटीकल इलनेस” या सदराखाली येत नसलेने तसेच विमा पॉलिसी काढलेपासून आजाराचे प्रथमतः निदान झालेनंतर 30 दिवसांपर्यंत जीवंत राहणे विमा पॉलिसीचे अटी प्रमाणे जरुरी आहे.  मात्र तक्रारदार यांचे पतीचा मृत्‍यू हा 30 दिवसांचे अगोदरच झाला असलेने वरील क्‍लेम देता येत नाही.  या स्‍वरुपाचे पत्र दि. 2/6/2019 रोजी तक्रारदार यांना देवून त्‍यांचा विमादावा नामंजूर केलेला आहे.  मात्र वि.प. विमा कंपनीने सदरचे तक्रारदार यांचा मृत्‍यू  क्रिटीकल इलनेसचे व्‍याख्‍येप्रमाणे अंतर्भूत होत नाही व या संदर्भातील क्रिटीकल इलनेसचे व्‍याख्‍येप्रमाणे कोणते आजार अंतर्भूत होतात हे पॉलिसीचे अटी शर्तीमध्‍ये नमूद केले आहे.  त्‍यामध्‍ये अट क्र. 1 मध्‍ये

First Heart attack of specified severity.

 

असू नमूद करण्‍यात आलेले आहे.  याचा विचार करता

“The first occurrence of myocardial infarction which means the death of the portion of the heart muscle as a result of inadequate blood supply to the relevant area the diagnosis for this will be evidenced by all of the following criteria.

  • A history of typical clinical symptoms consistent with the diagnosis of Acute Myocardial infarction.(for e.g. typical chest pain)
  • New characteristic electrocardiogram changes
  • Elevation of infarction specific enzymes, Troponins or other biochemical markers

 

12.   तसेच तक्रारदार यांचे पॉलिसीमध्‍ये “क्रेडीट शिल्‍ड” हेही कव्‍हर तक्रारदार यांना देण्‍यात आलेले आहे.  पॉलिसीचे अटी व शर्तीप्रमाणे याचाही विचार करता

“In the event of accidental death or permanent total disability of the insured person during the policy period, the company will make payment under this policy as detailed below -

The company will pay the balance outstanding loan amount to the legal heirs of the insured or the name insured subject to the maximum sum insured specified in the schedule.  

 

13.   वर नमूद पॉलिसीतील अटी शर्तींचा विचार करता तक्रारदार यांना ह्दयविकाराचा झटका आल्‍याने मृत्‍यू आला आहे हे कारण जरी वि.प. विमा कंपनीने हा अपघाती मृत्‍यू नसून नैसर्गिक मृत्‍यू आहे असे कथन करीत असली तरी या आयोगासमोर काही मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिर्णय आहेत. For a family accident is nowhere defined.  Heart attack is undersigned, unwanted mishap and therefore amounts to an accident for the family.  यामध्‍ये मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाने हार्ट अॅटॅक हा सुध्‍दा एक अपघातच आहे असे निरिक्षण नोंदविलेले आहे.  जरी तक्रारदार यांनी सदरचा न्‍यायनिर्णय या आयोगासमोर दाखल केलेला नसला तरीसुध्‍दा सदरचा निर्णय हा आयोगासमोर असलेने याचाही विचार हे आयोग करीत आहे व या तक्रारअर्जाचे कामी सदरचा मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचा न्‍यायनिर्णय लागू होत आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब, वि.प. विमा कंपनीने जरी तक्रारदाराचा मृत्‍यू हा अपघाती नसून तो नैसर्गिक आहे असे कथन केले असले तरी सदरचा आक्षेप हे आयोग फेटाळून लावत आहे व पॉलिसीचे कव्‍हरेजमध्‍ये तक्रारदार यांना “क्रेडीट शिल्‍ड” हेही कव्‍हरेज देण्‍यात आले आहे.  याचा विचार करता तक्रारदार हे मयत व्‍यक्‍तीचे कायदेशीर वारस असलेने व पॉलिसीचे कामी त्‍या पत्‍नी या नात्‍याने वारसदार असलेने सदरचे तक्रारदार यांचे पतीने काढलेल्‍या कर्जाची उर्वरीत रक्‍कम पत्‍नी व वारसदार या नात्‍याने त्‍यांना देण्‍याचे आदेश वि.प. विमा कंपनीस करण्‍यात येतात.  तसेच maximum sum insured देणेत यावी असेही निरिक्षण या आयोगाने नोंदविलेले आहे.  सबब, सदरचा रक्‍कम रु. 6,00,000/- देणेचे आदेश वि.प.क्र.3 व 4 यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या करण्‍यात येतात.   वि.प.क्र.1 व 2 यांना याकामी जबाबदार धरण्‍यात येत नाही.

 

14.   वि.प. विमा कंपनीने या संदर्भातील काही वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिर्णयही दाखल केलेले आहेत.  याचाही विचार हे आयोग करीत आहे. 

  1. 2005(1) CPR 64 SC

       United India Insurance Co.Ltd. vs. Harchand Rai Chandan Lal

 

  1.  Pankaj Kumar Chouadhary  Vs. Future Generali India Insurance Co.Ltd.

 

  1. 2017(2) CPR 6969 (NC)

A.Y. Cottex Ltd.Vs. The Oriental Insurance Co.Ltd

 

याचा विचार करता Insurance policy is a contract between insured and insurer and its terms and conditions are to be considered as such in same spirit in which they are written and agreed upon by the parties.

 

15.   वरील न्‍यायनिर्णयांचा विचार करता तक्रारदार यांचे विमा पॉलीसीचे अटी शर्तीप्रमाणेच सदरचा विमा मजूर करणेचे निष्‍कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.  सबब, तक्रारदार यांनी मागितलेली विमा दाव्‍याची रक्‍कम ही तक्रारदार यांना अदा करणेचे आदेश वि.प. विमा कंपनीस करण्‍यात येतात.  तसेच सदरचे रकमेवर विमादावा नाकारले तारखेपासून ते संपूर्ण रक्‍कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने देणेचे आदेश वि.प. विमा कंपनीस करणेत येतात तसेच तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारअर्जाचे खर्चापोटी मागितलेली अनुक्रमे रक्‍कम रु.1,00,000/- व 25,000/- ही या आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- देणेचे निष्‍कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.  सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.

 

 

आदेश

 

1.    तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2.    वि.प. क्र.3 व 4 यांनी तक्रारदार यांना रक्‍कम रु.6,00,000/-  देणेचे आदेश करणेत येतात.  तसेच सदरचे रकमेवर दि.02/06/2019 पासून संपूर्ण रक्‍कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज देणेचे आदेश करणेत येतात.

 

3.    वि.प. क्र.3 व 4 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.

 

4.    वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प.क्र.3 व 4 यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी. 

 

5.    वि.प.क्र.1 व 2 यांचेविरुध्‍द कोणतेही आदेश नाहीत. 

 

6.    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्‍वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

7.    जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्‍कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्‍याची वजावट करण्‍याची वि.प. यांना मुभा राहील.

 

8.    सदर आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्‍क पाठवाव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.