तक्रारदार : स्वतः हजर. सामनेवाले : प्रतिनिधी वकीलामार्फत हजर. -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाले हे एच.डी.एफ.सी. बँकेची क्रेडीट कार्ड शाखा आहे. तर सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 यांचे अधिकारी आहेत. सा.वाले क्र.1 बँकेने तक्रारदारांना क्रेडीट कार्ड सुविधा दिली होती. व त्याप्रमाणे तक्रारदारांनी क्रेडीट कार्डचा वापर केला होता. तक्रारदारांकडून सा.वाले क्र.1 बँकेला क्रेडीट कार्डाच्या वापराबद्दल काही रक्कम येणे होती. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे सा.वाले बँकेचे अधिका-यांनी दिनांक 14.6.2006 रोजी तक्रारदारांना तडजोड पत्र दिले व त्याप्रमाणे तक्रारदारांना ती रक्कम बँकेस अदा केली. त्यानंतर तक्रारदारांकडून रु.1,650/- येवढी बाकी होती. व तक्रारदारांनी ती रक्कम दिनांक 29.4.2007 रोजी सा.वाले बँकेत जमा केली. व तक्रारदारांकडून काही येणे बाकी नाही असे पत्र सा.वाले बँकेच्या अधिका-यांनी तक्रारदारांना दिले. 2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे तक्रारदारांनी क्रेडीट कार्डच्या वापराबद्दलची संपूर्ण रक्कम अदा केल्यानंतरही सा.वाले बँकेचे वसुली अधिकारी तक्रारदारांना त्रस्त करत होते. वेळी अवेळी फोन करुन धमक्या देत आहेत, येवढेच नव्हेतर बँकेने चेन्नाई येथील फौजदारी न्यायालयात तक्रार क्र.5487/08 ही तक्रारांचे विरुध्द दाखल केली. या प्रमाणे सा.वाले बँकेने तक्रारदारांना क्रेडीट कार्डचे संदर्भात विनाकारण मनस्ताप दिला. व या प्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप करुन तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सा.वाले क्र.1 बँकेने तक्रारदारांना नुकसान भरपाईबद्दल रु.1,50,000/- द्यावेत अशी मागणी केली. 3. सा.वाले क्र.1 यांचे अधिकारी श्री.अनंद प्रभू यांनी आपली कैफीयत शपथपत्रावर दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांची क्रेडीट कार्ड वापराची मर्यादा रु.30,000/- येवढी होती. परंतु तक्रारदारांकडून 11 जून, 2006 पर्यत बरीच येणेबाकी होती. त्यानंतर सा.वाले यांनी दिनांक 14.6.2006 रोजी तक्रारदारांना एक पत्र दिले व तक्रारदारांनी एक रक्कमी रु.19,000/- भरल्यास येणेबाकी संपविण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतु तक्रारदारांनी ती रक्कम एकरकमी अदा केली नाही. या प्रमाणे सा.वाले यांनी दिनांक 14.6.2006 च्या पत्राव्दारे तक्रारदारांना दिलेला प्रस्ताव संपुष्टात आला. तो केवळ तडजोडीचा प्रस्ताव होता. ज्याची कार्यवाही तक्रारदारांनी करावयाची होती. तक्रारदारांनी त्यानंतर क्रेडीट कार्ड बद्दल काही रक्कम जमा केली. परंतु संपूर्ण येणेबाकी अदा केली नाही. तक्रारदारांचे क्रेडीट कार्डचे खाते थकबाकीत गेल्याने सरते शेवटी सा.वाले बँकेने कायदेशीर कार्यवाही करण्याचे ठरविले, व सा.वाले यांचे क्रेडीट कार्ड मुख्यालय, चेन्नाई येथे असल्याने तेथील न्यायालयात तक्रारदारांचे विरुध्द फौजदारी कार्यवाही करण्यात आली, ती अद्याप प्रलंबीत आहे. या प्रमाणे तक्रारदार क्रेडीट कार्डची रक्कम थकबाकी ठेवण्यास जबाबदार आहेत असे कथन करुन सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास नकार दिला. 4. तक्रारदारांनी त्यानंतर आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. व त्यामध्ये सा.वाले यांच्या कैफीयतीमधील कथने नाकारली. 5. दोन्ही बाजुंनी पुरावा शपथपत्र, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद दाखल केला. 6. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्डचे खात्याचे संदर्भात थकबाकी रक्कम पूर्ण देय केली नाही. वसुली अधिका-यांमार्फत धमकावण्या देवून तक्रारदारांना मानसिक त्रास दिला व सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. | 2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. | 3 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 7. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 14.6.2006 रोजी दिलेल्या पत्राची प्रत हजर केलेली आहे. त्याचे एकंदर वाचन केले असता असे दिसून येते की, त्या पत्रातील पहिले वाक्य असे आहे की, सा.वाले यांना तक्रारदारांकडून तडजोडीपोटी पूर्ण रक्कम प्राप्त झाली. परंतू दुसरे वाक्य असे आहे की, त्या पत्रामध्ये नमुद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी जर रक्कम अदा केली नाही तर तो प्रस्ताव रद्द समजण्यात येईल. त्या पत्रामध्ये तक्रारदारानी रक्कम रोखीने रुपये 19,000/- जून, 2006 पर्यत भरावयाचे असे स्पष्टपणे नमुद केले होते. पत्राचे एकंदर वाचन केले असता असे दिसून येते की, दिनांक 14.6.2006 चे पत्र हे सा.वाले यांनी तक्रारदारांना दिलेल्या तडजोडीचा प्रस्ताव होता. व त्याप्रमाणे तक्रारदारांनी रु.19 हजार जून, 2006 मध्ये अदा करावयाचे होते. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीच्या शपथपत्रात असे स्पष्टपणे कथन केले की, तक्रारदारांनी या प्रस्तावाप्रमाणे एक रक्कमी रक्कम रु.19,000/- सा.वाले यांचेकडे अदा केले नाही. व तक्रारदारांनी सोईप्रमाणे काही रक्कमा अदा केल्या. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत खाते उता-यांच्या प्रती दाखल केल्या आहेत. त्यावरुन असे दिसते की, तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे काही रक्कम क्रेडीट कार्ड खाते बाकी बद्दल जमा केली, परंतु एक रक्कमी रु.19,000/- तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे जमा केल्याचे दिसून येत नाही. खाते उता-यातील नोंदी असे दाखवितात की, दरम्यान तक्रारदारांनी क्रेडीट कार्डचा वापर चालु ठेवला होता. तक्रारदारांनी संपुर्ण रक्कम सा.वाले यांना अदा केलेली नसल्याने बाकी रक्कमेवर सा.वाले यांनी व्याज आकारले व तक्रारदारांनी त्यांच्या सोईप्रमाणे रक्कमा जमा केल्या. व या प्रमाणे तक्रारदारांच्या क्रेडीट कार्डचे खाते निरंक होऊ शकले नाही. 8. तक्रारदारांनी आपल्या कैफीयेतीसोबत दिनांक 29.4.2007 रोजी रु.1,650/- सा.वाले बँकेकडे जमा केल्याबद्दल पावतीची प्रत हजर केली आहे. त्या पावतीवर अशी नोंद आहे की, सा.वाले यांचे अधिकारी श्री. झवर यांचेशी चर्चा केल्याप्रमाणे तक्रारदार रु.1,650/- जमा करत असून त्यानंतर सा.वाले यांचेकडून क्रेडीट कार्ड खात्याबद्दल मागणी होणार नाही. जमा पावतीवरील नोंद ही तक्रारदारांचे हस्तांक्षरात आहे व ती सा.वाले यांच्या अधिका-याचे हस्ताक्षरात नाही. तक्रारदारांनी आपले प्रति उत्तराचे शपथपत्रात तसे कथनही केलेले नाही. यावरुन सा.वाले यांनी तक्रारदार यांचेकडून रु.1,650/- स्विकारल्यानंतर क्रेडीट कार्डची काही येणे बाकी शिल्लक राहीली होती असा निष्कर्ष काढता येत नाही. 9. तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या खाते उता-याच्या प्रती असे दर्शवितात की, तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे वेळोवेळी क्रेडीट कार्ड खात्यामध्ये काही रक्कमा जमा केल्या परंतु संपूर्ण देय रक्कम अदा करण्यात आलेली नाही. सहाजिकच क्रेडीट कार्ड खात्यावर येणेबाकी बरीच राहीली व क्रेडीट कार्ड खात्याची मर्यादा रु.30,000/- तक्रारदारांनी कधीच ओलांडल्याने सा.वाले बँकेने तक्रारदारांचे विरुध्द कायदेशीर कार्यवाही केलेली दिसते. 10. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये असे कथन केले आहे की, सा.वाले यांचे वसुली अधिकारी तक्रारदारांना फोन करतात व वसुली बद्दल धमकवतात. परंतु त्या बद्दलचा तपशिल तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. या प्रकारचे प्रसंग कधी घडले याचा देखील तपशिल तक्रारीत किंवा लेखी युक्तीवादात पुरविलेला नाही. 11. एकंदर पुराव्याचा विचार करता तक्रारदार हे सा.वाले यांचे विरुध्द वरील आरोप सिध्द करु शकलेले नाहीत असा निष्कर्ष काढावा लागतो. 12. वरील परिस्थितीत पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 419/2008 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |