Maharashtra

Chandrapur

CC/13/80

Ajay Wasantrao Uttarwar - Complainant(s)

Versus

HDFC Agro Genral Insurance Company Limited Through Nagpur Branch Maneger - Opp.Party(s)

Adv.A.U.Kullarwar

30 Dec 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/13/80
 
1. Ajay Wasantrao Uttarwar
23,Vidharbha Housing Colony Ramnagar Chandrapur
Chandrapur
Maharshtra
...........Complainant(s)
Versus
1. HDFC Agro Genral Insurance Company Limited Through Nagpur Branch Maneger
B Wing 5th Flor Shriram Tower Kingsway Near Central Bus Stop Nagpur
Nagpur
Maharshtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. Kalpana Jangade MEMBER
 HON'BLE MRS. Kirti Gadgil MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: नि का :::

(मंचाचे निर्णयान्‍वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक :- 30/12/2014 )

 

अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 14 सह 12 अन्‍वये दाखल केली आहे.

 

 1.        अर्जदाराच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालील प्रमाणे. अर्जदाराने आापल्‍या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराने स्‍वतःच्‍या मालकीची कार करीता गैरअर्जदारापासून दि. 19/5/12 ते दि. 18/5/13 या कालावधीकरीता विमा पॉलिसी काढली होती. दि. 26/9/12 रोजी अर्जदार सदर वाहनाव्‍दारे बल्‍लारपूर ते चंद्रपूर येथे येत असतांना कारचे खालचे बाजुला उचंवटा लागल्‍याने ऑईल चेंबर फुटले त्‍यामुळे गाडीचे नुकसान झाले याबाबत अर्जदाराने गैरअर्जदाराकडून फोन वर माहीती दिली. गैरअर्जदाराचे कंपनीने दिलेल्‍या सुचनेनुसार दि. 27/9/12 रोजील अर्जदाराने नागपूर येथे सादिक मोटर प्राय. लिमी. येथे वाहन दुरुस्‍तीकरीता जमा केले. दि. 28/9/12 रोजी गैरअर्जदाराच्‍या कंपनीने कोणताही सर्व्‍हे न करता अर्जदारास रु. 8,417.62/- चे एचडीएफसी बॅंक, मुंबईचा चेक क्रं. 279398 दि. 28/9/12 चे पञासह पाठविला. गैरअर्जदार कंपनीने वाहनाचे किती नुकसान झाले याबाबत कोणतेही तपास केल्‍या शिवाय अर्जदाराला वरील नमुद रकमेचे चेक देवून अनुचित व्‍यवहार पध्‍दतीची अवलंबना केली आहे. अर्जदाराला सदर वाहनाच्‍या दुरुस्‍तीचा एकूण खर्च रु. 57,593/- असा आला. गैरअर्जदाराने अर्जदारास रु. 49,175.38/- कमी दिले सबब अर्जदाराने गैरअर्जदाराला दि. 4/6/13 ला वरील नमुद रकमेच्‍या मागणीकरीता नटीस पाठविली. सदर नोटीस मिळून सुध्‍दा गैरअर्जदाराने कोणतीही दखल घेतली नाही सबब सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्‍यात आली.  

       

2.    अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराला वाहनाची दुरुस्‍तीकरीता आलेला खर्च रु. 49,175/- व्‍याजासह देण्‍याचे आदेश व्‍हावे. तसेच अर्जदाराला झालेल्‍या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्‍याचा आदेश व्‍हावे.

 

3.    अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं. 09 वर आपले लेखीउत्‍तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्‍या लेखीउत्‍तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले सर्व आरोप हे खोटे असून ते नाकबुल आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून रु. 8,417.62/- चे धनादेश घेवून व्‍हाऊचर वर फुल अॅन्‍ड फायनल सॅटीसफॅक्‍शन म्‍हणून स्विकारले आहे. सदर धनादेश स्विकारल्‍यानंतर विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटी नुसार वाहनावर येणारा खर्च किंवा आलेल्‍या खर्चाची जबाबदारी विमा कंपनीवर नाही राहणार. तसेच गैरअर्जदार कंपनीने अपघातग्रस्‍त गाडीचा सर्व्‍हे करते वेळी सादिक मोटर्स ने गैरअर्जदाराला कुठलेही सप्‍लीमेंटरी इस्‍टीमेंट दिलेले नव्‍हते. गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति कोणतीही अनुचित व्‍यवहार पध्‍दतीची अवलंबना केली नसून सदर तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे.

 

4.    अर्जदाराचा अर्ज, दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्‍तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्‍तर, दस्‍ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्‍तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील निष्‍कर्ष आणि त्‍याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.

 

           

मुद्दे                                                    निष्‍कर्ष

 

(1)   अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ?                          होय.     

 

         

  (2)  गैरअर्जदाराने अर्जदारास न्‍युनतापूर्ण सेवा दिली आहे         

काय ?                                                         नाही.

 

  (3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला

आहे काय ?                                                   नाही.                                    

                               

  (4) आदेश काय ?                                         अंतीम आदेशाप्रमाणे.

 

 

                         कारण मिमांसा

 

मुद्दा क्रं. 1 बाबत ः-

 

5.    अर्जदाराने स्‍वतःच्‍या मालकीची कार करीता गैरअर्जदारापासून दि. 19/5/12 ते दि. 18/5/13 या कालावधीकरीता विमा पॉलिसी काढली होती. ही बाब दोन्‍ही पक्षांना मान्‍य असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे असे सिध्‍द होत असल्‍याने मुद्दा क्रं. 1 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

 

 

 

मुद्दा क्रं. 2 व 3  बाबत ः- 

 

6.    गैरअर्जदाराने नि. क्रं. 12 चे सोबत दाखल केलेले दस्‍ताऐवजाची पडताळणी करतांना असे दिसले कि, अर्जदाराने गैरअर्जदाराला रु. 8,417/- विमा क्‍लेमचे मिळाले म्‍हणून अशी रशिदावर अर्जदाराची सही आहे तसेच सदर रकमेबाबत अर्जदाराची समत्‍ती आहे असे (सॅटीसफॅक्‍शन व्‍हाऊचर) वर अर्जदाराची सही आहे. सदर व्‍हाऊचरवर अर्जदारानेचा कोणताही रकमेबाबत आक्षेप घेतलेला नाही किंवा नोंदविला नाही.

 

मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, यांनी दिलेल्‍या न्‍यायनिर्णयानुसार

 

II (2013)586 (NC)

M.L. KATHURIA V/S. ORIENTAL INSURANCE CO. LTD. & ANR.

Decided on 10.5.2013

 

Consumer Protection Act, 1986- Sections 2(1) (g), 14(1) (d), 21 (b) – Insurance –Full and final settlement- Cheque accepted without protest- Alleged coercion- Alleged deficiency in service- District Forum allowed complaint- State Commission allowed appeal- Hence revision- Once party accepts payment as full and final satisfaction without any protest, party cannot put forward claim before Consumer Fora Complainant had accepted Rs.3,10,000/- while accepting the claim voluntarily and without any coercion exercised upon him- No illegality irregularity or jurisdictional error in impugned order.

 

सदर प्रकरणात सुध्‍दा अर्जदाराने गैरअर्जदारापासून सदर वाहनाचे विमा क्‍लेम रु. 8,417.62/- फुल अॅन्‍ड फायनल सेंटलमेंट म्‍हणून घेतले असून त्‍यावर कोणताही आक्षेप व्‍हाऊचर किंवा रशिदावर नोंदविला नाही. सदर वरील नमुद असलेल्‍या रकमेचा धनादेश अर्जदाराला गैरअर्जदाराकडून मिळाल्‍यानंतर अर्जदाराने 08 महिण्‍यानंतर गैरअर्जदाराकडे नोटीस पाठविला यावरुन असे सिध्‍द होते कि, अर्जदार हे विमा क्‍लेमची रक्‍कम मिळाल्‍यानंतर 08 महिण्‍यापर्यंत कोणताही विमा रकमेबाबत आक्षेप किंवा उर्वरित रकमेबाबत गैरअर्जदाराकडून मागणीकरीता कोणतेही प्रयत्‍न केले नाही. तसेच गैरअर्जदाराने दाखल सॅटीसफॅक्‍शन व्‍हाऊचरवर अर्जदाराचे सही जोरजबरदस्‍तीने किंवा दिशाभूल करुन घेतल्‍याचे कोणतेही आरोप तक्रारीत दिसत नाही. वरील नमुद असलेल्‍या न्‍यायनिर्णयाचा आधार घेतांना मंचाच्‍या मताप्रमाणे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराला विम्‍याच्‍या शर्ती व अटी नुसार फुल अॅन्‍ड फायनल सेटलमेंट रक्‍कम दिली. व अर्जदाराने ती रक्‍कम कोणताही आक्षेप न घेता फुल अॅन्‍ड फायनल सेटलमेंट रक्‍कम ती स्विकारलेली आहे म्‍हणून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति कोणतीही न्‍युनतम सेवा दर्शविली नाही किंवा अनुचित व्‍यवहार पध्‍दत अवलंबविलेली नाही. सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्‍तर हे नकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रं. 4 बाबत ः- 

 

7.     मुद्दा क्रं. 1 ते 3 च्‍या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

अंतीम आदेश

             (1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

             (2) दोन्‍ही पक्षांनी आापआपला खर्च सहन करावा.

             (3) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी.

 

 

चंद्रपूर

दिनांक -   30/12/2014

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kirti Gadgil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.