Maharashtra

Satara

CC/22/91

श्रीनीश श्रीनिवास शेट्टी, व इतर - Complainant(s)

Versus

HDFC लाईफ इंशुरन्स् लि. सातारा - Opp.Party(s)

Adv. Shinde

29 May 2024

ORDER

Consumer Disputes Redressal
Commission, Satara
 
Complaint Case No. CC/22/91
( Date of Filing : 07 Mar 2022 )
 
1. श्रीनीश श्रीनिवास शेट्टी, व इतर
कमला चेंबर्स, सदरबझार, सातारा, ता. जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
...........Complainant(s)
Versus
1. HDFC लाईफ इंशुरन्स् लि. सातारा
सिल्वर आर्च, प्लॉट नं 1, पहिला मजला, स. नं. 288, 289, न्यू राधिका रोड, सातारा
सातारा
महाराष्ट्र
2. 2. HDFC लाईफ इंशुरन्स लि.
लोढा एक्सेल्स्, 13 मजला, अपोला मिल्स कंपाऊड, एन.एम. जोशी रोड, महालक्ष्मी मुंबई 400011
मुंबई
महाराष्ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. BHARATI S. SOLAWANDE PRESIDENT
 HON'BLE MRS. ROHINI B. JADHAV MEMBER
 HON'BLE MS. MANISHA H. REPE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 29 May 2024
Final Order / Judgement

न्या य नि र्ण य

 

द्वारा मा. श्रीमती रोहिणी बा. जाधव, सदस्य

 

1.    प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.

 

2.    तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –

      जाबदार ही विमा सेवा प्रदान करणारी विमा कंपनी आहे.  तक्रारदार क्र.1 हे नोकरीनिमित्‍त दुबई येथे असतात.  तक्रारदार क्र.1 हा तक्रारदार क्र.2 यांचा मुलगा आहे.  तक्रारदार क्र.1 यांनी जाबदार क्र.1 यांचेडून फॅमिली फ्लोटर प्‍लॅन दि. 23/09/2016 रोजी घेतला आहे.  सदर पॉलिसीचा क्र. 90351257 असा आहे.  त्‍याचा वार्षिक हप्‍ता रक्‍कम रु.10,110/- नियमित तक्रारदार  आजपर्यंत भरत आले आहेत.  दि. 23/09/2016 ते 23/09/2021 रोजी पर्यंत तक्रारदार यांनी जाबदार यांचे सर्व हप्‍ते वेळेत भरलेले आहेत.  दि. 23/9/2021 रोजी तक्रारदार यांनी धनादेश क्र. 419291 हा कॅनरा बॅंकेचा धनादेश हस्‍तपोच जाबदार यांचे कार्यालयामध्‍ये दिला.  सदरचा प्रिमिअम मिळाल्‍याची पोहोच जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना दि. 27/09/2021 रोजी पोस्‍टाद्वारे पाठविली आहे.  परंतु अचानक नोव्‍हेंबर 2021 च्‍या पहिल्‍या आठवडयात जाबदार कंपनीने तक्रारदार यांना चालू वर्षाचा प्रिमिअम न भरलेबाबत फोन आला.  म्‍हणून तक्रारदाराने याबाबत जाबदार कंपनीमध्‍ये जावून शहानिशा केली असता तक्रारदार यांचा चेक बाऊन्‍स झाल्‍याचे सांगण्‍यात येवून तक्रारदारांना चेक परत करण्‍यात आला.  तक्रारदारांनी याबाबत कॅनरा बॅंकेत चौकशी कली असता त्‍यांनी सदरचा चेक क्लिअरन्‍ससाठी बॅंकेत आला नसल्‍याचे तसेच चेकवरील आय.एफ.सी. कोड बदलला आहे, त्‍यामुळे चेक बाऊन्‍स झाल्‍याचा शेरा नमूद आहे असे सांगितले.  तदनंतर तक्रारदारांनी जाबदार यांचेशी संपर्क साधला असता पॉलिसी रिव्‍हाईव्‍ह करावी लागेल असे सांगून तक्रारदार क्र.2 यांची ई.सी.जी. व मेडीकल टेस्‍ट दि. 7/12/2021 रोजी करुन घेतली.  सदर लॅबमधूनच त्‍याचदिवशी तक्रारदार यांचा रिपोर्ट विमा कंपनीस लॅबमार्फत पाठविण्‍यात आला.  तत्‍पूर्वी तक्रारदार यांनी पॉलिसी पुनरुज्‍जीवीत करण्‍यासाठीचा फॉर्म भरुन त्‍यासोबत प्रिमिअम रु.11,461/- चा अॅक्‍सीस बॅंकेच्‍या चेक क्र. 485821 दि.15/11/2021 ने जाबदार यांचेकडे दिला.  तक्रारदार क्र.1 हे दुबई येथे असल्‍याने त्‍यांनाही फॉर्म पाठविण्‍यात आला व त्‍याची सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी जाबदार यांचेकडे दिली.  तरीसुध्‍दा जाबदार यांनी, तक्रारदार यांनी कागदपत्रे सादर न केल्‍यामुळे तक्रारदाराची पॉलिसी रद्द केलेचा मॅसेज तक्रारदारांना दि. 21/1/2022 रोजी पाठविला.  तक्रारदारांनी जाबदारांनी सांगितल्‍याप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती.  तरीही जाबदारांनी तक्रारदारांची पॉलिसी रद्द केली आहे. जाबदार यांनी चेक बाऊन्‍स झाल्‍यानंतर तक्रारदारास त्‍वरित कळविले नव्‍हते.  वेळेत कळविले असते तर तक्रारदार हे ग्रेस पिरियडमध्‍ये प्रिमिअम भरु शकले असते.  तक्रारदारांनी दिलेल्‍या दि.15/11/2021 चा धनादेशाची रक्‍कम रु.11,461/- अद्याप जाबदार कंपनीकडे जमा आहे.  जाबदार यांनी कोणती कागदपत्रे तक्रारदारांनी जाबदारांना दिली नाहीत याबाबत‍ तक्रारदारांना स्‍पष्‍ट कळविलेले नाही.  अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे.   म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.  सबब, जाबदार यांनी तक्रारदाराचे HDFC Life Health Assure Plan Policy पूर्ववत चालू ठेवण्‍याचे आदेश व्‍हावेत, तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- मिळावी व अर्जाचा खर्च रु.5,000/- जाबदार यांचेकडून मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे. 

 

3.    तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत तक्रारदार यांनी जाबदार यांना दिलेला अर्ज, चालू प्रिमिअम भरल्‍याची पावती, रिटर्न स्‍टेटमेंट, हेल्‍थ रिव्‍हायव्‍हल फॉर्म, अॅक्‍सीस बॅंकेचा खाते उतारा, कॅनरा बॅंकेचा खात्‍याचा उतारा इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

4.    प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र.1 व 2 यांचेवर होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत तसेच त्‍यांनी म्‍हणणेही दाखल केले नाही.  सबब, जाबदार क्र.1 व 2 यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश करण्यात आला.

 

5.    तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व पुरावा शपथपत्र व युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात. 

 

.क्र.

मुद्दे

उत्तरे

1

तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ?

होय.

2

जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ?

होय.

3

तक्रारदार हे जाबदार यांचेकडून पॉलिसी पूर्ववत चालू होवून मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ?

होय.

4

अंतिम आदेश काय ?

खालीलप्रमाणे

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र.1

 

6.    जाबदार ही विमा सेवा प्रदान करणारी विमा कंपनी आहे.  तक्रारदार क्र.1 हा तक्रारदार क्र.2 यांचा मुलगा आहे.  तक्रारदार क्र.1 यांनी जाबदार क्र.1 यांचेडून फॅमिली फ्लोटर प्‍लॅन दि. 23/09/2016 रोजी घेतला आहे. सदर पॉलिसीचा क्र. 90351257 असा आहे.  त्‍याचा वार्षिक हप्‍ता रु.10,110/- नियमित तक्रारदार भरत आले आहेत.  दि. 23/09/2016 ते 23/09/2021 रोजी पर्यंत तक्रारदार यांनी जाबदार यांचे सर्व हप्‍ते वेळेत भरलेले आहेत.  तक्रारदार यांनी  तक्रारअर्जासोबत दाखल केलेल्‍या कागदयादीतील अ.क्र.2 ला पॉलिसीचे प्रिमियमची जाबदार यांनी दिलेल्‍या पोहोच पावतीची प्रत दाखल केली आहे.  जाबदार यांनी याकामी हजर होवून सदरची बाब नाकारलेली नाही.  सबब, तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2

 

7.    तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत दाखल केलेल्‍या कागदयादीतील अ.क्र.3-3 ला दाखल केलेल्‍या चेकवर एचडीएफसी बॅंक लि. चा चेक स्‍वीकारल्‍याबाबतचा शिक्‍का आहे.  सदरचा चेक दि. 23/9/2021 रोजी जाबदार विमा कंपनीने स्‍वीकारल्‍याचे दिसते.  सदरचा चेक दि. 23/09/2021 रोजी स्‍वीकारल्‍यानंतर जाबदार कंपनीने तक्रारदारांना पाठविलेली पोचपावती तक्रारदारांना दि 27/09/2021 रोजी मिळाली.  ती याच कागदयादीच्‍या अ.क्र.2 ला दाखल आहे.  सदरचा चेक हा तक्रारदारांनी जाबदार यांना मुदतीत दिलेला होता.  सदरचा चेक न वटल्‍याने तो जाबदार कंपनीकडे दि. 29/09/2021 रोजी 88-Other reasons असा शेरा मारुन परत आल्‍याचे तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या कागदयादीतील अ.क्र.3-1 व 3-2 मधील कागदपत्रांवरुन दिसून येते.  तसेच  जाबदारांनी  सदरचा  चेक क्लियरिंगसाठी दि. 28/9/2021 ला पाठविल्‍याचेही या  कागदपत्रांवरुन  दिसून येते.  त्‍यामुळे  सदरची  बाब  जाबदारांनी  तक्रारदार  यांना,  चेक न  वटता  परत  आला  त्‍याच दिवशी,  म्‍हणजे  दि. 29/09/2021  रोजी  कळविणे  आवश्‍यक  होते.   परंतु  जाबदारांनी   सदरची    बाब    तक्रारदारांना नोव्‍हेंबर 2021 फोनद्वारे कळविली.  म्‍हणून  तक्रारदार क्र. 2 हे  स्‍वतः  प्रिमियम  भरल्‍याची  पोहोच  पावती  घेवून  विमा कंपनीकडे गेल्‍या असता जाबदारांनी चेक न वटल्‍याबाबत सांगितले.  वास्‍तविक पाहता, जाबदार विमा कंपनीने तक्रारदारांना चेक न वटल्‍याबाबतची माहिती त्‍वरित देणे आवश्‍यक होते, जेणेकरुन तक्रारदारास प्रिमिअमची रक्‍कम विहीत मुदतीत भरणे शक्‍य झाले असते.  परंतु जाबदारांनी सदरची बाब तक्रारदारास कळविण्‍यास दोन महिने उशिर केला, त्‍यामुळे तक्रारदारांना ग्रेस पिरियडमध्‍येही विमा हप्‍त्‍याचे पैसे भरता आले नाहीत हे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  यामध्‍ये तकारदारांची काहीही चूक दिसून येत नाही.

 

8.    चेक न वटण्‍याबाबत 88-Other reasons नुसार जी कारणे आहेत, त्‍यामध्‍ये incorrect date mentioned on the cheque, signature mismatch, mismatch of the amount and figures, damaged cheque, overwriting of the cheque इत्‍यादी कारणांचा समावेश होतो.  प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदाराचा चेक हा 88-Other reasons या कारणास्‍तव वटलेला नाही.  यावरुन तक्रारदाराचा चेक हा केवळ तांत्रिक कारणामुळे वटलेला नाही ही बाब स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे चेक न वटण्‍यामध्‍ये तक्रारदाराचा कोणताही दोष दिसून येत नाही असे या आयोगाचे मत आहे.  जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा चेक न वटल्‍याची बाब तक्रारदारास त्‍वरित कळवून तक्रारदाराकडून दुसरा चेक घेणे अभिप्रेत होते.  परंतु जाबदारांनी तसे केल्‍याचे दिसून येत नाही.  याउलट जाबदार यांनी चेक न वटलेची बाब तक्रारदारांना खूपच उशिरा म्‍हणजे नोव्‍हेंबर 2021 मध्‍ये फोनद्वारे कळविली. यामध्‍ये तक्रारदाराचा कोणताही दोष दिसून येत नाही असे या आयोगाचे मत आहे.

 

9.    तक्रारदारांची स्‍वतःची चूक नसताना त्‍यांना 2016 पासून व्‍यवस्थित सुरु असलेली पॉलिसी पुनरुज्‍जीवीत करण्‍यास जाबदारांनी सांगितले.  त्‍यानुसार तक्रारदारांनी मेडीकल टेस्‍ट करुन घेतली व आवश्‍यक ती कागदपत्रे जाबदारांना दिली तसेच विमा हप्‍त्‍याचे रकमेचा चेकही अदा केला.  परंतु तरीही जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना दि. 21/01/2022 रोजी तक्रारदारांची विमा पॉलिसी रद्द केल्‍याचा संदेश पाठविला. 

 

10.   त्‍यानंतर तक्रारदारांनी दि. 31/1/2022 रोजी जाबदार विमा कंपनीत समक्ष जावून लेखी निवेदन दिले.  सदरचे निवेदन तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या कागदयादीतील अ.क्र.1 ला दाखल केलेले आहे.  सदर निवेदनाद्वारे तक्रारदाराने पॉलिसी पुनरुज्‍जीवित करणेची विनंती केली असता त्‍यावर जाबदार विमा कंपनीने “We have registered your concern and will get back to you shortly.  Please quote this service request No. 1-160331590115 for further interactions – HDFC Life.” असे उत्‍तर दिले.  यावर विमा कंपनीने पुन्‍हा काहीही कार्यवाही केल्‍याचे दिसून येत नाही.  तक्रारदारांकडून जाबदार विमा कंपनीने प्रिमियम घेतल्‍याचे तक्रारीसोबत जोडलेल्‍या कागदयादीतील अ.क्र.5 च्‍या तक्रारदाराच्‍या बॅंक खातेच्‍या उता-यावरुन दिसून येते. तथापि पॉलिसी रद्द केल्‍यानंतर सदरची घेतलेली प्रिमियमची रक्‍कम जाबदार विमा कंपनीने तक्रारदारांना परत केल्‍याचे दिसून येत नाही.  जाबदार विमा कंपनीने तक्रारदारांना पॉलिसीचे पुनरुज्‍जीवन करण्‍यासाठी ज्‍या बाबींची पूर्तता करण्‍यास सांगितले होते, त्‍या बाबींची पूर्तता तक्रारदारांनी केल्‍याचे तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन दिसून येते. 

 

11.   तत्‍कालीन आयोगाने जाबदारांना दि. 8/3/2022 रोजी, तक्रारदार यांच्‍या तूर्तातूर्त ताकीदीच्‍या अंतरिम अर्जाप्रमाणे त्‍यांची मागणी मंजूर का करण्‍यात येवू नये अशी कारणे दाखवा नोटीस काढून जाबदारांचे लेखी म्‍हणणे दि.8/4/2022 पर्यंत दाखल करणेचा आदेश केला होता. सदरचे नोटीसची बजावणी जाबदारांना होवूनही जाबदार हे दि. 8/4/2022 रोजी आयोगासमोर हजर झालेले नाहीत.  त्‍यानंतर दि. 13/07/2022 रोजी जाबदारांनी वकीलांतर्फे म्‍हणणे देणेसाठी मुदतीचा अर्ज दिला.  परंतु त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा आदेश झालेले असल्‍याने त्‍यांचा अर्ज नामंजूर करण्‍यात आला.  त्‍यानंतर दि. 2/1/2023 रोजी जाबदार क्र.1 व 2 यांनी त्‍यांचा लेखी युक्तिवाद याकामी दाखल केला. सदरचा लेखी युक्तिवाद तत्‍कालीन आयोगाने अभिलेखावर दाखल करुन घेतला.  तथापि जाबदारांविरुद एकतर्फाचे आदेश दि. 30/6/2022 रोजी झाले असल्‍याने सदरचा युक्तिवाद याकामी वाचता येणार नाही असे या आयोगाचे मत आहे.  जाबदारांनी नोटीस बजावणी होवूनही विहीत मुदतीत हजर होवून स्‍वतःची बाजू मांडलेली नाही.

 

12.   वरील सर्व बाबींचा विचार करता जाबदार यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेत गंभीर त्रुटी केल्‍याचे निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

 

मुद्दा क्र.3

 

13.   सबब, तक्रारदार यांनी आवश्‍यक त्‍या बाबींची पूर्तता करुनही जाबदार यांनी तक्रारदाराचे पॉलिसीचे पुनरुज्‍जीवन केलेले नाही.  सबब, तक्रारदार हे त्‍यांचे विमा पॉलिसीचे जाबदार यांचेकडून पुनरुज्‍जीवन होवून मिळण्‍यास पात्र आहेत असे या आयोगाचे मत आहे.  तसेच जाबदार यांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास नाहक मानसिक त्रास सोसावा लागला तसेच या आयोगात तक्रार दाखल करावी लागली.  सबब, तक्रारदार हे जाबदार यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- जाबदारांकडून मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. सबब आदेश.

 

आदेश

 

  1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
  2. जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांची HDFC Life Health Assure Plan Policy No. 90351257 पूर्ववत चालू करण्‍याचे आदेश जाबदार क्र.1 व 2 यांना करण्‍यात येतात.
  3. पॉलिसी पूर्ववत चालू केल्‍यानंतर तक्रारदार यांना पुनरुज्‍जीवीत पॉलिसीची सर्व आवश्‍यक कागदपत्रे देण्‍याचा आदेश जाबदार क्र.1 व 2 यांना करण्‍यात येतो.
  4. जाबदार यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
  5. सदर आदेशाचे अनुपालन जाबदार यांनी प्रस्‍तुत निकालपत्राची प्रत मिळालेपासून 45 दिवसांचे आत करावे.
  6. सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.

 

 
 
[HON'BLE MRS. BHARATI S. SOLAWANDE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. ROHINI B. JADHAV]
MEMBER
 
 
[HON'BLE MS. MANISHA H. REPE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.