ग्राहक तक्रार क्र. 45/2014
दाखल तारीख : 03/02/2014
निकाल तारीख : 30/03/2015
कालावधी: 01 वर्षे 01 महिने 2 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. ve अमर सुभाषराव मोरे,
वय – 29, धंदा-व्यवसाय,
रा.शेळगाव, ता.परंडा, जि.उस्मानाबाद, ... तक्रारदार.
वि रु ध्द
1. व्यवस्थापक,
एच.डी.एफ.सी. बँक लि.
रिटेल लोन सर्व्हिस सेंटर, जेम्स स्टोन शॉप,
सेंट्रल एस.टी. स्टॅन्ड जवळ कोल्हापूर.
2. व्यवस्थापक,
एच.डी.एफ. सी. बँक लि.
सन प्लाझा शॉप नं.8516/11,
मुरारजी पेठ लकी चौक सोलापूर 413007.
3. श्री. एच.व्ही. भुसारे,
कार्यकारी संचालक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती,
सहकारी बँक, लि. उस्मानाबाद.
4) श्री. बाळासाहेब पांडूरंग जगताप
व्यवस्थापक,
दि. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
शाखा शेळगाव, ता. परंडा जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रादारातर्फे विधीज्ञ : श्री. एस. एन. माने.
विप क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री. पी.एम. जोशी.
विप क्र.3 व 4 तर्फे विधीज्ञ : श्री. एस. पी. दानवे.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
अ) 1. विरुध्द पक्षकार (विप) क्र.1 व 2 एच.डी.एफ.सी. बँक याचेकडून जे.सी.बी.साठी कर्ज घेतल्यानंतर परत फेडी प्रित्यर्थ आपले उस्मानाबाद डी.सी.सी. बँक शेळगाव शाखा (विप क्र.4) यांचेकडील बचत खात्याचे कोरे चेक सही करुन दिले असतांना व त्यापैकी दि.01/02/2013 चे चेकची रक्कम खात्यातून कमी झाली असतांना विप क्र.1 व 2 यांनी ही रक्कम येणे दाखवून वर दंड व्याज लावल्याने विप यांनी सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाईसाठी तक्रारकर्ता (तक) यांनी ही तक्रार दिलेली आहे.
2) तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे तक ने विप क्र. 1 व 2 यांचेकडून शेती व शेतीपुरक व्यवसायासाठी जे.सी.बी. खरेदीसाठी दि.01/11/2010 रोजी रु.14,32000/- कर्ज घेतले संपूर्ण कर्ज 01/11/2013 पर्यात फेडण्याचे होते. ते सर्व हप्ते प्रत्येकी रु.47,300/- प्रमाणे तक ने फेडलेले आहेत. दि.1/02/2013 रोजी विप क्र. 4 कडील आपले खाते क्रमांक 2392 चा चेक नं.334657, रु.47,300/- चा दि.16/02/2013 रोजी नावे पडलेला आहे. ही रक्कम विप क्र. 1 व2 यांना मिळालेली असतांनाही त्यांनी तक ला दंड रु.15,860/- आकारला आहे. सदर चेकच्या व्यवहारास विप क्र. 1 व2 व 4 तसेच डीसीसीचे मुख्य ऑफिस विप क्र. 3 हेच जबाबदार आहेत. पुढे जाता विप क्र. 1 व2 यांनी चेक क्र.334658 ते 334667 हे पण बाऊंन्स झाले अशी तकच्या खाते उता-यात नोंद केली आहे. वास्तविक हे चेक विप क्र.4 कडे कधीही पाठविण्यात आलेले नव्हते. त्या कारणावरुन विप क्र. 1 व 2 यांनी अकारण दंड आकारला आहे. विप यांनी तक चे बाबतीत काळजीपूर्वक व्यवहार केला नाही. व तक ला बेबाकी प्रमाणपत्र अद्यापही दिलेले नाही. तरी तक ने संपूर्ण कर्ज फेडले असल्यामुळे तसे प्रमाणपत्र देण्याबद्दल विप यांना आदेश व्हावा तसेच आरसी बुकातून विप यांचे नाव कमी करणेबाबत आदेश व्हावा दंडाची रक्कम रु.15,860/- आकारल्यामुळे मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व खर्चाबददल रु.5,000/- विप कडून मिळावे अशी विनंती केली आहे.
3) तक्रारीसोबत तक ने विप क्र.4 कडील खात्याचा उतारा, विप क्र. 1व 2 कडील खात्याचा उतारा, पाठवलेल्या नोटिसची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
ब) विप क्र.1 व 2 यांनी आपले लेखी म्हणणे दि.21/07/2014 रोजी दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे तक ने व्यवसायीक कारणासाठी कर्ज घेतले असल्यामुळे तो या विप चा ग्राहक होऊ शकत नाही म्हणून तक्रार रद्द व्हावी असे म्हंटले आहे. या विप चे म्हणणे आहे की विप क्र. 4 यांचेकडी ल धनादेश या विप ला मिळाला होता परंतू तांत्रिक अडचणीमुळे तो क्लिअर झाला नाही. या विप ने तक ला पत्र पाठवून त्याचा धनादेश तसेच आणखीन एक धनादेश क्लिअर होत नसल्यामूळे तेवढया रकमेचा डीडी पाठविण्यास सांगितले. विप क्र.4 यांनी दि.16/02/2013 चा रु.99760/- चा डीडी महाराष्ट स्टेट कॉपरेटीव्ह बँक लि. (एमएससी) मुबंई यांचेकडे वटणारा दिला. तो सुध्दा अपूरी रक्कम शिल्लक असल्याने न वटता परत आला या विप ने नंतर दि.12/11/2013 रोजी नोटिस पाठवून विप क्र.4 च्या धनादेशाऐवजी दुसरे धनादेश देणेविषयी कळविले. या विप ने हप्ता थकल्यामुळे करारातील अटी व शर्ती नुसार व्याज व दंडाची आकारणी केली आहे. कारण तक ने हप्ता भरण्याची तजविज केली नाही. तक ला बेबाकी प्रमाणपत्र देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यामुळे तक्राक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
क) विप क्र.3 व 4 यांनी हजर होऊन दि.21/07/2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे तक ने दिलेल्या दि.01/02/2013 च्या धनादेशाची रक्कम या विप ने त्याचे खात्यात दि.16/02/2013 रोजी नावे टाकली त्यानंतर त्या चेकची रक्कम रु.47,300/- व दुसरे खातेदार जेकटे यांचा धनादेश क्र.47382 ची रक्कम रु.52,730/- याचे कमिशन वजा करुन रु.99,760/- चा मायकर डीडी नं.32577 (एम.एस.सी.मुंबई वरील) विप क्र.1 व 2 यांच्या हक्कात दि.16/02/2013 रोजी रजिष्टर पोष्टाने एच.डी.एफ. सी. बँक मुंबई यांचेकडे पाठवीला. त्याचा अॅडव्हाईस एम.एस.सी. मुंबईला रजिष्टर पोष्टाने पाठविला. विप क्र.1 व 2 अगर एम.एस.सी. यांनी या विप ला ड्राफ्ट वठला किंवा नाही या बद्दल काहीही कळवले नाही. तक चे धनादेश नंबर 334658 ते 334667 या विप कडे वठविण्यासाठी सादर झालले नाहीत. त्यामुळे या विप विरुध्द ही तक्रार रद्द करण्यात यावी असे नमुद केले आहे.
ड) तक ची तक्रार त्यांनी दाखल केलेली कागदपत्र विप चे म्हणणे लक्षात घेता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तर
1) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय विप 3 व 4 ने.
2) तक अनूतोषास पात्र आहे काय ? होय विप क्र.3 व 4 कडून.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
इ) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
1. विप क्र.4 कडील खात्याचा उतारा स्पष्टपणे दर्शवितो की ता;16/02/2013 रोजी चेक क्र.334657 ची रक्कम रु.47300/- खर्ची टाकण्यात आली. त्यावेळी शिल्लक रक्कम रु.51,826/- होती त्यानंतर शिल्लक रु.4,526/- झाली म्हणजेच तक च्या खात्यात चेक दिला तेव्हा पुरेशी रक्कम होती व विप क्र.4 ने चेकची रक्कम खर्चीपण टाकली. तक ला विप क्र. 1 व 2 यांचे कर्ज फेडणे असल्यामुळे तो चेक त्याने त्यांच्याकडे दिला याबद्दल वाद नाही. विप क्र. 1 व 2 कडून पैसे मागण्यासाठी ज्या खात्यावर चेक काढला तेथे पाठवला गेला. या संपूर्ण पध्दतीमध्ये काहीही चूक दिसून येत नाही. विप क्र.1 व 2 कडील खाते उतारा पाहिला असता ता.02/03/2013 रोजी चेक क्र.334657 बाऊंन्स झाल्यामुळे येणे रक्कम रु.48,015/- वरुन रु.95,515/- करण्यात आली. त्यानंतर बाऊन्सींग चार्जेस ओव्हर डयू चार्जेस लावण्यात आले. पुढे सुध्दा चेक बाऊन्स झाल्याच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत व ओव्हर डयू चार्जेसपण नावे टाकण्यात आले आहेत. असे दिसते की त्यानंतर तक ने हप्ते रोख स्वरुपात भरले आहे. मात्र काही विलंब झाल्याचे दिसून येत आहे.
2. विप क्र. 4 कडून तक ची रक्कम विप क्र.1 व 2 यांना मिळाली नाही याबद्दल ही वाद नाही. विप क्र. 1 व 2 चे म्हणणे आहे की त्यांनी तक ला व्यापारी कारणांसाठी कर्ज दिले व त्यामुळे ही तक्रार चालणार नाही. विप क्र.1 व 2 यांनी तक कडून कर्जाचा हप्ता मागणे व न मिळाल्यास पूढील पावले उचलणे यामध्ये कोणतीही चूक आढळून येत नाही. तथापि, इथे बँकर म्हणजे विप क्र. 4 यांचेकडे तक ची रक्कम असतांना त्यानी विप क्र. 1 व 2 यांना कोणत्याही वैध कारणांशिवाय पाठविली नाही. त्यामुळे जर सेवेत त्रुटी असेल तर ती विप क्र.3 व 4 यांचीच असणार. तक याचे विप कडे बचत खाते दिसून येते. त्या खात्यात रकमा जमा करणे व्याज जमा करणे व मागणी प्रमाणे रकमा देणे ही विप क्र.4 ची जबाबदारी आहे. त्यामुळे तक हा विप क्र. 4 चा ग्राहक असून विप क्र. 4 ने सेवेत त्रुटी केली का हाच कळीचा मुद्दा आहे.
3. तक ने विप क्र. 4 ने एचडीएफसी बँक उस्मानाबाद यांना दि.07/11/2014 रोजी पाठवलेले पत्राची प्रत हजर केली आहे. विप क्र.4 यांनी त्याबददल संदीग्ध भूमीका घेतली आहे. त्या पत्राप्रमाणे विप क्र. 4 ने दि.16/02/2013 रोजी एम एस सी बँकेवर काढलेला चेक क्र. 32577 रु.99760/- चा एचडीएफसी बँक मुंबई कडे पाठवला होता. पण तो वठला नाही. विप क्र. 4 ने तोच चेक परत मिळावा अशी विनंती केली. तक ने विप क्र. 3 चे मुध्याधिकारी हिशेब विभागाला लिहलेले दि.28/11/2014 चे पत्र याची प्रतपण हजर केली आहे. त्यांमध्ये हे म्हंटले आहे की एम एस सी बँकेवर काढलेला डीडी नं.32577 दि.16/02/2013 रोजी एचडीएफसी बँक यांना पाठवला डीडी न वटता परत गेला म्हणून एम एस सी बँकेने दि.27/02/2013 रोजी रिटर्न चार्जेस नावे टाकले. एचडीएफसी बँकेने स्टॉप पेमेंट घेण्याची सूचना केली होती. एम एस सी बँकेकडून प्रमाणपत्र घेऊन शेळगाव शाखेस तसे कळवावे असे पत्रात म्हंटले आहे. एम एस सी बँकेचे विप क्र.3 ला लिहिलेले दि.04/12/2014 चे पत्राची पत्र हजर केलेली आहे. त्या प्रमाणे चे क्र. 32577 हरवल्याची माहिती मिळाली होती त्या बददल स्टॉप पेमेंट नोट घेण्यात आली होती.
4. विप क्र.4 चे म्हणणे आहे की, चेक किंवा डीडी नंबर 32577 रु.99,760/- चा त्यानी एचडीएफसी बँक मुंबईला रजिष्टर पोष्टाने पाठवला. विप क्र. 1 व 2 चे म्हणणे आहे की सदरचा डीडी अपू-या रकमांमुळे अनादरीत झाला. विप क्र.3 चे सुध्दा म्हणणे आहे की डीडी अनादरीत झाला एम एस सी बँकेच्या पत्रात चेक गहाळ झाल्याचे कळवल्याचे म्हंटले आहे.
5. वास्तवीक पाहता एचडीएफसी बँकेकडून पैसे मिळण्यासाठी तो एम एस. सी. बँकेकडे जायला पाहिजे होता. जर पैसे दिले असते तर एम एस सी बँकेने तो विप क्र.4 कडे पैसे मिळण्यासाठी पाठवला असता. जर पैसे दिले नसते तर परत एचडीएफसी बँकेकडे पाठवला असता. विप क्र. 3 चे पत्राप्रमाणे पैसे न देता एम एस सी बँकेने तो एच डी एफसी बँकेकडे पाठवला पूढे त्याचा ठावठीकाणा लागत नसल्याचे दिसते.
6. अता प्रश्न असा उदभवतो की एम एस सी बॅकेने चेकची रक्कम एचडीएफसी बँकेला का पाठवली नाही. हे लक्षात घेतले पाहिजे की विप क्र. 3 व 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असून तिच्यावर कंट्रोल हा एमएससी बॅंकेचा असतो विप क्र. 3 4 ने आपल्या आर्थीक परिस्थितीबददल काहीही म्हंटलेले नाही. मात्र परीस्थिती चांगली नसल्यामुळेच एम एस सी बॅाकेने त्यांचे चेकचा अनादर केल्याचे दिसते. एमएससी बँकेला विप क्र. 3 व 4 कडून जादा येणे असणार व त्यामुळेच त्यांचे चेकचा अनादर केल्याचे दिसते. विप क्र. 3व 4 यांनी या बाबत अवाक्षर काढले नसले तरीही विप क्र.3 चे पत्रामुळे यावर बराच प्रकाश पडतो.
7. काहीही झाले तरी तक चे खात्यात पूरेशी रक्कम असल्यामुळे त्याच्या चेकचे पैसे विप क्र. 1 व 2 ला पाठवीणे हे विप क्र. 3 व 4 चे कर्तव्य होते. जर चेक गहाळ झाला असेल तर योग्य ती पाऊले उचलून त्वरीत ते पैसे देणे हे विप क्र. 3 व 4 चे कर्तव्य होते. विप क्र.3 च्या पत्रावरुन हे स्पष्ट होते की एमएससी बँकेकडे विप क्र.3 व 4 च पत घसरल्यामुळे बँकेने त्यांचे चेकचा अनादर केला. आपली पत राखणे ही विप क्र. 3 व 4 ची जबाबदारी आहे. काहीही असले तरी तक चे पैसे विप क्र. 1 व 2 ला पाठविणे ही विप क्र. 3 व 4 ची जबाबदारी होती ती पार न पाडून त्यांनी सेवेत त्रुटी केली आहे त्यामुळे तक अनूतोषास पात्र आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व2 चे उत्तर विप क्र.3 व 4 च्या विरुध्द होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विप क्र.3 व 4 यांनी तक च्या चेकची रक्कम रु. 47,300/- (रुपये सत्तेचाळीस हजार तीनशे फक्त) तसेच आकारलेल्या दंडाची रक्कम रु.5,379/-(रुपये पाच हजार तीनशे एकोणऐंशी फक्त) विप क्र.1 व 2 यांना दयावी.
3) त्यानंतर विप क्र.1 व 2 यांनी आपली नोंद वाहनाच्या आरसी बूकातून कमी करुन आरसी बुक तक ला दयावे.
4) विप क्र.3 व 4 यांनी तक ला या तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) दयावे.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद