Maharashtra

Nagpur

CC/10/291

Shri Vivek Mohanlal Walke - Complainant(s)

Versus

HCL Infosystems Ltd. - Opp.Party(s)

Adv. Amit Khare

16 Mar 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/291
 
1. Shri Vivek Mohanlal Walke
Nagpur
...........Complainant(s)
Versus
1. HCL Infosystems Ltd.
Nagpur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. Amit Khare, Advocate for the Complainant 1
 Adv. Anilkumar, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

सौ. जयश्री येंडे, सदस्‍यायांचे कथनांन्‍वये.
 
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 16/03/2012)
1.                 तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍याच्‍या कथनानुसार,  गैरअर्जदार क्र. 1 एच.सी.एल.इन्‍फोसिस्‍टीम लिमिटेड ही संगणक क्षेत्रातील राष्‍ट्रीय पातळीवरील अग्रगण्‍य कंपनी आहे. तसेच गैरअर्जदार 2 व 3 हे त्‍यांची फ्रेंचाईजी कंपनी आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांना संगणकासंबंधी शैक्षणिक व्‍यापार व्‍यवहारात सहाय्य करते. गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांनी 09.10.2008 मध्‍ये दिलेल्‍या जाहिरातीला प्रतिसाद देऊन तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 1 यांच्‍या ‘एच सी एल सर्टीफाईड इंजिनीयर’ या एक वर्षाच्‍या अभ्‍यासक्रमाकरीता प्रवेश घेतला. सदर संपूर्ण अभ्‍यासक्रमाची एकूण फी लॅपटॉपसहीत रु.75,000/- एवढी फी असल्‍याचे, तसेच सदर अभ्‍यासक्रमामध्‍ये प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षित व्‍यक्‍तींद्वारे देण्‍यात येईल. सरावाकरीता संगणक व संबंधीचे साहित्‍य, वेळोवेळी चाचणी परिक्षा घेण्‍याचे, व्‍यक्‍तीमत्‍व विकासासंबंधी विशेष वर्ग घेऊन, मुलाखतीस समोर जाण्‍याचे कसब शिकविणे, तसेच नामांकित कंपनीत प्‍लेसमेंट मिळवून देण्‍यात येईल असे गैरअर्जदार क्र. 2 यांचेद्वारे तक्रारकर्त्‍यास सांगण्‍यात आले. त्‍यामुळे सदर अभ्‍यासक्रमात तक्रारकर्त्‍याने प्रवेश घेतला व वेळोवेळी मिळून फीपोटी एकूण रु.75,000/- गैरअर्जदार यांना अदा केले. सदर अभ्‍यासक्रमाचे वर्ग ऑक्‍टोबर 2008 पासून बजाजनगर येथे सुरु झाले. पुढे गैरअर्जदारांनी टाळाटाळ करुन, बजाजनगरमधील क्‍लासेस बंद केले व नंतर मंगळवारी येथे सुरु केले. तेथेही क्‍लासेस पूर्ण केले नाही आणि कोर्स संपल्‍याचे घोषीत केले, जेव्‍हा की, अभ्‍यासक्रम पूर्ण केल्‍याच गेला नव्‍हता. काही दिवसांनी तक्रारकर्त्‍याचे असे लक्षात आले की, गैरअर्जदार यांनी दिलेल्‍या आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. बरेचदा वर्ग झाले नाही, तर कधी सदर बदलत होते, ट्रेंड सर न मिळाल्‍यामुळे मध्‍यंतरी लांब सुट्टी देण्‍यात आली. त्‍यानंतर फ्रेंचाईजी हस्‍तांतरण करुन केंद्राची जागा बदलली. परंतू नविन फ्रेंचायजी गैरअर्जदार क्र. 3 कडेसुध्‍दा ट्रेंड सर मिळाले नाही. त्‍यामुळे तसेच इतर तांत्रिक कारणामुळे सदर सरावास वेळ न मिळून सराव पूर्ण होऊ शकला नाही. तक्रारकर्त्‍याने सदर बाबी संदर्भात पत्राद्वारे तसेच फिडबॅक फॉर्मद्वारे तक्रारी कळवूनही गैरअर्जदार यांनी सदर तक्रारीस दाद दिली नाही, त्‍यामुळे सदर अभ्‍यासक्रमाचा उद्देश सफल न होऊन तक्रारकर्त्‍याचे आर्थिक नुकसान तर झालेच, तसेच उमेदीचा कालावधी वाया गेला. गैरअर्जदार यांची सदर कृती ही सेवेतील निष्‍काळजीपणा दर्शविते. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन, रु.75,000/- ही रक्‍कम 18% व्‍याजासह परत मिळावी, नुकसान भरपाई मिळावी, जाण्‍या-येण्‍याचा खर्च मिळावा, मानसिक त्रासाची भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
2.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना प्राप्‍त झाल्‍यावर त्‍यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दस्‍तऐवजासह दाखल केले.
3.          गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्‍या लेखी उत्‍तरात त्‍यांनी नमूद केले की, सदरच्‍या तक्रारीत आवश्‍यक विरुध्‍द पक्ष न केल्‍याने त्‍याची बाधा येते. तसेच सदर वाद हा लवाद/आरबीट्रेशन समोर प्रलंबित आहे. गैरअर्जदार हे भारतातील एक प्रमुख हार्डवेअर, सर्विसेस आणि आय.टी.सी. सिस्‍टम इंटेग्रेशन कंपनी असून ती गैरअर्जदाराशी संमिलित कंपनी असून आय.टी.सी. प्रॉडक्‍टसच्‍या विविध गोष्‍टींचा समावेश असून गैरअर्जदार क्र. 1 हे आय.सी.टी.प्रॉडक्‍ट्स मिळण्‍याचे एकमेव ठिकाण आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 1 ही संगणक क्षेत्रातील एक प्रमुख संस्‍था असल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे मान्‍य केले. गैरअर्जदाराचे कथनानुसार त्‍यांनी शिक्षण देण्‍याच्‍या पध्‍दतीमध्‍ये आपली मुलभूत पध्‍दती विकसित केली आहे व एक नाविन्‍यपूर्ण संस्‍था बनविली आहे. तक्रारकर्त्‍याने प्राप्‍त केलेल्‍या शैक्षणिक वस्‍तू या त्‍याच्‍या संस्‍थेमध्‍ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यांच्‍या लाभासाठी तयार केलेल्‍या आहेत. गैरअर्जदार यांनी विक्री अधिकार प्राप्‍त लोक नेमले आहेत. गैरअर्जदार क्र. 1 यांनी शैक्षणिक साहित्‍य आणि सहकारी कंपनीद्वारे विक्री अधिकार प्राप्‍त विद्यार्थ्‍यांच्‍या मदतीने तयार केलेले लॅपटॉप पुरविण्‍याबाबत आपले कार्य मर्यादित ठेवले आहेत. गैरअर्जदारांनी विक्री अधिका-यासोब्‍त वेगवेगळे करारनामे केले व ते करीयर डेव्‍हलपमेंट सेंटर स्‍थापीत करण्‍यासाठी जबाबदार आहेत.
 
            गैरअर्जदार क्र. 1 यांनी प्रथमतः ते. ऑटोमॅटीक टेक्‍नॉलॉजी प्रा. लि. या कंपनीला फ्रेंचाईझी म्‍हणून नियुक्‍त केलेले होते. ती कंपनी असूनही बजाजनगर, नागपूर येथे कार्यरत आहे. त्‍यानंतर मे. बिग विग या संस्‍थेला फ्रेंचाईझी म्‍हणून नियुक्‍त केले. त्‍यांनी विक्रीयधिकार शुल्‍क आणि इतर देय रक्‍कम पूर्णपणे दिली नाही. तसेच विद्यार्थ्‍याचे शुल्‍क खात्‍यात सरळ जमा न करता त्‍याचा अपहार केला. तसेच प्रवेश आणि निर्गमन यातही अडचण आणली आणि विद्यार्थ्‍यांचा अभ्‍यासक्रम बि‍गविगने सोडून दिल्‍यामुळे पूर्ण होऊ शकला नाही. वास्‍तविक गैरअर्जदार क्र. 1 यांनी सर्व अभ्‍यास साहित्‍य व लॅपटॉप पुरविले असतांना देखील बिगविगने आपला अहवाल सादर केला नाही. गैरअर्जदार यांनी सर्व विद्यार्थ्‍यांना बजाजनगर केंद्रात अभ्‍यासक्रम पूर्ण करण्‍याची माहिती दिली. तरी तेथे विद्यार्थी आले नाही. वास्‍तविक बिगविगने गैरअर्जदार कंपनीच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्‍यांना सर्व शिक्षण देण्‍याचे मान्‍य केले होते. तक्रारकर्त्‍याने रेकॉर्डवर दाखल केलेले कागदपत्र बिगविग केंद्राकडून देण्‍यात आले. त्‍याचा बजाजनगर केंद्राशी कोणताही संबंध नाही असे असतांना गैरअर्जदार क्र. 2 यांना प्रतिपक्ष करण्‍यात आले. वास्‍तविक बिगविग कंपनीला प्रतिपक्ष करावयास हवे होते. त्‍यांनीच सदर केंद्र एकतर्फी बंद केलेले आहे. बिगविगशी करारात लवाद नेमण्‍याचे नमूद आहे, त्‍यामुळे लवाद नेमण्‍यात आलेला आहे. तसेच मे. बिगविग यांची एम.सी.ए. 670/2010 क्रमांकाचा अर्ज मा. उच्‍च न्‍यायालय, नागपूर खंडपीठापुढे प्रलंबित आहे.
 
एवढेच नव्‍हे तर लॅपटॉप न मिळाल्‍याची बाब खोटी आहे. दि.09.02.2010 रोजी लॅपटॉप पाठविल्‍याचे गैरअजदार यांनी नमूद करुन ते मिळाल्‍याची पावती सोबत जोडलेली आहे.
 
                  -निष्‍कर्ष-
 
 
4.          दस्‍तऐवजावरील जाहिरात, तक्रारकर्त्‍याचे शपथपत्रावरील कथन, तसेच दाखल पावत्‍यांचे अवलोकन करता निर्विवादपणे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी दिलेल्‍या जाहिरातील प्रतिसाद देऊन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्‍या एच.सी.एल.सर्टीफाईड इंजिनियर या अभ्‍यासक्रमात दि.19.07.2008 रोजी प्रवेश घेतला होता. सदर अभ्‍यासक्रमाची फी लॅपटॉपसह रु.75,000/- ठरलेली होती हे तक्रारकर्त्‍याच्‍या शपथपत्रावरुन दिसून येते. त्‍यापैकी दाखल मुळ पावत्‍यांनुसार एकूण रु.35,000/- तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार यांना विविध धनादेशाद्वारे अदा केल्‍याचे दिसून येते. सदर प्रकरणी गैरअर्जदारांनी युक्‍तीवादा दरम्‍यान प्रकरणात दाखल पावत्‍या या खाडाखोड करुन रकमेत बदल केल्‍याचे नमूद केले. परंतू सदर प्रकरणी पावत्‍यांच्‍या मुळ प्रती पृ.क्र.86 वर दाखल आहे. पावत्‍यांचे अवलोकन केले असता, त्‍यामध्‍ये कुठल्‍याही प्रकारची खाडाखोड नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने रु.35,000/- गैरअर्जदारांना अदा केल्‍याचे पावतीवरुन निदर्शनास येते.  
 
5.          सदर प्रकरणात तक्रारकर्त्‍याची मुख्‍य तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार यांनी दिलेल्‍या आश्‍वासनाप्रमाणे, तसेच जाहिरातीप्रमाणे सदर अभ्‍यासक्रम शिकवला नाही, वेळेत पूर्ण केला नाही, बॅचेसचा अनियमितपणा, संगणक नादुरुस्‍त असल्‍याने सरावास वेळ मिळाला नाही, फ्रेंचाईझी हस्‍तांतरण करुन केंद्राची जागा बदलल्‍यामुळे, दोन केंद्रे सुरु झाली पण गैरअर्जदार क्र. 3 कडेसुध्‍दा प्रशिक्षीत शिक्षक वर्ग आला नाही, त्‍याचबरोबर जवळपास दोन वर्ष पूर्ण होऊनही सदर अभ्‍यासक्रम पूर्ण झाला नाही.
 
6.          गैरअर्जदार क्र. 1 यांचे मते गैरअर्जदार क्र. 2 हे स्‍वतंत्र केंद्र आहे व त्‍यांनी गैरअर्जदार क्र. 1 तर्फे शिक्षण देण्‍याचे काम अंगिकारले आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 3 हे केंद्र एकतर्फी बंद झाले. त्‍यास कारणीभूत बिग विग कंपनी आहे. सदरची कंपनी गैरअर्जदार क्र. 1 यांची फ्रेंचाईझी असली तरी विद्यार्थ्‍याचे शुल्‍क सदर कंपनीने स्विकारले व अपहार केला. वास्‍तविक गैरअर्जदार यांनी विद्या‍र्थ्‍यांना देण्‍यासाठी सर्व अभ्‍यास साहित्‍य लॅपटॉप पुरविले असतांना देखील त्‍यासंदर्भातील अहवाल सदर कंपनीने त्‍यांना दिले नाही.
 
7.          त्‍यानंतर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्‍या जवाबावरुन (परीच्‍छेद क्र.2) असेही निदर्शनास येते की, गैरअर्जदार 3 हे केंद्र बंद झाले. प्रकरणातील कागदपत्रे व गैरअर्जदाराचे जवाबावरुन एक बाब निश्चित आहे की, गैरअर्जदाराने आपल्‍या फ्रेंचाईझीमार्फत सुरु केलेला अभ्‍यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही व तक्रारकर्ता विद्यार्थ्‍यांना योग्‍य ते प्रशिक्षण मिळू शकले नाही व ‘बिग विग कंपनी’ यांनी सगळा घोळ घातल्‍यामुळे सदर परिस्थिती आलेली आहे. विद्यार्थ्‍यांनी प्रशिक्षणाकरीता नविन नेमणूक केलेल्‍या फ्रेंचाइजीकडे जावयास पाहिजे होते हे गैरअर्जदार यांचे म्‍हणणे संयुक्‍तीक वाटत नाही किंवा त्‍यामुळे गैरअर्जदार आपल्‍या जबाबदारीतून मुक्‍त होऊ शकत नाही. दस्‍तऐवज क्र. IV वरील दि.14.09.2009 चे पत्र, तसेच तक्रारकर्त्‍याचे शपथपत्र यावरुन असे निदर्शनास येते की, गैरअर्जदार क्र. 2 केंद्रातून विद्यार्थी गैरअर्जदार क्र. 3 केंद्रामध्‍ये हस्‍तांतरीत करण्‍यात आलेले होते. पर्यायाने सदर केंद्र बंद झाल्‍यामुळे सदर कारवाई गैरअर्जदार यांनी केल्‍याचे दिसून येते. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे जवाबावरुन (परिच्‍छेद क्र.2) गैरअर्जदार क्र. 3 केंद्र बंद झाले. अशात-हेने येनकेनप्रकारे हे सिध्‍द होते की, विद्या‍र्थ्‍यांना अभ्‍यासक्रम दिलेल्‍या आश्‍वासनाप्रमाणे पूर्ण होऊ शकला नाही.
 
8.          गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे मते त्‍यांची कंपनी ही भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे, असे असेल तर त्‍यामुळे त्‍यांची जबाबदारी आणखी वाढते. जर गैरअर्जदाराने नियुक्‍त केलेल्‍या फ्रेंचाईजीची कृती योग्‍य नसेल तर त्‍यांचेविरुध्‍द गैरअर्जदाराला कारवाई करता आली असती व पुढेही करता येईल. तक्रारकर्त्‍यांनी त्‍यांना लॅपटॉप व शैक्षणिक साहित्‍य मिळाले नाही असे तक्रारीत नमूद केले आहे. गैरअर्जदारांनी लॅपटॉप व शैक्षणिक साहित्‍य हे विद्यार्थ्‍यांना पुरविण्‍याकरीता बिग विग कंपनीला हस्‍तांतरीत केल्‍याचे म्‍हटले आहे. परंतू दोन्‍ही पक्षांनी विद्यार्थ्‍यांना प्रत्‍यक्षात लॅपटॉप मिळाले किंवा नाही हे दर्शविणारा कागदोपत्री पूरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. त्‍यामुळे उभय पक्षांचे एकमेकांवरील आरोप व प्रत्‍यारोप हे दस्‍तऐवजाअभावी सिध्‍द होत नाही. 
 
 
9.          प्रकरणातील वस्‍तूस्थितीवरुन हे न्‍यायमंच या निष्‍कर्षाप्रत येते की, गैरअर्जदाराने नियुक्‍त केलेल्‍या फ्रेंचायजी संस्‍थेने सदर अभ्‍यासक्रम व प्रशिक्षण योग्‍य त-हेने व त्‍यांनी दिलेल्‍या आश्‍वासनानुसार न चालविल्‍यामुळे तक्रारकर्ता विद्यार्थ्‍यांचे नुकसान झाले. ग्रा.सं.का.नुसार ‘सेवेतील कमतरता’ आहे. सदरचा अभ्‍यासक्रम हा गैरअर्जदार यांचा आहे. तो त्‍यांनी गैरअर्जदार क्र. 2 व 3 मार्फत चालविला आहे. तसेच तक्रारकर्त्‍यांनी भरलेले शुल्‍क हे कराराच्‍या अटीनुसार प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्षपणे गैरअर्जदार क्र. 1, 2 व 3 यांना मिळालेले आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांचा तक्रारकर्ता ग्राहक आहे.
10.         प्रकरणातील कागदपत्रातील असे दिसते की, तक्रारकर्त्‍याने एकूण रु.35,000/- भरलेले आहेत. त्‍यामुळे ती रक्‍कम व्‍याजासहीत परत करण्‍यास तसेच नुकसान भरपाई गैरअर्जदार क्र. 1 व 2 जबाबदार राहील.
 
11.          गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्‍या मते गैरअर्जदार क्र. 1 व बिग विग कंपनी यांच्‍यात झालेल्‍या करारानुसार लवाद नेमण्‍याची तरतूद आहे. त्‍याप्रमाणे गैरअर्जदार यांनी लवादाची नेमणूक केली असे असले तरी सदरचा करार हा सदर दोन पक्षातील आहे. त्‍यामुळे ती अट या मंचाला बंधनकारक नाही. तसेच गैरअर्जदार त्‍यांनी उल्‍लेख केलेला निवाडा हा प्रलंबित नसून त्‍याचा निकाल लागलेला आहे. तसेच सदर तक्रारीत तक्रारकर्ता हा पक्ष नसल्‍यामुळे त्‍याला तो लागू नाही. तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार यांचे सदर शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्‍ठीत नाव बघून सदर अभ्‍यासक्रमात प्रवेश घेतलेला आहे व दिलेले शुल्‍क हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 कंपनीला दिलेले आहे. त्‍यामुळे बिग विग कंपनीला आवश्‍यक पक्ष म्‍हणून सम्‍मीलित केले नाही हे म्‍हणणे मंचाला मान्‍य नाही.
 
14.         निवडलेला अभ्‍यासक्रम पूर्ण न झाल्‍याने व तसे प्रमाणपत्र, सराव प्राप्‍त न झाल्‍याने विद्यार्थ्‍यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्‍यामुळे परिणामी वेळ व भविष्‍यातील नोकरीच्‍या तदतूदींवर त्‍याचा परिणाम झाला. म्‍हणून तक्रारकर्ते सदर प्रकरणी नूकसान भरपाई व गैरअर्जदारांच्‍या सेवेतील त्रुटीमुळे तक्रार मंचासमोर दाखल करावी लागल्‍याने पर्यायाने तक्रारीचा खर्चही मिळण्‍यास पात्र आहे.
            उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन सदर मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याला रु.35,000/- ही रक्‍कम द.सा.द.शे. 9% व्‍याजासह 19.07.2008 पासून तर संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त होईपर्यंत द्यावी.      3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याला नूकसान भरपाईदाखल रु.5,000/- व      तक्रारीच्‍या खर्चादाखल रु.1,000/- द्यावे.
4)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून       30 दिवसाचे आत संयुक्‍तपणे किंवा पृथ्‍थकपणे करावे.
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.