Maharashtra

Satara

CC/14/100

VANITA KISHOR SHRISAGAR - Complainant(s)

Versus

HASTKALA CITY CENTER - Opp.Party(s)

SHINDE

12 Jun 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

 

                           तक्रार क्र. 100/2014.

                            तक्रार दाखल दि.4-7-2014.

                                    तक्रार निकाली दि.12-6-2015. 

 

सौ.वनिता किशोर क्षीरसागर.

रा.83 भवानी पेठ, सातारा.                  ....  तक्रारदार   

 

         विरुध्‍द

 

हस्‍तकला सिटी सेंटरतर्फे प्रोप्रा.

शिक्षक बँकेसमोर, पोवई नाका,

जि.सातारा.                             ....  जाबदार

 

                 तक्रारदारातर्फे अँड.आर.सी.शिंदे.  

                 जाबदार 1 तर्फे अँड.पी.एच.धुमाळ.

                                                       

                          न्‍यायनिर्णय  

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

                                                     

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.

       तक्रारदारानी जाबदारांचे दुकानातून दि.1-2-2013 रोजी काळया रंगाची साडी खरेदी केली होती.  सदर साडीची किंमत रक्‍कम रु.4,950/- होती व प्रस्‍तुत किंमतीवर 10%सूट वजा जाता रक्‍कम रु.4,455/- या किंमतीस तक्रारदाराने जाबदाराकडून साडी खरेदी केली.  सदर साडी जास्‍त किंमतीची असलेने तक्रारदारांनी सदर साडीचे टिकाऊपणाबाबत, साडीच्‍या रंगाबाबत जाबदारास विचारणा केली असता जाबदाराने साडी अत्‍यंत चांगली, टिकाऊ असलेची खात्री व भरवसा तक्रारदारास दिला.  तसेच साडीत कोणतीही उणीव अगर दोष असलेस साडी खरेदीची रक्‍कम तक्रारदारास परत देणेची खात्री व भरवसा दिला होता.  तक्रारदाराने जाबदारावर विश्‍वास ठेवून सदरची साडी रक्‍कम रु.4,455/- ला खरेदी केली.  त्‍यानंतर तक्रारदाराने सदर साडीतील ब्‍लाऊज पिस कट करत असताना असे निदर्शनास आले की, सदरची साडी अत्‍यंत जुनी असून त्‍यास धस लागलेली आहे.  सदरची बाब लक्षात येताच तक्रारदार जाबदाराचे दुकानात जाऊन साडी परत घेऊन साडीची रक्‍कम परत मागितली असता जाबदारानी साडीची रक्‍कम आज देतो, उदया देतो म्‍हणून उडवाउडवीची उत्‍तरे देत टाळाटाळ करीत आले आहेत.  आजअखेर जाबदाराने साडीची किंमत तकारदारास परत केलेली नाही व तक्रारदारास खराब साडी विक्री करुन दयावयाच्‍या सेवेत जाबदारानी कसूर केली आहे.  या कारणास्‍तव तक्रारदाराने जाबदारास दि.25-3-2014 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून साडी खरेदीची रक्‍कम रु.4,455/- व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- नुकसानभरपाईची मागणी केली परंतु आजपर्यंत जाबदाराने तक्रारदाराचे नोटीसीला उत्‍तर दिलेले नाही अगर मागणीप्रमाणे रक्‍कमही तक्रारदारास अदा केलेली नाही.  अशा प्रकारे जाबदाराने तक्रारदारास सदोष सेवा पुरवली असल्‍याने जाबदाराकडून रक्‍कम रु.4,455/- 18% व्‍याजाने मिळणेसाठी सदरचा तक्रारअर्ज तक्रारदाराने मे.मंचात दाखल केलेला आहे.   

2.     तक्रारदाराने सदर कामी जाबदारांकडून नुकसानीपोटी साडीची किंमत रक्‍कम रु.4,455/- 18% व्‍याजदराने वसूल होऊन मिळावेत, तसेच तक्रारदाराना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- 18% व्‍याजाने अदा करावेत अशी मागणी केली आहे.

3.      तक्रारदाराने सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/3 कडे अनुक्रमे तक्रारदाराने जाबदाराकडून साडी खरेदी केलेची पावती, तक्रारदाराने जाबदाराला वकीलामार्फत पाठवलेली नोटीस, सदर नोटीस जाबदारास पोहोचलेची पोहोचपावती, नि.17 कडे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.20 कडे लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने सदर कामी दाखल केली आहेत. 

4.    जाबदाराने सदर कामी हजर राहून नि.14 कडे म्‍हणणे, नि.15 कडे म्‍हणण्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.18 कडे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.21 कडे लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदारानी दाखल केली आहेत. 

       जाबदारानी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्‍यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप घेतले आहेत-

तक्रारअर्ज खोटा व लबाडीचा असून मान्‍य व कबूलनाही.  तक्रारदाराने जाबदाराकडून काळया रंगाची साडी खरेदी केलेचा मजकूर बरोबर आहे, परंतु खरी वस्‍तुस्थिती पुढीलप्रमाणे-

तक्रारदाराने दि.1-2-2013 रोजी सिल्‍क फॅन्‍सी साडी रक्‍कम रु.4,455/- (रु.चार हजार चारशे पंचावन्‍न मात्र)ला खरेदी केली आहे.  साडीची किंमत रु.4,950/- होती परंतु सदर साडीवर 10%डिस्‍काऊंट देऊन सदरची साडी रक्‍कम रु.4,455/- ला विक्री केली आहे.  सदर साडीची विक्री करतेवेळी तक्रारदाराने अँडव्‍हान्‍सपोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार मात्र)जाबदाराकडे जमा केले होते व उर्वरित रक्‍कम रु.3,455/- तक्रारदाराकडून येणे बाकी होती.  साडीखरेदी केली त्‍यावेळीच साडीतून ब्‍लाऊजपीस तक्रारदारास कापून दिला व साडीला फॉल बिडींग व टोलप्रेस करुन सदरची साडी दि.16-2-2013 रोजी तक्रारदाराचे ताब्‍यात दिली.  साडी खरेदी करताना तक्रारदाराने साडी पूर्णपणे उलगडून चेक करुन नंतरच ब्‍लाऊजपीस कट केला होता व सदर ब्‍लाऊजपीस तक्रारदारास दिला होता.  दि.16-2-2013 रोजी तक्रारदारास साडीचे बिल दिले.  त्‍या बिलाच्‍या पाठीमागे सदर साडीबाबतची सर्व सविस्‍तर माहिती दिलेली आहे.  तसेच नियम व अटीसुध्‍दा बिलाचे पाठीमागे नमूद केल्‍या आहेत.  साडीविक्री करतानाच साडीची कोणतीही गॅरंटी नसल्‍याचे जाबदाराने तक्रारदारास सांगितले होते, तरीही तक्रारदाराने सदरची साडी स्‍वतःचे हमीवर खरेदी केली होती.  तक्रारदाराने साडी खरेदी करताना फक्‍त रु.1,000/- अँडव्‍हान्‍स दिला होता व उर्वरित रक्‍कम रु.3,455/-(रु.तीन हजार चारशे पंचावन्‍न मात्र)ची मागणी जाबदाराने तक्रारदाराकडे केली होती परंतु तक्रारदार उर्वरित रक्‍कम जाबदारास देणेची टाळाटाळ करीत होते व ती रक्‍कम बुडवणेचे हेतूने जाबदाराविरुध्‍द खोटी तक्रार दाखल केली आहे.  कारण जाबदाराने तक्रारदारास सांगितले होते की, सदर उर्वरित रक्‍कम लवकरात लवकर दिली नाही तर तक्रारदाराविरुध्‍द कायदेशीर कारवाई करणेत येईल, त्‍यामुळे तक्रारदाराने तक्रारअर्जात खोटा मजकूर घालून जाबदाराविरुध्‍द खोटा तक्रारअर्ज दाखल केला आहे.  साउीचे सर्व पैसे तक्रारदाराने दिले नाहीत त्‍यामुळे तक्रारदार ही जाबदारांची ग्राहक होत नाही.  त्‍यामुळे तक्रारअर्ज चालणेस पात्र नाही.  प्रस्‍तुत साडीचा वापर तक्रारदाराने दि.16-2-2013 पासून 7-7-2014 पर्यंत म्‍हणजे तक्रार दाखल करेपर्यंत केला आहे म्‍हणजे सुमारे 17 महिने केला आहे. त्‍यामुळे 17 महिन्‍यानंतर साडी जुनीच होणार आहे. केवळ जाबदारांची उर्वरित रक्‍कम रु.3,455/-बुडवणेचे हेतूने तक्रारदाराने सदर तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे.  त्‍यामुळे तक्रारअर्ज फेटाळणेत यावा व तक्रारदाराकडून जाबदारास येणे असलेली रक्‍कम रु.3,455/- व मानसिक, शारिरीक त्रासाबाबत तक्रारदाराकडून रक्‍कम रु.40,000/- तक्रारदाराने जाबदाराला अदा करावेत असे म्‍हणणे जाबदाराने दिलेले आहे. 

5.   वर नमूद तक्रारदार व जाबदारांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.           मुद्दा                                          उत्‍तर

1.  तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय?                       होय.

2. जाबदाराने तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय?               नाही.

3. अंतिम आदेश काय?                                शेवटी नमूद आदेशाप्रमाणे.

विवेचन-

6.       वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने जाबदारांकडून रक्‍कम रु.4,455/-ची साडी खरेदी केली.  प्रस्‍तुत रकमेपैकी रक्‍कम रु.1000/- अँडव्‍हान्‍स जाबदारास अदा केले आहेत, तसेच उर्वरित रु.3,455/- देणे बाकी असलेची पावती नि.5/1 कडे दाखल आहे.  तक्रारदाराने साडी जाबदाराकडे खरेदी केलेची बाब जाबदाराने कबूल केली आहे.  सबब तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत व जाबदार हे सेवादेणार असल्‍याचे निर्विवाद सिध्‍द होते म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत. 

7.      वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने साडी खरेदी केली त्‍यावेळी जाबदाराने रक्‍कम रु.1000/- अँडव्‍हान्‍स जमा केलेनंतर जाबदाराने तक्रारदारास दि.16-2-2013 रोजी सदर साडीला फॉल बिडींग करुन होलप्रेस करुन साडीची डिलीव्‍हरी दिली.  असे नि.5/1 कडे दाखल पावतीवर नमूद आहे.  तसेच तक्रारदाराकडून रक्‍कम रु.3,455/- येणे बाकी असलेचे नमूद आहे.  तसेच सदर पावतीच्‍या मागील बाजूस नमूद असलेला मजकूर पुढीलप्रमाणे-  We can not give guarantee for colour, zari, slippage of silk saree.  No exchange, no return goods once sold will not be taken back.

         याचाच अर्थ प्रस्‍तुत साडीची जाबदारांनी गॅरंटी दिली नव्‍हती व नाही, तसेच एकदा विकलेला माल परत घेतला जाणार  नाही असेही तक्रारदारास सांगितले होते व तसा मजकूर सदर पावतीवर नमूद आहे.  वरील  नमूद सर्व मजकूर जाबदाराने साडी विकताना तक्रारदारास मराठीतून समजावून सांगितला असूनही तक्रारदाराने स्‍वतःचे हमीवर साडी खरेदी केली, तसेच तक्रारदाराने साडीची किंमत रक्‍कम रु.4,455/- पैकी रक्‍कम रु.1000/- अँडव्‍हान्‍स जमा केलेचे व उर्वरित रक्‍कम रु.3,455/- तक्रारदाराकडून येणे बाकी असलेचे सदर नि.5/1 कडील पावतीवरुन स्‍पष्‍ट होते परंतु प्रस्‍तुत बाकी रक्‍कम तक्रारदाराने तदनंतर अदा केली किंवा कसे याचे ज्ञान होत नाही आणि सदरची उर्वरित रक्‍कम जाबदारानी मागणी केलेनंतर जाबदारास दयावी लागू नये म्‍हणून साडी खराब असलेचा व साडी परत घेऊन पैसे परत मागणेचा अट्टाहास जाबदाराकडे तक्रारदाराने केलेचा दिसून येते, तसेच सदर साडीला कोणतीही गॅरंटी जाबदाराने दिलेली नाही ही बाब नि.5/1 कडील साडी खरेदीचे पावतीचे मागील बाजूस वर  सर्व बाबी स्‍पष्‍ट नमूद केल्‍या आहेत त्‍यामुळे तक्रारदारास जाबदाराने अंधारात ठेवून किंवा फसवून सदरची साडी खरेदी करणेस भाग पाडले असे म्‍हणणे न्‍यायोचित होणार नाही तसेच जाबदाराने तक्रारदारास दिलेल्‍या सेवेत कोणतीही कमतरता/त्रुटी केलेली नाही असे या मंचास वाटते.  त्‍यामुळे जाबदाराने तक्रारदारास सदोष सेवा पुरवलेली नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 

8.       सबब सदर कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                          आदेश

1.   तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करणेत येतो.

2.   सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

3.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

ठिकाण- सातारा.

दि. 12-6-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.