Maharashtra

Jalgaon

CC/08/1540

Bhagwant Laxan Patil - Complainant(s)

Versus

Hariom urban co.op society - Opp.Party(s)

Adv.Bhangale

01 Aug 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/1540
 
1. Bhagwant Laxan Patil
Bhusawal
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Hariom urban co.op society
Bhusawal
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. B.D. Nerkar PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                      
 जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
                  तक्रार क्रमांक 1540/2008
                  तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आले तारीखः – 11/11/2008
                  सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 03/12/2008.
                  तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-   01/08/2009
 
      श्री. भगवंत लक्ष्‍मण पाटील,
      वय- सज्ञान,धंदा- सेवानिवृत्‍त,
      रा. महेश नगर, प्‍लॉट नं.9, धनश्री गॅस एजन्‍सीचे पश्चिमेस,
      भुसावळ, ता.भुसावळ, जिल्‍हा जळगांव.                 ......... तक्रारदार
      विरुध्‍द
1.     हरीओम अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.भुसावळ,
रा.सिंधी कॉलनी, जामनेर रोड, आदर्श हायस्‍कुल समोर,भुसावळ,
ता.भुसावळ, जि.जळगांव. (समन्‍स म.मॅनेजर यांचेवर बजवावेत.)
2.    श्री.जानकीदास होलाराम रतनानी (चेअरमन)
रा.सिंधी कॉलनी, जानू किराणा दुकान, भुसावळ,जि.जळगांव.
3.    श्री.पंडीत देवचंद जावळे (व्‍हा.चेअरमन)
रा.हनुमान नगर, भुसावळ, ता.भुसावळ,जि.जळगांव.
4.    श्री.गोपाळ शिवराम पाटील (संचालक)
रा.साकेगांव, ता.भुसावळ, जि.जळगांव.
5.    श्री.मदन गंभीर काळे (संचालक)
रा.साकेगांव, ता.भुसावळ, जि.जळगांव.
6.    श्री.विजय गजानन नेवे (संचालक)
रा.शांतीनगर, भुसावळ, ता.भुसावळ,जि.जळगांव.
7.    श्री.दिलीप देवेंद्र पटवारी (संचालक)
रा.मरीमाता मंदीराजवळ, भुसावळ, ता.भुसावळ,जि.जळगांव.
8.    श्री.मधुकर कृष्‍णा न्‍हाळदे (संचालक)
रा.हनुमान नगर, भुसावळ, ता.भुसावळ,जि.जळगांव.
9.    श्री.राजेश टिकमचंद दोधानी (संचालक)
रा.सिंधी कॉलनी, रवी फॅन्‍सीचे बाजूस, भुसावळ, जि.जळगांव.
10.   श्री.सुरेशकुमार हसमल अघीचा (संचालक)
रा.सुनिल मिल, शिव मंदीराचे बाजूला, भुसावळ,जि.जळगांव.
11.    श्री.किरण गोपाळ पाटील (संचालक)
रा.वेडीमाता मंदीराजवळ, भुसावळ,जि.जळगांव.
12.   सौ.उमा जानकीराम रतनानी (संचालीका)
रा.सिंधी कॉलनी, जानू किराणा दुकान, भुसावळ,जि.जळगांव.
13.   शितल गोपीचंद दर्डा (संचालीका)
रा.नानकनगर, सिंधी कॉलनी, भुसावळ, ता.जि.जळगांव.
14.   पुष्‍पा रमेशलाल बत्रा (संचालीका)
रा.सिंधी कॉलनी, जुन्‍या पुजा डेअरीजवळ, भुसावळ,जि.जळगांव.
15.   आशाबाई जेठानंद शेतीजा (संचालीका)
रा.हनुमान नगर, भुसावळ, जि.जळगांव.          ..........      सामनेवाला
 
 
 
                        न्‍यायमंच पदाधिकारीः- 
                        श्री. बी.डी.नेरकर                       अध्‍यक्ष.
                        अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव           सदस्‍य.
 
                        अंतिम आदेश
                   ( निकाल दिनांकः 01/08/2009)
(निकाल कथन न्‍याय मंच सदस्‍य श्री. चंद्रकांत मोहन येशीराव यांचेकडून   )
 
                        तक्रारदारतर्फे  श्री.हेमंत अ.भंगाळे वकील   हजर
                        सामनेवाला  क्रं.4,5,6,7,8,10 व 14 तर्फे
श्री.दिपकराज सोपान खडके वकील  हजर.(नो-से)
      सामनेवाला क्र. 1,2,3,9,11,12,13 व 15 एकतर्फा.
 
                        सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्‍तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
                        1.         सामनेवाला ही महाराष्‍ट्र को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी अक्‍ट 1960 चे कायद्यान्‍वये स्‍थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्‍था आहे. सदरील सामनेवाला यांचे जळगाव जिल्‍हयात वेगवेगळया ठिकाणी शाखा आहेत. वेगवेगळया प्रकारच्‍या ठेवी स्विकारणे, त्‍यावर व्‍याजदेणे, कर्ज वाटप करणे इत्‍यादी सामनेवाला या पतसंस्‍थेचे कार्य आहेत. सामनेवाला ही एक नामांकीत पतसंस्‍था असल्‍याने इतर ठेवीदारांप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्‍थेत पुढील प्रमाणे रक्‍कम गुंतविलेल्‍या आहेत, त्‍याचा तपशील पुढील प्रमाणेः-
           
 

अ.क्र.
पावती क्रमांक
 ठेव दिनांक
रक्‍कम रुपये
देय तारीख
1
 000373
09/09/2005
58,615/-
15/09/2007
2
 000594
17/05/2006
1,00,000/-
17/09/2007
3
 000715
10/08/2006
50,000/-
10/12/2007
4
 000716
10/08/2006
50,000/-
10/12/2007
5
 000717
10/08/2006
50,000/-
10/08/2007

             
            तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्‍या मुदत ठेव पावत्‍यांची मुदत संपलेली असल्‍याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्‍याने , तक्रारदार हे त्‍यांची मुदत ठेवीची रक्‍कम सामनेवाला यांचेकडे व्‍याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्‍तरे देऊन व पैसे देण्‍यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ठेवीची रक्‍कम देण्‍यास नकार दिलेला आहे. तक्रारदार यांना सामनेवाला क्रं. 3 व 4 यांचे खालीलप्रमाणे मिळकतीचे उतारे प्राप्‍त झालेले आहेत.
            I)     मौजे भालोद, ता.यावल,जि.जळगांव येथील गट नं.1034 क्षेत्र 0हे42आर मधील श्री.पंडीत देवचंद जावळे यांचा हिस्‍सा 
            II)    मौजे भालोद, ता.यावल,जि.जळगांव येथील गट नं.546 क्षेत्र 0हे49 आर मधील श्री.पंडीत देवचंद जावळे यांचा हिस्‍सा.
            III)  मौजे साकेगांव, ता.यावल,जि.जळगांव येथील गट नं.122/1 क्षेत्र 1हे29 आर, एकुण क्षेत्र 2 हे 78 आर मधील श्री.गोपाळ शिवराम पाटील यांचा हिस्‍सा.
            येणेप्रमाणे तक्रारदार यांना सदर मिळकतीचे उतारे प्राप्‍त झालेले आहेत. तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून वरील मुदत ठेवीची रक्‍कम घेणे असल्‍याने सामनेवाला हे आपल्‍या मिळकती त्‍वरीत विल्‍हेवाट लावण्‍याच्‍या तयारीत आहेत अशी माहिती तक्रारदार यांना मिळालेली आहे. सामनेवाला हे तक्रारदार यांना रक्‍कम मिळू नये व त्‍यात अडचणी याव्‍यात म्‍हणून सामनेवाला सदरील कृत्‍य करीत आहेत. सामनेवाला यांनी वरील मिळकतीची विक्री केल्‍यास तक्रारदार यांना मे. न्‍यायमंचाचे हुकूमाप्रमाणे मुदत ठेवीची रक्‍कम वसूल करणे असंभव होईल म्‍हणून तक्रारदार यांनी सदरील तक्रारीअर्जासोबत तुर्तातुर्त मनाई हुकूमाचाही अर्ज दाखल केलेला आहे. म्‍हणून तक्रारदार यांनी मे. न्‍यायमंचास विनंती केली आहे की, तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून वरील वर्णन केलेल्‍या मुदत ठेवीच्‍या रक्‍कमा व्‍याजासह परत मिळाव्‍यात तसेच सामनेवाला क्रं.3 व 4  यांनी अथवा त्‍यांचे तर्फे अन्‍य कोणीही वरील मिळकती विकू नये अथवा त्‍या अन्‍य त-हेने तबदील करु नये असा त्‍यांचेविरुध्‍द निरंतर मनाई हुकूम देण्‍यात यावा व ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत मिळणेकामी तसेच त्‍यांना झालेल्‍या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्‍द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.      
            2.    सदरची तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आल्‍यानंतर , सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्‍यात आल्‍या. त्‍याप्रमाणे सामनेवाला क्रं. 4,5,6,7,8,10 व 14   हे तक्रारीत हजर झाले तथापी त्‍यांनी मुदती घेऊनही लेखी म्‍हणणे सादर न केल्‍याने सामनेवाला क्र. 4,5,6,7,8,10 व 14 विरुध्‍द नो-से आदेश पारीत करुन तक्रार एकतर्फा निकालासाठी घेतली.   तसेच सामनेवाला क्र. 1,2,3,9,11,12,13 व 15 हे मंचाची नोटीस प्राप्‍त होऊन देखील गैरहजर राहील्‍याने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आले.   
            3.    तक्रारदार यांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व तक्रारदाराचे वकील यांचा युक्‍तीवाद ऐकला असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
            1.     तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1)
                  प्रमाणे ग्राहक आहे काय ?                     .......होय
 
            2.    सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्‍य ती सेवा न
                  देऊन आपल्‍या सेवेत कसूर केला आहे काय       ?     ...... होय
 
      म्‍हणून आदेश काय                 अंतिम आदेशाप्रमाणे
निष्‍कर्षाची कारणेः-
             4.  मुद्या क्रमांक 1 तक्रारदार यांनी तक्रारीत निशाणी 3 अंतर्गत दाखल केलेल्‍या पावतीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी काही रक्‍कम सामनेवाला यांचे पतसंस्‍थेत ठेव म्‍हणून ठेवलेली आहेत. सबब सदरील कागदपत्रावरुन दिसून येते की, तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1) ड नुसार ग्राहक आहे.
            5.    मुद्या क्रमांक 2   दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्‍यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्‍थेत रक्‍कम  गुंतवणूक  केलेल्‍या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदत संपण्‍याआधी ठेवीदाराने सदरील रक्‍कमेची मागणी केल्‍यास ग्राहकांना त्‍यांच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा त्‍यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे हा ग्राहकाचा वाद आहे. सदरील मुदत ठेवीची रक्‍कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्‍याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्‍यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्‍कम आपल्‍या फायद्याकरीता मुद्याम स्‍वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्‍तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे तसेच सदरील तक्रार दाखल केल्‍यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्‍यांचे शपथपत्रा दाखल केल्‍यानंतरही सदरील रक्‍कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्‍या सेवेत कसूर केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्‍हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्‍यांची ठेव रक्‍कम व्‍याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्‍कम मागणेस हक्‍कदार आहे.
            तक्रारदार यांची ठेवीची रक्‍कम परतफेड करण्‍याची हमी दिल्‍यानंतर व त्‍याची मुदत संपल्‍यानंतर ठेवीची रक्‍कम देण्‍याची वसुली अभावी सामनेवाला यांनी टाळाटाळ केलेली आहे, जेणेकरुन तक्रारदार संस्‍थेने नाईलाजाने सदरहू तक्रार दाखल करुन सामनेवाला यांचेकडून ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत मिळणेकरीता विनंती केलेली आहे. कारण त्‍यांची रक्‍कम मिळणेस धोका निर्माण झाला आहे. म्‍हणून सदरहू तक्रारीत तक्रारदार यांना निशाणी 6 प्रमाणे दरम्‍यानचे हुकूमासाठी अर्ज दाखल केला आहे. त्‍यावर विद्यमान मंचाने दिनांक 13.01.2009 ला अंतरिम आदेश होणेसाठी सामनेवाला क्रं. 3 व 4 यांना नोटीस काढण्‍यात आली होती जेणेकरुन सामनेवाला क्रं.  3 व 4 ची मालमत्‍ता (अर्जाप्रमाणे ) '' जशीची तशी '' का ठेवण्‍यात येऊ नये असा आदेश पारीत केला आहे. त्‍याकरीता सदरील सामनेवाला यांनी खुलासा दाखल करावयाचा होता. त्‍याची जाणीव सामनेवाला यांना आहे कारण सामनेवाला यांना नोटीस लागून ते तक्रारीत हजर होऊन त्‍यांनी आपला खुलासा दाखल केला नाही व कोणतीही हरकत घेतलेली नाही. तसेच तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून बरीच रक्‍कम परत घ्‍यावयाची आहे ही बाब सामनेवाला यांना ज्ञात आहे. आणि अशी रक्‍कम जर सामनेवाला क्रं. 1 संस्‍था त्‍यांचे संचालक मंडळ/ चेअरमन यांचे कृतीमुळे परत करण्‍यास असमर्थ आहे तर संस्‍थेचे सर्व संचालक मंडळ/ चेअरमन स्‍वतंत्ररित्‍या व एकत्रितरित्‍या सदरील रक्‍कम परतफेड करण्‍यास जबाबदार आहेत आणि त्‍यामुळे त्‍यांची मालमत्‍ता ही जप्‍त होऊन कायद्याने विक्रीचा आदेश होऊन प्राप्‍त झालेल्‍या रक्‍कमेच्‍या धनादेशातून सबंधीत तक्रारदार यांची रक्‍कम परतफेड होऊ शकते . म्‍हणून मंचाने सदरहू तक्रारीत सामनेवाला यांची जी मालमत्‍तेबद्यल अंतरीम आदेश करीता नोटीस दिली होती तो आता या आदेशाप्रमाणे सामनेवाला क्रं. 3 व 4 ची सदरहू तक्रारीत दर्शविल्‍याप्रमाणे त्‍याचे किंवा त्‍याचे हिश्‍याची मालमत्‍ता '' जशीची तशी '' ठेवण्‍यात येत आहे. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
                        आ    दे    श 
            ( अ )       तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
            ( ब )       सामनेवाला क्रं. 1 ते 15  यांना असे निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव पावती क्रमांक 000373, 000594, 000715, 000716 व 000717 मॅच्‍युअर्ड झालेली असल्‍याने त्‍यावरील मुदती अंती देय असलेल्‍या रक्‍कमा त्‍या त्‍या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्‍यापासून ) एकत्रित रक्‍कमेवर   द.सा.द.शे . 5 टक्‍के व्‍याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( क )       सामनेवाला क्रं. 1 ते 15 यांना असेही  निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास झालेल्‍या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 2000/- नुकसान भरपाई म्‍हणून देण्‍यात यावे.
             ( ड )      सामनेवाला क्रं. 1 ते 15  यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी   रक्‍कम रुपये 1000/-   देण्‍यात यावे. 
            ( इ )             सामनेवाला क्रं. 1 ते 15 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वरील सर्व रक्‍कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत द्याव्‍यात अन्‍यथा वरील सर्व एकत्रित रक्‍कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे . 6 टक्‍के व्‍याजासह संपूर्ण रक्‍कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( ई )       सामनेवाला क्रं. 3 व 4 च्‍या तक्रारीत व निशाणी 6 मध्‍ये आणि तक्रारीत म्‍हटल्‍याप्रमाणे मालमत्‍ता मंचाचे आदेशाप्रमाणे जप्‍त करण्‍यात येते म्‍हणून सामनेवाला यांनी वरील मालमत्‍ता किंवा त्‍याचे कोणत्‍यही हिश्‍याचा व्‍यवहार करु नये आणि वरील मालमत्‍तेचा कोणालाही कोणत्‍याही प्रकारे विक्री,गहाण,दान, बक्षीस,ताबा व अन्‍य मार्गाने तबदील करु नये.   सदर आदेश सामनेवाला यांनी तक्रारदाराच्‍या इतर तक्रारीतील आदेशाप्रमाणे पूर्ण रक्‍कम तक्रारदार यांना मिळेपर्यंत सामनेवाला यांचेवर बंधनकारक राहील.
            ( फ )       सदरील तक्रारीच्‍या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्‍यास सामनेवाला क्रं. 1 ते 15 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्रा ठरतील.
            ( ग )       उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्‍क्‍याची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  गा 
दिनांकः- 01/08/2009
                  (श्री.चंद्रकांत मोहन येशीराव )        ( श्री.बी.डी.नेरकर )
                            सदस्‍य                       अध्‍यक्ष 
                                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव
 
 
 
 
[HON'ABLE MR. B.D. Nerkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.