Maharashtra

Pune

PDF/109/2007

R.A.JAIN - Complainant(s)

Versus

HAPPY HOMES LANKSCAPE PVT LTD - Opp.Party(s)

04 May 2011

ORDER

 
Complaint Case No. PDF/109/2007
 
1. R.A.JAIN
BHOSALE NAGAR, PUNE 7
...........Complainant(s)
Versus
1. HAPPY HOMES LANKSCAPE PVT LTD
MODEL COLONY, PUNE 16
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  ANJALI DESHMUKH PRESIDENT
  Smt. Sujata Patankar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्‍यक्ष यांचेनुसार,
                                                :-    निकालपत्र :-
                                                    दिनांक 4 मे 2011
 
तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे-
1.          तक्रारदारानी जाबदेणार सोबत 1998 मध्‍ये करारनामा केला. त्‍या करारनाम्‍यानुसार जाबदेणार रिव्‍हरडेल या योजनेत तक्रारदारास रक्‍कम रुपये 3,50,000/- प्रत्‍येकी भरुन प्रत्‍येकी अर्धा एकर जागा प्‍लॉट नं 307ए व 308ए रुले गाव, ता. हवेली, जिल्‍हा पुणे येथे देणार होते. जाबदेणार यांनी प्रत्‍येकी अर्ध्‍या एकरात आंबा, साग, नीम झाडे लावून देणार होते. तसेच हेल्‍थ क्‍लब, जंगल हट, ध्‍यानधारणा केन्‍द्र, योगा केन्‍द्र, निसर्गोपचार केन्‍द्र, रिट्रीट केन्‍द्र, स्‍वीमिंग पुल, अॅम्‍युसमेंट पार्क देणार होते.  त्‍यापैकी तक्रारदारानी जाबदेणार यांच्‍याकडे रक्‍कम रुपये 1,78,000/- भरले. जाबदेणार पॅम्‍प्‍लेटनुसार रेस्‍टॉरंट, फिशींग, बिलीअर्ड टेबल, वीज, पाणी, 24 तास सिक्‍युरिटी, हॉर्स व कॅमल राईडिंग, बोटींग, वॉटर स्‍कुटर, क्रिकेट पिच देखील देणार होते. प्रत्‍येकी अर्ध्‍या एकर प्‍लॉटची किंमत रक्‍कम रुपये 3,50,000/- होती. बुकींच्‍या वेळेस तक्रारदारानी रक्‍कम रुपये 69,000/- प्रत्‍येक प्‍लॉट साठी एकूण रुपये 1,38,000/- पावती क्रमांक 50565 व 50566 अन्‍वये दिनांक 20/2/1998 रोजी भरले. बुकींगची रक्‍कम भरल्‍यानंतर तक्रारदारास प्‍लॉटचे डिमार्केशन करुन देण्‍यात येईल असे सांगण्‍यात आले. तक्रारदारानी वेळोवेळी प्‍लॉटची हद्य दाखविण्‍याबाबत जाबदेणार यांना सांगितले परंतू जाबदेणार यांनी काही ना काही कारणावरुन ते नाकारले. जाबदेणार यांनी मागणी केल्‍यारुन तक्रारदारानी पुढील हप्‍त्‍यापोटी प्रत्‍येकी रुपये 57,000/- एकूण रुपये 1,14,000/- भरले. त्‍याच्‍या पावत्‍या क्र.51698 व 51699 दिनांक 8/8/1998 जाबदेणार यांनी तक्रारदारास दिल्‍या. वेळोवेळी तक्रारदारानी जागेची पाहणी केली असता योजनेत प्रगती होत नसल्‍याचे निदर्शनास आले. जाबदेणार यांनी तो प्रोजेक्‍ट अपूर्ण ठेवला. जाबदेणार यांनी तक्रारदाराकडून रक्‍कम स्विकारुन कराराप्रमाणे योजनेतील सुविधा दिल्‍या नाहीत, योजनेत प्रगती केली नाही, प्‍लॉटमध्‍ये झाडे लावून दिली नाही, म्‍हणून दिनांक 4/1/2007 रोजी वकीलामार्फत नोटीस दिली. परंतू नोटीसला जाबदेणार यांनी उत्‍तर दिले नाही. म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून भरलेली रक्‍कम रुपये 1,38,000/-, हप्‍त्‍याची रक्‍कम 1,14,000/- त्‍यावर 18 टक्‍के व्‍याज 2,99,360/-, नुकसान भरपाई रक्‍कम रुपये 1,00,000/-, व नोटीसचा खर्च मागतात. तक्रारदारानी प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली.
2.          जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागून गैरहजर. त्‍यांचेविरुध्‍द मंचानी दिनांक 30/11/2009 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला. 
3.          तक्रारदारानी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारानी जाबदेणार यांच्‍याकडे रिव्‍हरडेल या योजनेत रक्‍कम रुपये 2,52,000/- भरले. तक्रारदारानी पैसे भरल्‍याच्‍या पावत्‍या रेकॉर्डवर दाखल केल्‍या आहेत. जाबदेणार प्रत्‍येकी अर्धा एकर जागा/प्‍लॉट रुले गाव, ता. हवेली जिल्‍हा पुणे, तक्रारदारास देणार होते. जाबदेणार यांनी प्‍लॉट व करारनाम्‍यात नमूद केलेल्‍या सोई-सुविधा तक्रारदारास दिल्‍या नाहीत. या तक्रारीत दोन मुद्यांचा समावेश आहे. तक्रार ही मुदतबाहय आहे आणि दुसरे व्‍यावसायिक कारणासाठी. तक्रारदारानी जाबदेणार यांच्‍याकडे एकूण रक्‍कम रुपये 2,52,000/- पैकी रक्‍कम रुपये 1,38,000/- दिनांक 20/2/1998 मध्‍ये भरली, व रक्‍कम रुपये 1,14,000/- दिनांक 8/8/1998 रोजी भरली. पैसे भरुनही जाबदेणार यांनी प्‍लॉटवर आंब्‍याची, नीम व सागाची झाडे लावली नाही, डिमार्केशन केले नाही, वीज पाणी अंतर्गत रस्‍ते, प्‍ले ग्राऊंड या सोईसुविधा करारानुसार हेल्‍थ क्‍लब, जंगल हट, ध्‍यानधारणा केन्‍द्र, योगा केन्‍द्र, निसर्गोपचार केन्‍द्र, रिट्रीट केन्‍द्र, देण्‍याचे मान्‍य केले होते त्‍या दिल्‍या नाहीत. स्‍वीमिंग पुल, अॅम्‍युसमेंट पार्क, पॅम्‍प्‍लेटनुसार रेस्‍टॉरंट, फिशींग, बिलीअर्ड टेबल, वीज, पाणी, 24 तास सिक्‍युरिटी, हॉर्स व कॅमल राईडिंग, बोटींग, वॉटर स्‍कुटर, क्रिकेट पिच दिले नाही.  त्‍यानंतर तक्रारदारानी दिनांक 4/1/2007 रोजी जाबदेणार यांना नोटीस देऊन भरलेल्‍या रक्‍कमेचा परतावा मागितला. त्‍यानंतर मंचात दिनांक 23/4/2007 रोजी तक्रार दाखल केली. वास्‍तविक पाहता तक्रारदारानी 8/8/1998 नंतर स्‍कीममध्‍ये जाबदेणार यांनी प्रगती न केल्‍यानी तक्रारदारानी पुढील रक्‍कम भरण्‍याचे बंद केले. तक्रारदारानी 23/4/2007 रोजी मंचात जवळजवळ 9 वर्षानी तक्रार दाखल केली. विलंब माफीचा अर्ज तक्रारीसोबत दाखल करण्‍यात आलेला नाही. ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 24 ए नुसार तक्रार मुदतबाहय आहे असे मंचाचे मत आहे. दुसरा मुद्या असा की तक्रारदारानी जाबदेणार यांच्‍याकडून प्रत्‍येकी अर्ध्‍या एकराचे दोन प्‍लॉट घेतले होते. तक्रारीत असे कुठेही नमूद करण्‍यात आलेले नाही की त्‍यावर घर बांधून रहाण्‍यास तक्रारदार जाणार होते. तक्रारदार व जाबदेणार यांच्‍यात झालेल्‍या कराराची पाहणी मंचानी केली असता जाबदेणार यांनी त्‍यावर आंबा, नीम, सागाची झाडे लावणार होते, सोई सुविधा देणार होते. त्‍यावरुन या प्‍लॉटची खरेदी तक्रारदारानी नफा मिळविण्‍यासाठी, व्‍यावसायिक कारणासाठी, केलेली होती हे दिसून येते. हा वाद ग्राहक वाद होत नाही. 
            वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतो-
                                 :- आदेश :-
1.     तक्रार नामंजूर करण्‍यात येते.
2.    खर्चाबद्यल आदेश नाही.
3.    आदेशाची प्रत दोन्‍ही पक्षास विनामूल्‍य पाठविण्‍यात यावी.
 
 
 
 
[ ANJALI DESHMUKH]
PRESIDENT
 
[ Smt. Sujata Patankar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.