जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 315/2016.
तक्रार दाखल दिनांक : 25/10/2016.
तक्रार आदेश दिनांक : 19/07/2017. निकाल कालावधी: 00 वर्षे 08 महिने 24 दिवस
अमोल पिता बाबुराव रणदिवे, वय 26 वर्षे, व्यवसाय : शिक्षण व
खाजगी नोगरी, रा. कल्पना नगर, कळंब, ता. कळंब, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) हनुमंत लिंबराज कदम, वय 36 वर्षे, व्यवसाय : व्यापार,
प्रोप्रा. जगदंब मोबाईल्स्, सुनिल मार्केटच्या बाजूस, गाळा क्र.2,
मेन रोड, कळंब, ता. कळंब, जि. उस्मानाबाद.
(2) सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स्, शॉप नं.8 व 9, ए-1 खिरा नगर, बाटा
शोरुमच्या समोर, एस.व्ही. रोड, सांताक्रुझ, मुंबई, महाराष्ट्र. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : के.एस. ओव्हळ
विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेतर्फे विधिज्ञ : डी.एन. गोंड
विरुध्द पक्ष क्र. 2 अनुपस्थित
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून दि.11/11/2015 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 कंपनीचा सॅमसंग गॅलक्सी जे-1 हा मोबाईल हँडसेट रु.6,100/- किंमतीस खरेदी केला. परंतु तो मोबाईल हँडसेट सदोष होता आणि मोबाईल हँडसेट ओव्हर हीट होणे, संभाषण आवाज न येणे, हँडसेट अचानक डिसचार्ज होणे, डिस्प्ले नेहमी बंद पडणे इ. दोष निर्माण झाले. त्याबाबत विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी केज किंवा उस्मानाबाद येथील सॅमसंग सर्व्हीस सेंटरकडे जाण्याचा सल्ला दिला. तक्रारकर्ता यांनी केज व उस्मानाबाद सॅमसंग सर्व्हीस सेंटरकडे मोबाईल हँडसेट दाखवला असता रु.4,500/- खर्च येणार असल्याचे सांगितले. तक्रारकर्ता यांच्या मोबाईल हँडसेटकरिता वॉरंटी असतानाही त्यांना रु.4,500/- खर्च येणार असल्याचे सांगितले. तक्रारकर्ता यांनी मोबाईल हँडसेट दुरुस्त करुन देणे किंवा रक्कम परत करण्यासाठी विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठवली असता विरुध्द पक्ष क्र.1 यांनी नोटीसचे उत्तर देऊन नकार दिला. वरील वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून वादकथित मोबाईल हँडसेट दुरुस्त करुन देणे किंवा बदलून देणे किंवा रु.6,100/- रक्कम परत करण्याचा व मानसिक त्रासाकरिता रु.90,000/- नुकसान भरपाईसह रु.3,900/- तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे सद्यस्थितीत त्यांचे दुकान बंद आहे. दि.11/11/2015 रोजी तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडून पावती क्र.991 नुसार सॅमसंग कंपनीच्या J1104 ACE मोबाईल हँडसेट खरेदी केला. त्या पावती क्र.991 वर असणा-या अटी व शर्ती वाचून तक्रारकर्ता यांनी पावतीवर स्वाक्षरी केली. अट क्र.2 प्रमाणे मोबाईलची वॉरंटी कंपनीने दिलेली असून त्याच्याशी डिलर अथवा रिटेलरचा काहीही संबंध नाही आणि अट क्र.3 नुसार मोबाईलच्या वॉरंटीचा कालावधी त्या-त्या कंपनीने ठरवला असून त्या कालावधीमध्ये रिपेअर करुन किंवा बदलून देण्याची जबाबदारी ही कंपनीची असून त्यास कोणताही रिटेलर/डिलर जबाबदार नाही, असे नमूद आहे. तक्रारकर्ता यांच्या नुकसान भरपाईस जबाबदार नसल्यामुळे तक्रार खर्चासह नामंजूर करावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.1 यांनी केली आहे.
3. विरुध्द पक्ष क्र.2 यांना जिल्हा मंचाच्या नोटीसची बजावणी झाली आहे. त्यानंतर ते जिल्हा मंचापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करुन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
4. तक ची तक्रार त्यानी दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांची उत्तरे खालील दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप ने तक ला दोषयुक्त मोबाईल हॅन्डसेट दिला काय ? होय
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमिमांसा
5. मुद्दा क्र. 1 व 2 : तक ने विप क्र. 2 निर्मित मोबाईल हॅण्डसेट विप क्र. 1 कडून दि.11/11/2015 रोजी रु.6,100/- ला खरेदी घेतला हे पावतीवरुन दिसुन येत आहे. विप क्र.1 ने ते मान्य केलेले आहे. तक च्या महणण्याप्रमाणे मोबाईल घेतल्यापासूनच ओव्हर हिट होणे आवाज स्पष्ट न येणे अचानक डिसचार्ज होणे डिस्पले बंद पडणे असे दोष दिसुन आले. तक ला केज व उस्मानाबाद येथील सर्हिसे सेंटर मध्ये दुरुस्ती साठी रु.4,500/- खर्च सांगितले म्हणून तक ने विप ला दि.01/08/2016 ची नोटीस पाठवली तक ने त्या नोटीसची स्थळप्रत हजर केली आहे. तसेच स्वत:चे शपथपत्र दिलेले आहे.
6. विप क्र. 1 ने तक च्या तक्रारी नाकारलेल्या आहेत. मात्र तो विक्रेता आहे त्याचे म्हणणे प्रमाणे मोबाईलची वॉरंटी ही कंपनीने दिलेली आहे त्यामुळे विप क्र.1 कोणत्याही प्रकारे जबबादार नाही. विप क्र.2 उत्पादक कंपनीने या कामी हजर होऊन बचाव मांडलेला नाही. हे खरे आहे की तक ने मोबाईल हॅण्ड सेटमध्ये दोष असल्याबददल वेगळा पुरावा दिला नाही व फक्त शपथपत्र दिलेले आहे. विप क्र. 1 ने दिलेल्या पावतीनुसार वॉरंटी ही उत्पादक कंपनी महणजे विप क्र. 2 ने दिलेली आहे. विप क्र. 2 ने या कामी कोणताच बचाव घेतलेला नसल्यामुळे तिला तक च्या तक्रारी मान्य आहेत असा निष्कर्ष काढावा लागेल विप क्र. 2 ने प्रस्तुत मोबाईलची वॉरंटी दिली असल्यामुळे मोबाईल सेट मधील दोष दुरुस्त करण्याची जबाबदारी विप क्र. 2 वर आहे. त्यामुळे विप क्र. 2 ने दोषयुक्त मोबाईल सेट तक ला दिला असा निषकर्ष आम्ही काढतो. म्हणून आम्ही मुददा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीप्रामणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
1) विप क्र. 2 ने वादातील हॅण्डसेटची एक महिन्याच्या आत दुरुस्ती करुन तक ला दयावी. जर दुरुस्ती शक्य नसेल तर विप क्र. 2 ने तक ला मोबाईल सेट ची किंमत रु. 6,100/- परत दयावी.
2) विप क्र. 2 ने तक ला या तक्रारीचा खर्च रक्कम रु.3,000/- दयावा.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-