(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 26 सप्टेंबर, 2017)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 व 13 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. तक्रारकर्ता हा में. स्टार मुल्टीपंल इंटरप्राईशेज या नावाने आपला व्यापार करतो. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचे हल्दिराम फुड प्रॉडक्टसच्या पॉकीटांचा 5 वर्षापासून नियमित ग्राहक आहे व तो स्वतःकरीता व कुटूंबाकरीता नेहमी फलाहारी चिवडा व खट्टामिठ्ठा चिवडा याची पॉकीटे खरेदी करतो. तक्रारकर्त्याने नेहमीप्रमाणे दिनांक 26.3.2011 रोजी 30 ग्रॅम वजनाचे खट्टामिठ्ठा चिवड्याचे पॉकीट रुपये 5/- देवून खरेदी केला त्याचा बॅच नंबर 11 T-299 पॅक दिनांक 8.3.2011 असा लिहिला आहे. तसेच, त्याचदिवशी त्याने फलाहारी चिवडा खरेदी केले त्याचे वजन 30 ग्रॅम विक्री किंमत रुपये 5/- बॅच नंबर 11 R-294 पॅक दिनांक 13.3.2011 असे लिहिले आहे, या दोन्हीं पॉकीटांवर हल्दिराम असे लिहिले आहे याबद्दल काही तक्रार नाही. परंतु, फलाहारी चिवडा व खट्टामिठ्ठा चिवडा खरेदी करतांना तक्रारकर्त्यास असे लक्षात आले की, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 चे फलाहारी चिवडा व खट्टामिठ्ठाचे पॉकीट रुपये 10/- किंमतीचे 60 ग्रॅम वजनाचे या पॉकीटमध्ये 75 ग्रॅम माल जास्त असल्यामुळे तो पॉकीट ग्राहकांकरीता फायदेशिर आहे असे नजरेस आल्यामुळे तक्रारकर्त्यास रुपये 10/- किंमतीचे फलाहारी चिवडा व खट्टामिठ्ठा चिवडाचे पॉकीट खरेदी करण्याचा मोह झाला, त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 26.3.2011 ला रुपये 10/- किंमतीचे फलाहारी चिवडाचे पॉकीट 75 % जास्त दाखविलेले बॅच नंबर 11 R-299 पॅक दिनांक 8.3.2011 लिहिलेला खरेदील केला व त्याचप्रमाणे त्याचदिवशी म्हणजे दिनांक 26.3.2011 ला रुपये 10/- किंमतीचा खट्टामिठ्ठा चिवडाचे पॉकीट 75 % जास्त दाखविलेला बॅच नंबर 11 R-291 पॅक दिनांक 16.3.2011 असे लिहिलेला खरेदी केला, याची बिल तक्रारकर्त्याजवळ आहे.
2. परंतु, तक्रारकर्त्याचे लक्षात आले की, 75 % जास्त असलेल्या फलाहारी चिवडा व खट्टामिठ्ठाची पॉकीटावरील वजनाचे अवलोकन केले असता, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याची फसवणूक करुन त्यास लुबाडले आहे. ज्याअर्थी, रुपये 5/- च्या किंमतीच्या पॉकीटमध्ये 30 ग्रॅम माल असतो व रुपये 10/- किंमतीच्या पॉकीटमध्ये 60 ग्रॅम माल असतो, तर 75 % जास्त माल असलेल्या पॉकीटमध्ये 105 ग्रॅम माल असावयास पाहीजे होता. परंतु, हल्दिरामच्या पॉकीटवरुन असे दिसते की, विरुध्दपक्ष 30 ग्रॅम माल रुपये 5/- ला विकतात व 75 % जास्त माल देत नाही. तसेच, त्याने 26 ग्रॅम जास्त माल दाखविला, परंतु हे खोटे व लबाडीचे आहे. विरुध्दपक्षाने रुपये 10/- किंमतीचे पॉकीटमध्ये 60 ग्रॅम माल अधिकचे 75 % जास्त म्हणजे 45 ग्रॅम जास्त असावयास पाहीजे, म्हणजेच विरुध्दपक्षाच्या त्या पॉकीटमध्ये 105 ग्रॅम माल असावयास पाहीजे. परंतु, रुपये 10/- किंमतीच्या पॉकीटात लिहिलेल्या वजनाप्रमाणे विरुध्दपक्ष 105 ग्रॅम माल न देता फारच कमी माल भरतात. यावरुन, विरुध्दपक्ष हे वजनात चोरी करतात व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करतात व लोकांची लुबाडणूक व फसवणूक करतात. त्याचप्रमाणे, ग्राहकांना योग्य सेवा देत नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने खालील प्रमाणे मागणी केलेली आहे.
1) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 याचेविरुध्द कलम 12 व 13 प्रमाणे विद्यमान मंचाने प्रतिवादी विरुध्द योग्य कार्यवाही करावी व त्यांना शिक्षा करावी.
2) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासाबद्दल रुपये 5,00,000/- नुकसान भरपाईचे आदेश द्यावे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचाची नोटीस पाठविण्यात आली होती. त्यानुसार विरुध्दपक्ष क्र.1 व 2 ने लेखीउत्तर दाखल करुन त्यात नमूद केले की, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याची फसवणूक केली हे चुकीचे आहे. तक्रारकर्त्याने त्याचे फलाहारी चिवडा व खट्टामिठ्ठा चिवडाची पॉकीटवर जो आक्षेप घेतला, त्यासंबंधी विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार रुपये 10/- किंमतीचे पॉकीटचे वजन 60 ग्रॅम लिहिले असून त्या पॉकीटवर प्रामाणिकपणे पॉकीटवर ‘’34 ग्रॅम + 26 ग्रॅम जास्तीचे = 60 ग्रॅम’’ असे नमूद आहे. विरुध्दपक्षाने पॉकीट जितके वजन लिहिले आहे तेवढ्याच वजनाचा चिवडा सदर पॉकीटात उपलब्ध असल्यामुळे विरुध्दपक्षाने कुठलेही खोटे आश्वासन दिले नाही, जी सत्य परिस्थिती होती तीच पूर्णपणे ग्राहकांना सांगून आपला माल विकलेला आहे. त्यामुळे, सदर तक्रार ही सेवेत त्रुटी (Deficiency in service) या संवर्गात मोडत नसून सदर तक्रार मंचासमक्ष चालण्यास अपात्र आहे.
4. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार रुपये 5/- किंमतीचे पॉकीटमध्ये 30 ग्रॅम माल असतो व रुपये 10/- किंमतीचे पॉकीटमध्ये 60 ग्रॅम माल असता, तर 75 % जास्त माल असलेल्या पॉकीटमध्ये 105 ग्रॅम माल असावयास पाहीजे होता. परंतु, तक्रारकर्ता हे विसरले की, रुपये 5/- पॉकीटला पॅकींग करतांना त्याच्या आकार लहान असल्यामुळे किंमत कमी व माल जास्त असतो. परंतु, 60 ग्रॅम मालाच्या पॉकीटाला लागणारा खर्च हा पॉकीट मोठे असल्यामुळे खर्च जास्त येतो, त्यामुळे वरील मालात व त्याला लागणा-या लागतीत तफावत असते. त्याचप्रमाणे, विरुध्दपक्षाने जितका माल ग्राहकांना देत आहे, तेवढ्याच मालाचे विवरण पॉकीटवर लिहिले आहे, यामध्ये लोकांची लुबाडणूक किंवा फसवणूक करण्याचे कारण नाही.
5. तसेच, विरुध्दपक्ष कंपनीत तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन वजनमाप अधिकारी यांनी इन्स्पेक्शन केले असता, त्यांना सुध्दा वरील तक्रारीत तथ्य आढळून आले नाही. जर, तक्रारकर्त्यास रुपये 10/- च्या पॉकीट संबंधी काही तक्रार असेल तर ते रुपये 5/- किंमतीचे दोन पॉकीट घेऊ शकतात, त्याकरीता विरुध्दपक्षाकडून कोणतीही रोकटोक नाही. विरुध्दपक्षाने रुपे 5/- किंमतीचे पॉकीट हे समाजाची सेवा करण्याकरीता काढलेले आहे, त्या पॉकीटात त्यांना कुठलाही नफा नाही. परंतु, रुपये 10/- किंमतीच्या पॉकीटाला जास्त लागत असल्यामुळे त्यात असणारे वजन हे लागतीचे हिशोबाने बरोबर आहे. त्यामुळे, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे व्यवस्थापनावर लावलेला आरोप हे चुकीचे असून सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
6. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्षाने मौखीक युक्तीवाद केला नाही. दोन्ही पक्षानी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : नाही.
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
7. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून रुपये 5/- चे खट्टामिठ्ठा चिवडा व फलाहारी चिवडाची पॉकीट विकत घेतले व त्याचे वजन प्रत्येकी 30 ग्रॅम इतके होते. परंतु, रुपये 10/- किंमतीचे पॉकीटवर 75 % जास्तीचा माल असल्याचे लिहिले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र ते केवळ 60 ग्रॅम इतक्याच वजनाचे होते. तक्रारकर्त्याच्या म्हणण्या प्रमाणे 75 % ग्रॅम जास्तीचे वजन 105 ग्रॅम वजनाचा चिवडा पॉकीट राहणे आवश्यक होते. याबाबत, विरुध्दपक्षाने खुलासा केला आहे की, त्याने रुपये 5/- किंमतीचे चिवडाचे पॉकीट हे समजाच्या सेवेसाठी विकत आहे. परंतु, रुपये 10/- किंमतीचे पॉकीटाची लागतकरीता पॉकीट मोठे असल्यामुळे त्याकरीता लागतचा खर्च जास्त येत होता. विरुध्दपक्षाने रुपये 10/- किंमतीचे पॉकीटवर ‘’34 ग्रॅम + 26 ग्रॅम जास्तीचे = 60 ग्रॅम’’ असे प्रकाशीत केले आहे, त्यामुळे येथे जनतेची फसवणूकीचा प्रश्न येत नाही. त्याचप्रमाणे, वजनमाप विभागाचे अधिका-यांनी इन्स्पेक्शन केले असता त्यांना सुध्दा वरील तक्रारीत तथ्य आढळून आले नाही.
8. विरुध्दपक्षाने, अर्जदार यांनी मा.उच्च न्यायालय, बॉम्बे, बेंच नागपुर, नागपुर यांचेसमोर दाखल केलेले प्रकरण “Criminal Writ Petition No. 949/2014, Nilesh Marotrao Nagolkar –Vs.- Haldiram Food International Ltd., Order Dated 10.4.2015” च्या आदेशातील मत खालील प्रमाणे.
“As per the provision of Rule 6(1)(c) of the Legal Metrology (Packed Commodities) Rule 2011, the manufacturer or packer is required to mention the net quantity of the content in package and therefore the net content of the packages were checked according to the procedure prescribed in the Rule 19 of the aforesaid Rules. The net content of the packages were found within the tolerance prescribed in Rules.”
मा.उच्च न्यायालयाच्या या आदेशान्वये तक्रारकर्त्याची रिट पिटीशन नंबर 949/2014 ही खारीज करण्यात आली होती.
9. त्याचप्रमाणे, विरुध्दपक्षाने, अर्जदार यांनी Addl. Sessions Judge-7, Nagpur न्यायालयात दाखल केलेल्या “Crimianl Revision No.277/2016, Shri. Rajendra S/o. Shivkisan Agrawal and others –Vs.- Nilesh S/o. Marotrao Nagolkar, Order Dated 2.2.2017” आदेशामध्ये अमान्य घोषीत करण्यात आले व तक्रार खारीज करण्यात आली. या सर्व न्यायनिवाड्याचा आधार घेऊन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 26/09/2017