नि.65 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार अर्ज क्रमांक : 09/2010 तक्रार अर्ज दाखल झाल्याचा दि.15/02/2010 तक्रार अर्ज निकाली झाल्याचा दि.23/12/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्री.विश्वनाथ शंकर बाईत मु.पो.ते-ये (बुरंबी), ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी – 415 611. ... तक्रारदार विरुध्द 1. एच.एल.ओबेरॉय माऊली दर्शन कॉम्प्लेक्स, शेरे नाका, झाडगांव, ता.जि.रत्नागिरी. 2. एच.एल.ओबेरॉय, गंजी गल्ली, बिंदू चौक, कोल्हापूर. 3. ऍडोनीस इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि., 10, अमित प्लाझा, गणपती गारमेंट जवळ, गांधीनगर, कोल्हापूर. 4. ऍडोनीस इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि., 32, अक्षय कॉम्प्लेक्स, ढोलेपाटील रोड, पुणे – 411 001. 5. ब्लू मोबाईल करीता प्रथम टेलिकॉम इंडिया प्रा.लि., सी-202/203 भानूकांत कॉम्प्लेक्स, सीएचएस लि. आरे रोड, मुंबई – 400 063. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.एस.एस.गानू सामनेवाले क्र.1 व 5 : वगळणेत आले. सामनेवाले क्र.2 : एकतर्फा सामनेवालेक्र.3व 4 : विधिज्ञ श्री.वाय.पी.गुरव -: नि का ल प त्र :- अ) सदर कामी तक्रारदार यांनी विधिज्ञांसह व सामनेवाला क्र.3 व 4 यांनी समक्ष उपस्थित होवून नि.64 वर पुरशीस दाखल केली. सदर पुरशीसमधील मजकूर खालीलप्रमाणेः- “प्रस्तुत कामी तक्रारदार व सामनेवाला नं.2 व 3 यांचेमध्ये तडजोड झाली असून सदर तडजोडीप्रमाणे सामनेवाला नं.3 व 4 यांनी तक्रारदार यास Blue मोबाईल कंपनीचा Blue 455 X या मॉडेलचा मोबाईल हॅन्डसेट Adonis Electronics Pvt., Ltd., शेरेनाका रत्नागिरी यांचे डिलीव्हरी चलन नं.11 दि.23/12/2010 प्रमाणे त्यातील नमूद तपशीलाप्रमाणे अर्जदार यास अदा केला आहे. आता तक्रारदार याची सामनेवालाविरुध्द कोणतीही तक्रार नसल्याने प्रस्तुतचा तक्रार अर्ज मे.मंचाने निकाली करावा अशी मे.मंचास नम्र विनंती आहे.” येणेप्रमाणे पुरशीस आहे. ब) सदर पुरशिसवर पुढीलप्रमाणे आदेश करण्यात आला. ‘‘तक्रारदार व सामनेवाला 3 व 4 समक्ष उपस्थित. तक्रारदारतर्फे विधिज्ञ उपस्थित. प्रस्तुत पूरशिसमधील मजकूर मान्य व कबूल करतात. प्रस्तुत पूरशिसचे अनुषंगाने सदरचा तक्रार अर्ज निकाली करणेत येत आहे.’’ तक्रारदार व सामनेवाला क्र.3 व 4 तर्फे नि.64 वर दाखल पुरशिसच्या अनुषंगाने प्रस्तुत तक्रार अर्ज निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी दिनांक : 23/12/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |